Tuesday, January 13, 2015

एमपीएससी मुख्यपरीक्षा :गोपाळ गणेश आगरकर(Gopal Ganesh Agarkar)

(१४ जुलै १८५६–१७ जून १८९५). एक बुद्धिप्रामाण्यावादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी गरीब घराण्यात झाला. हालअपेष्टांना गोपाळ गणेश आगरकरगोपाळ गणेश आगरकरतोंड देत कराड, रत्‍नागिरी, अकोला आणि पुणे येथे राहून ते एम्‌. ए. झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी पुण्यात निर्माण केलेल्या जहाल विचारांच्या राष्ट्रवादी पंथास ते लोकमान्य टिळकांसह जाऊन मिळाले. लोकशिक्षण आणि लोकजागृती करण्यासाठी या तिघांनी पुण्यात ‘न्यू इंग्‍लिश स्कूल’ स्थापन केले (१८८०), तसेच केसरी आणि मराठा (इंग्रजी) ही पत्रे चालू केली (१८८१). न्यू इंग्‍लिश स्कूलमध्ये आगरकरांनी अध्यापनाचे काम केले. त्याचप्रमाणे केसरीच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारून परिणामकारक लेखन आणि कुशल संपादन यांच्या जोरावर अल्पावधीतच केसरीला लोकप्रियता प्राप्त करून दिली. न्यू इंग्‍लिश स्कूलच्या चालकांनी स्थापन केलेल्या ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ च्या ‘फर्ग्युसन महाविद्यालया’चे प्राचार्य (१८९२) म्हणूनही त्यांनी काम केले.

महाविद्यालयीन जीवनातच जॉन स्ट्यूअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांनी त्यांचे मन संस्कारित झाल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन बुद्धिप्रामाण्यवादी आणि अज्ञेयवादी झालेला होता. याच दृष्टिकोनातून तत्कालीन समाजाची पुनर्घटना करण्याची आवश्यकता त्यांना वाटत होती. केसरीतील त्यांच्या सामाजिक लेखांतून हीच भूमिका व्यक्त होऊ लागली. सामाजिक प्रश्नांच्या जाणिवेपेक्षा राजकीय प्रश्नांची जाणीव अधिक तीव्र असली पाहिजे, असे केसरी व मराठाच्या चालकमंडळींस वाटत असल्यामुळे, आगरकरांचा वैचारिक कोंडमारा होऊ लागला. परिणामत: ते केसरीतून बाहेर पडले (१८८७) आणि आपल्या क्रांतिकारक सामाजिक विचारांच्या प्रतिपादन-प्रसारासाठी सुधारक हे पत्र त्यांनी काढले (१८८८). त्यात राजकीय व अर्थशास्त्रविषयक लेखही येत.



बुद्धिवादी दृष्टिकोनातून समाजजीवनाचे विश्लेषण करून अन्याय्य रूढी आणि परंपरा यांच्यावर त्यांनी कडाडून हल्ले चढविले. बुद्धीच्या निकषांखेरीज अन्य कोणताही निकष ते मानीत नसल्यामुळे समाजसुधारणांचे समर्थन करण्यासाठी स्मृतिवचनांचा आधार घेणे त्यांना मान्य नव्हते. नीतिमान आणि सदाचरणी समाजाच्या निर्मितीसाठी ईश्वर आणि धर्म यांचीही आवश्यकता त्यांना वाटत नव्हती. परोपकारादी सद्गुण धर्माच्या आधी अस्तित्वात आले असून नंतर धर्मात ते गोवले गेले, अशी त्यांची भूमिका होती. बुद्धिवाद, व्यक्तिवाद, समता आणि मानवतावाद या चतु:सूत्रीने त्यांचा सारा सामाजिक विचार व्यापलेला आहे. साहजिकच, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यांसारख्या कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता आणि चातुर्वर्ण्य, ⇨जातिसंस्था, ⇨अस्पृश्यता,          ⇨ बालविवाह इ. गोष्टी त्यांना सर्वथैव अमान्य होत्या. मनुष्यजातीचे ऐहिक सुखवर्धन हेच त्यांचे ध्येय बनले होते. तथापि निव्वळ इंद्रियसुखालाच ऐहिक सुख मानण्याइतपत त्यांची दृष्टी संकुचित नव्हती. नीतिमान आणि संयमी जीवनामुळे मनाला लाभणारे समाधानही या ऐहिक सुखात त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिस्वातंत्र्यामुळे स्वार्थ आणि स्वैराचार फैलावण्याऐवजी समाजातील व्यक्ती परोपकारी आणि परहितचिंतकच होतील, असे त्यांना वाटे. उलट व्यक्तिस्वातंत्र्य न मानणाऱ्या व निरुपयोगी परंपरांनी वेढलेल्या समाजाची केव्हाही प्रगती होऊ शकणार नाही, अशी त्यांची धारणा होती. परंपरांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐतिहासिक होता; त्यामुळे एखादी गोष्ट समाजाच्या एका अवस्थेत उपयुक्त ठरली असेल, हे ते मान्य करीत; मात्र तीच गोष्ट बदलत्या काळात जाचक ठरल्यास बिनदिक्कतपणे टाकून द्यावी, असे ते म्हणत. अशा रूढी आणि परंपरा स्वखुषीने सोडून द्यावयास समाज तयार नसेल, तर त्या कायद्याने नाहीशा कराव्या, असे त्यांचे मत होते.



त्यांचे हे विचार तत्कालीन अंधश्रद्ध सामान्यांना समजले नाहीतच. तथापि टिळकांसारख्या सुशिक्षित आणि चिंतनशील व्यक्तींचाही त्यांना पाठिंवा मिळू शकला नाही. जनतेचे लक्ष समाजक्रांतीवर केंद्रित करून त्यात तिची शक्ती वाया घालवण्यापेक्षा आधी राजकीय स्वातंत्र्यासाठी तिचा उपयोग करून घ्‍यावा, तसेच सामाजिक रूढींच्या प्रश्नावर लोकांची मने दुखवून राजकीय चळवळीत फूट पाडू नये, असे टिळकांना वाटे. ईश्वर आणि धर्म यांच्याविषयीचे आगरकरांचे विचार रा. गो. भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे यांसारख्या सुधारक व्यक्तींनाही पटत नसत. सुधारकातील लेखांविरुद्ध चहुबाजूंनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली. खुनाच्या धमक्या, प्रेतयात्रा काढणे इ. प्रकार झाले; परंतु ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार’, या भूमिकेतून सामाजिक सुधारणांचा कडवा पुरस्कार त्यांनी आमरण चालू ठेवला. सुधारकातील लेखांतून त्यांचे समाजजीवनाच्या विविध अंगांचे सूक्ष्म निरीक्षण आणि सखोल चिंतन प्रत्ययास येते. स्त्रियांचा पोषाख, विधवांचे केशवपन, सोवळे-ओवळे, अंत्यविधी आणि अंत्यसंस्कार, हजामत, जोडे इ. विषय जसे त्यांत आहेत, तसेच देवतांची उत्पत्ती, मूर्तिपूजा, आत्म्याची मरणोत्तर स्थिती इत्यादींसारखे तात्त्विक आणि धर्माशी निकटचा संबंध असलेले विषयही आहेत. सामाजिक सुधारणा आणि कायदा यांचे संबंध काय असावेत, यासंबंधीची आपली भूमिका मांडण्यासाठी आणि समाजहितकारक कायद्यांच्या जोरदार पुरस्कारासाठी काही लेख लिहिले गेले आहेत; तर काही लेखांतून सामाजिक गुलामगिरीने जखडून गेलेल्या स्त्रियांच्या शिक्षणादी समस्यांविषयी मूलगामी विचार आलेले आहेत.



समाजचिंतन हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव असला, तरी राजकीय विचारांच्या जहालपणात ते टिळकांच्या बरोबरच होते. राजकीय हक्क आणि राजकीय स्वातंत्र्य यांची तीव्र जाणीव त्यांच्या लेखांतून स्पष्टपणे प्रतिबिंबित झालेली आहे. चिपळूणकर निवर्तल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय विचारजागृती घडवून आणण्याचे काम केसरीतून बाहेर पडेपर्यंत त्यांनीच केले.



आपल्या वैचारिक लेखांनी मराठीतील निबंधसाहित्यात त्यांनी मोलाची भर घातली, पल्लेदार वाक्ये, मुद्देसूद प्रतिपादन, अन्वर्थक अलंकार आणि प्रासंगिक नर्मविनोद ही त्यांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये. त्यांच्या ‘कवि, काव्य, काव्यरति’ आणि ‘शेक्सपिअर, भवभूति व कालिदास’ यांसारख्या साहित्यविषयक निबंधांनी आजच्या काही टीकाकारांचे लक्ष वेधून घेतले असून त्यांनी आगरकरांना साहित्यशास्त्रातील काही मूलभूत तत्त्वांचा शास्त्रीय पद्धतीने विचार करणारे विचारवंत मानले आहे. काव्य आणि संवेदना यांचा विशेष संबंध, काव्यातील सत्य आणि शास्त्रीय सत्य, काव्यातील करुणरस, कविमन आणि काव्यनिर्मितिप्रक्रिया इत्यादींसंबंधीचे त्यांचे विचार या दृष्टीने कक्षणीय ठरतात. त्यांचे ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत: विकारविलसित अथवाशेक्सपीअरकृत हॉम्लेट नाटकाचे भाषांतर (१८८३), डोंगरीच्या तुरुंगांत आमचे १०१ दिवस (१८८२), शेठ माधवदास रघुनाथदास व बाई धनकुवरबाई यांचे पुनर्विवाहचरित्र (१९०७),वाक्यमीमांसा आणि वाक्याचे पृथक्करण.



विकारविलासिताच्या प्रदीर्घ प्रस्तावंनेत परक्या भाषेतील नाट्यकृतींची मराठी भाषांतरे कशी करावी, यासंबंधीची मते त्यांनी मांडली आहेत. ‘कोल्हापूर प्रकरणा’वरून १८८२त डोंगरी येथे टिळकांसह कारावास भोगत असतानाचे त्यांचे अनुभव त्यांनी डोंगरीच्या तुरुंगांत मध्ये खेळकर आणि विनोदी शैलीत सांगितले आहेत. मराठी वाक्याचे निरनिराळे अवयव आणि त्यांचे परस्परसंबंध यांचा तपशीलवार विचार त्यांनीच मराठीत प्रथम आणला. त्यांचे केसरीतील निवडक निबंध (१८८७) आणि सुधारकातील वेचक लेख (निबंधसंग्रह १८९५) प्रसिद्ध झाले आहेत. साहित्य अकादेमीनेही त्यांचे काही लेख प्रसिद्ध केले आहेत. दम्याच्या विकाराने पुणे येथे ते निधन पावले.

संस्था

  • गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आचार्य अत्रे यांनी पुण्यात इ.स. १९३४साली आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.

पत्रकारिता

१८८१ मध्ये 'केसरी'हे वृत्तपत्र सुरू केले. याचे प्रथम संपादक म्हणून आगरकरांनी १८८८ पर्यंत काम केले. आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून 'केसरी'त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे 'केसरी'ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकरांत वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासुन 'केसरी'चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले.[२]
आगरकरांनी पुण्यातच सुधारक वृत्तपत्र सुरू केले. सुधारक मधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व इ. मुद्यांचा प्रसार केला. तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.[३]


संदर्भ : १. अळतेकर, मा. दा. संपा. संपूर्ण आगरकर ३ भाग, पुणे, दु. आवृ. १९३७, १९१७, १९१८.
            २. खांडेकर, वि. स. संपा. आगरकर, व्यक्ति आणि विचार, पुणे, १९४५.
            ३. गोखले, पु. पां. आगरकर चरित्र, पुणे, १९४४.

कुलकर्णी, अ. र.
Source:Marathi vishvkosh 
Wikipedia

Monday, January 12, 2015

भारतीय लोक नृत्य राज्यनिहाय यादी(State wise List of Indian folk dances )


नृत्यझारखंड छाऊ, Sarahul, जाट-जतिन, कर्म, Danga, Bidesia, Sohrai.
उत्तराखंड Gadhwali, Kumayuni, Kajari, Jhora, Raslila, Chappeli
आंध्र प्रदेश (शास्त्रीय) कुचीपुडी, Ghantamardala, Ottam Thedal, Mohiniattam, कुम्मी, सिद्धी माधुरी, Chhadi.
छत्तीसगड Goudi कर्मा, Jhumar, Dagla, पाली, Tapali, Navrani, Diwari, Mundari.
अरुणाचल प्रदेश मुखवटा नृत्य, युद्ध नृत्य इत्यादी
हिमाचल प्रदेश Jhora, Jhali, Chharhi, Dhaman, Chhapeli, Mahasu, नाती, डांगी, चंबा, थंड होण्यासाठी फ्रीज, Jhainta, Daf, लावा नृत्य इत्यादी
गोवा मंडी, Jhagor, Khol, Dakni,
आसाम बिहू, Bichhua, Natpuja, Maharas, Kaligopal, Bagurumba, नागा नृत्य, क्रीडा गोपाळ Tabal Chongli, कनू, Jhumura Hobjanai
पश्चिम बंगाल काठी, Gambhira, Dhali, जत्रा, बाऊल, Marasia, महाल, कीर्तन,
(शास्त्रीय) केरळ कथकली, Rakhal, Nat पुरळ, महा पुरळ, Raukhat
मेघालय Laho, Baagla,
(शास्त्रीय) मणिपूर मणिपुरी, Rakhal, Nat पुरळ, महा पुरळ, Raukhat,
नागालँड चोंग, Khaiva, लिम, Nuralim,
(शास्त्रीय) ओरिसा ओडिसी, Rakhal, Nat पुरळ, महा पुरळ, Raukhat
महाराष्ट्र लावणी, Nakata, कोळी, Lezim, Gafa, Dahikala Dasavtar किंवा Bohada, तमाशा, Mauni, Powara, Gouricha
कर्नाटक Yakshagan, Huttari, Suggi, Kunitha, Karga, Lambi
गुजरात गरबा, दांडिया रस, Tippani Juriun, भवाई,
पंजाब Bhangra, Giddha, मौज करणे, Dhaman
राजस्थान Ghumar, Chakri, Ganagor, झुलान लीला Jhuma, Suisini, Ghapal, Panihari, Ginad
मिझोराम Khanatm, Pakhupila, Cherokan
जम्मू आणि काश्मीर रौफ, Hikat, Mandjas, Kud दांडी nach, Damali.
तामिळनाडू भरतनाट्यम, Kumi, Kolattam, Kavadi
उत्तर प्रदेश Nautanki, Raslila, Kajri, Jhora, Chappeli, Jaita.
बिहार Jata-जतिन, Bakho-Bakhain, Panwariya, आदेश-चकवा, Bidesia, जत्रा,
हरियाणा Jhumar, Phag नृत्य, Daph, Dhamal, Loor, Gugga, Khor, Gagor

**भारतीय राज्यघटना**(Indian Constitution) एमपीएससी (पूर्वपरीक्षा)

एकूण 22 भाग आणि 12 परिशिष्टे
**भाग - I (कलम 1-4): संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्र
**भाग II (कलम 5-11): नागरिकत्व
**भाग III (कलम 12-35): मूलभूत अधिकार
**भाग IV (कलम 36-51): मार्गदर्शक तत्वे
*भाग IV (A) (कलम 51A): मूलभूत कर्तव्ये
**भाग V (कलम 52-151) - केंद्र सरकार (संघराज्य)
**भाग VI (कलम 152-237) - राज्य सरकार
**भाग VII (कलम 238) - अनुसूचित राज्य सूची (ब)
**भाग VIII (कलम 239-241) - केंद्रशासित प्रदेश क्षेत्र
**भाग IX (कलम 242-243) - पंचायतराज
**भाग X (कलम 244-244A) - अनुसूचित जाती व जमाती प्रदेश/क्षेत्र
**भाग XI (कलम 245-263) - केंद्र - राज्य संबंध
**भाग XII (कलम 264-300A) - महसुल - वित्त
**भाग XIII (कलम 301-307) - व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध
**भाग XIV (कलम 308-323) - प्रशासकीय लोकसेवा आयोग
**भाग XV (कलम 323A, 323B) - न्यायाधिकरण
**भाग XVI (कलम 330-342) - अनुसूचित जाती, जमाती साठी आणि अँग्लो इंडियन्स साठी विशेष सोयी
**भाग XVII (कलम 343-351) - कार्यालयीन भाषा
**भाग XVIII (कलम 352-360) - आणीबाणी विषयक माहिती
**भाग XIX (कलम 361-367) - मिश्र कलमे (काश्मीर, इत्यादी)
**भाग XX (कलम 368) - संविधान दुरुस्ती बाबत
**भाग XXI (कलम 369-392) - अस्थायी, संक्रमाणि आणि विशेष उपबंध
**भाग XXII (कलम 393-395) - संक्षिप्त रूपे, प्रारंभ आणि निरसने
***परिशिष्ट I - राज्य व केंद्र शासित प्रदेश
**परिशिष्ट II - वेतन आणि मानधन
**परिशिष्ट III - पद ग्रहण शपथा
**परिशिष्ट IV - राज्यसभा जागांचे विवरण
**परिशिष्ट V - भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती
**परिशिष्ट VI - ईशान्य भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती
**परिशिष्ट VII - केंद्र आणि राज्य सरकार मधील सूची
**परिशिष्ट VIII - भाषा
**परिशिष्ट IX - कायद्यांचे अंमलीकरण
**परिशिष्ट X - पक्षांतरच्या कारणाहून राजकीय पक्षांच्या किंवा सभागृह सदस्यांना अपात्र घोषित
**परिशिष्ट XI - पंचायत राज (राज्याकडे सोपवायची 29 व
िषयांची यादी)
**परिशिष्ट XII - नगरपालिका व महानगर पालिका.

Sunday, January 11, 2015

महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था :


मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा)
गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे)
नारळ संशोधन केंद्र, - भाटय़े (रत्नागिरी)
सुपारी संशोधन केंद्र, - श्रीवर्धन (रायगड)
काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव)
हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली)
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज - केगांव (सोलापूर)
राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे)

महाराष्ट्रातील प्रमुख संशोधन संस्था :

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम    - मुंबई
भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर,    - मुंबइ
टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस    - मुंबई
इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज    - मुंबई
कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी    - मुंबई
नॅशमल केमिकल लॅबोरेटरी    - पुणे
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी    - पुणे
वॉटर अँड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट (वाल्मी)    - औरंगाबाद
भारत इतिहास संशोधन मंडळ,     - पुणे
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर    - पुणे
सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉटन रिसर्च    - नागपूर
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी)    - नाशिक
 अॅटोमिक एनर्जी कमिशनचे मुख्यालय    - मुंबई
 खार जमीन संशोधन केंद्र    - पनवेल

Saturday, January 10, 2015

MPSC Basics :: अर्थशास्त्राची तयारी

राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना अर्थशास्त्राच्या संकल्पना व्यवस्थित समजून घेणे गरजेचे ठरते. ते करताना महाराष्ट्राची आणि भारताची आíथक पाहणी अभ्यासावी. अर्थशास्त्रासंबंधीची आकडेवारी वेगवेगळ्या पुस्तकांत वेगवेगळी असू शकते. हे लक्षात घेत india.gov.in या वेबसाइटवरील अधिकृत आकडेवारी अभ्यासावी. परीक्षेत अर्थशास्त्रीय आकडेवारीसंबंधात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या खूप नसते. या लेखात आपण काही महत्त्वाच्या आíथक संकल्पना समजून घेऊयात-
जागतिक अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण उत्पादन साधन संपत्तीची मालकी आणि विकासाची अवस्था या दोन निकषांवर होते. उत्पादन साधनसंपत्तीच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था या तीन प्रकारे वर्गीकरण केले जाते.

  • भांडवलशाही अर्थव्यवस्था (मुक्त अर्थव्यवस्था)-  या अर्थव्यवस्थेत उत्पादनांची साधने खासगी मालकीची असतात. वैशिष्टय़े- उत्पादक ग्राहकांच्या मागणीनुसार वस्तूंचा पुरवठा करतात. ग्राहक सार्वभौम असतात. त्यांच्या पसंतीनुसार उत्पादन केले जाते. थोडक्यात, ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो. किंमत ठरविण्याची प्रक्रिया मुक्तपणे चालते. म्हणजेच ती सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असते, म्हणून या अर्थव्यवस्थेला 'मुक्त अर्थव्यवस्था' असेही म्हणतात. यात उत्पादन नफा मिळविण्याच्या हेतूने केले जाते.
त्रुटी- आíथक सत्तेचे केंद्रीकरण झाल्याने गरीब-श्रीमंत यातील दरी वाढते. यात गरिबी, बेरोजगारी, पर्यावरण या प्रश्नांचा विचार केला जात नाही.
  • समाजवादी अर्थव्यवस्था- ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारी मालकीची (सार्वजनिक मालकीची) असतात, तिला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतात. वैशिष्टय़े- वस्तू आणि सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही. सर्व आíथक निर्णय सरकार घेते. या व्यवस्थेत ग्राहक सार्वभौम ठरत नाही. वस्तू व सेवांचे उत्पादन, वाटप इत्यादी बाबी बाजार यंत्रणेवर अवलंबून नसून त्याबाबतचा निर्णय शासन घेते. 
त्रुटी- यात व्यक्तिस्वातंत्र्याचा लोप होतो. कधीकधी सरकारी नियंत्रणाचा अतिरेक होतो. कार्यक्षमता, उत्पादकता कमी होते.
  • मिश्र अर्थव्यवस्था-  ज्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खासगी अशी दोन्ही क्षेत्रे एकाच वेळी अस्तित्वात असतात, त्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. वैशिष्टय़े- यात खासगी मालमत्तेविषयक मर्यादित हक्क असतो. काही उद्योगांची उभारणी सरकारी आणि खासगी स्तरावर केली जाते. भांडवली आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील त्रुटी वगळून त्यातील चांगल्या बाबींचा समन्वय या अर्थव्यवस्थेत करण्यात आला आहे.
* विकसित अर्थव्यवस्था- या अर्थव्यवस्थेत दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण जास्त असते. यात मोठय़ा प्रमाणावर औद्योगिकीकरण, शहरीकरण झालेले असते. साक्षरतेचे प्रमाण जास्त असते. जन्मदर व मृत्युदर प्रमाण कमी असतो. 
उदा. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया इत्यादी.
* विकसनशील अर्थव्यवस्था- या अर्थव्यस्थेत दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण तुलनेने कमी असते. साक्षरतेचे प्रमाण कमी असते. मात्र जी अर्थव्यवस्था आपल्या समस्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते, त्या अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था असे म्हणतात. उदा. भारत, श्रीलंका, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतील काही देश.

* मायक्रोइकॉनॉमिक्स- यात बाजारपेठेतील विक्रेता आणि ग्राहक या मूलभूत घटकांचा अभ्यास केलेला असतो. उदाहरणार्थ पुस्तक बांधणी, आगकाडय़ा तयार करणे तसेच खरेदीदार, विक्रेता या घटकांचा विचार असतो.
* मॅक्रोइकॉनॉमिक्स- यात अर्थव्यवस्थेच्या व्यापक घटकांचा विचार केलेला असतो. म्हणजेच यात राष्ट्रीय उत्पन्न, महागाई, बेरोजगारी चलनविषयक धोरण, राजकोषीय धोरण यांचा अभ्यास करण्यात आलेला असतो.
* संघटित क्षेत्र- कार्यशक्तीचे विभाजन दोन गटांत केले जाते- संघटित क्षेत्रातील कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगार. संघटित क्षेत्रातील कामगारांना कायद्याद्वारे संरक्षण दिले जाते. हे कामगार आपल्या ट्रेड युनियन्स स्थापन करून मालकांकडून चांगल्या मजुरीसाठी वाटाघाटी करू शकतात. सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा तसेच १० किंवा त्याहून अधिक कामगारांना रोजगार देणाऱ्या खासगी क्षेत्रातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश संघटित क्षेत्रात होतो.
* असंघटित क्षेत्र- संघटित क्षेत्र सोडून उर्वरित उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा समावेश असंघटित क्षेत्रात होतो. त्यांना संघटित क्षेत्रासारखे लाभ मिळत नाहीत. उदा. शेतीवर काम करणारे शेतमजूर.
* मूल्यावपात-  अर्थव्यवस्थेच्या संदर्भात 'डंपिंग' म्हणजे, एखाद्या देशातील उत्पादक स्थानिक बाजारात ज्या किमतीस आपले उत्पादन विकतो, त्यापेक्षा कमी किमतीस तेच किंवा त्यासारखे उत्पादन विदेशी बाजारपेठेत विकतो, त्या विक्री धोरणास 'डंपिंग' असे म्हणतात. यामुळे ग्राहकांना स्वस्त किमतीत वस्तू उपलब्ध होतात. मात्र त्याचा फटका स्थानिक उत्पादकांना मोठय़ा प्रमाणात बसतो. अनेकदा त्यांना आपले उत्पादन बंद करावे लागते, कामगारांचा रोजगार जातो. यामागची कारणे- काही वेळा स्थानिक बाजारातील मागणीचा अंदाज न आल्याने अधिक उत्पादन केले जाते. या अतिरिक्त उत्पादनाची विक्री करण्यासाठी 'डंपिंग'चा आधार घेतला जातो. बहुतेक वेळा विदेशी बाजारपेठ काबीज करण्यासाठी तेथील किमतीपेक्षा कमी किमतीला माल विकून ती बाजारपेठ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातो. बाहेरील देशाच्या मालाचे भारतात 'डंपिंग' होऊ नये, यासाठी केंद्र सरकारचे जे धोरण आहे, त्यास 'अँटिडंपिंग' असे म्हणतात. जागतिक व्यापार संघटनेच्या करारात 'डंपिंग' हे बेकायदेशीर ठरवलेले नाही. मात्र 'डंपिंग' होत असेल तर त्या विरोधात धोरण आखण्याची मुभा जागतिक व्यापार संघटनेने सदस्यांना दिलेली आहे.
* मानव विकास निर्देशांक- मानव विकास निर्देशांक मोजण्यामागची प्रमुख संकल्पना पाकिस्तानी अर्थतज्ज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ज्ञ अर्मत्य सेन यांची आहे, असे मानले जाते. महबूब उल हक यांना मानव विकास निर्देशांकाचे जनक म्हणतात. हा निर्देशांक पुढील निकषांवर काढला जातो- 
1. आरोग्य- देशाचा आरोग्य स्तर मोजण्यासाठी जन्माच्या वेळेचे आयुर्मान या निर्देशांकात वापरण्यात येते.
2. शिक्षण-  देशाचा शैक्षणिक स्तर मोजण्यासाठी पुढील दोन निकष वापरले जातात- १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची अपेक्षित शालेय वर्षे, २५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या प्रौढांचे सरासरी शालेय वर्षे.
3. जीवनमानाचा दर्जा- देशाच्या जीवनमानाचा दर्जा मोजण्यासाठी दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हा निकष वापरला जातो.
* गौण प्रत कर्ज (Sub Prime Loans)- प्राइम हा शब्द इंग्रजीत उच्च दर्जा दाखविण्यासाठी वापरला जातो. सब प्राइम याचा अर्थ कमी दर्जा/ गौण दर्जा. एखादी बाब कमी महत्त्वाची असेल तर तिला 'सब प्राइम' असे म्हटले जाते. व्यापारी बँका लोकांकडून ठेवी गोळा करतात आणि गरजू लोकांना व्यवसायासाठी कर्ज देतात. लोकांकडून गोळा केलेली ठेवींची रक्कम बँकांच्या दृष्टीने देणी (liabilities) असतात तर वाटप केलेली कर्जाची रक्कम येणी (assets)असतात. बँका कर्ज देताना खालील बाबींची खात्री करून घेतात-  कर्ज देताना बँका कर्जदाराकडून तारण, गहाण, जामीन देणारा इत्यादी गोष्टींची पूर्तता करून घेतात. कर्ज देताना कर्जदाराच्या व्याज आणि कर्ज फेडण्याच्या क्षमतेची पूर्ण खात्री करून घेतात. जर या दोन्ही बाबी समाधानकारक असतील तर ते कर्ज चांगले किंवा उच्च दर्जाचे (prime loans ) मानले जाते. या उलट दिलेल्या कर्जासाठी पुरेशी सुरक्षितता नसेल तसेच परतफेडीची कर्जदाराची क्षमता नसेल आणि अशांना कर्ज दिले तर त्याला गौण प्रत कर्ज असे म्हटले जाते.
गौण प्रत कर्ज देण्याची कारणे -
  1. काही वेळा प्राइम कर्ज दिल्यानंतरही कालांतराने ती सबप्राइम होतात. उदा. कर्ज देताना एखाद्याची कर्ज फेडण्याची क्षमता सुरुवातीला चांगली असेल आणि काही वर्षांनंतर तो कर्ज फेडू न शकल्यास ते गौण प्रत कर्ज होते.
  2. काही वेळा सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे काही कर्जे वाटावी लागतात. उदा. सुशिक्षित बेरोजगारांना वाटलेली कर्जे, अल्पभूधारक शेतकऱ्यांना वाटलेली कर्जे. हे कर्ज वाटण्यासाठी कर्जदारांच्या संख्येचे लक्ष्य बँकांना दिले जाते. साहजिकच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांत कर्जवाटप करणे अनिवार्य होते. त्यामुळे ही लक्ष्यपूर्ती करताना कर्जाची सुरक्षितता आणि कर्ज परतफेडीची क्षमता या बाबींकडे दुर्लक्ष होऊन ही कर्जे गौण प्रत होतात.
  3. काही वेळा बँकांकडे (ठेवींच्या स्वरूपात) भरपूर पसा उपलब्ध होतो. हा पसा कर्ज स्वरूपात दिल्याशिवाय बँकांना व्याज मिळत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या ठेवींवर व्याज देणे अवघड होऊन बसते. हा पसा बँकांना कर्ज स्वरूपात द्यायचा असल्याने आणि बाजारात कर्जाची मागणी कमी असल्याने बँका कर्ज देताना कर्जाच्या सुरक्षिततेकडे व कर्जदाराच्या परतफेड क्षमतेकडे दुर्लक्ष करतात आणि ही कर्जे गौण प्रत कर्जे ठरतात. 
source: www.loksatta.com

थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ


० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्य प्रदेश)
० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर
० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)
० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज (कोल्हापूर)
० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)
० महात्मा फुले- पुणे
० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)
० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)
० गोपाळ हरी देशमुख- पुणे
० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)
० सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)
० बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)
० आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके- शिरढोण (रायगड)
० आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)
०स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)
० सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)
० विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)


० गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)
० विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)
० डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)
० साने गुरुजी- पालघर (रायगड)
० संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)
० सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)
० संत ज्ञानेश्वर- आपेगाव
०संत एकनाथ- पैठण-
० समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना)
० संत तुकडोजी महाराज- यावली (अमरावती)