महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य
दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी
(homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन
वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध
नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर
अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे
२१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि
कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री
पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी
५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस
भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो.
महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.
विषय | माहिती |
स्थापनदिन | १ मे १९६० |
राजधानी | मुंबई |
उपराजधानी | नागपूर |
अक्षांश | १५*.८’ उत्तर २२*.१’ उत्तर |
रेखांश | ७२* .६’ पूर्व ते ८०*.९’ पूर्व |
चतुःसीमा | पूर्व - छत्तीसगड, पश्चिम - अरबी समुद्र, दक्षिण - गोवा, कर्नाटक, आध्रं प्रदेश, उत्तर - दादरा व नगरहवेली, गुजरात, मध्य प्रदेश. |
क्षेत्रफळ | ३,०७, ७१३ चौ. किमी. |
एकूण वनक्षेत्र | ६४०७८ चौ. किमी. |
वन्यजीव सुरक्षित क्षेत्र | १५,३२,१५ चौ किमी |
पूर्व-पश्चिम लांबी | ८०० किमी |
दक्षिणोत्तर लांबी | ८०० किमी. |
समुद्र किनारा | ७२० किमी |
हवामान | उन्हाळा ३९* ते४२*, हिवाळा ३४* ते १२*, पावसाळा जून ते सप्टेंबर |
पर्वत रांगा | सातपुडा,सह्याद्री – (उपरांगा : सातमाळा, अजिंठा डोंगर, हरिश्चंद्र डोंगर, बालाघाट, व महादेव डोंगर.) |
सर्वात उंच शिखर | कळसूबाई - १,६३६ मीटर |
महत्त्वाचे घाट | कोकणात
जाण्यासाठी सह्याद्रीवरील घाट : थळ, माळशेज, बोर, वरंधा, कुंभार्ली, आंबा,
फोंडा व आंबोली घाट, पुणे - सातारा : कात्रज, खंबाटकी, पुणे – सासवड :
दिवा घाट, औरंगाबाद - चाळीसगाव : औट्रम घाट |
प्रमुख नद्या | नर्मदा,तापी
: (उपनद्या- पांझरा,गिरणा, मोर्णा, पूर्णा, काटेपूर्ण), वैणगंगा: ( पंच,
कन्हान, वर्धा, पैणगंगा.), गोदावरी:( कादवा, प्रवरा, शिवना, सिंदफणा,
मांजरा, पूर्णा, मन्याड, दुधना, प्राणहिता, इंद्रावती), भीमा: (कुकडी, घोड,
भामा, नीरा, माण, सीना.), कृष्णा: (कोयना, वेण्णा, गायत्री, येरळा, वारणा,
पंचगंगा, मलप्रभा व घटप्रभा.), कोकणातील नद्या: वैतरणा, तानसा, काळू,
उल्हास, आंब, सावित्रई, वाशिष्ठी, शुक, गड, शास्त्री व तेरेखोल. |
महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळानुसार ३ रा व लोकसंखेनुसार २ रा क्रमांक लागतो. |
No comments:
Post a Comment