Sunday, December 14, 2014

एमपीएससी (पूर्वपरीक्षा) : जगाचा आर्थिक भूगोल

एमपीएससी (पूर्वपरीक्षा) : जगाचा आर्थिक भूगोल
पेपर १ मधील भूगोल या घटकाच्या अभ्यासक्रमातील जागतिक
भूगोलाअंतर्गत 'आíथक भूगोल' हा अत्यंत महत्त्वाचा उपघटक
आहे. जगाचा आíथक भूगोल अभ्यासताना विविध देशांतील खनिज
संपत्ती, त्यांचे वितरण, जगातील उद्योगधंदे, जगातील कृषी व
कृषींचे प्रकार तसेच जगातील वाहतूक यांचा अभ्यास करावा.
हा अभ्यास करताना जगातील विविध ठिकाणे लगेचच नकाशात पाहून
त्याची नोंद करावी, म्हणजे अभ्यास सोपा आणि रंजक होतो.
खनिज संपत्ती
खनिजे ही पृथ्वीच्या पोटात सापडणारी सर्वात मोठी संपत्ती आहे.
पृथ्वीचे कवच खनिज संपत्तीने परिपूर्ण आहे. औद्योगिक
क्रांतीनंतर खनिजांना अधिक महत्त्व प्राप्त झाले. भूकवचातून
खनिजे खोदून काढण्यासाठी खाणकाम विकसित झाले. खनिजांवर
देशांचा औद्योगिक विकास अवलंबून असतो. गुणधर्मानुसार खनिजांचे
तीन प्रकारे वर्गीकरण केले जाते.
* धातू खनिजे- लोह खनिजे, तांबे, जस्त, सोने, चांदी, मॅग्नेशिअम,
बॉक्साईड, क्रोमियम, युरेनियम इ. धातू भूगर्भात अशुद्ध स्वरूपात
सापडतात. त्यावर प्रक्रिया करून शुद्ध धातू मिळवतात.
* अधातू खनिजे- अभ्रक, ग्रॅफाईट, गंधक, हिरा इ. अधातू खनिजे
आहेत.
* ऊर्जा साधनसंपत्ती- कोळसा, खनिज तेल नसíगक वायू,
आण्विक ऊर्जा यांचा ऊर्जा साधनसंपत्तीत समावेश होतो.
* खनिजांचे उपयोग- लोह खनिजांचा उपयोग कृषी अवजारे, वाहनांचे
सुट्टे भाग, इमारती बांधकामे इ. करण्यासाठी होतो.
मँॅगेनिज- याचा उपयोग उच्च प्रतीचे पोलाद तयार
करण्यासाठी होतो. जगातील ९० टक्के मँॅगेनिज पोलाद
निर्मितीसाठी वापरले जाते.
बॉक्साईड- या खनिजांपासून अॅल्युमिनियम धातू मिळवला जातो.
आजच्या औद्योगिक युगात अॅल्युमिनियम धातूला फारच महत्त्व
आहे.
युरेनियम, थोरियम यांचा उपयोग
अणुऊर्जा निर्मितीसाठी केला जातो.
जगातील खनिज साठे आणि प्रमुख उत्पादक देश
* लोहखनिज - रशिया, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, कॅनडा इ.
* मँगेनिज - रशिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील इ.
* बॉक्साईड - ऑस्ट्रेलिया, जमका, ब्राझील इ.
* तांबे - चिली, संयुक्त संस्थाने, कॅनडा, रशिया इ.
* जस्त - कॅनडा, ऑस्ट्रेलिया, रशिया,चीन, पेरू इ.
* सोने - दक्षिण आफ्रिका, संयुक्त संस्थाने, रशिया, ऑस्ट्रेलिया
जगातील उद्योगधंदे
लोहपोलाद उद्योगधंदा- कोणत्याही देशाच्या औद्योगिक
प्रगतीमध्ये हा उद्योगधंदा पायाभूत मानला जातो. जगातील सर्वात
पहिली पोलाद भट्टी इ. स. पंधराव्या शतकात जर्मनीमधील
ऱ्हाईनलँड येथे उभारण्यात आली.
प्रमुख उत्पादक देश
संयुक्त संस्थाने- संयुक्त संस्थानांमधील लोहपोलाद उद्योगातील
केंद्रीकरण देशाच्या ईशान्य भागात व पंचमहासरोवरांच्या विभागात
झालेले आहे. याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे-
* या विभागात रस्ते व लोहमार्ग यांचे जाळे उत्तम प्रकारे
विकसित झाले आहे. उत्तर अॅपलेशियन विभागातून उत्तम
प्रकारच्या कोळ्शाचा पुरवठा होतो.
* देशातील हा विकसित विभाग असल्याने मोठी स्थानिक बाजारपेठ
उपलब्ध आहे.
* सुपिरिअर सरोवरालगतच्या मिनेसोटा राज्यातील मेसाबी व इतर
खाणींतून मुबलक प्रमाणात लोहखनिजांचा पुरवठा होतो.
* सुपिरिअर, मिशिगन, एरी, ओंटारिओ, ह्य़ुरॉन ही पंचमहासरोवरे,
सेंट लॉरेन्स नदी तसेच इतर अनेक कालवे यामधून स्वस्त दराने
जलवाहतूक होते.
प्रमुख उत्पादक केंद्र -
* पिट्सबर्ग, यंगस्टाऊन विभाग- हा देशातील अग्रेसर उत्पादक
विभाग आहे. देशातील सुमारे ३६ टक्के उत्पादन या विभागात होते.
पश्चिम पेनसिल्व्हेनिया, ओहिओ, केंटुकी आणि पश्चिम
व्हर्जििनया या राज्यांत हा विभाग आहे. पिट्सबर्ग, यंगस्टाऊन,
जोहान्सटाऊन, वेअरटन आणि पोर्टमाऊथ ही येथील
महत्त्वाची पोलादनिर्मिती केंद्रे आहेत.
* पंचमहासरोवरीय विभाग- या क्षेत्राचा विस्तार, डेट्रॉईटपासून
बफेलोपर्यंत झाला आहे. येथील डेट्रॉईट, बफेलो, क्लिव्हलँड,
टोलेडो लॉरेन आणि सरोवर काठावरील अनेक महत्त्वाची बंदरे
ही लोखंड पोलाद उत्पादनाची महत्त्वाची केंद्रे आहेत.
जलवाहतुकीमुळे लोखंड व कोळसा कमी दरात आणला जातो.
नायगारा जलविद्युत प्रकल्पापासून जलविद्युत पुरवठा होतो.
* मिशिगन सरोवरालगतचा प्रदेश - देशातील ३५ टक्के पोलादाचे
उत्पादन या भागात होते. शिकागो, गॅरी, सेंट लुईस,
मिलवॉकी ही प्रमुख उत्पादक क्षेत्रे आहेत. येथील
केंद्रांना इलिनॉईस व पेनसिल्व्हेनिया राज्यातून कोळसा व सुपीरिअर
सरोवराच्या प्रदेशातून लोहाचा पुरवठा होतो.
शिकागोला देशाच्या सर्व भागांतून लोहमार्ग येऊन मिळतात.
शिवाय प्रदेशाचे स्थान देशाच्या मध्यवर्ती ठिकाण असल्याने
बाजारपेठेचे सान्निध्य लाभले आहे.
* सुपीरिअर सरोवरालगतचा प्रदेश - डुलूथ हे उत्पादनाचे प्रमुख
केंद्र आहे. हा प्रदेश लोहखनिज क्षेत्रात असल्याने येथून लोखंड
घेऊन जाणाऱ्या बोटी परतीच्या वेळी कोळसा घेऊन परत येतात.
* रशियन राष्ट्रकुल देश - युक्रेन हे सर्वात मोठे व सर्वात
प्राचीन लोहपोलाद उत्पादन केंद्र आहे. युक्रेन येथे लोहपोलाद
उद्योग विकसित झाले, याची कारणे -
* डोनबास खोऱ्यात उच्च प्रतीचा कोळसा मिळतो.
* क्रिव्हॉयरॉग क्षेत्रातून लोहखनिज आणले जाते.
* निकोपोल क्षेत्रातून मॅँगनीज व चुनखडीचा पुरवठा होते.
* डॉन, निपर, डोनत्स या नद्या तसेच एॅझोव्ह समुद्रात स्वस्त
दराने जलवाहतूक होते. या सुविधांमुळे युक्रेन क्षेत्रात अनेक
महत्त्वाची लोहपोलाद निर्मितीची केंद्रे उदयास आली आहेत.
मॉस्को प्रदेश - मॉस्को, टुला, लिपेटस्क, गोर्की, कुलेबाकी इ.
लोहपोलादनिर्मितीची प्रमुख केंद्रे आहेत. येथील केंद्रांना स्थानिक
क्षेत्रांतून लोहखनिजाचा पुरवठा केला जातो.
शिवाय युक्रेन व उरल क्षेत्रातून लोहखनिज आयात केले जाते.
डोनेट्झ क्षेत्रातून कोळसा आणला जातो. या प्रदेशाच्या
दक्षिण भागातील होल्गोग्राड हेदेखील महत्त्वाचे उत्पादक
केंद्र आहे.
उराल प्रदेश- रशियातील हा दुसरा महत्त्वाचा विभाग
समजला जातो. उत्तम प्रतीच्या लोखंडाचा समृद्ध साठा तसेच
मॅँगेनीज, निकेल, क्रोमियम यांसारख्या खनिजांच्या विपुलतेमुळे
येथील लोखंड पोलादनिर्मिती केंद्राचा विकास झाला आहे.
मॅग्निटोगोस्र्क हे रशियातील पोलादनिर्मितीचे सर्वात मोठे
केंद्र आहे.
युरोप खंड -जर्मनी- हुर्र पोलादनिर्मिती क्षेत्र - देशातील सुमारे
८० टक्के पोलादाचे उत्पादन या क्षेत्रातून होते. हुर्र
ही ऱ्हाईनची एक उपनदी आहे. हुर्र नदीच्या खोऱ्यात पूर्व-पश्चिम
दिशेला ८० किमी व दक्षिण उत्तर दिशेला ४०
किमी रुंदीच्या पट्टय़ात महत्त्वाची पोलाद निर्मितीची केंद्रे आहेत.
हुर्र प्रांतात पोलादनिर्मितीचे केंद्र विकसित
होण्याची महत्त्वाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत-
* पश्चिम युरोप खंडातील समृद्ध असे कोळशाचे साठे हुर्र
क्षेत्रात आहे.
* फ्रान्स, लक्झेंबर्ग, स्वीडन, स्पेन येथून लोहखनिजांची आयात
केली जाते.
* मुबलक पाणीपुरवठा
* ऱ्हाईन व हुर्र दरम्यान स्वस्त जलवाहतुकीचा फायदा.
सार विभाग- सार येथे देशातील महत्त्वाचे कोळशाचे साठे आहेत.
फ्रान्स देशाच्या सीमेवरील लॉरेन प्रांतातून लोहखनिज आणले जाते.
ग्रेट ब्रिटन- येथे कोळशाचे साठे मोठय़ा प्रमाणात आढळतात.
परंतु, लोहखनिजाचे साठे अपुरे असल्याने स्वीडन, नॉर्वे, स्पेन,
आफ्रिका, कॅनडा येथून उच्च प्रतीच्या लोखंडाची आयात
करावी लागते. देशातील महत्त्वाचे पोलाद निर्मितीचे केंद्र
समुद्रकिनाऱ्यावरील बंदराच्या ठिकाणी स्थापित झालेले आहे.
आशिया खंड
चीन- लोहपोलाद उद्योगाला आवश्यक असणारे सारे पाठबळ
चीनमध्ये उपलब्ध आहे. लोखंड, कोळसा, चुनखडी, मँगेनिज इ.
खनिजे स्थानिक पातळीवर उपलब्ध आहेत. मांचुरिया, शान्सी,
शेन्सी, शाटुंग, क्वाँगटुंग, चिक्यांग येथील क्षेत्रातून लोखंड व
कोळसा विपुल प्रमाणात मिळतो.
जपान- येथे लोहखनिजे व कोळशाची कमतरता असून पोलाद उद्योग
येथे विकसित झाला आहे.
उत्तर क्युशू क्षेत्र - जपानमधील सुमारे २५ टक्के उत्पादन
या विभागातून होते. नागासाकी, टोबाटा ही येथील पोलाद
उत्पादनाची महत्त्वाची केंद्रे आहेत.
ओसाका- कोबे क्षेत्र - देशातील एक तृतीयांश उत्पादन
या विभागातून होते. वाकायामा, हिरोशिमा, नागोय, कोबे,
ओसाका ही येथील प्रमुख केंद्र्रेे आहेत.
टोकियो- याकोहामा क्षेत्र- येथील केंद्रांना संयुक्त संस्थानांमधून
कोळसा व भारत, मलेशिया, इंडोनेशियातून लोखंडाचा पुरवठा होतो.
टोकिओ, कावासाकी, हिताची, याकोहामा, चिबी ही प्रमुख उत्पादक
केंद्रे आहेत.
वाहन उद्योग
संयुक्त संस्थाने वाहन उद्योग हा संयुक्त संस्थानातील
महत्त्वपूर्ण उद्योग आहे. लोकांचे उच्च राहणीमान, उच्च
प्रतीच्या पोलादाचे उत्पादन वैज्ञानिक व तांत्रिक संशोधन,
मोठय़ा प्रमाणात भांडवल पुरवठा, कच्चा मालाची व
ऊर्जा साधनांची उपलब्धता, वाहन उद्योगाला सरकारने दिलेले
उत्तेजन यामुळे संयुक्त संस्थानात या उद्योगाचे केंद्रीकरण झाले
आहे.
ऑटोमोबाइल ट्रँगल- पंचमहासरोवराच्या दक्षिणेस या उद्योगाचे
केंद्रीकरण झाल्याने या क्षेत्राला 'ऑटोमोबाईल ट्रँगल' या नावाने
ओळखले जाते. या विभागाचा विस्तार बफेलो, सिनसिनाटी व
विस्कॉन्सिन या शहरांनी मर्यादित झाला आहे. डेट्रॉईट हे
या विभागातील सर्वात महत्त्वाचे केंद्र आहे. डेट्रॉईट शहरात
देशातील या व्यवसायातील २० टक्के कामगार आहेत.
जपान- जपानमधील हॉन्शू बेटावर स्वयंचलित वाहन उद्योगाचे
केंद्रीकरण झालेले आहे.
हान्शू बेटांच्या दक्षिण भागातील नागोय हे स्वयंचलित वाहन
उद्योगाचे सर्वात मोठे व महत्त्वपूर्ण केंद्र आहे. नागोय हे
देशातील महत्त्वाचे बंदर असल्याने आयात-निर्यात व्यापार सुलभ
झाला आहे. येथे जलविद्युत शक्तीचा विकास झाल्याने
ऊर्जेचा प्रश्न सुटला आहे. सुटे भाग तयार करणारे अनेक लहान-
मोठे कारखाने आहेत. याच भागात उद्योगांची प्रथम सुरूवात
झाल्याने कुशल मजुरांचा पुरवठा होतो. जपानमधील टोकियो-
याकोहामा येथेही या उद्योगाचा विकास झाला आहे.
या केंद्रांनादेखील नागोयसारखीच भौगोलिक परिस्थिती उपलब्ध
आहे. औद्योगिक क्षेत्रातील यावाटा, टोयाटो, कोबे, ओसाका,
हिरोशिमा, ही शहरेदेखील मोटारगाडय़ाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध
आहेत.
युरोप खंड
जर्मनी- जागतिक उत्पादनाच्या सुमारे १० टक्के उत्पादन जर्मनीत
होते. फॉक्सवॅगन ही मोटार गाडय़ांच्या उत्पादनातील प्रमुख
कंपनी आहे.
फ्रान्स- फ्रान्समध्ये रेनॉल्ट, प्युजो स्रिटॉन, सिमका या प्रमुख
कंपन्या वाहन उद्योगांशी संबंधित आहेत.
इटली- फियाट ही देशातील प्रमुख कंपनी आहे.
ग्रेट ब्रिटन- युरोपियन देशात जर्मनी, फ्रान्स, इटलीनंतर
हा चौथा महत्त्वाचा देश आहे. ग्रेट ब्रिटनमध्ये ऑस्टिन, मॉरिश,
रॉल्सराईस या प्रमुख गाडय़ांचे उत्पादन होते. ब्रिटिश लेलँड,
फोर्ड, जनरल मोटर्स, ब्रिटिश मोटार कॉर्पोरेशन,
मोटारगाडय़ा निर्मितीच्या कंपन्या आहेत.
जगातील प्रमुख खंडांतर्गत लोहमार्ग
खंडातून जाणाऱ्या आणि खंडाच्या दोन
टोकांना जोडणाऱ्या लोहमार्गास खंडांतर्गत लोहमार्ग असे
म्हणतात.
० कॅनेडिअन पॅसिफिक लोहमार्ग/ ट्रान्स कॅनेडिअन लोहमार्ग -
कॅनडातील हा महत्त्वपूर्ण लोहमार्ग आहे. कॅनडाच्या दक्षिण
भागातून जाणाऱ्या या लोहमार्गाची लांबी ५,६०० किमी आहे.
कॅनडाच्या पुर्व किनारपट्टीवरील हॅलिफॅक्स बंदरापासून ते
पश्चिमेकडील पॅसिफिक महासागर किनारपट्टीवरील व्हॅन्कुव्हर
बंदरापर्यंत जातो. १८८६ मध्ये हा लोहमार्ग निर्माण करण्यात
आला. या मार्गात क्विबेक - माँट्रीअल - ओटावा - विनिपेग -
मॅडिसन- कॅलगरी- व्हायकिंग हॉर्स ही प्रमुख स्थानके आहेत.
० कॅनेडियन नॅशनल लोहमार्ग - कॅनडाच्या अटलांटिक किनाऱ्यावरील
हॅलिफक्स बंदरापासून पश्चिमेकडील पॅसिफिक किनाऱ्याजवळील
व्हॅन्कुव्हर बंदरापर्यंत जातो. क्विबेक - माँट्रियल - विनिपेग -
एडमंटन ही या लोहमार्गावरील प्रमुख स्थानके आहेत.
० ट्रान्स सबेरियन लोहमार्ग- जगातील सर्वात जास्त
लांबीचा हा लोहमार्ग रशियात आहे. १९०५ साली हा मार्ग पूर्ण
झाला. रशियातील पश्चिमेकडील लेनिनग्राडपासून (सेंट पीटर्सबर्ग)
ते पूर्व किनाऱ्यावरील व्हॅलिडिव्होस्टॉकपर्यंत
जाणाऱ्या या लोहमार्गाची लांबी ९३३२ किमी. ट्रान्स सबेरियन
लोहमार्गाला 'रशियाची जीवनरेषा' म्हणतात. या मार्गावरील प्रमुख
स्थानके मॉस्को- गोर्की- ओम्स्क- नोवोसिबिस्र्क-
व्हॅलिडिवोस्टॉक आहेत.
० अंतर्गत जलमार्ग- सेंट लॉरेन्स जलमार्ग : संयुक्त संस्थाने व
कॅनडा यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आलेल्या सेंट लॉरेन्स
जलमार्गामुळे पंचमहासरोवरे सेंट लॉरेन्स नदीमार्फत अटलांटिक
महासागराला जोडलेली आहेत.
सागरी मार्ग
० उत्तर अटलांटिक सागरी मार्ग- हा जगातील सर्वात
गजबजलेला व जास्तीत जास्त मालवाहतूक करणारा जलमार्ग आहे.
या जलमार्गामुळे उत्तर अमेरिकेच्या पूर्व व ईशान्य
किनारपट्टीवरील प्रदेश व पश्चिम युरोपातील प्रगत देश
परस्परांना जोडले गेलेले आहेत. जगातील जवळजवळ २५ टक्के
व्यापार या सागरी मार्गाने चालतात.
० भूमध्य सुएझ कालवा- उत्तर अटलांटिक मार्गाच्या खालोखाल
सुएझ मार्गावरील वाहतूक चालते. कालव्याची लांबी १६० किमी तर
रुंदी ६५ मीटर आहे. या कालव्याच्या मुखाशी तांबडय़ा समुद्रातील
पोर्ट सय्यद व सुएझ ही दोन बंदरे जोडली गेलेली आहेत. सुएझ
कालव्यामुळे युरोप व आशियातील अंतर केप ऑफ गुड होप
मार्गाच्या तुलनेने आठ हजार किमीने कमी झालेले आहेत. मात्र
हा कालवा अरुंद असल्याने मोठय़ा सागरी नौका येथून जाऊ शकत
नाहीत.
० पनामा कालवा- यामुळे अटलांटिक व प्रशांत महासागर जोडले
गेलेले आहेत. कालव्याच्या अटलांटिक किनाऱ्यावर कोलोन, तर
पॅसिफिक किनाऱ्यावर पनामा ही बंदरे आहेत.
पनामा कालव्याची लांबी ८० किमी, तर रुंदी १८० ते ३३०
किमी आहे. या कालव्यामुळे अमेरिकेच्या अटलांटिक व पॅसिफिक
किनाऱ्यामधील अंतर कमी झालेले आहे. पनामा कालव्यामुळे संयुक्त
संस्थाने, ऑस्ट्रेलिया, संयुक्त संस्थाने ते जपान हे अंतर कमी झाले
आहे.
Source- Loksatta

No comments:

Post a Comment