Wednesday, December 17, 2014

अर्थशास्त्र डायरेक्ट टॅक्स कोड:


डायरेक्ट टॅक्स कोड म्हणजेच  प्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर म्हणजे असे कर जे कायदेशीरपणे ज्या व्यक्तीवर लादलेले असतात, तीच व्यक्ती ते कर भरत असते आणि कराचे ओझेही त्याच व्यक्तीला सहन करावे लागते
या प्रत्यक्ष करांविषयीच्या एकत्रित नियमावलीला प्रत्यक्ष कर संहिता असे म्हणतात
प्रत्यक्ष कर संहिता विधेयक २०१० मध्ये संसदेत सादर झाले. १ एप्रिल २०१२ पासून ही संहिता लागू करण्याचे उदिष्ट सरकारने ठेवले होते, परंतु काही तांत्रिक बाबींमुळे ते लागू करणे शक्य झाले नाही
प्रत्यक्ष कराची काही उदिष्ठये खलीलप्रमाणे आहेत,
  • प्रत्यक्ष कर कायदा सोपा व सुटसुटीत बनविणे 
  • कराचा पाया विस्तृत करणे जेणेकरून व्यक्तिवरचा करभार कमी होईल 
  • लोकांची कर भरण्याची प्रवृत्तीस प्राधान्य देणे 
वैशिष्ट्ये:
  • प्रत्यक्ष कर संहितेद्वारे एकसमान करदेय व्यवस्था निर्माण केली ज्यावेळी एकाच दस्तावेजात बहुतेक कर आणि उपकार भरता येतील 
  • प्रत्यक्ष कर संहितेमध्ये सोप्या भाषेचा वापर केला गेला आहे. जेणेकरून करदात्यांना संहिता समजून घेताना त्याचा उपयोग होईल
  • प्रत्यक्ष कर संहितेमध्ये लवचिकता दिसून येते, संहितेच्या अनिवार्य व सामान्य तत्वांमध्ये गरजेनुसार बदल करता येतील 
  • कर अर्जावर सर्व उपयुक्त नियमांची नोंद सोप्या भाषेत करण्यात आली आहे 
  • करदर ठरविण्यासाठी दरवर्षी Finance Act नावाचा जो कायदा पास केला जातो, तो कायदा DTC  मुळे पास करण्याची गरज नाही. यामुळे करदरांमध्ये स्थिरता निर्माण होईल 
  • प्रत्यक्ष करांच्या दरातील बदल यापुढे दुरुस्ती विधेयकाने ठरविले जातील 
  • PPF, EPF, NSC इ. मधील बचत रकमा करमुक्त केल्या जातील 
  • मुदत ठेवी, शिक्षणावरील खर्च, गृहकर्जावरील व्याज व गृहकर्जाची मुद्दल रक्कम इ. करमुक्त नसेल

No comments:

Post a Comment