ब्राम्हो समाज
राजा राममोहन रॉय यांनी १८२८ साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली

उद्देश: हिंदू धर्मग्रंथांचा चिकिस्तक अभ्यास करुन खरया धर्मतत्वांची जाणीव
लोकांना करुन देणे त्याचप्रमाणे ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी जो प्रचार
चालविला होता त्याचे उत्तर देणे
वैशिष्ट्ये: एकेश्वर वादावर भर, मूर्तीपूजेला विरोध, वेदप्रणीत हिंदू धर्मावर निष्ठा
राजा राममोहन रॉय यांच्यानंतर ब्राम्हो समाजाची धुरा देवेंद्रनाथ टागोर
यांनी संभाळली. त्यांनी १८४३ साली ब्राम्हो समाजात प्रवेश केला व केशवचंद्र
सेन यांनी १८५७ मध्ये सदस्यत्व पत्करले. परंतु या दोघांच्यात वैचारिक
मतभेद होता. देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखालील आदि ब्राम्हो समाजचे
कार्य मुख्यत्वे करुन धार्मिक सेवांपुरतेच मर्यादित होते, तर केशवचंद्र सेन
यांच्या नेतृत्वाखालील नूतन किंवा ब्राम्हो समाजाने समाजसुधारनेसारख्या
व्यापक क्षेत्रातही आपले कार्य चालू ठेवले
केशवचंद्र सेन यांनी 'सुलभ समाचार' या सप्ताहिकद्वारे आपल्या विचारांचा प्रसार केला. नूतन ब्राम्हो समाजाने, स्त्रियांनाही ब्राम्हो समाजात स्थान दिले. त्याचबरोबर स्त्रियांच्या शिक्षणासाठी 'विक्टोरिया इंस्टीट्यूट' व 'नॉर्मल स्कुल' या संस्थांचीही स्थापना केली. तंत्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन त्यांनी तंत्रनिकेतनही सुरु केले
मुलींच्या विवाहाची किमान वयोमर्यादा १४ वर्षे ठरविणारा 'दी नेटिव्ह सिव्हिल मॅरेज एक्ट' १८७२ साली पास झाला. त्यामागे केशवचंद्र सेन यांचा मोलाचा वाटा होता. परन्तु १४ वर्षे पूर्ण न झालेल्या आपल्या मुलीचा विवाह त्यांनी कुचबिहाराच्या राजाशी १८७८ साली घडवून आणला. त्यामुळे नव ब्राम्हो समाजातील काही मंडळींनी त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास उडाला आणि त्यातूनच पुढे 'साधारण ब्राम्हो समाज' या वेगळ्या संस्थेची स्थापना झाली. या दुहीमुळे ब्राम्हो समाजाचा प्रभाव कमी होऊन त्यांचे कार्य मंदावले

No comments:
Post a Comment