Wednesday, December 17, 2014

जागतिक गुलामगिरी निर्देशांक-2014


डिसेंबर २०१४ जागतिक गुलामगिरी निर्देशांक-२०१४ प्रसिद्ध झाला आहे.
‘वॉक फ्री फौंडेशन’ या संस्थेतर्फे हा निर्देशांक प्रसिध्द केला जातो. (संस्थापक- ॲन्ड्र्यू आणि निकोला फॉरेस्ट, ऑस्ट्रेलियन मानवतावादी) या संस्थेतर्फे प्रसिध्द झालेला हा केवळ दुसरा निर्देशांक आहे. (पहिला २०१३ साली)
महत्वाचे – येथे गुलामगिरी हा शब्द ‘आधुनिक गुलामगिरी’ या अर्थाने वापरण्यात आलेला आहे.
निर्देशांकातील आकडेवारी :- -
जगातील गुलामगिरी २०१३च्या तुलनेत वाढली आहे. जगात एकूण ३.५८ कोटी गुलाम आहेत. १६७ देशांचा अभ्यास करून ही आकडेवारी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
गुलामगिरीचा सर्वाधिक प्रभाव असलेले देश (top ५) :- -
मॉरीटानिया, उझबेकिस्तान, हैती, कतार, भारत, पाकिस्तान
सर्वात जास्त गुलामांची संख्या असलेले देश (top ५) :- -
भारत, चीन, पाकिस्तान, उझबेकिस्तान, रशिया. ३.५८ कोटी गुलामांतील ६१% गुलाम या ५ देशांत आहेत.
सर्वात कमी गुलामगिरी :- -
खंड = युरोप आणि उत्तर अमेरिका देश = आईसलंड आणि आयरलंड
२०१४ च्या निर्देशांकाचे विशेष :- -
शासन गुलामगिरी मिटवण्यासाठी कोणते प्रयत्न करत आहे, हे देखील या वर्षीच्या निर्देशांकात पाहिले गेले. विकसित देश यात आघाडीवर आहेत तर अविकसित आणि विकसनशील (भारतासारखे) यात पिछाडीवर आहेत.
जागतिक गुलामगिरी निर्देशांकाचा उद्देश :- -
गुलामगिरीचा अंत करणे. गुलामांना ओळखणे आणि त्यांची सुटका करणे. गुलामांच्या सुटकेची एक निश्चित कार्यपद्धती विकसित करणे. (सर्व देशांना ज्याचे अनुकरून करून गुलामांची सुटका करता येईल ...) गुलामगिरी वाढवणारे समाजातील घटक ओळखणे. (उदा. व्यक्ती, संस्था, धारणा, प्रवृत्ती इ.) या घटकांना होणारा वस्तू, सेवा आणि अर्थपुरवठा थांबवणे.

No comments:

Post a Comment