Thursday, December 25, 2014

Major historical forts in Maharashtra ( *महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक किल्ले*)


ठाणे - अर्नाळा, वसईचा भुईकोट किल्ला, गोरखगड
रायगड - कर्नाळा, मुरुड-जंजिरा, लिंगाणा, द्रोणागिरी, तळे
रत्नागिरी - सुवर्णदुर्ग (सागरी), रत्नदुर्ग, विजयगड, पासगड
सिंधुदुर्ग - विजयदुर्ग (सागरी), देवगड, पारगड, रामगड
पुणे - शिवनेरी, पुरंदर, प्रचंडगड, सिंहगड, राजगड
नाशिक - ब्रह्मगिरी, साल्हेर-मुल्हेर, मांगी-तुंगी, अंकाई-
औरंगाबाद - देवगिरी (दौलताबाद)
कोल्हापूर - पन्हाळा, विशालगड, भुदरगड
अहमदनगर - हरिश्वंद्रगड, रतनगड
अकोला - नर्नाळा
सातारा - अजिंक्यतारा, मकरंदगड, प्रतापगड, सज्जनगड,

〓 Geography 〓 ••( राज्य निर्मिती) FORMATION OF INDIAN STATES ••


» अरुणाचल प्रदेश- २०फेब्रुवारी१९८७.

» आंध्र प्रदेश- ०१ऑक्टोबर १९५३.

» आसाम- २६जानेवारी१९५०.

» उत्तर प्रदेश- १५ऑगस्ट१९४७.

» उत्तरांचल- ०९नोव्हेंबर२०००.

» ओरिसा- १५ऑगस्ट१९४७.

» कर्नाटक- १५ऑगस्ट१९४७.

» केरळ- ०१नोव्हेंबर १९५६.

» गुजरात- ०१मे१९६०.

» गोवा- ३०मे१९८७.

» छत्तीसगढ- ०१नोव्हेंबर २०००.

» जम्मू काश्मिर- २६ऑक्टोबर १९४७.

» झारखंड- १५नोव्हेंबर २०००.

» तामिळनाडू- १५ऑगस्ट१९४७.

» त्रिपुरा- २१जानेवारी १९७२.

» नागालॅंड- ०१डिसेंबर१९६३.

» पंजाब- १५ऑगस्ट१९४७.

» पश्चिम बंगाल- १५ऑगस्ट१९४७.

» बिहार- १५ऑगस्ट१९४७.

» मणिपूर- २१जानेवारी १९७२.

» मध्य प्रदेश- ०१ऑगस्ट१९५६.

» महाराष्ट्र- ०१मे१९६०.

» मिजोराम- २०फेब्रुवारी १९८७.

» मेघालय- १५एप्रिल१९७०.

» राजस्थान- ०१नोव्हेंबर १९५६.

» सिक्किम- १६मे१९७५.

» हरियाणा- ०१नोव्हेंबर १९६६.

» हिमाचल प्रदेश- २५जानेवारी१९७१.

〓>> केंद्रशासित प्रदेश <<〓

» अंदमान आणि निकोबार- ०१नोव्हेंबर १९५६.

» चंढीगढ- १९६६

» दादरा नगरहवेली- ११ ऑगस्ट१९६१.

» दिव दमण- ३०मे१९८७.

» पॉंडीचेरी- ०७जानेवारी १९६३.

» लक्षद्विप- ०१नोव्हेंबर १९५६.

महाराष्ट्रातील ऊर्जा साधनसंपत्ती( Energy Resources In Maharashtra)


 १. दगडी कोळसा - महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे पूर्व विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्य़ांत आढळतात. भूर्गभीय शास्त्राच्या दृष्टीने महाराष्ट्रातील दगडी कोळसा हा गोंडवनी संघाच्या व दामुदा मालेतील बाराकार समुदायातील खडकात आढळतो. भारताच्या दगडी कोळशाच्या एकूण साठय़ांपकी सुमारे चार टक्के कोळशाचा साठा महाराष्ट्रात आढळतो. महाराष्ट्रात दगडी कोळसा हा पुढील तीन क्षेत्रांत आढळून येतो-
 वैणगंगा खोरे, वर्धा खोरे, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्य़ाचा सीमावर्ती भाग.
जिल्हावार दगडी कोळशाचे वितरण - महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्य़ात बल्लारपूर तालुक्यात आढळतात.
चंद्रपूर - चंद्रपूर तालुक्यात चंद्रपूर व घुगुस, राजुरा तालुक्यात सास्ती, वरोडा, भदावती तालुक्यात मांजरी येथे दगडी कोळशाचे साठे आहेत.
यवतमाळ - या जिल्हय़ात वणी, राजुरा, मोरेगाव व उंबरखेड तालुक्यांत दगडी कोळशाच्या खाणी आहेत.
नागपूर - नागपूर जिल्ह्य़ात उमरेड, सावनेर व कामढी तालुक्यात दगडी कोळशाचे साठे आहेत. उमरेड तालुक्यातील दगडी कोळसा उच्च प्रतीचा आहे.
औष्णिक विद्युत केंद्र
महाराष्ट्रात प्रामुख्याने औष्णिक वीज निर्माण केली जाते, ही केंद्रे प्रामुख्याने कोळशाच्या खाणीजवळ किंवा रेल्वे मार्गाजवळ उभारली जातात. याचे कारण असे की, औष्णिक विद्युत निर्मितीसाठी वेळेवर कोळशाचा पुरवठा व्हावा.
०    कोकणातील औष्णिक विद्युत केंद्रे - चोला ( ठाणे ), मध्य रेल्वेचे कल्याणजवळ उल्हास नदीच्या खाडीजवळ औष्णिक केंद्र आहे. यापासून मुंबई, मुंबई उपनगर, कल्याण, पुणे, मुंबई - कल्याण, इगतपुरी याकरता विद्युत पुरवठा केला जातो. या केंद्रास झारखंडमधील कोळसा रेल्वे मार्गाने उपलब्ध होतो तर पाणी हे उल्हास नदीने मिळते.
तुभ्रे येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.
०     पश्चिम महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र -
 एकलहरे (नाशिक) - नाशिकजवळील एकलहरा येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. याचा फायदा नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रासाठी झाला आहे.
०     खान्देशमधील औष्णिक विद्युत केंद्र - फेकरी (भुसावळ) जळगाव जिल्ह्य़ातील भुसावळजवळ फेकरी येथे हे औष्णिक विद्युत केंद्र आहे.
०     मराठवाडय़ातील औष्णिक विद्युत केंद्र - परळी (बीड) मराठवाडय़ात बीड जिल्ह्य़ात परळी येथे हे औष्णिक केंद्र उभारले आहे.
०     विदर्भातील औष्णिक विद्युत केंद्र - विदर्भात पाच औष्णिक केंद्रे आहेत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे औष्णिक विद्युत केंद्रास लागणारा कोळसा स्थानिक स्तरावर उपलब्ध होतो.
     पारस -  अकोला जिल्ह्य़ात पारस औष्णिक विद्युत केंद्र आहे.
     कोराडी - महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे औष्णिक विद्युत केंद्र नागपूरजवळ कोराडी येथे आहे.
खापरखेडा - नागपूरच्या वायव्येस खापरखेडा हे औष्णिक केंद्र आहे.
दुर्गापूर - चंद्रपूर जिल्ह्य़ात दुर्गापूर औष्णिक केंद्र आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्य़ात चंद्रपूरच्या दक्षिणेस बल्लारपूर येथेही औष्णिक विद्युत केंद्र आहे.
जलविद्युत केंद्रे
महाराष्ट्रात पुढील महत्त्वाची जलविद्युत केंद्रे आहेत-
०    कोयना जलविद्युत केंद्र - महाराष्ट्र औद्योगिकदृष्टय़ा अग्रणी राज्य आहे, या अग्रणी राज्यात या विकासात कोयना जलविद्युत केंद्राचा महत्त्वाचा वाटा आहे. कोयनेचा चौथा टप्पा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर जगातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्पात कोयनेचे स्थान अग्रेसर राहील. कृष्णा नदीची उपनदी कोयना असून तिचा उगम महाबळेश्वरमधून होतो. हेळवाकजवळील देशमुखवाडी येथे कोयना नदीवर धरण बांधून पाणी अडवले आहे. या धरणामुळे विस्तृत जलाशय निर्माण झालेला असून हा जलाशय शिवसागर म्हणून ओळखला जातो.
०     लेक टॅिपगचा यशस्वी प्रयोग - कोयना जलाशयात लेक टॅिपगचा यशस्वी प्रयोग १३ मार्च १९९९ रोजी झाला. अत्याधुनिक तंत्रावर आधारित या प्रकारचा हा प्रयोग आशिया खंडात पहिल्यांदा यशस्वी झाला. अशाच प्रकारचा प्रयोग पुन्हा एप्रिल २०१२ मध्ये झाला.
०     महाराष्ट्रातील इतर जलविद्युत प्रकल्प - कोकणात रायगड जिल्ह्य़ात टाटा वीज मंडळाचे भिरा, खोपोली व भिवपुरी येथे जलविद्युत प्रकल्प आहेत.
०     जायकवाडी पठण जलविद्युत प्रकल्प - मराठवाडय़ात गोदावरी नदीवर पठणजवळ धरण बांधलेले आहे. त्या आधारे वीज निर्मिती करण्यात येते.
०     येलदरी जलविद्युत प्रकल्प - मराठवाडय़ात पूर्णा नदीवर परभणी जिल्ह्य़ात जिंतूर तालुक्यात येलदरी गावाजवळ हे धरण बांधले आहे. या प्रकल्पाच्या पायथ्याशी वीज केंद्र आहे. याचा फायदा मराठवाडय़ातील परभणी, जिंतूर, िहगोली, इ. भागांतील उद्योगधंद्यांना होतो.
खनिज तेल व नसíगक वायू
०     बॉम्बे हाय - मुंबईजवळ पश्चिमेला अरबी समुदात ३ फेब्रु. १९७४ रोजी 'सागर सम्राट'ने पहिली विहीर खोदली. या तेल क्षेत्रालाच 'बॉम्बे हाय' म्हणतात. बॉम्बे हाय क्षेत्रात खनिज तेल व नसíगक वायू उपलब्ध होतात.
०     उरण औष्णिक विद्युत केंद्र - उरण बंदराजवळ नसíगक वायू साठवला जातो व तेथे हे औष्णिक केंद्र आहे.
०     अणु ऊर्जा - अणुऊर्जा निर्मितीसाठी युरेनियम, थोरियम, लिथियम व प्लॅटिनम यासारख्या औण्विक इंधनांचा वापर केला जातो. यापकी भारतात थोरियमचे साठे मोठय़ा प्रमाणात आढळतात.
०     १० ऑगस्ट १९४८ रोजी भारतीय अणुशक्ती मंडळाची स्थापना करण्यात आली, महाराष्ट्रात मुंबई (तुभ्रे) येथे तारापूर आण्विक केंद्र आहे.
 १. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (ट्रॉम्बे) - मुंबईला तुभ्रे येथे ही संस्था असून या ठिकाणी खालील अणुभट्टय़ा आहेत.
 अप्सरा, सायरस , झरलिना, पूर्णिमा- १, पूर्णिमा- २, ध्रुव
२. तारापूर अणू केंद्र - ऑकटोबर १९६९ मध्ये अमेरिकेच्या मदतीने हे अणू केंद्र उभारले. या केंद्रामधून महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना वीजपुरवठा केला जातो.

Wednesday, December 24, 2014

संयुक्त महाराष्ट्र चळवळ : Very important for MPSC - STI exam


सर्व मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वाच्या आधारावर एक राज्य स्थापन करण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला संयुक्त महाराष्ट्र आंदोलन किंवा चळवळ असे म्हणतात. ही चळवळ स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु झाली आणि १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर ती समाप्त झाली. १९५० ते १९६० या काळामधील महाराष्ट्रातील हे सर्वांत व्यापक असे जनआंदोलन होते आणि त्यात एकूण १०५ लोकांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला.
इ. स. बाराव्या शतकात मराठी भाषिक लोकांच्यात राजकीय व सांस्कृतिक अस्मितेची जाणीव वाढीस लागली; पण राजकीय दृष्ट्या मराठी भाषिक लोक विखुरलेले राहिले. इंग्रजांच्या काळात मराठी भाषिक लोक मुंबई राज्य, हैदराबाद संस्थान आणि मध्य प्रांतात विभागलेले होते. प. महाराष्ट्राचा भाग मुंबई राज्यात मोडत होता. गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता, तर मराठवाड्याचे पाच जिल्हे हैदराबाद संस्थानात होते. विदर्भाचे आठ जिल्हे मध्य प्रांताचा भाग होते. या सर्व भागांना एकत्र आणून त्यांचे भाषेच्या आधारे एक राज्य बनविण्यात यावे, असा विचार त्या काळात बळावत होता. काँग्रेस पक्षाने भाषावार प्रांतरचनेचे तत्त्व मान्य केले. नंतरच्या काळात काँग्रेस पक्षाने भाषेच्या आधारावर प्रदेश काँग्रेस समित्यांची स्थापना केली. मुंबई राज्यात गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक या प्रदेश समित्या स्थापन झाल्या.
भारताला स्वातंत्र्य मिळाले; परंतु भारतीय संविधानात भाषिक प्रदेश राज्यांची स्थापना करण्यासंबंधी नियमावली अंतर्भूत केली नव्हती. तथापि इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अहमदाबाद अधिवेशनात (१९२१) भाषिक राज्य होणे आवश्यक आहे, असा ठराव संमत झाला होता. तरीसुद्घा तत्कालीन नेहरु सरकारने भाषावार प्रांताबाबत नकारात्मक भूमिका स्वीकारली. सरकारने स्थापन केलेल्या दर समितीने भाषावार प्रांतरचना करण्यास नकार दिला. यावर विचार करण्यासाठी काँग्रेसने ‘ जेव्हीपी ’ समिती नेमली. या समितीत जवाहरलाल नेहरु, वल्ल्भभाई पटेल व पट्टाभि सीतारामय्या यांचा समावेश होता. या समितीने भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न अग्रक्रमाने हाती घेतला जाऊ नये, अशी शिफारस केली. याबाबतीत केंद्र सरकार व पं. नेहरु यांच्या मते चार महत्त्वाच्या अडचणी होत्या : (१) भाषावार प्रांतरचनेचा निर्णय घाईघाईने घेतला जाऊ नये; कारण शेकडो वर्षे एकसाथ राहणाऱ्या लोकांच्या जीवनपद्घतीत एकदम मोठा बदल घडवून आणणे इष्ट नसते. (२) प्रत्येक भाषिक गटात अल्पसंख्याक भाषिक घटक आहेत. त्यांचा या मागण्यांना विरोध आहे. त्यांच्या आक्षेपांचा योग्य असा विचार झाला पाहिजे. (३) देशापुढे विकासाचे व ऐक्याचे इतर महत्त्वाचे प्रश्न असताना भाषावार प्रांतरचनेसारखा लोकांचे विभाजन करणारा विषय अग्रक्रमाने रेटू नये. त्यामुळे हिंसक चळवळी व प्रतिचळवळी निर्माण होतील. (४) भारतातील सांस्कृतिक विविधता हे देशाच्या राष्ट्रीयत्वाचे वैभव आहे. हैदराबादसारखे चार भाषा बोलणारे, सामायिक भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करणारे राज्य आपण कायम टिकविले पाहिजे.
महाराष्ट्रात मराठी भाषिक राज्याची म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे आंदोलन दिनांक १२ मे १९४६ रोजी बेळगाव येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीच्या स्थापनेपासून विशेष आकारास येऊ लागले. संमेलनाचे अध्यक्ष ग. त्र्यं. माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा पुरस्कार केला. मुंबई राज्यातील प. महाराष्ट्र हा भाग संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी उत्सुक होता. गोवा अजून पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. हैदराबाद राज्यातील मराठवाडा भागातील लोकांची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा होती. मुख्य प्रश्न मध्यप्रांताचा भाग असलेल्या विदर्भाचा होता. नागपूर ही मध्यप्रांताची राजधानी होती आणि राष्ट्रीय चळवळीत विदर्भातील नेत्यांनी मोठी भूमिका बजावलेली होती. शेकडो वर्षांपासून मराठी भाषिक असूनही विदर्भाची वेगळी अशी अस्मिता विकसित झालेली होती. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करणाऱ्या नेत्यांनी विदर्भातील नेत्यांशी चर्चा करुन त्यांच्याबरोबर ‘ अकोला करार ’ केला. या करारात तीन मुद्दे महत्त्वाचे होते : (१) मध्यप्रांतात हिंदी भाषिक विभागाच्या वर्चस्वाखाली विदर्भ राहणार नाही. (२) संयुक्त महाराष्ट्राची मागणी काही कारणांमुळे जर अमान्य झाली, तर स्वतंत्र महाविदर्भाच्या स्थापनेस महाराष्ट्राच्या नेत्यांनी पाठिंबा द्यावा. (३) विदर्भाने मध्यप्रांताचा वा संयुक्त महाराष्ट्राचा उपप्रांत म्हणून राहावे असा पर्याय जर दिला असेल, तर विदर्भाने संयुक्त महाराष्ट्राचा पर्याय निवडावा.
१५ ऑगस्ट १९४७ नंतर भारतीय संघराज्यात अनेक संस्थानांचे विलीनीकरण झाले होते. त्यामुळे नव्याने घटकराज्यांची पुनर्रचना करणे गरजेचे होते; पण भारतीय घटनाकारांनी घटकराज्यांत उपप्रांत तयार करण्याचे तत्त्व अमान्य केले. त्यामुळे अकोला करार कालबाह्य झाला.
संयुक्त महाराष्ट्राची मागणी पुढे रेटण्यासाठी काँग्रेसांतर्गत १९४८ मध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव देव या परिषदेचे अध्यक्ष झाले. १९५२ मध्ये सर्व राज्यांत नवी सरकारे स्थापन झाली. आंध-प्रांताच्या स्थापनेसाठी पोट्टू श्रीरामलू यांचा उपोषणात मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या दंगलीमुळे १९५३ मध्ये सरकारला आंध-प्रांत मद्रास प्रांतातून वेगळा करावा लागला. याच काळात भाषिक राज्य स्थापन करण्यासाठी अनेक प्रांतांत चळवळी सुरु झाल्या. संयुक्त महाराष्ट्राला विदर्भाचा पाठिंबा मिळविण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या नेत्यांनी विदर्भाच्या नेत्यांशी चर्चा केली आणि २८ सप्टेंबर १९५३ रोजी त्यांच्याशी ‘नागपूर करार’ केला. या करारावर बॅ. रामराव देशमुख, गोपाळराव खेडकर, शेषराव वानखेडे, रा. कृ. पाटील, पी. के. देशमुख, भाऊसाहेब हिरे, नाना कुंटे, देवकीनंदन व यशवंतराव चव्हाण यांच्या सह्या होत्या. त्यात खालील तरतुदी होत्या : (१) मुंबई राजधानी असलेला सर्व मराठी भाषिक लोकांचा महाराष्ट्र प्रांत तयार करण्यात यावा. (२) नागपूरला उच्च न्यायालयाचे एक खंडपीठ असावे. त्याचप्रमाणे विधानसभेचे वर्षातून एक अधिवेशन तेथे घेण्यात यावे. (३) मंत्रिमंडळात व सर्व शासकीय खात्यात लोकसंख्येच्या प्रमाणात राज्याच्या घटकप्रदेशांना प्रतिनिधित्व मिळावे. (४) नागपूरला राजधानीचे शहर म्हणून जे फायदे पूर्वी मिळत आहेत, ते तसेच यापुढे मिळत राहावेत. या करारामुळे विदर्भातील मुख्य नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्रास मान्यता दिली; पण बिजलाल बियाणी व बापूसाहेब अणे यांनी स्वतंत्र नागविदर्भास पाठिंबा दिला आणि त्यासाठी त्यांनी चळवळही सुरु केली.
राज्यांच्या पुनर्रचनेचा विचार करण्यासाठी केंद्र शासनाने एस्. फाझल अली यांच्या अध्यक्षतेखाली २९ डिसेंबर १९५३ रोजी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. पं. हृदयनाथ कुंझरु व सरदार पणिक्कर हे या आयोगाचे सभासद होते. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने व इतरांनी आयोगासमोर संयुक्त महाराष्ट्राच्या राज्याची मागणी केली. या आयोगाने आपला अहवाल १० ऑक्टोबर १९५५ रोजी प्रसिद्घ केला. आयोगाने पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि कर्नाटक या राज्यांच्या निर्मितींची शिफारस केली. हैदराबाद राज्य कायम ठेवावे व विदर्भाचे स्वतंत्र राज्य करावे, अशाही आयोगाच्या शिफारशी होत्या; पण हैदराबाद राज्यातील मराठी भाषिकांची त्या राज्यात राहण्याची इच्छा नव्हती. आयोगाने संयुक्त महाराष्ट्राची मागणी अमान्य केली आणि कन्नड भाषिक जिल्हे वगळून, मराठवाडा धरुन, गुजराती प्रदेशासह मुंबईच्या द्वैभाषिक राज्याची शिफारस केली. सौराष्ट्राचा गुजरातेत समावेश करावा व मुंबईस राजधानी करुन गुजरात व महाराष्ट्र यांचे द्वैभाषिक राज्य करावे, असे आयोगाचे म्हणणे होते. आयोगाच्या शिफारशींच्या विरोधात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. या अवधीमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीची चळवळ अधिक आक्रमक बनली. मुख्य प्रश्न मुंबईच्या भवितव्याचा होता व ते शहर महाराष्ट्रास देण्यास गुजराती भाषिकांचा विरोध होता. मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेला बेळगाव-कारवारचा भाग आयोगाने कर्नाटकास दिला. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी या द्वैभाषिकास नकार दिला. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आयोजित केलेल्या सभेत देवांनी तशी घोषणादेखील केली.
केंद्र सरकारने मुंबईच्या प्रश्नाचा तिढा सोडविण्यासाठी ‘त्रिराज्य योजना ’ जाहीर केली. या योजनेत सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भ व मराठवाड्यासह महाराष्ट्र आणि मुंबई हे शहरराज्य अशा प्रकारची तीन राज्ये स्थापन करण्याचा विचार मांडला. महाराष्ट्रास मुंबई द्यावयास केंद्र सरकार तयार नव्हते. महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईत लोकांचा असंतोष वाढू लागला. या घटना ऑक्टोबर १९५५ नंतर घडल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने त्रिराज्य योजनेस पाठिंबा दिला व शंकरराव देव यांनी संयुक्त महाराष्ट्र परिषद बरखास्त केली. ते सर्वांना सबुरीचा सल्ल देत होते. १८ नोव्हेंबर १९५५ रोजी मुंबई विधानसभेसमोर या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बंद पुकारण्यात आला व सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला. सेनापती बापट यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. त्यानंतर संप, बंद व मोर्चे यांचे सत्र सुरु झाले. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला. या गोळीबारात १५ माणसे ठार झाली. संयुक्त महाराष्ट्रासाठीची चळवळ या गोळीबारानंतर उग्र झाली.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढविण्यासाठी काँग्रेस पक्षीय पुढाऱ्यांना दूर सारुन महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची ६ फेबुवारी १९५६ रोजी स्थापना केली. प्रजा समाजवादी पक्षाचे नेते एस्. एम्. जोशी त्याचे प्रमुख होते. यांत प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, हिंदु महासभा, सोशॅलिस्ट पार्टी व जनसंघ हे पक्ष सामील झाले. नंतरच्या काळात डॉ. आंबेडकरांच्या संमतीने शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन व नंतरचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांत सामील झाला. एस्. एम्. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, ना. ग. गोरे, आचार्य प्र. के. अत्रे, उद्घवराव पाटील, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, जयंतराव टिळक प्रभृती हे या चळवळीचे नेते होते.
त्रिराज्य योजनेत मुंबईचे शहरराज्य अनुस्यूत होते; पण त्याचे स्वरुप स्पष्ट झालेले नव्हते. १६ जानेवारी १९५६ रोजी पं. नेहरुंनी असे घोषित केले, की मुंबई केंद्रशासित केली जाईल. १७ जानेवारीस विरोधकांनी सार्वत्रिक संपाची घोषणा केली. १७ जानेवारी ते २२ जानेवारी या काळात मुंबईत मोठा हिंसाचार झाला. पोलिसांनी गोळीबार केला. त्या गोळीबारात ७६ लोकांचा बळी गेला. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी २३ जानेवारी रोजी आपला राजीनामा पंतप्रधानांना दिला; पण त्यांनी तो स्वीकारला नाही. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत संप व चळवळी सुरु झाल्या. मुंबई महानगरपालिकेने संयुक्त महाराष्ट्रास पाठिंबा देणारा ठराव संमत केला.
मधील काळात विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी झाला. तोपर्यंत राज्य पुनर्रचना विधेयक मुंबई विधानसभेमध्ये चर्चेसाठी आले होते. काँग्रेसने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन बोलावले. नेहरु व इतर नेत्यांच्या विरोधात निदर्शने करण्याचा निर्णय समितीने घेतला व हजारो लोकांनी त्यात भाग घेतला. ३ जून १९५६ रोजी चौपाटीवरील सभेत नेहरुंनी अशी घोषणा केली, की मुंबई पाच वर्षांसाठी केंद्रशासित प्रदेश राहील. पाच वर्षांनंतर तिच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाईल. या तिन्ही राज्यांसाठी मुंबई राज्याचे एकच उच्च न्यायालय (हायकोर्ट) व लोकसेवा आयोग असेल. नेहरुंच्या या घोषणेनंतर वातावरण जास्त तापले. देशमुख यांच्या विनंतीवरुन पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपतींनी सी. डी. देशमुख यांचा राजीनामा स्वीकारला. आपल्या भाषणात त्यांनी नेहरुंवर मंत्रिमंडळास महत्त्वाच्या निर्णयांबाबत विश्वासात न घेतल्याबद्दल व मुंबईच्या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी न केल्याबद्दल दोष दिला. याच काळात महागुजरात परिषदेच्या आंदोलनामुळे गुजरात भाषिक प्रदेशाची मागणी वाढू लागली व तीही चळवळ उग्र बनत गेली. गुजरातेत हिंसाचारात वाढ झाली व तेथे पोलीस गोळीबारात ३० लोक ठार झाले. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन दडपण्याकरिता तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असलेल्या मोरारजी देसाईंच्या शासनाने (१९५२-५६) कठोर उपाय योजले. या चळवळीत एकूण ३१,०९२ इसमांना अटक करण्यात आली, १९,४४५ लोकांवर खटले गुदरले व त्यांतील १८,४१९ लोकांना कैदेची शिक्षा झाली. मुंबई आणि अन्य नागरी व ग्रामीण भागात दंगली उसळल्या. त्यात ५३७ वेळा गोळीबार करण्यात आला. सुमारे ५०० दुकाने लुटली; ८० ट्रामगाड्यांची आणि २०० बसगाड्यांची मोडतोड करण्यात आली. त्या वेळी झालेल्या गोळीबारामध्ये १०५ माणसे बळी गेली. त्यांचे स्मारक पुढे हुतात्मा स्मारक म्हणून मुंबईत फ्लोरा फाउंटनजवळ उभारण्यात आले.
विदर्भ वगळून द्वैभाषिकाची वा त्रिराज्याची योजना मान्य होत नाही, हे लक्षात आल्यानंतर महागुजरात व संयुक्त महाराष्ट्र या महाद्वैभाषिक राज्यांचा पर्याय पुढे आणण्यात आला. महाराष्ट्रातील काही नेत्यांचा त्यास आशीर्वाद होता. मुंबईवर पाणी सोडण्यापेक्षा द्वैभाषिकाचा पर्याय बरा, असा विचार करुन या नेत्यांनी त्यास पाठिंबा दिला. महाराष्ट्र काँग्रेसनेही त्यास पाठिंबा दिला. महाद्वैभाषिक मुंबई राज्य १ नोव्हेंबर १९५६ रोजी अस्तित्वात आले. या द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्रिपद तरुण काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांना देण्यात आले. मुंबई कायमची आपल्या हातातून जाऊ नये, म्हणून महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी हा पर्याय स्वीकारला.
काँग्रेसच्या विरोधात १९५७ मध्ये होणाऱ्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय संयुक्त महाराष्ट्र समितीने घेतला आणि समितीच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने झंझावाती प्रचार केला. या निवडणुकीत संपूर्ण मुंबई राज्यात काँग्रेसने ३९५ पैकी २२२ जागा जिंकून बहुमत मिळविले; पण प. महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झाला. प. महाराष्ट्रातील १३५ पैकी फक्त ३५ जागा काँग्रेसला मिळाल्या. समितीला ९६ जागा मिळाल्या. सर्व विधानसभेत समितीला १२४ जागा मिळाल्या. या निवडणुकीत न. वि. गाडगीळ, देवकीनंदन, मालोजीराजे नाईक-निंबाळकर, पाटसकर आणि इतर अनेक महत्त्वाचे काँग्रेस उमेदवार पराभूत झाले आणि समितीला अभूतपूर्व यश मिळाले. समितीचे उमेदवार भाई एस्. ए. डांगे मुंबईमधून विकमी बहुमताने विजयी झाले. गुजरात, विदर्भ व मराठवाड्यातून काँग्रेसचे उमेदवार चांगल्या संख्येने निवडून आले. प. महाराष्ट्रातील लोकमत समितीच्या बाजूने आहे, हे सिद्घ झाले. प्रजा समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व रिपब्लिकन पक्ष हे समितीतील चार मोठे पक्ष होते. यशवंतराव चव्हाण हे मुंबई राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले.
संयुक्त महाराष्ट्र समितीची संयुक्त महाराष्ट्रासाठी चळवळ चालूच राहिली. समितीने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळविला आणि मुंबईचे महापौरपद समितीस मिळाले.
३० नोव्हेंबर १९५७ रोजी पं. जवाहरलाल नेहरु प्रतापगडावर छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यासाठी येणार होते. द्विभाषकाविरुद्घ मत व्यक्त करुन संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने मोठ्या प्रमाणात प्रतापगडाच्या पायथ्याशी निदर्शने आयोजित केली. हजारोंच्या संख्येने समितीचे निदर्शक नेहरु जाणाऱ्या मार्गावर हजर राहिले आणि त्यांनी निदर्शने केली. पुन्हा १९ डिसेंबर १९५८ रोजी समितीने दिल्ली येथे सत्याग्रह केला. त्यात बेळगावचा व इतर सीमाभागांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या काळात महाराष्ट्रात झालेल्या बहुतेक पोटनिवडणुका समितीच्या उमेदवारांनी जिंकल्या. नगरपालिकांच्या निवडणुकांतही समितीचे उमेदवार विजयी होत होते. १९५८-५९ मध्ये मराठवाड्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकांत समितीच्या उमेदवारांचा विजय झाला. त्यामुळे समितीची लोकप्रियता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत वाढत आहे हे स्पष्ट झाले.
महाद्वैभाषिक स्थापन झाल्यानंतर गुजरातेत महागुजरातसाठी महागुजरात परिषदेची चळवळ सुरु झाली. त्या चळवळीला गुजरातच्या शहरी भागात पाठिंबा मिळू लागला. दोन्ही राज्यांत लोकमत विरोधात जात आहे, हे पाहून गुजरात व महाराष्ट्र ही दोन राज्ये वेगळी केली पाहिजेत, अशी भावना काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वात निर्माण होऊ लागली. द्वैभाषिक चालवताना आर्थिक साधनांच्या वाटपाबाबत मतभेद होत होते. त्यामुळे त्यावेळच्या काँग्रेस अध्यक्षा श्रीमती इंदिरा गांधी, गृहमंत्री गोविंद वल्ल्भ पंत आणि इतरांनी शेवटी याबाबतचा निर्णय घेतला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य करण्यात आली; पण सीमेवरचा डांग हा आदिवासी बहुसंख्य लोकसंख्या असणारा जिल्हा, खानदेश आणि उंबरगाव नजिकची अनेक गावे गुजरातला देण्यात आली. त्याचप्रमाणे नवी राजधानी बांधण्यासाठी व इतर खर्चासाठी गुजरातला ५० कोटी रुपये देण्याचे मान्य करण्यात आले.
१ मे १९६० रोजी गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन स्वतंत्र राज्ये जन्मास आली. गुजरात राज्याचे उद्घाटन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले, तर महाराष्ट्र राज्याचे उद्घाटन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते करण्यात आले. गुजरात आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रदेशांचा समावेश करण्यात आला होता. कच्छ व सौराष्ट्र हे भाग गुजरातेत प्रथमच सामील होत होते. मराठवाड्याचा भाग शेकडो वर्षांनंतर संयुक्त महाराष्ट्राचा भाग बनत होता. नंतरच्या काळात विकासाच्या प्रश्नाबाबत विविध उपभागांत संघर्ष होऊ नये; म्हणून या राज्यांच्या स्थापनेच्या वेळी घटनादुरुस्ती करुन घटनेच्या ३७१ कलमामध्ये विदर्भ, सौराष्ट्र व इतर भागांसाठी विकास परिषदांची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली. या दोन्ही राज्यांची वाटचाल १९६० नंतर सुरु असून सध्या ती भारतातील सर्वांत विकसित अशी राज्ये आहेत.
संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन ही स्वातंत्र्य चळवळीनंतरची महाराष्ट्रातील व्यापक लोकसमर्थन असणारी चळवळ होती. हे राज्यातील पुरोगामी चळवळीचे सर्वांत मोठे व व्यापक आंदोलन होते. या चळवळीत महाराष्ट्रातील मध्यमवर्ग, कामगार, शेतकरी, विचारवंत आदी समाजातील सर्व स्तर एकत्र आले होते. याशिवाय शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर साबळे, पिराजीराव सरनाईक, आत्माराम पाटील वगैरे शाहिरांनी उभा-आडवा महाराष्ट्र पिंजून काढला व हे आंदोलन गावोगावी पोहोचविले. या चळवळीच्या निमित्ताने काही काळ महाराष्ट्रातील डाव्या पक्षांची राजकीय ताकदही वाढली. या चळवळीच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तत्त्वमंथन झाले व अपूर्व अशी राजकीय जागृती निर्माण झाली. हा प्रश्न बळाचा वापर न करता सामंजस्याने सोडविला असता, तर पुढील प्राणहानी झाली नसती, असे काही तज्ञांचे मत आहे. गुजरात व महाराष्ट्र ही राज्ये स्थापन झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती बरखास्त करण्यात आली. ही समिती विसर्जित करु नये, असा काही नेत्यांनी - विशेषत: आचार्य अत्रे, उद्घवराव पाटील, जयंतराव टिळक - आग्रह धरला; कारण बेळगाव-कारवारचा प्रश्न त्यावेळी निकालात निघाला नव्हता.
द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषिक बेळगाव-कारवार इ. भूप्रदेश कर्नाटक राज्यात समाविष्ट झाले. ते भाग महाराष्ट्रात समाविष्ट करुन घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती स्थापन झाली. या समितीच्या मागणीप्रमाणे बेळगावबाबत महाजन आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाचा निवाडा उभयपक्षी मान्य होईल, अशी हमी घेण्यात आली होती. तो निवाडा १९६७ मध्ये बाहेर आला; पण त्यात प्रत्यक्ष बेळगाव शहर व कारवार जिल्ह्यातील मराठी भाषिक भागही कर्नाटकातच ठेवावा, अशी शिफारस करण्यात आली; पण ती गोष्ट महाराष्ट्रास मान्य झाली नाही. त्यामुळे वाद कायम आहे.

Current Affiairs:2014

#‎चालू‬ घडामोडी:- डिसेंबर २०१४
०१) माहिती अधिकारासाठी आवश्यक असलेला फॉर्म कधीपासून ऑनलाइन उपलब्ध होणार असल्याचे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे?
== ०१ जानेवारी २०१५
०२) संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत विक्रमी १८ विधेयके मंजूर झाली, तर राज्यसभेची मोहोर किती विधेयकांवर उमटली?
== १२ विधेयके
०३) नॅशनल डेमोक्रटिक फ्रंट ऑफ बेडोलँडच्या दहशतवाद्यांनी आसाममधील कोणत्या दोन ठिकाणी नुकतेच हल्ले केले आहेत?
== कोक्राझार आणि सोनितपूर
०४) मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याच्या पूर्वीच्या आघाडी सरकारच्या निर्णयात महत्त्वपूर्ण बदल करत राज्य सरकारने मुस्लिमांचे आरक्षण रद्द ठरवत केवळ मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण ठेवण्याची तरतूद असलेले विधेयक कधी विधानसभेत मंजूर करण्यात आले?
== २३ डिसेंबर २०१४
०५) २०१४ हे वर्ष पत्रकारांसाठी घातक ठरले असून, वार्ताकन करत असताना किमान ६० पत्रकार ठार झाले. त्यातील एकूण ४४ टक्के पत्रकारांचा खून करण्यात आला, असे आपल्या अहवालात कोणत्या संस्थेने म्हटले आहे?
== कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्स' (सीपीजे)
०६) पाकिस्तान व रशिया यांच्यात नुकताच किती डॉलर्सचा ऊर्जा करार झाला आहे व त्यात कराची ते लाहोर दरम्यान गॅस पाइपलाइन टाकण्यात येणार आहे?
== १.७ अब्ज डॉलर्सचा
०७) पुण्यातील हिंदुस्तान अ‍ॅण्टीबॉयोटिक या कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय रसायन, खते व औषध राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली आहे?
== ५३० कोटी
०८) १९८५ मध्ये 'लव्ह इज नेव्हर सायलेंट', १९९० मध्ये 'कॅरोलिन' व १९९२ मध्ये 'मिस रोज व्हाइट' चित्रपटांसाठी 'एम्मी' पुरस्कार विजेते ठरलेले कोणत्या दिग्दर्शकाचे नुकतेच निधन झाले आहे?
== जोसेफ सरजट
०९) देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा ठरलेल्या 'सत्यम कॉम्प्युटर्स'प्रकरणी हैदराबादमधील विशेष न्यायालय कधी निकाल देणार आहे?
== ०९ मार्च २०१५
१०) यंदाच्या (२०१५) 'प्रवासी भारतीय दिवस' कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार आहेत?
== गयाना प्रजासत्ताकाचे अध्यक्ष डोनाल्ड रॅमोतर

'भारतरत्न'

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि हिंदू महासभेचे प्रणेते पंडीत मदन मोहन मालवीय यांना बुधवारी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' जाहीर झाला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरून यासंबंधी माहिती दिली. मालवीय यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. वाजपेयी यांचा गुरुवारी, २५ डिसेंबर रोजी वाढदिवस असल्यामुळे 'भारतरत्न' जाहीर करून केंद्र सरकारने त्यांना जन्मदिनी सर्वोच्च मोलाची भेट दिली आहे.
source: loksatta

Tuesday, December 23, 2014

महाराष्ट्रातील अभयारण्ये


महाराष्ट्रात एकूण ६१९१६ चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे व ते एकूण राज्याच्या २० टक्के आहे. राज्यात खालील प्रकारच्या वनांचा समावेश होतो.
  • उष्ण कटिबंधीय पानगळीची शुष्क वने
  • उष्ण कटिबंधीय पानगळीची दमट वने
  • उष्ण कटिबंधीय काटेरी वने
  • उष्ण कटिबंधीय सदाहरित वने
  • समशीतोष्ण रुंदपर्णीय पर्वतीय वने
  • सागरी किनाऱ्यावरची भरती ओहोटीची दलदलीय वने
महाराष्ट्रात खालील अभयारण्यांचा समावेश होतो (विभागानुसार) कोकण

पश्चिम महाराष्ट्र
विदर्भ

उत्तर महाराष्ट्र

मराठवाडा