.
• चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्याशिवाय अन्य कोणत्याही राष्ट्रीय नेत्याचा फोटो छापण्यास रिझर्व्ह बँकेच्या पॅनेलने नकार दिला आहे. लोकसभेतील लेखी उत्तरामध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली.
• रिझर्व्ह बँकेने भविष्यातील नोटा छापण्याविषयी ऑक्टोबर २०१० मध्ये या पॅनेलची स्थापना केली होती.
------------------------
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार रेल्वे मंत्रालयाने आता महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन्सवर मोफत 'वाय-फाय' सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिल्ली रेल्वे स्टेशनवर 'वाय-फाय' सेवेचा प्रारंभ करण्यात आला.
• दिल्ली स्टेशनवरच्या सर्व १६ प्लॅटफॉर्मवर ‘वाय-फाय’ सेवा अर्धा तासासाठी मोफत मिळेल. त्यानंतर अधिक 'वाय-फाय' वापरायचे झाल्यास प्रवाशांना ३० मिनिटांसाठी २५ रुपयांचे, तर एक तासासाठी ३० रुपयांचे स्क्रॅच कार्ड घेता येईल.
• ‘वाय-फाय’ हेल्पडेस्कवर मिळणारी ही कार्ड २४ तासांसाठी वैध असणार आहेत.
------------------------
• अमेरिकेच्या सिनेटने भारतातील पुढचे राजदूत म्हणून रिचर्ड राहुल वर्मा यांच्या नावाला मंजुरी दिली.
• वर्मा ४६ वर्षांचे असून पहिलेच भारतीय वंशाचे अमेरिकी राजदूत आहेत.
No comments:
Post a Comment