#चालू घडामोडी नोव्हेंबर २०१४
०१) 'टाइम' या साप्ताहिकाच्या वतीने निवडण्यात आलेल्या 'पर्सन ऑफ द इयर' या वार्षिक सन्मानासाठी जागतिक नेते, व्यावसायिक आणि कला क्षेत्रातील ५० दिग्गज स्पर्धकांमध्ये कोणत्या भारतीय नेत्याचा समावेश करण्यात आला आहे?
== पंतप्रधान नरेंद्र मोदी
०२) कोकणातील कोणत्या दोन नद्यांचे पाणी अडवून मुंबईकडे वळविण्याच्या योजनेस केंद्र सरकारने तत्त्वत: मंजुरी दिली आहे?
== दमनगंगा व पिंजाळ(प्रकल्पाचा अपेक्षित खर्च सुमारे १२०० कोटी रुपये)
०३) टूजी घोटाळ्यात अडकलेल्या काही आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक असलेल्या कोणत्या व्यक्तीस या घोटाळ्याच्या तपास कामातून दूर हटवण्याचे निर्देश दिले?
== रणजीत सिन्हा( सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने)
०४) सीबीआयचे संचालक रणजीत सिन्हा टूजी घोटाळ्यातील काही आरोपींना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असून आपल्याच खात्यातील एका अधिकाऱ्याने त्याला विरोध दर्शवला असता त्याची या घोटाळ्याच्या तपास कामातून गच्छंती करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत असा आरोप करत त्यांच्याविरुध्द याचिका दाखल करणारी संस्था कोणती?
== सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन
०५) २०१६ मध्ये तब्बल दहा कोटी भारतीय ऑनलाइन शॉपिंगचे ग्राहक असतील, असे भाकीत कोणी केले आहे
== गुगल
०६) मध्यावधी निवडणुकांची घोषणा करणारे श्रीलंकेचे अध्यक्ष कोण?
== महेंद्र राजपक्षे
०७) फिजीचे पंतप्रधान फ्रँक बैनिमिरामा यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅसिफिक राष्ट्रांना किती लाख डॉलर विशेष दत्तक निधीची घोषणा केली आहे?
== १० लाख डॉलर
०८) १९८१ साली माजी पंतप्रधान,दिवंगत इंदिरा गांधी यांच्यानंतर ३३ वर्षांनंतर फिजीला भेट देणारे पहिले पंतप्रधान कोण?
== पंतप्रधान नरेंद्र मोदी
०९) अमेरिकेतून जाहीर होणाऱ्या पहिल्या पाचशे महासंगणकांच्या यादीत पहिला क्रमांकावर असणारा संगणक कोणता?
== तियानहे-२(चीन)
१०) तियानहे -२ हा संगणक चीनच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी या संस्थेने तयार केला असून तो सेकंदाला ३३.८६ पेंटाफ्लॉप या वेगाने काम करू शकतो. याचा अर्थ तो ३३८६० क्वाड्रिलियन इतकी गणने सेकंदाला करू शकतो.म्हणजेच शून्यावर किती?
== एकावर पंधरा शून्य
११) संयुक्त राष्ट्र 'द पॉवर ऑफ १.८ बिलियन' लोकसंख्या निधी अहवालानुसार तरूणांची संख्या सर्वात जास्त असलेला जगातील एकमेव देश कोणता?
== भारत(१० ते २४ वयोगटातील तरूणांची संख्या ३५.६ कोटी)
१२) आएनजी वैश्य बँकेच्या संपादनाने कोटक महिंद्र बँक ही खासगी क्षेत्रातील बँक कितव्या क्रमांकाची बँक बनणार आहे?
== चौथ्या
१३) इंदिरा गांधी शांती पुरस्कार २०१४ कोणत्या संस्थेस जाहीर करण्यात आला आहे?
== इस्रो
१४) ऑक्सफोर्ड डिक्शनरीच्या ‘वर्ड ऑफ द इयर-२०१४’ साठी निवड करण्यात आलेला शब्द कोणता?
== वेप (Vape)
१५) ‘इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स पीस प्राइज’ २०१४ साठी निवड करण्यात आलेली भारतीय वंशाची अमेरिकन तरुणी कोण?
== नेहा गुप्ता
१६) २०१४ मधली सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक घटना म्हणून टाइम मॅगझिनने कोणत्या घटनेचा उल्लेख केला आहे?
== इस्रोची मंगळ मोहीम
१७) आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे?
== पंडीत बिरजू महाराज
१८) आदित्य विक्रम बिर्ला कला किरण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात येणार आहे?
== ओडिसी नृत्य सादरण करणारे राहुल आचार्य आणि कुचीपुडी नृत्यांगना प्रतिक्षा काशी
१९) जागतिक टीव्ही दिवस (World Television Day) कधी साजरा केला जातो?
== २१ नोव्हेंबर
२०) मुंबई आणि ठाण्याला पर्यायी वाहतुकीचा मार्ग देणाऱ्या कोणत्या दोन मेट्रो प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे?
== दहिसर-चारकोप-वांद्रे-मानुखुर्द मेट्रो-२ आणि वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो ५
२१) २६ जानेवारी २०१५ च्या प्रजासत्ताकदिनाला प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित राहणार आहेत?
== अमेरिकेेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा
२२) भारताच्या दौऱ्यावर दोनवेळा येणारे पहिले अमेरिकी अध्यक्ष कोण ठरणार आहेत?
== अमेरिकेेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा(यापूर्वी नोव्हेंबर २०१० मध्ये आले होते)
२३) २०१४ या वर्षातील सर्वात नाविन्यपूर्ण आणि दाखल घेण्याजोगे संशोधन म्हणून २५ संशोधनांच्या रांगेत 'टाईम्स' ने इस्रो च्या मंगळमोहिमेचा समावेश केला आहे,यास कोणत्या नावाने संबोधित करत गौरव केला आहे?
== द सुपरस्मार्ट स्पेसक्राफ्ट
२४) २०१४ या वर्षातील सर्वात नाविन्यपूर्ण आणि दाखल घेण्याजोगे संशोधन म्हणून २५ संशोधनांच्या रांगेत 'टाईम्स' ने प्रा.नलिनी नाडकर्णी यांनी बनविलेल्या कोणत्या संकल्पनेचा समावेश करण्यात आला आहे?
== कैद्यांसाठी बनविलेली ब्यू रूम(स्नेक रिव्हर करेक्शनल इन्स्टिट्यूशन)
२५) २०१४ या वर्षातील सर्वात नाविन्यपूर्ण आणि दाखल घेण्याजोगे संशोधन म्हणून २५ संशोधनांच्या रांगेत 'टाईम्स' ने गुगलचे माजी अभियंते प्रमोद शर्मा यांच्या कोणत्या संशोधनाचा समावेश करण्यात आला आहे?
== ऑस्मो टॅबलेट
२६) एलपीआर म्हणजे काय?
== लीगल परमनंट नंबर(अमेरिकन ग्रीनकार्ड)
२७) केंद्र सरकारने कोणत्या तीन ऊर्जा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे?
== दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना,एकात्मिक ऊर्जा विकास योजना आणि ईशान्य भारत ऊर्जा पद्धती सुधारणा प्रकल्प
२८) सेवा हमी कायद्यासाठी १३ सचिवांचा समावेश असलेली एक समिती बनविण्यात आली आहे.या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
== मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय
२९) कुडाळ तालुक्यातील दशहत माजविणार्या जंगली हत्तींना काबूत करण्यासाठी वनखाते कोणती मोहीम राबविणार आहेत?
== कुणकी मोहीम
३०)भारतीय वैद्यक परिषदेने(एमसीआय) कोणत्या तीन वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रस्ताव नाकारले आहे?
== चंद्रपूर,बारामती आणि नंदूरबार
३१) मराठा आरक्षणासंदर्भात विशेष समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला असून या समितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत?
शिक्षणमंत्री विनोद तावडे
३२) शारदा चिडफंड घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खासदार असलेल्या कोणत्या नेत्यास नुकतीच अटक करण्यात आली आहे?
== श्रीन्जॉय बोस
३३) ब्राझिलमध्ये झालेल्या ६८ व्या जागतिक शरीरसौष्ठवपटू स्पर्धेत साठ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकणारा महाराष्ट्राचा खेळाडू कोण?
== दिनेश कांबळे
३४) अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेच्या 'नॅशनल बुक अॅवॉर्ड'साठी यंदा भारतीय वंशाचे लेखक आनंद गोपाल यांना 'कथाबाह्य विभागा'त नामांकन मिळाले आहे.त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी नामांकन मिळाले आहे?
== 'नो गुड मेन अमंग द लिव्हिंगः अमेरिका, तालिबान अँड द वॉर थ्रू अफगाण आइज'
३५) बिहारमधील डुमराव राजघराण्याची बदनामी केल्याच्या आरोपावरून चेतन भगत यांना नोटीस बजावण्यात आली आहे.या विषयाशी संबंधित त्यांचे पुस्तक कोणते?
== हाफ गर्लफ्रेंड
३६) २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी प्राणाची बाजी लावत स्फोटकांचा साठा शोधून अनेकांचे प्राण वाचवणा-या मुंबई पोलिसांच्या श्वान पथकातील कोणत्या श्वानाचा मृत्यू झाला आहे?
== प्रिन्स
३७) जगातील पहिली पांढ-या वाघांची सफारी मध्य प्रदेशातील कोणत्या ठिकाणी होणार आहे?
== रेवा
३८) ४५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन अतिथी कोण होते?
== अमिताभ बच्चन
३९) ४५व्या इफ्फीचे औचित्य साधून कोणत्या अभिनेत्याला सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि केंद्रीयमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते ‘शताब्दी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.?
== दाक्षिणी अभिनेते रजनीकांत (शिवाजीराव गायकवाड)
४०) जागतिक प्रसाधनगृह दिवसाच्या(१९ नोव्हेंबर) निमित्ताने संयुक्त राष्ट्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतात किती लोक प्रसाधनगृहाचा वापर करत नाहीत?
५९.७ कोटी लोक(एकूण लोकसंख्येच्या ४७ टक्के)
४१) सोची(रशिया) येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे जगज्जेतेपद दुसर्यांदा भारताचा आव्हानवीर विश्वनाथन आनंद याचा ६.५-४.५ अशा दोन गुणांच्या फरकाने पराभव करत पटकाविणारा नॉर्वेचा खेळाडू कोण?
== मॅग्नस कार्लसन
४२) नुकतेच निधन झालेले माजी पेट्रोलियम मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कोण?
== मुरली देवरा
४३) ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी केरळ मधील कोणत्या दोन नागरिकांना व्हॅटिकनसिटी येथे संतपद बहाल केल्याचे जाहीर केले?
== फादर कुरिअकोसे ऊर्फ चावारा आणि सिस्टर युफ्रेशिया इलुवेंथिकल
४४) "इवुप्रेशिम्मा‘ म्हणून ओळखल्या जाणार्या संत कोण?
== सिस्टर युफ्रेशिया (1877-1952)
४५) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षपदी कोणत्या माजी सनदी अधिकार्याची केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे?
== दीपक गुप्ता
४६) रघुवीर नेवरेकर यांचे नुकतेच निधन झाले आहे.ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
== नाटक/रंगभूमी(प्रसिध्द नाटके:- संशयकल्लोळ,शारदा)
४७) अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्व सोयींनी परिपूर्ण अशा "स्मार्ट क्लासरूम‘ निर्माण करण्याचा निर्णय कोणत्या राज्यसरकारने घेतला आहे?
== कर्नाटक
४८) कोलकता आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक विभागात "द गोल्डन बेंगॉल टायगर ट्रॉफी‘ने सन्मानित करण्यात आलेली दिग्दर्शिका कोण?
== चित्रपट दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक फराह खान
४९) गोवा चित्रपट महोस्तवात (इफ्फी) इंडियन पॅनोरमाचा उद्घाटन सिनेमाचा मान मिळालेला चित्रपट कोणता?
== एलिझाबेथ एकादशी (दिग्दर्शन परेश मोकाशी)
५०) टु-जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) करण्यात येणारा तपास आता कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे?
== सीबीआयचे अतिरिक्त संचालक आर.के. दत्ता
No comments:
Post a Comment