Saturday, December 13, 2014

#STI पूर्वपरीक्षा स्पेशल #अतिसंभाव्य १०० प्रश्नोत्तरे


#चालू घडामोडी:- डिसेंबर २०१४:- भाग ००१

०१) रोहतक येथे चालत्या बसमध्ये छेड काढणाऱ्या तीन तरुणांना धडा शिकविण्याणाऱ्या आरती (वय २२) आणि पूजा (वय १९ ) या दोन बहिणींना येत्या प्रजासत्ताकदिनी सन्मानित करण्याचा स्तुत्य निर्णय देशातील कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे.
== हरियाना(हा निर्णय रद्द करण्यात आला आहे)

०२) बॅरिस्टर अशी ओळख असलेले व ९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे?
== अ. र. अंतुले (१९९५ ते १९९६ दरम्यान त्यांनी केंद्रीय आरोग आणि कुटुंबकल्याण मंत्रीपद)

०३) ‘चमत्कार‘, ‘जुदाई‘, ‘इश्क‘, ‘चोर के घर चोर‘, ‘अंगुर‘, ‘खट्टा-मीठा‘, ‘कोरा कागज‘, ‘चोरी मेरा काम‘ यासारख्या विनोदी चित्रपटात काम करण्यार्या कोणत्या विनोदी अभिनेत्याचे नुकतेच निधन झाले आहे?
== देवेन वर्मा

०४) महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, कोकण रेल्वे महामंडळाने कोणासोबत जयगड बंदर ते डिगणी (संगमेश्वर) हा भाग कोकण रेल्वेला जोडण्याच्या प्रकल्पांविषयी सामंजस्य करार केला आहे?
== JSW जयगड पोर्ट लि.

०५) उद्योगपती विजय मल्ल्या यांचा कोणत्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) म्हणून पुनर्नियुक्ती व्हावी यासाठी कंपनीने केलेला अर्ज केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे?
== किंगफिशर एअरलाइन्स

०६) ईशान्य भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काही महत्त्वपूर्ण घोषणा:-
- १४ नवीन रेल्वेमार्गांसाठी : २८ हजार कोटी
- ईशान्येत सहा नवी कृषी महाविद्यालयांसाठी : २० हजार कोटी
- टू जी मोबाईल सेवेसाठी : ५ हजार कोटी
- ऊर्जा केंद्र विकासासाठी : ५ हजार कोटी
- मणिपूरमध्ये क्रीडा विद्यापीठ
- पर्यटनाकडे विशेष लक्ष

०७) उत्तर प्रदेशातील कोणत्या राष्ट्रीय महामार्गांवर देशातील पहिले आधुनिक गस्ती पथके तैनात केली जाणार असून, त्यांना न्यूझीलंडच्या पोलिसांमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे?
== राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२ आणि २५

०८) ईबोलाग्रस्त देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांना आता कोणते प्रमाणपत्र बाळगणे आवश्यपक असेल?
== नो-इबोला

०९) कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री जी. के. वसन यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव काय आहे?
== तमिळ मनिला कॉंग्रेस (मूपनार)

१०) चेन्नईतील ग्लोबल रूण्णालयात एका ६४ वर्षे वयाच्या बहरीन महिलेवर कृत्रिम फुफ्फुसाच्या प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशा प्रकारची ही भारतातील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा करण्यात येत आहे. या महिलेचे नाव काय?
== फातिमा मोहम्मद अहमद (शल्यचिकित्सक डॉ. राहूल चांदोला आणि डॉ.विजील राहूलन)

११) भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ विनोदी अभिनेते देवेन वर्मा यांना कोणत्या चित्रपटातील विनोदी भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता?
== चोरी मेरा काम, चोर के घर चोर आणि अंगूर

१२) जमिनीवरुन जमिनीवर मारा करणा-या कोणत्या अणवस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओदिशाच्या किना-यावर घेण्यात आली असून चार हजार कि.मी. पर्यंतच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. तसेच हे क्षेपणास्त्र एक टन वजनापर्यंतचे अणवस्त्र वाहून नेऊ शकते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. याचे वजन १७ टन असून लांबी २० मीटर आहे?
== अग्नि-४

१३) एचआयव्ही रुग्णांसाठी कोणता हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला असून या हेल्पलाइनच्या माध्यमातून एचआयव्ही रुग्णांसाठी केंद्र व मदत व्यवस्थापन यंत्रणेची माहिती मिळणार आहे?
== १०९७ (भारतात २१ लाख जण एचआयव्हीग्रस्त आहेत)

१४) राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या नोंदणीनुसार २०१३ मध्ये महिलांवर अत्याचार वाढले असून बाल गुन्हेगारांकडून हे अत्याचार करण्याचे प्रमाण १३२ टक्क्यांनी वाढले आहे. १६ ते १८ वयोगटातील मुलांकडून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.२००२ मध्ये हे प्रमाण ४८.७ टक्के होते.तर २०१३ मध्ये हे प्रमाण किती झाले आहे?
== ६६.३ टक्के

१५) संयुक्त राष्ट्रांनी आशिया-पॅसिफिक भागाला जे लक्ष्य दिले आहे, त्याचाच एक भाग म्हणून देशातील सर्व जन्म आणि मृत्यूंची नोंद करण्याचे महत्त्वाकांक्षी आणि आव्हानात्मक ध्येय भारताने कधीपर्यत पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे?
== २०२०
१६) २०१४ च्या जागतिक एड्स दिनाची थीम काय आहे?
== Focus, Partner, Achieve: An AIDS-free Generation

१७) सोहराबुद्दीन केसमधील कोणत्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशाचे नुकतेच निधन खाले आहे?
== पी. एच. लोया

१८) सायंकाळी सहा वाजता 'उंगली' या चित्रपटाचा खेळ सुरु असतांना संपूर्ण जाळून खाक झालेले 'अलंकार' चित्रपटगृह कोणत्या शहरात आहे?
== मनमाड(जि.नाशिक)

१९) बिनधास्त शैलीतील संवादफेक व मुद्राभिनय यासाठी ओळख असलेल्या कोणत्या अभिनेत्रीचे नुकतेच निधन झाले आहे?
== नयनतारा('शांतेचं कार्ट चालू आहे':-:नाटक, 'तुला शिकवीन चांगला धडा':-चित्रपट)

२०) गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या मराठी चित्रपटांना स्पेशल ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
== मराठी पाऊल पडते पुढे आणि एक हजाराची नोट(दिग्दर्शक:-श्रीहरी साठे)

२१) ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्यूग्सच्या अपघाती मृत्यूनंतर इस्त्रायलच्या अॅशडोडमधल्या बेन ग्युरियन पार्कमध्ये खेळवण्यात येत असलेल्या एका अॅमॅच्युअर लीगमध्ये बॉलचा फटका लागल्याने अंपायरचा जागीच मृत्यू झाला आहे.त्यांचे नाव काय होते?
== हिलेल ऑस्कर

२२) मकाऊ ग्रां. प्रि. सुवर्ण बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद सलग दुसर्या वर्षी कायम राखणारी भारतीय खेळाडू कोण?
== पी. व्ही. सिंधू

२३) कोणत्या संघाने मलगा संघावर २-१ असा विजय मिळवत सर्व प्रकारच्या स्पर्धामध्ये सलग १६वा विजय मिळवत क्लब फुटबॉलच्या इतिहासात विक्रमाची नोंद केली आहे?
== रिअल माद्रिद

२४) देशात वस्तू वायदे व्यवहारांच्या सार्वत्रिकीकरणात मोलाचा वाटा असलेल्या जिओजित कॉमट्रेड लिमिटेडने आपले बोधचिन्ह आणि नावातही बदल करत कोणते नामाधिकरण केले आहे?
== जिओफिन कॉमट्रेड

२५) अमेरिकेतील कोणत्या श्वेतवर्णीय अधिकाऱ्याने फग्र्युसन येथील सेंट लुईस उपनगरात नि:शस्त्र कृष्णवर्णीय मुलावर गोळीबार करून त्याला ठार केल्याच्या प्रकरणी राजीनामा दिला आहे?
== डॅरन विल्सन

२६) गोव्यातील ४५ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात रशियाचे दिग्दर्शक आंद्रे झ्वागिनेत्सेव यांच्या कोणत्या चित्रपटाला 'सुवर्णमयूर' पुरस्कार मिळाला आहे?
== लेवियाथन

२७) गोव्यातील ४५ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले हाँगकाँगचे चित्रपट निर्माते कोण?
== वाँग कार-वाई

२८) मध्यप्रदेशातील भोपाळ शहराजवळील रायसेन जिल्ह्यातील कोणत्या भागातील विविध कंपन्यांमध्ये काम करणारे सुमारे ४१ कर्मचारीवायुगळतीमुळे आजारी पडले आहेत?
== मंदिदीप औद्योगिक वसाहत

२९) हत्येच्या व भष्ट्राचाराच्या आरोपातून इजिप्तच्या न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेले माजी अध्यक्ष कोण?
== होस्नी मुबारक

३०) यंदाच्या वर्षी देशात किती आयुर्वेदिक महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली असून यापैकी तीन महाराष्ट्रात उघडण्यात येणार आहेत?
== १८
३१) राज्यातील ३१ तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची HIV-AIDS ची लागण कमी होत असून राज्यात एकही कैदी बाधित नसलेले तुरुंग कोणते?
== विसापूर(नगर)

३२) यशवंतराव चव्हान यांच्या मंत्रिमंडळात खारभूमी आणि कामगार खात्याचे उपमंत्री असलेल्या कोणत्या नेत्याचे नुकतेच निधन झाले आहे?
== अँड.दत्ताजी खानविलकर(अलिबाग मतदारसंघ)

३३) "महाराष्ट्रातील गुन्हे-२०१३' या अहवालनुसार राज्यात अनुसूचित जातीच्या नागरिकांवरील अत्याचार्यांमध्ये ५३.८% वाढ झाली असून,सर्वात जास्त गुन्हे कोणत्या जिल्ह्यात घडले आहे?
== नांदेड
*खुनाचे सर्वाधिक प्रमाण:- नगर जिल्हा
*बलात्कार:- पुणे(ग्रामीण)

३४) 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले आहे?
== जेष्ठ गायिका श्रीमती कृष्णा कल्ले

३५) राज्य सरकारने स्वच्छ् भारत अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येकी किती अनुदान देण्याचे ठरविले आहे?
== बारा हजार रुपये(केंद्र:- नऊ हजार रुपये आणि राज्य:- तीन हजार रुपये)

३६) जागतिक व्यापार संघटनेतील १६० देशांनी भारतात शेतकर्यांना शेतीमालावर दिले जाणारे अनुदान हे कायमस्वरुपी तोडगा निघेपर्यत सुरु ठेवण्यास मंजुरी दिली आहे.यासाठी जीनीव्हा येथे २७ नोव्हेंबर रोजी कोणता करार करण्यात आला आहे?
== जागतिक सुलभीकरण करार(टीएफए)

३७) खनिज तेल आणि नैसर्गिक वायुक्षेत्रातील पाच वर्षांच्या सहकार्यासाठी भारताने नुकतेच कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे?
== मोझांबिक(पेट्रोलियम मंत्री:- धर्मेंद्र प्रधान)
*मोझोंबिक चे पेट्रोलियम मंत्री:- ओल्देमिरो ज्युलिओ

३८) २०१४-१५ चा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे?
== जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे

३९) राज्यातील विदर्भ,मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांना शेवटची मुदतवाढ कधीपर्यंत देण्यात आली आहे?
== ३० एप्रिल २०१५

४०) शासनाचे काही महत्त्वाचे निर्णय:-
* चंद्रपुर मधील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र
* बुरुड समाजातील बांबू कामगारांना स्वामित्व शुल्कात सूट
* कोल्हापूर आणि नांदेड येथे फॉरेंन्सिक लॅब्स

४१) राज्यात २०१३ मध्ये सर्वाधिक अपघात ठाणे(ग्रामीण) हद्दीत झाले असून सर्वाधिक अपघाती मृत्यू कोठे झाले आहेत?
== पुणे(ग्रामीण)

४२) बिहारचे हंगामी राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली आहे?
== केसरीनाथ त्रिपाठी

४३) भारताने 'ऑनलाईन व्हिसा ऑन अरायव्हल' ची सेवा किती देशांतील पर्यटकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे?
== ४३ देश

४४) राज्य सरकारचे वाड्मय पुरस्कार:-
* प्रौढ वाड्मय कवी केशवसुत पुरस्कार:- श्रीकांत देशमुख(बोलावें ते आम्ही)
* नाटकासाठीचा राम गणेश गडकरी पुरस्कार:- मयुर देवल(एका गुराख्याचे महाकाव्य)
* प्रौढ वाड्मय कादंबरीचा ह.ना.आपटे पुरस्कार:- विश्राम गुप्ते(ईश्वर डॉट कॉम)
* विनोदासाठी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार:- तंबी दुराई
* न.चिं.केळकर पुरस्कार:- प्रतिभा रानडे(ज्ञानकोशकार गणेश रंगो भिडे)

४५) महाराष्ट्र,मध्यप्रदेश,गोवा आणि ओडिसा या चार महत्त्वाच्या राज्यांमध्ये 'कॅटॅलिस्ट्स फॉर सोशल अक्सन(सीएसए) या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार अनाथालयातील मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण किती टक्के आहे?
== ४४% (देशपातळीवर ४६%)

४६) इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष मोर्सी यांची पुनर्नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी त्यांच्या समर्थकांनी गेल्या वर्षी १४ ऑगस्ट २०१३ मध्ये दक्षिण इजिप्तमध्ये हिंसक आंदोलन केले होते.त्यामुळे न्यायालयाने मुस्लिम ब्रदरहूडच्या किती जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे?
== १८८

४७) केनियाच्या मंडेरा भागातील एका खाणीवर कोणत्या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी हल्ला केला असून अतिरेक्यांनी खाणीमध्ये केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ३६ मजूर ठार झाले आहेत?
== अल-शबाब

४८) जागतिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनामध्ये आणखी घट करण्याचे संवेदनशील उद्दिष्ट बाळगलेल्या जागतिक हवामान परिषदेची सुरुवात कोणत्या देशात झाली आहे?
== दक्षिण अमेरिकेतील पेरू देशामध्ये (भारतासह १९० हून अधिक देशांचे प्रतिनिधी यात सहभागी)

४९) जागतिक हवामान परिषदेची २०१५ ची बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे?
== पॅरिस

५०) सर्वोच्च न्यायालयाकडून कोणत्या विषयांच्या सुनावणीसाठी विशेष पीठाची स्थापना करण्यात आली आहे?
== सामाजिक विषयांवरील

५१) सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असलेल्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे?
=== व्ही. आर. कृष्ण अय्यर

५२) सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही. आर. कृष्ण अय्यर मद्रास विधानसभेवर कोणत्या वर्षी निवडून आले होते?
== १९५२

५३) सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही. आर. कृष्ण अय्यर यांनी १९५७ मध्ये इएमएस नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखालील डाव्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद सांभाळताना कोणत्या खात्यांचा पदभार सांभाळला होता.
== कायदा, गृह, पाटबंधारे, ऊर्जा, समाज कल्याण

५४) सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही. आर. कृष्ण अय्यर यांनी १९६८ला केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ते कधी कार्यरत होते?
== १९७३-१९८०

५५) सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही. आर. कृष्ण अय्यर यांना भारत सरकारने कोण-कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले होते?
== पद्मभूषण पुरस्कार-१९८९ आणि पद्मविभूषण पुरस्कार-१९९९

५६) केंद्राच्या पंतप्रधान सडक योजनेच्या धर्तीवरच राज्यात कोणती योजना राबविण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला असून येत्या पाच वर्षांत राज्यातील सर्व गावे आणि खेड्यांना जोडण्याचा संकल्प सरकारने सोडला असून, यासाठी २५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे?
== मुख्यमंत्री सडक योजना

५७) मुख्यमंत्री ग्रामसडक योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रत्येक वर्षी राज्याच्या अर्थसंकल्पात किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे?
== ५०० कोटी (नवीन रस्ते बांधण्यासाठी २०० कोटी, तर आधीच्या रस्त्यांची डागडुजी व मजबुतीकरण करण्यासाठी ३०० कोटींचा निधी वापरण्यात येईल.)

५८) मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची सुरुवात राज्यातील ५०० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आदिवासी गावांपासून सुरू करण्यात येणार असून राज्यातील किती गावे सर्वप्रथम चांगल्या रस्त्यांनी जोडण्यात येतील?
== १२८९ गावे

५९) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या १२ डिसेंबर २०१४ रोजी ७५ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्यांचे हे अमृत महोत्सवी वर्ष राज्यभरात कोणते वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे?
== कृतज्ञता वर्ष

६०) क्रिकेट फिक्सिंसगसारखे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांना अधिकारांमध्ये वाढ करणारे बिल कोणत्या देशाच्या संसदेत संमत करण्यात आले असून नव्या कायद्यानुसार फिक्सिंोग फौजदारी गुन्हा असणार आहे?
== न्यूझीलंड (१५ डिसेंबरपासून हा नवा कायदा अमलात येईल.)

६१) अल्पबचतीला प्रोत्साहन देऊन मुलींच्या उच्च शिक्षण, विवाहासाठी सरकारने कोणती योजना जाहीर केली असून ही योजना केवळ मुलींसाठीची विशेष गुंतवणूक योजना आहे या योजनेतील गुंतवणूकीवर व्याजाचा विशेष दर देण्यात येणार आहे.
== सुकन्या समृद्धी खाते

६२) ‘सुकन्या समृद्धी खाते‘ योजनेंतर्गत मुलीच्या नावे टपाल खात्यात किंवा बॅंकेमध्ये मुदत खाते उघडणे आवश्यहक असून योजनेची मुदत २१ वर्षाची असून केवळ किती वर्षे गुंतवणूक करावी लागणार आहे?
== १४ वर्षे

६३) सुकन्या समृद्धी खाते‘ योजनेंतर्गत खाते भारतातील कोणत्याही शहरात स्थलांतरित करता येणार आहे. तसेच जमा झालेल्या रकमेतील पन्नास टक्के रक्कम मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा मुलगी किती वर्षाची झाल्यानंतर तिच्या लग्नासाठी काढता येणार आहे?
== १८ वर्षे

६४) ‘सुकन्या समृद्धी खाते‘ योजनेंतर्गत किती वर्षापर्यंतच्या कोणत्याही मुलीला हे खाते तिच्या नैसर्गिक किंवा कायदेशीर पालकांमार्फत उघडता येणार आहे. तसेच मुलगी दहा वर्षांची झाल्यावर ती स्वत:च या खात्यावरील व्यवहार करण्यात पात्र ठरणार आहे. मुलीचे निधन झाल्यास खाते तातडीने बंद करण्यात येणार असून व्याजासह खात्यातील रक्कम अदा करण्यात येणार आहे?
== १० वर्षे वयाची मुलगी

६५) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाहन उद्योगातील आघाडीच्या कोणत्या कंपनीने जपान आणि चीनमधील एकूण एक लाख ९० हजार गाड्या माघारी बोलावणार असून गाडीच्या चालकाच्या शेजारील सीटच्या बाजूच्या एअर बॅगमध्ये त्रुटी असल्याने त्या बदलण्यासाठी हा ‘रिकॉल‘ करण्यात येणार आहे?
== टोयोटा मोटर कॉर्पोरेशन कंपनी (तकाटा कॉर्पोरेशनने या एअर बॅग बनविल्या आहेत)

६६) राज्यातील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी १९८४ मध्ये कोणती समिती स्थापन करण्यात आली होती?
== दांडेकर समिती

६७) राज्यातील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी २०११ मध्ये कोणती समिती स्थापन करण्यात आली होती?
== विजय केळकर समिती (माजी केंद्रीय पेट्रोलियम सचिव)

६८) पुणे शहरातील मुळा-मुठा नदीसुधार योजनेसाठी कोणत्या कंपनीने नाममात्र व्याजदराने साडेआठशे कोटी रुपयांचे कर्ज देण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे?
== जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीने (जायका)

६९) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदी अनिलकुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यापूर्वी ते कोणत्या पदावर कार्यरत होते?
== सीबीआयच्या विशेष संचालक आणि अतिरिक्त सचिव- मुख्य दक्षता आयुक्त (१९७९च्या बिहार कॅडर बॅचचे आयपीएस अधिकारी)

७०) संतती नियमनासाठीच्या शस्त्रक्रियेदरम्यान महिलांवर सायकलच्या पंपाचा वापर करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर कोणत्या राज्यसरकारने संतती नियमन शिबिरांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत?
== ओडिशा (अंगुल जिल्ह्यातील एका शिबिरामध्ये)

७१) "ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल‘ या संस्थेच्या जागतिक भ्रष्टाचार आकलन निर्देशांकात १७८ देशांत भारताचा क्रमांक कितवा लागतो?
== ८५ वा ३६ गुणांसह (मागील वर्षी ९४व्या स्थानावर)

७२) "ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल‘ या संस्थेच्या जागतिक भ्रष्टाचार आकलन निर्देशांकात १७८ देशांत पहिल्या क्रमांक कोणत्या देशाचा लागतो?
== डेन्मार्क (सोमालिया आणि दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार)

७३) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही संकल्पना १९५५ मध्ये सर्वप्रथम कोणी जगासमोर मांडली होती?
== जॉन मॅकार्थी

७४) जगभरातील भारतीयांबद्दल लोकसभेत माहिती देताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भारताचे राष्ट्रीयत्व असलेले एकूण ६४८३ लोक जगातील वेगवेगळ्या ६८ देशांमध्ये तुरूंगवासात असून त्यापैकी सर्वाधिक १४६९ जण कोणत्या देशाच्या ताब्यात आहेत?
== सौदी अरेबिया

७५) राज्याच्या शिक्षण शुल्क नियंत्रण कायद्याची अधिसूचना जारी झाली असून येत्या शैक्षणिक वर्षापासून हा कायदा लागू होणार आहे यासाठी शाळांना कधीपर्यंत शुल्क निश्चिचत करण्यासाठी शिक्षण शुल्क समिती स्थापन करायची आहे?
== जानेवारी २०१५ पर्यंत

७६) राज्याच्या शिक्षण शुल्क नियंत्रण कायद्यानुसार व्यवस्थापनाने ठरवलेले शुल्क आणि शालेय शिक्षण शुल्क समितीने मंजूर केलेले शुल्क यात किती टक्यांनि हून अधिक फरक नसेल?
== १५%

७७) संजय गांधी निराधार योजनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?
== बॅ. अंतुले

७८) कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची घोषणा सर्वप्रथम कोणी दिली होती?
== == बॅ. अंतुले

७९) खासगीकरणाच्या माध्यमातून देशातील निवडक ५० रेल्वे स्थानके स्वच्छ करण्याचा विडा नरेंद्र मोदी सरकारने उचलला असून,यासाठी राज्यातील कोणत्या ५ रेल्वेस्थानकांची निवड करण्यात आली आहे?
== मुंबई सेंट्रल, वांद्रा, जळगाव, नाशिक रोड व सोलापूर

८०) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस (२५ डिसेंबर) यापुढे कोणता दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे?
== सुशासन दिन

८१) जगातील सर्वात स्थूल माणुस म्हणून प्रसिद्ध असलेल्या केथ मार्टिन (४४) यांचे न्यूमोनियाने निधन झाले. मृत्यूसमयी त्याचे वजन किती किलो होते?
== ४४४.५२१ किलो

८२) अमेरिकन भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व इंडोनेशियातील मालुकू प्रांतातील कोणत्या भागाला भूकंपाचा जोरदार धक्का बसला असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.० इतकी नोंदवण्यात आली आहे?
== सामुलाकी भागाला

८३) डिऑक्सिरायबोन्यूक्लिक अॅसिड अर्थात डीएनएच्या संरचनेचा शोध लावल्याबद्दल नोबेल पुरस्कार मिळवणारे ज्येष्ठ जीवशास्त्रज्ञ जेम्स डी वॉटसन यांनी लिलावाच्या माध्यमातून तब्बल किती हजार अमेरिकी डॉलर इतकी रक्कम मिळवली आहे?
== ४७ लाख ५७ हजार अमेरिकी डॉलर

८४) ज्येष्ठ जीवशास्त्रज्ञ जेम्स डी वॉटसन यांच्यासह अन्य दोन शास्त्रज्ञाना डीएनएच्या संरचनेचा शोध लावल्याबद्दल नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला होता?
== १९६२

८५) कोणत्या देशाने ‘गुगल टॅक्स’ नावाचा नवीन कर सुरू केला असून, तो बहुराष्ट्रीय कंपन्यांना लागू करण्यात आला आहे?
== इंग्लंड

८६) रिलायन्स इंडस्ट्रीजने तेलसाठय़ांचा शोध आणि शुद्धीकरणसंबंधी मेक्सिकोची राष्ट्रीय तेल कंपनी असलेल्या कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे?
== पेट्रोलिओस मेक्सिकॅनोसबरोबर (पेमेक्स)

८७) २०१४ मधील सर्वात मोठा जमीन व्यवहार (१२११ कोटी रुपये) म्हणून गुरगावजवळील चौमा गावातील जमीन कोणत्या कंपनीने स्थावर मालमत्ता कंपनी एम३एम इंडियाला विकली आहे?
== सहारा समूह

८८) २९व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे विजेते:-
*मुख्य मॅरॅथॉन(पुरुष):- एॅमॉस माइयो मैंडी(केनिया) २ तास १८ मिनिटे आणि ३६ सेकंद
*अर्ध मॅरॅथॉन(पुरुष):- डॅनियल एम. मुटेटी(केनिया) १ तास, २ मिनिटे, ५ सेकंद
*अर्ध मॅरॅथॉन(महिला);- नॅन्सी एन. वाम्बुआ(केनिया) १ तास, ११ मिनिटे, ५५ सेकंद

८९) २९व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये एकूण किती देशांमधील १५० आंतरराष्ट्रीय धावपटूंसह २५ हजार पुणेकरांनी भाग घेतला होता मॅरॅथॉनमधील हा विक्रमी सहभाग आहे?
== १० देशातील

९०) पाकिस्तानच्या कोणत्या ऑल राऊंडर खेळाडूची गोलंदाजीची शैली संशयास्पद आढळल्याने त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून बंदी घालण्यात आली आहे?
== मोहम्मद हाफीज

९१) आरसीएफ नाडकर्णी चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकाविणारा संघ कोणता?
== ओएनजीसी

९२) न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार:-
*एक डिसेंबर २०१४ पर्यंत सर्वोच्च न्यायालयात ६४ हजार ९१९ खटले प्रलंबित आहेत.
*२४ उच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या सुमारे ४४ लाखाहून अधिक आहे
* स्थानिक आणि गुन्हेगारी न्यायालयात अनुक्रमे ३४ लाख ३२ हजार ४९३ आणि १० लाख २३ हजार ७३९ खटले प्रलंबित आहेत.
*सर्वाधिक प्रलंबित खटले हे अलाहाबाद उच्च न्यायालयात आहेत.तर सिक्कीम उच्च न्यायालयात सर्वात कमी प्रलंबित खटले आहेत.

९३) भारताच्या कोणत्या दळणवळण उपग्रहाचे फ्रेंच गयाना येथील कोरु अंतराळ संशोधन केंद्राच्या तळावरुन ७ डिसेंबर रोजी पहाटे दोन वाजून १० मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले?
== जीसॅट-१६

९४) जीसॅट-१६ उपग्रहाचे वजन तीन हजार १८१.६ किग्रॅ इतके असून या उपग्रहात दळणवळणासाठी किती ट्रान्सपोन्डर लावण्यात आले आहेत?
== ४८ (इस्रोचे सॅटेलाईट सेंटरचे संचालक एस. के. शिवाकुमार)

९५) टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग २०१५ या यादीत ब्रिक्स राष्ट्रे आणि इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील १०० अव्वल विद्यापीठांची ताजी यादी जाहीर करण्यात आली आहे.या यादीत देशातील कोणते विद्यापीठ २५सावे आणि देशातील पहिल्या क्रमांकांचे विद्यापीठ आहे?
== इंडियन इन्स्टिटयुट ऑफ सायन्स’ने (आयआयएस)

९६) जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश या दहशतवादी संघटनेचा सूत्रधार असलेल्या कोणत्या दहशतवाद्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने केंद्रीय सुरक्षा पथकाच्या मदतीने आसाममधील नालबारी जिल्ह्यातून अटक केली आहे?
== शाहनूर आलम

९७) डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन वाचता येत नसल्याची तक्रार काही खासदारांनी केल्यामुळे भारतीय वैद्यकीय परिषद नियंत्रण कायद्यात सुधारणा केली असून या अंतर्गत डॉक्टरला कॅपिटल लिपीत प्रिस्क्रिप्शन सक्तीचे केले आहे.हा निर्णय घेणारे केंद्रिय आरोग्यमंत्री कोण?
== जे. पी. नड्डा

९८) शुद्ध व दर्जेदार रक्तपुरवठा करणा-या जगातील किती देशांमध्ये भारताचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे?
== ५१ देशांमध्ये

९९) केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या (इंटेलिजेंस ब्यूरो) प्रमुखपदी आयबीचे विद्यमान प्रमुख सय्यद आसिफ इब्राहिम यांच्याजागी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
== दिनेश्वर शर्मा

१००) केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या (इंटेलिजेंस ब्यूरो) प्रमुखपदी पोहचणारे पहिले मुस्लिम व्यक्ती कोण?
== सय्यद आसिफ इब्राहिम

3 comments: