Thursday, January 8, 2015

लोकसभा (Lok Sabha) एमपीएससी (पूर्वपरीक्षा)

लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. संसदेचे सभागृह ह्या नात्याने लोकसभेतील सदस्यांचे प्रमुख कार्य, 'भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बहुमताने बनवणे' हे असते, अर्थात हे सदस्य राज्यकारभाराच्या विधिमंडळ शाखेचे सदस्य आहेत.
'लोकसभा' हा शब्द संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या दोन पाठोपाठ निवडणुकांमधील कालावधीसही वापरतात. २००८ पर्यंत भारतामध्ये १४ लोकसभा-कालावधी झाले आहेत. लोकसभेचे सदस्य हे जनतेचे थेट प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.
प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो, त्यानंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात. ह्याला आणीबाणीची परिस्थिती हा एक अपवाद आहे. आणीबाणीची परिस्थिती जाहीर केल्यास लोकसभेचा कालावधी एक वर्षाच्या टप्प्यामध्ये ५ वर्षाहून अधिक काळही वाढवता येतो.
कार्यकालः लोकसभेचा कार्यकाल हा ५ वर्षाचा असतो. लोकसभेचा कार्यकाल हा वाढविता येत नाही. परंतु आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास राष्ट्रपतीनी संकटकालीन घोषणा केल्यास तो कार्यकाल १ वर्ष वाढविता येतो. 
त्याचप्रमाणे सभागृहामध्ये कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्यास लोकसभा मुदतीपूर्व विसर्जित करुन पुन्हा नव्याने निवडणुका घ्याव्या लागतात.
सदस्य पात्रता:
१) निवडणुक लढविण्यासाठी तो सदस्य भारताचा नागरिक असावा.
२) त्या व्यक्तीचे वय २५ वर्ष पूर्ण असावे.
३) देशातील कोणत्याही विधीमंडळाचे सदस्यत्व नसावे तसेच संसदेने प्रतिनिधीत्वाविषयी ठरविलेल्या अटींची पूर्तता त्या व्यक्तीने केलेली असावी.
पदाधिकारी: लोकसभेतील सभासदांपैकी सभापती आणि उपसभापती यांची निवड केली जाते.
सभापतीचा कार्यकाल हा ५ वर्षाचा असतो. मात्र सभासदाने कालावधीपूर्व राजीनामा दिल्यास, सभासदावर एकमताने अविश्वास ठराव मंजुर झाल्यास किंवा लोकसभेचे सदस्यत्व संपुष्टात आल्यास सभापती पद देखील वरील कारणांमुळे सोडावे लागते.
सभापतीच्या अनुपस्थितीत उपसभापती हा लोकसभेचा सभापती म्हणुन कार्यभार सांभाळतो.

राज्यागणिक मतदारसंघ

विभाग प्रकार मतदारसंघ
अरुणाचल प्रदेश राज्य
आंध्र प्रदेश राज्य ४२
आसाम राज्य १४
उत्तर प्रदेश राज्य ८०
उत्तराखंड राज्य
ओडिशा राज्य २१
कर्नाटक राज्य २८
केरळ राज्य २०
गुजरात राज्य २६
गोवा राज्य
छत्तीसगढ राज्य ११
जम्मू आणि काश्मीर राज्य
झारखंड राज्य १४
तमिळनाडू राज्य ३९
त्रिपुरा राज्य
नागालँड राज्य
पंजाब राज्य १३
पश्चिम बंगाल राज्य ४२
बिहार राज्य ४०
मणिपूर राज्य
मध्य प्रदेश राज्य २९
महाराष्ट्र राज्य ४८
मिझोरम राज्य
मेघालय राज्य
राजस्थान राज्य २५
सिक्कीम राज्य
हरियाणा राज्य १०
हिमाचल प्रदेश राज्य
अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेश
चंदीगढ केंद्रशासित प्रदेश
दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश
दादरा आणि नगर-हवेली केंद्रशासित प्रदेश
दिल्ली राज्य
पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेश
लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश

हेही पाहा

बाह्य दुवे

 Source: wikipedia

No comments:

Post a Comment