१. दगडी कोळसा - महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे पूर्व विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्य़ांत आढळतात. भूर्गभीय शास्त्राच्या दृष्टीने महाराष्ट्रातील दगडी कोळसा हा गोंडवनी संघाच्या व दामुदा मालेतील बाराकार समुदायातील खडकात आढळतो. भारताच्या दगडी कोळशाच्या एकूण साठय़ांपकी सुमारे चार टक्के कोळशाचा साठा महाराष्ट्रात आढळतो. महाराष्ट्रात दगडी कोळसा हा पुढील तीन क्षेत्रांत आढळून येतो-
वैणगंगा खोरे, वर्धा खोरे, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्य़ाचा सीमावर्ती भाग.
जिल्हावार दगडी कोळशाचे वितरण - महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्य़ात बल्लारपूर तालुक्यात आढळतात.
चंद्रपूर - चंद्रपूर तालुक्यात चंद्रपूर व घुगुस, राजुरा तालुक्यात सास्ती, वरोडा, भदावती तालुक्यात मांजरी येथे दगडी कोळशाचे साठे आहेत.
यवतमाळ - या जिल्हय़ात वणी, राजुरा, मोरेगाव व उंबरखेड तालुक्यांत दगडी कोळशाच्या खाणी आहेत.
नागपूर - नागपूर जिल्ह्य़ात उमरेड, सावनेर व कामढी तालुक्यात दगडी कोळशाचे साठे आहेत. उमरेड तालुक्यातील दगडी कोळसा उच्च प्रतीचा आहे.
औष्णिक विद्युत केंद्र
महाराष्ट्रात प्रामुख्याने औष्णिक वीज निर्माण केली जाते, ही केंद्रे प्रामुख्याने कोळशाच्या खाणीजवळ किंवा रेल्वे मार्गाजवळ उभारली जातात. याचे कारण असे की, औष्णिक विद्युत निर्मितीसाठी वेळेवर कोळशाचा पुरवठा व्हावा.
० कोकणातील औष्णिक विद्युत केंद्रे - चोला ( ठाणे ), मध्य रेल्वेचे कल्याणजवळ उल्हास नदीच्या खाडीजवळ औष्णिक केंद्र आहे. यापासून मुंबई, मुंबई उपनगर, कल्याण, पुणे, मुंबई - कल्याण, इगतपुरी याकरता विद्युत पुरवठा केला जातो. या केंद्रास झारखंडमधील कोळसा रेल्वे मार्गाने उपलब्ध होतो तर पाणी हे उल्हास नदीने मिळते.
तुभ्रे येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.
० पश्चिम महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र -
एकलहरे (नाशिक) - नाशिकजवळील एकलहरा येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. याचा फायदा नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रासाठी झाला आहे.
० खान्देशमधील औष्णिक विद्युत केंद्र - फेकरी (भुसावळ) जळगाव जिल्ह्य़ातील भुसावळजवळ फेकरी येथे हे औष्णिक विद्युत केंद्र आहे.
० मराठवाडय़ातील औष्णिक विद्युत केंद्र - परळी (बीड) मराठवाडय़ात बीड जिल्ह्य़ात परळी येथे हे औष्णिक केंद्र उभारले आहे.
० विदर्भातील औष्णिक विद्युत केंद्र - विदर्भात पाच औष्णिक केंद्रे आहेत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे औष्णिक विद्युत केंद्रास लागणारा कोळसा स्थानिक स्तरावर उपलब्ध होतो.
पारस - अकोला जिल्ह्य़ात पारस औष्णिक विद्युत केंद्र आहे.
कोराडी - महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे औष्णिक विद्युत केंद्र नागपूरजवळ कोराडी येथे आहे.
खापरखेडा - नागपूरच्या वायव्येस खापरखेडा हे औष्णिक केंद्र आहे.
दुर्गापूर - चंद्रपूर जिल्ह्य़ात दुर्गापूर औष्णिक केंद्र आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्य़ात चंद्रपूरच्या दक्षिणेस बल्लारपूर येथेही औष्णिक विद्युत केंद्र आहे.
जलविद्युत केंद्रे
महाराष्ट्रात पुढील महत्त्वाची जलविद्युत केंद्रे आहेत-
० कोयना जलविद्युत केंद्र - महाराष्ट्र औद्योगिकदृष्टय़ा अग्रणी राज्य आहे, या अग्रणी राज्यात या विकासात कोयना जलविद्युत केंद्राचा महत्त्वाचा वाटा आहे. कोयनेचा चौथा टप्पा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर जगातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्पात कोयनेचे स्थान अग्रेसर राहील. कृष्णा नदीची उपनदी कोयना असून तिचा उगम महाबळेश्वरमधून होतो. हेळवाकजवळील देशमुखवाडी येथे कोयना नदीवर धरण बांधून पाणी अडवले आहे. या धरणामुळे विस्तृत जलाशय निर्माण झालेला असून हा जलाशय शिवसागर म्हणून ओळखला जातो.
० लेक टॅिपगचा यशस्वी प्रयोग - कोयना जलाशयात लेक टॅिपगचा यशस्वी प्रयोग १३ मार्च १९९९ रोजी झाला. अत्याधुनिक तंत्रावर आधारित या प्रकारचा हा प्रयोग आशिया खंडात पहिल्यांदा यशस्वी झाला. अशाच प्रकारचा प्रयोग पुन्हा एप्रिल २०१२ मध्ये झाला.
० महाराष्ट्रातील इतर जलविद्युत प्रकल्प - कोकणात रायगड जिल्ह्य़ात टाटा वीज मंडळाचे भिरा, खोपोली व भिवपुरी येथे जलविद्युत प्रकल्प आहेत.
० जायकवाडी पठण जलविद्युत प्रकल्प - मराठवाडय़ात गोदावरी नदीवर पठणजवळ धरण बांधलेले आहे. त्या आधारे वीज निर्मिती करण्यात येते.
० येलदरी जलविद्युत प्रकल्प - मराठवाडय़ात पूर्णा नदीवर परभणी जिल्ह्य़ात जिंतूर तालुक्यात येलदरी गावाजवळ हे धरण बांधले आहे. या प्रकल्पाच्या पायथ्याशी वीज केंद्र आहे. याचा फायदा मराठवाडय़ातील परभणी, जिंतूर, िहगोली, इ. भागांतील उद्योगधंद्यांना होतो.
खनिज तेल व नसíगक वायू
० बॉम्बे हाय - मुंबईजवळ पश्चिमेला अरबी समुदात ३ फेब्रु. १९७४ रोजी 'सागर सम्राट'ने पहिली विहीर खोदली. या तेल क्षेत्रालाच 'बॉम्बे हाय' म्हणतात. बॉम्बे हाय क्षेत्रात खनिज तेल व नसíगक वायू उपलब्ध होतात.
० उरण औष्णिक विद्युत केंद्र - उरण बंदराजवळ नसíगक वायू साठवला जातो व तेथे हे औष्णिक केंद्र आहे.
० अणु ऊर्जा - अणुऊर्जा निर्मितीसाठी युरेनियम, थोरियम, लिथियम व प्लॅटिनम यासारख्या औण्विक इंधनांचा वापर केला जातो. यापकी भारतात थोरियमचे साठे मोठय़ा प्रमाणात आढळतात.
० १० ऑगस्ट १९४८ रोजी भारतीय अणुशक्ती मंडळाची स्थापना करण्यात आली, महाराष्ट्रात मुंबई (तुभ्रे) येथे तारापूर आण्विक केंद्र आहे.
१. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (ट्रॉम्बे) - मुंबईला तुभ्रे येथे ही संस्था असून या ठिकाणी खालील अणुभट्टय़ा आहेत.
अप्सरा, सायरस , झरलिना, पूर्णिमा- १, पूर्णिमा- २, ध्रुव
२. तारापूर अणू केंद्र - ऑकटोबर १९६९ मध्ये अमेरिकेच्या मदतीने हे अणू केंद्र उभारले. या केंद्रामधून महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना वीजपुरवठा केला जातो.
No comments:
Post a Comment