Wednesday, December 31, 2014

ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना (Establishment of British rule in India)


 बंगालमध्ये इंग्रज सत्तेचा उदय:
१. भारतात इंग्रजांचे बस्तान
२. प्लासीची लढाई
३. मीर कासीमशी तह
४. बक्सारची लढाई आणि तिचे महत्व

  १. भारतात इंग्रजांचे बस्तान:
  • व्यापाराच्या उद्देशाने पोर्तुगीज आणि डच यांच्या नंतर इंग्रज भारतात आले. त्यासाठी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. 
  • इंग्रजांची पहिली वखार मुगल सम्राट जहांगीर च्या कारकीर्दीत पश्चिम किनार्‍यावर सुरत येथे स्थापन झाली.
  • बंगालमध्ये पहिली इंग्रज वखार १६५१ मध्ये हुगळी येथे निघाली. त्यासाठी बंगालचा तत्कालीन सुभेदार शाहशुजा ह्याने इंग्रजांना परवानगी दिली.
  • त्याचवर्षी राजवंशातील एका स्त्रीवर डॉ. बाऊटन ह्याने केलेल्या उपचारांमुळे खूष होऊन शाहशुजाने इंग्रजांना वार्षिक रु. ३०००/- च्या मोबदल्यात संपूर्ण बंगाल, बिहार आणि ओरिसात  मुक्त व्यापाराची परवानगी दिली. 
 २. प्लासीची लढाई:
  • १७५६ मध्ये सिराजउदौला बंगालचा नबाब बनला. ह्याच सुमारास फ्रेंचांशी युद्ध सुरु होण्याची परिस्थिती दिसू लागल्याने   इंग्रजांनी फोर्ट विलियम लढण्यासाठी सज्ज केला व पराकोटावर तोफा चढविल्या.  ह्याबद्दल सिराजउद्दौलाने जाब विचारला असता इंग्रजांनी टाळाटाळीचे उत्तर दिले. त्यामुळे सिराजउदौलाने इंग्रजांविरुद्ध मोहीम सुरु केली आणि फोर्ट विलियमवर हल्ला चढविला. ५ दिवसानंतर इंग्रजांनी शरणागती पत्करली आणि कलकत्त्याचा ताबा माणिकचंदकडे नबाब राजधानी मुर्शिदाबाद येथे निघून गेला.
  • कलकत्ता सिराजउदौलाच्या हाती पडल्याची बातमी मद्रासला पोहोचताच  तेथील अधिका-यांनी तेथील एक सैन्य क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली कलकत्त्याला पाठवले. हे सैन्य कलकत्त्याला जाताच (डिसेंबर १७५६) माणिकचंदने लाच घेऊन कलकत्त्याचा ताबा इंग्रजांना दिला. 
  • ह्यानंतर सिराजउदौला आणि क्लाइव्ह ह्यांच्यात कलकत्ता येथे एक तह झाला. त्यानुसार इंग्रजांना व्यापारातील जुन्या सवलती पुन्हा मिळाल्या तसेच कलकत्त्याची लष्करी सिद्धता करण्याची अनुमती मिळाली. इंग्रजांचे झालेले नुकसान भरून देण्याचे नबाबाने कबूल केले. परंतु इंग्रज आता आक्रमक भूमिकेत होते. तसेच नबाबाचे काही अधिकारी त्याच्यावर नाराज होते. संधीचा फायदा घेत क्लाइव्हने कारस्थान रचले. त्यात नबाबाचा मुख्य सेनापती मीर जाफर इ. सहभागी झाले. कारस्थान असे ठरले कि मीर जाफरला नबाब बनवले जाईल आणि त्याऐवजी तो कंपनीच्या उपकाराची परतफेड करेल.
  • मार्च १७५७ मध्ये इंग्रजांनी फ्रेंच वसाहत चंद्रनगर जिंकून घेतले. त्यामुळे नबाब संतापला. पण तो अडचणीत होता कारण त्याला अफगानांकडून व मराठ्यांकडून आक्रमण होण्याची भीती वाटत होती. नेमक्या अशावेळी क्लाइव्ह आपल्या सैन्यासह मुर्शिदाबादकडे निघाला. 
  • इंग्रज सैन्य आणि नबाब सिराजउदौलाचे सैन्य २३ जून १७५७ रोजी मुर्शिदाबादच्या दक्षिणेला २२ मैलांवर असलेल्या प्लासी गावात एकमेकांसमोर आले. इंग्रज सैन्यात ९५० युरोपियन पायदळ, १०० युरोपियन तोफ, ५० इंग्रज नाविक आणि २१०० भारतीय सैनिक होते. 
  • लढाई चालू असताना मीर जाफरने नबाबला सल्ला दिला कि त्याने युद्धकार्य  अधिका-यांकडे सोपवावे आणि स्वतः युद्धभूमी सोडून निघून जावे. त्याप्रमाणे नबाब २००० सैन्य घेऊन मुर्शिदाबादकडे निघून गेला. नबाबाकडील फ्रेंच सेनाही लवकर पराभूत झाली. मीर जाफर सर्व लढाई तटस्थपने बघत राहिला. क्लाइव्हच्या विजयाबद्दल मीर जाफरने त्याचे अभिनंदन केले.
  • लवकरच नबाब सिराजउदौला याला पकडून ठार मारण्यात आले आणि मीर जाफरला बंगालचा नबाब म्हणून घोषित करण्यात आले.
  • इंग्रजांच्या मदतीबद्दल मीर जाफरने कंपनीला २४ परगणे जिल्ह्याचा प्रदेश दिला. स्वतः क्लाइव्हला २,३४,००० पौन्ड्स भेट देण्यात आली आणि इतरांना रु. ५० लक्ष बक्षीस देण्यात आले. बंगालमधील सर्व फ्रेंच वसाहती इंग्रजांना देण्यात आल्या. तसेच कोणताही इंग्रजांकडून नबाब घेणार नाही असे ठरले.
 प्लासीच्या लढाईचे महत्व :
  • लष्करी दृष्टीने पाहता प्लासीची लढाई फारशी महत्वाची नव्हती. इंग्रजांनी खास लष्करी डावपेचाचे किंवा चातुर्याचे प्रदर्शन केले नाही. नबाबाच्या सहकार्यांनी त्याचा विश्वासघात केला. 
  • प्लासीच्या लढाईचे खरे महत्व त्यानंतर घडलेल्या घटनाक्रमांमुळे आहे. बंगाल इंग्रज नियंत्रणाखाली आला. नवीन नबाब मीर जाफर आपले पद आणि संरक्षण ह्यासाठी पूर्णतः इंग्रजांवर अवलंबून राहिला. हळूहळू बंगालची सर्व सत्ता कंपनीकडे आली.प्लासीच्या लढाईने विशेषतः त्यानंतर इंग्रजांनी बंगालच्या केलेल्या लुटीमुळे इंग्रज अपरिमित साधनसंपत्तीचे स्वामी बनले. कंपनीच्या स्थितीचाही कायापालट झाला. इंग्रजांनी हि लढाई जवळ जवळ न लढतच जिंकली. भारतावर अधिकार मिळवण्याच्या साखळीतील हि महत्वाची कडी होती. 
 ३. मीर कासीमशी तह:  

  • मीर जाफरविरुद्ध निर्माण होत असलेल्या परिस्थितीचा अचूक फायदा मीर जाफरचा धूर्त जावई मीर कासीम ह्याने घेऊन स्वतःला इंग्रजांचा मित्र व नबाबाचा प्रतिस्पर्धी जाहीर केले. इंग्रजांच्या आर्थिक अडचणी दूर करण्याचेही त्याने आश्वासन दिले. त्यादृष्टीने इंग्रज व मीर कासीममध्ये खालील तह झाला.
    •  मीर कासीमने कंपनीला बरद्वान, मिदनापूर व चितगाव जिल्हे द्यावे.
    • सिल्हटच्या चुना व्यापारात कंपनीची अर्धी भागीदारी राहील.
    • मीर कासीम कंपनीला दक्षिण मोहिमांसाठी रु. ५ लक्ष देईल.
    • कंपनीचे शत्रुमित्र मीर कासीम आपले शत्रुमित्र मानील.
    • एकमेकांच्या प्रदेशातील लोकांना रहिवासाची संमती देण्यात येणार नाही.
    • कंपनी मीर कासीमला लष्करी मदत देईल. परंतु अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाही.
  • तहाची अंमलबजावणी करण्यासाठी इंग्रज अधिकारी मुर्शिदाबादला गेले. एकून परिस्थिती आपल्याविरुद्ध गेल्याची पाहून मीर जाफरने सत्तात्याग केला. त्यानंतर मीर जाफरने कलकत्ता येथे राहणे पसंद केले. त्याला रु. १५,०००/- मासिक पेन्शन देण्याचे ठरले. 
 ४. बक्सारची लढाई आणि तिचे महत्व:
  • कालांतराने मीर कासीम हि इंग्रजांच्या हातातील खेळणे बनले. व्यापारीवृत्तीच्या इंग्रजांनी अखेर मीर कासिम्ला संघर्ष करण्यास प्रवृत्त केले. 
  • प्रत्यक्षात संघर्षाला प्रारंभ १७६३ मध्ये झाला. ताबडतोब मीर कासिमाला नबाब पदावरून हटवून मीर जाफरला पुन्हा बंगालच्या नबाबपदावर बसवण्यात आले. मात्र संघर्ष सुरूच राहिला. हळूहळू मीर कासीमची ताकद कमी पडू लागली. म्हणून तो सीमेवरील अवध राज्यात निघून गेला. ह्यावेळी अवधाचा नबाब शुजा उद्दौला होता. पानिपतच्या युद्धाच्या वेळी दिल्लीहून पळालेला मुगल सम्राट शाह आलम अवधच्याच आश्रयाला होता. इंग्रजांना बाहेर काढण्याबाबत वरील तिघांचे संगनमत होऊन त्यांनी एक संयुक्त फळी तयार केली. त्यात सुमारे ५०,००० च्या आसपास सैनिक होते. 
  • ह्या सैन्याचा मुकाबला कंपनीबरोबर बक्सार येथे झाला. इंग्रज सैन्यात ७०२७ सैनिक असून त्याचे नेतृत्व मेजर मनरोकडे होते.
  • २३ ऑक्टोबर १७६४ रोजी झालेल्या बक्साराच्या लढाईत उभयपक्षी हानी झाली. मात्र विजय इंग्रजांना मिळाला. लढाईत इंग्रजांकडील ८४७ सैनिक जखमी किंवा मृतुमुखी पडले. 
  • प्लासीची लढाई आणि बक्सारची लढाई यामध्ये महत्वाचा फरक म्हणजे प्लासीची लढाई इंग्रजांनी विश्वासघाताच्या मार्गाने जिंकली होती. मात्र बक्सारची लढाई इंग्रजांनी स्वतःच्या युद्धकौशल्यावर जिंकली. 
  • प्लासीच्या निर्णयावर बक्साराच्या विजयाने शिक्कामोर्तब केले. भारतात आता इंग्रजांना आव्हान देणारे दुसरे कोणी राहिले नाही. बंगालचा नबाब इंग्रजांच्या हातातील खेळणे बनला. अवधाचा नबाब शुजा उदौला आणि देल्ली सम्राट शाह आलम इंग्रजांना शरण आले. इंग्रजांचे क्षेत्र पश्चिमेला अलाहाबाद्पर्यंत वाढले आणि त्यामुळे दिल्लीला जाण्याचा मार्ग मोकळा झाला. 
  • प्लासीच्या लढाईने इंग्रज सत्ता दृढमूल झाली तर बक्सारच्या लढाईने उत्तर भारतात ती बलशाली बनली. भारत गुलामगिरीत जाणार हे स्पष्ट दिसत होते. बक्सारची लढाई भारताच्या इतिहासात निर्णायक ठरली होती.

#‎अतिसंभाव्य‬ १०० प्रश्नोत्तरे:- STI पूर्वपरीक्षा 2015


‪#‎चालू‬ घडामोडी:- डिसेंबर २०१४
०१) ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराचे ४४वे व ४५वे मानकरी कोण ठरले आहेत?
== स्वातंत्र्य सेनानी पंडित मदन मोहन मालवीय(मरणोत्तर) आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी
०२) मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झालेले पंडित मदन मोहन मालवीय हे कितवे भारतीय आहेत?
== बारावे
०३) ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झालेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे कितवे पंतप्रधान आहेत?
== सातवे
पंडित मदन मोहन मालवीय यांचा जन्म कधी व कोठे झाला?
== २५ डिसेंबर १८६१ मध्ये अलाहाबाद येथे(मृत्यू:-१२ नोव्हेंबर १९४६-वाराणसी)
०४) अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म कधी व कोठे झाला?
== सन २५ डिसेंबर १९२४ मध्ये ग्वाल्हेर येथे
०५) नरेंद्र मोदी सरकारने २५ डिसेंबर हा दिवस कोणता दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली आहे?
== 'सुशासन दिवस' Good Governance Day
०६) आशियातील सर्वात मोठे निवासी विद्यापीठ म्हणून ओळखलेले जाणार्या बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणत्या वर्षी केली होती?
== १९१६
०७) १९०९(लाहोर-रौप्यमहोस्तवी),१९१८(दिल्ली) १९३२(दिल्ली) आणि १९३३(कलकत्ता) असे चार वेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेली व्यक्ती कोण?
== पंडित मदन मोहन मालवीय
०८) हिंदुस्थान असेच इंडियन ओपीनियन,साप्ताहिक अभ्युदय या साप्ताहिकाचे संपादक व अलाहाबादमधून प्रकाशित होणा-या 'द लीडर' या इंग्लिश वर्तमानपत्राचेही संस्थापक असलेली व्यक्ती कोण?
== पंडित मदन मोहन मालवीय
०९) 'मकरंद' आणि 'झक्कड़सिंह' या टोपणनावाने कविता करणारे स्वातंत्रसैनानी कोण?
== पंडित मदन मोहन मालवीय
१०) पंडित मदन मोहन मालवीय यांचे काम आणि सेवाभावी वृत्तीने प्रभावित होऊन लोक त्यांना काय म्हणत असत?
== महामना
११) चौरीचौरा कटाच्या खटल्यात (१९२२) आरोपीची बाजू मांडणारे वकील कोण?
== पंडित मदन मोहन मालवीय
१२) पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान कोण?
== अटलबिहारी वाजपेयी
१३) १९७७ मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार सत्तेवर असताना अटलबिहारी वाजपेयी यांनी कोणत्या खात्याचा कार्यभार संभाळला होता?
== परराष्ट्र खाते (२४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९)
१४) १६ मे ते १ जून १९९६ आणि नंतर १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४ पर्यंत भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान असलेला नेता कोण?
== अटलबिहारी वाजपेयी(तीनदा पंतप्रधान)
१५) भारतीय जनसंघ या पक्षाचे सहसंस्थापक आणि १९६८ ते १९७३ पर्यंत त्याचे अध्यक्षपद भूषविणारी व्यक्ती कोण?
== अटलबिहारी वाजपेयी
१६) अटलबिहारी वाजपेयी यांचे आदर्श कोण होते?
== डॉ॰ श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय
१७) भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८-१९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५-१९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७-१९८०), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८०-१९८६) आणि भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८०-१९८४, १९८६, १९९३-१९९६), ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते असलेली व्यक्ती कोण?
== अटलबिहारी वाजपेयी
१८) अटलबिहारी वाजपेयी १९५७ मध्ये संसदेवर कोणत्या मतदारसंघातून निवडून आले?
== बलारामपूर
१९) १९७७ च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हिंदीतून भाषण करणारी भारतीय व्यक्ती कोण?
== अटलबिहारी वाजपेयी
२०) मे १९९८ मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली ५ अणुचाचण्या कोठे केल्या?
== पोखरण(राजस्थान) Operation Shakti–98
२१) सदा ए सरहद या नावाने ओळखली जाणारी लाहोर-दिल्ली बससेवेची सुरवात १९९८ मध्ये करणारे पंतप्रधान कोण?
== अटलबिहारी वाजपेयी
२२) राष्ट्रधर्म (मासिक),पाञ्चजन्य (साप्ताहिक) आणि स्वदेश व वीर अर्जुन या दैनिकांचे संपादक म्हणून काम पाहणारी व्यक्ती कोण?
== अटलबिहारी वाजपेयी
२३) सन १९९९ साली तालिबान अतिरेक्यांनी IC - ८१४(काठमांडू कडून दिल्ली) या प्रवासी विमानाचे अपहरण केले होते ही घटना कोणत्या भारतीय पंतप्रधानाच्या काळात घडली आहे?
== अटलबिहारी वाजपेयी
२४) कारगिल युध्दाच्या वेळी १९९९ मध्ये ऑपरेशन विजय कोणत्या भारतीय पंतप्रधानाच्या काळात सुरु झाले?
== अटलबिहारी वाजपेयी
२५) २००१ साली दहशतवादी अफझल गुरु आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला ही घटना कोणत्या भारतीय पंतप्रधानाच्या काळात घडली आहे?
== अटलबिहारी वाजपेयी
२६) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना कोण-कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
== १९९२ - पद्मविभूषण
१९९३ - कानपूर विद्यापिठाची डॉक्टवरेट
१९९४ - लोकमान्य टिळक पुरस्कार
१९९४ - सर्वोत्कृष्ट संसदपटू
१९९४ - पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार
२०१४ - भारतरत्न
२७) राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजननेची सुरवात कोणत्या पंतप्रधानांच्या काळात सुरु झाली?
== अटलबिहारी वाजपेयी
२८) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची साहित्य संपदा:-
नयी चुनौती, नया अवसर (२००२)
इंडियाज पर्स्पेक्टिीव्ह ऑन एशियान अँड एशिया- पॅसिफिक रिजन (२००३)
न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी (१९७९)
डिसीसिव्हज डेज (१९९९)
नॅशनल इंटिग्रेशन (१९६१)
शक्ती से शांती (१९९९)
राजनीती की रपतिली रहेम (१९९७)
विकारा बिंदू (हिंदी आवृत्ती) (१९९७)
कुछ लेख, कुछ भाषण (१९९६)
बॅक टू स्क्वेअर (१९९८)
डायनॅमिक्स् ऑफ ॲन ओपन सोसायटी (१९७७)
‘मेरी संसदीय यात्रा’ (चार खंड),
‘फोर डिकेडस इन पार्लमेंट’ (तीन खंडांत भाषणांचा संग्रह) १९५७- ९५,
‘लोकसभा में अटलजी’ (भाषणांचा संग्रह),
‘कैदी कवीराज की कुंडलियाए’
‘न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी (१९७७- ७९ या काळात परराष्ट्रमंत्री असताना केलेल्या भाषणांचा संग्रह)
२९) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे कवितासंग्रह:-
ट्‌वेन्टी वन पोएम्स (२००३)
क्यार खोया, क्या२ पाया (१९९९)
मेरी इक्याावन कविताएँ (१९९५)
श्रेष्ठ कविता (१९९७)
‘अमर आग हैं’

३०) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काही प्रसिध्द रचना:-
अंतरद्वंद्व
अपने ही मन से कुछ बोलें
ऊँचाई
एक बरस बीत गया
क़दम मिला कर चलना होगा
कौरव कौन, कौन पांडव
क्षमा याचना
जीवन की ढलने लगी साँझ
झुक नहीं सकते
दो अनुभूतियाँ
पुनः चमकेगा दिनकर
मनाली मत जइयो
मैं न चुप हूँ न गाता हूँ
मौत से ठन गई
हरी हरी दूब पर
हिरोशिमा की पीड़ा
३१) युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून खासदार राजीव सातव यांना हटवून पंजाबमधील आमदार असलेल्या कोणत्या नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे?
== अमरिंदर राजा ब्रार
३२) कोळसा खाणींचे वाटप करणाऱ्या तसेच विमा क्षेत्रात ४९ टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण अध्यादेशांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कधी मंजुरी देण्यात आली?
== २४ डिसेंबर २०१४
३३) चीनमधील कोणत्या शहरातील सरकारी शिक्षण विभागाने शाळांमध्ये ख्रिसमससंबंधी कार्यक्रम साजरे करण्यावर बंदी घातली आहे?
== वेंझोऊ
३४) वेंझोऊ हे शहर चीनच्या पूर्व किनाऱ्याला असून इथे असलेल्या ख्रिश्चन बहुसंख्येमुळे त्या शहराला चीनचे ----- म्हणून संबोधले जाते
== जेरुसलेम
३५))उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल या कंपनीने कोणत्या जपानी वित्तीय संस्थेशी ख्रिसमसच्या मुहूर्तावर व्यावसायिक करार केला आहे?
== सुमिटोमो मित्सुई ट्रस्ट बँक
३६)एटीएम वापरावर शुल्क आकारण्यास परवानगी दिल्याबद्दल कोणत्या उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेसह इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) आणि स्टेट बँकेलाही नोटिस पाठविली आहे?
== दिल्ली उच्च न्यायालय ( मुख्य न्यायमूर्ती जी. रोहिणी आणि न्या. पी. एस. तेजी यांच्या खंडपीठाने)
३७) कोणते शहर हे लोकसंख्येच्या तुलनेत भारतातील सर्वात जास्त सायकल वापरणारे शहर म्हणून ओळखले जात असल्याचा अहवाल नाशिक सायकल‌स्टि असोसिएशनने केलेल्या पहाणीत आढळून आला आहे?
== नाशिक
३८) चलनात असलेल्या नोटांत संगती असावी आणि बनावट नोटांची तस्करी रोखण्यास मदत व्हावी या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेने २००५ पूर्वी नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर कधीपासून अंमलबजावणी होणार आहे?
== ३० जून २०१५
३९) आगामी महाराष्ट्र कबड्डी लीगसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने पुणेस्थित कोणत्या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीशी करार केला आहे?
== गॉडविट एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड
४०) सात सक्कं त्रेचाळीस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== किरण नगरकर
४१) अर्थ मंत्रालयाने कच्च्या तेलासाठी २.५ टक्के; तर वनस्पती तेलासाठी ५ टक्के आयात शुल्क वाढविले आहे.त्यामुळे कच्च्या तेलावरील एकूण आयात शुल्क आणि वनस्पती तेलावरील एकूण आयात शुल्क किती टक्के झाले आहे?
== अनुक्रमे ७.५% आणि १५%
४२) सुमात्रा बेटांच्या उत्तरेला समुद्रात ९.२ रिश्टएर तीव्रतेचा भूकंप बसल्याने प्रचंड त्सुनामी आली होती, त्या घटनेला २६ डिसेंबर २०१४ रोजी किती वर्षे पूर्ण होत आहे?
== दहा वर्षे
४३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मोहिमेत कोणत्या जिल्ह्यातील ४ लाख ८५ हजार ४७ लोकांनी जिल्ह्यातील १८९० ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत नवा विश्व विक्रम केला असून या मोहिमेची नोंद आता गिनेस बुकात होणार असून, या मोहिमेचा देशभर प्रसार करण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ऍप्लिकेशनदेखील लॉंच केले जाणार आहे. तसेच स्वच्छतेच्या मोहिमेचा संदेश देणारी दिनदर्शिकादेखील प्रसिद्ध केली जाईल?
== सबरकांथा(गुजरात)
४४) केंद्र सरकारची समुद्र विज्ञान संस्था (एनआयओ) आणि राज्याच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) यांच्या एकत्रित अहवालानुसार देशातील सर्वाधिक प्रदूषित समुद्रकिनारा कोणता?
== महाराष्ट्राचा समुद्रकिनारा
४५) संगणक आणि टॅबलेट अश्या दोन्ही प्रकारे वापर करता येणारे व विंडोज ८.१ कार्य प्रणालीवर चालणारे कोणते उपकरण माइक्रोसॉफ्ट कंपनीने सादर केले आहे?
== विंडोज टू इन वन
४६) दहशतवादाशी संबंधित खटले तातडीने निकाली काढण्यासाठी विशेष लष्करी न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय नुकताच कोणत्या देशाने घेतला आहे?
== पाकिस्तान
४७) ‘देशभक्त नथुराम गोडसे’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या मागणीसंदर्भात अखिल भारतीय हिंदू महासभेविरोधात पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते असलेल्या कोणत्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे?
== हेमंत पाटील
४८) वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी गृह खात्याने तज्ज्ञ अभ्यास गटाची नियुक्ती केली असून यात कोणाचा समावेश करण्यात आला आहे?
== पुण्यातील सी-डॅकचे महासंचालक डॉ. रजत मुना, बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्रा. कृष्णन, सीहीआरटी-ईनचे महासंचालक डॉ. गुलशन राय, आयआयटी कानपूरचे प्रा. डॉ. मणिंद्र अग्रवाल, बंगळूरआयआयटीचे प्रा. डॉ. डी. दास यांचा समावेश असेल, तर गृह खात्याचे सहसचिव कुमार अलोक हे या तज्ज्ञ गटाचे समन्वयक असतील.
४९) केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने खासगी कंपन्यांना कोळसा खाणींचे "ई ऑक्श न‘द्वारे पुनर्वाटप करण्यासंदर्भातील अध्यादेश पुन्हा एकदा प्रसिद्ध करण्यास संमती दिली असून या अध्यादेशान्वये पहिल्या टप्प्यात एकूण किती खाणींचे पुनर्वाटप केले जाणार आहे?
== १०१ खाणींचे
सार्वजनिक कंपन्यांना:-३६ खाणी
उर्जा मंत्रालयास:- ६३ खाणी
पोलाद व सिमेंट उद्योगासाठी:- २ खाणी
५०) दादासाहेब फाळके पुरस्काराने(२०१०) गौरविण्यात आलेले व "एक दुजे के लिए‘ या चित्रपटाचे प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक असलेल्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे?
== के. बालचंदर
५१) कवितालया प्रॉडक्शीनच्या माध्यमातून अनेक हिट चित्रपटांची निर्मिती करणारे प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक कोण?
== के. बालचंदर
५२) 'Why I Assassinated Gandhi' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== नथुराम गोडसे
५३) 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटकाचे लेखक कोण आहेत?
== प्रदीप दळवी
५४) 'गांधीहत्या आणि मी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== गोपाळ गोडसे
५५) 'पंच्चावन्न कोटींचे बळी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== गोपाळ गोडसे
५६) 'Why I killed Gandhi' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== नथुराम गोडसे
५७) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी कोणाच्या नावाची घोषणा केली आहे?
== राधाकृष्ण विखे पाटील(कॉंग्रेस पक्ष)
५८) जगात सर्वांत मोठे सर्च इंजिन म्हणून वापरात असलेल्या गुगलने आपल्या कोणत्या बहुचर्चित स्वयंचित कार चे नुकतेच सादरीकरण केले आहे?
== गुफी
५९) देशातील कोणत्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत मतदारांना नकाराधिकाराचा (नोटा) अधिकार मिळणार नाही. हे मतदान यंत्राद्वारे होणार असले तरी यात 'नोटा'ची तरतूद नाही?
== अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (भिंगार)
६०) रामजन्मभूमी वादात मुस्लिमांची बाजू मांडणाऱ्या सात प्रमुख याचिकाकर्त्यांपैकी एक असलेल्या कोणत्या याचिकाकर्त्याचे नुकतेच निधन झाले आहे?
== मोहम्मद फारूक(१०० वय वर्षे)
६१) यंदाच्या यश चोप्रा स्मृती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले महानायक कोण?
== अमिताभ बच्चन
६२) स्पंदन आर्ट संस्थेतर्फे दिला जाणारा महमद रफी जीवन गौरव पुरस्कार यावर्षी कोणास प्रदान करण्यात आला आहे?
== ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर
६३) विमा क्षेत्रात FDI वाढ व कोळसा खाण वितरणासाठी ई-लिलाव पद्धती आणण्याबाबतच्या अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कधी स्वाक्षरी.केली?
== २६ डिसेंबर २०१४
६४) ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युज याच्या स्मरणार्थ एव्हरेस्टवर ठेवणार बॅट.नेण्याचा उपक्रम कोणत्या देशाची क्रिकेट संघटना राबविणार आहे?
== नेपाळ क्रिकेट संघटना
६५) सोनितपूरमध्ये बोडो अतिरेक्यांविरुद्ध आसाम रायफल्स, निमलष्करी दल आणि लष्करी जवानांची संयुक्त कारवाई सुरू केली असून या कारवाईस काय नाव देण्यात आले आहे?
== मिशन ऑल आऊट
६६) झारखंडचे नवे मुख्यमंत्री.म्हणून कोणत्या बिगरआदिवासी चेहऱ्याला प्रथमच संधी मिळत आहे?
== रघुवर दास- भाजप (जमशेदपूर पूर्व मतदारसंघ)
६७) प्रवाशांसाठी ऑनलाइन रिचार्ज सुविधा सुरु करणारी मेट्रो सेवा कोणत्या शहरात पुरविली जाणार आहे?
== मुंबई
६८) देशात वाहनचोरीमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागला आहे?
== दुसरा(पहिल्या स्थानावर उत्तर प्रदेश)
६९) सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) यांनी दिल्ली येथे माहिती तंत्रज्ञान व संचारण मंत्रालयातर्फे जगातील सर्वात आटोपशीर महासंगणक प्रणालीचे अनावरण केले.त्याचे नाव काय आहे?
== परम शावक
७०) महाराष्ट्र वीज मंडळाने आपल्या तीनही कंपन्यांमधील तमाम वीज कर्मचाऱ्यांना तीन लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे?
== ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी
७१) इंडोनेशियातून सिंगापूरला जाणारे 'एअर एशिया'चे विमान उड्डाणानंतर बेपत्ता झाले आहे.या विमानाचा फ्लाईट नंबर काय होता?
== क्यूझेड ८५०१ (एअरबस ३२०-२००' प्रकारातील)
७२) 'एअर एशिया'च्या क्यूझेड ८५०१ फ्लाईट नंबर असलेल्या विमानाने इंडोनेशियाच्या सुरबाया येथून सिंगापूरसाठी स्थानिक वेळेनुसार पहाटे ५.२० वाजता उड्डाण केले होते हे विमान सकाळी ८.३० वाजता सिंगापूरच्या कोणत्या विमानतळावर उतरणार होते?
== चंगी
७३) एअर एशियाचे क्यूझेड ८५०१ हे विमान सुमात्रा बेटाच्या पूर्व किनाऱ्यावरील कोणत्या परिसरात बेपत्ता झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे?
== पूर्व बेलितुंग
७४) दक्षिण आशियात लोकप्रिय असलेली कोणती हवाई सेवा भारतात हवाई सेवा देणारी पहिली विदेशी कंपनी आहे?
== एअर एशिया
७५) भारतात टाटा सन्स आणि उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे व्याही अरुण भाटिया यांच्याशी भागिदारी करून एअर एशियाने सेवा सुरू केली केली. १२ जून २०१४ रोजी एअर एशियाचे भारतातील पहिले उड्डाण बेंगळुरूहून कोठे झाले होते?
== गोवा
७६) अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या तब्बल १३ वर्षांच्या हस्तक्षेपाला/युध्दाला अधिकृतपणे पूर्णविराम दिला आहे?
== २८ डिसेंबर २०१४ (अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी)
७७) सोनी पिक्चरच्या कोणत्या चित्रपटात उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन याच्या हत्येच्या कटाचे कथानक दाखविले असल्याने कोरियाने या चित्रपटाला विरोध केला होता?
== द इंटरव्ह्यू
७८) पेशावरमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि वरिष्ठ तालिबानी कमांडर असलेल्या कोणत्या दशहतवाद्यास पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांनी खैबर एजन्सीमध्ये ठार केले आहे?
== सद्दाम
७९) सद्दाम हा तेहरीकी तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) कोणत्या ग्रुपचा सदस्य होता?
== तारिक गदर ग्रुप
८०) 'असोचेम-पीडब्ल्यूसी'च्या अहवालानुसार सध्या देशातील प्रति व्यक्ती ऑनलाइन शॉपिंगची मर्यादा वार्षिक सरासरी किती हजार रुपये आहे?
== सहा हजार रुपये
८१) मराठी माणसाच्या व्यवस्थापन कौशल्याला सातासमुद्रापार पोहोचविणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांचे नेते असलेल्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे?
== गंगाराम तळेकर
८२) अमेरिकेत फिलाडेल्फिया येथे झालेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात डबेवाल्यांचे प्रतिनिधी म्हणून रघुनाथ मेदगे यांच्यासह कोण उपस्थित होते?
== गंगाराम तळेकर
८३) दिल्ली आयआयटीचे संचालक असलेल्या कोणत्या व्यक्तीने कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा दिला आहे?
== रघुनाथ शेवगावकर
८४) सरकारी कर्मचारी अधियम, २०१४ नुसार सरकारी कर्मचाऱ्याला त्याची पत्नी; तसेच त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांची संपत्ती, देणी या बद्दलची माहिती कधीपर्यंत सरकारला द्यावी लागेल?
== ३० एप्रिल २०१५ पर्यंत (लोकपाल कायद्याअंतर्गत)
८५) संसदेने दोन वर्षांपूर्वी मंजूर केलेला भूसंपादन कायदा १ जानेवारी २०१४ला अस्तित्वात आल्यानंतर त्यातील कलम १०५ (३) नुसार कधीपर्यंत १८८५ चा भूसंपादन (खाण) कायदा, १९५६ चा राष्ट्रीय महामार्ग कायदा, १९६२ चा अणुऊर्जा कायदा, १९७८ चा मेट्रो रेल्वे कायदा, १९८९ चा रेल्वे कायदा यासारख्या केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या तब्बल १३ कायद्यांमध्ये दुरुस्त्या करायच्या आहेत.
== १ जानेवारी २०१५ पूर्वी
८६) सन टीव्हीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) असलेल्या कोणत्या व्यक्तीस लैंगिक छळाच्या आरोपावरून चेन्नई पोलिसांच्या सेंट्रल क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे?
== सी. प्रवीण
८७) सहा हजार कोटी रुपयांचा अंमली पदार्थांच्या घोटाळ्यातील सहभागाप्रकरणी पंजाबचे महसूलमंत्री असलेल्या कोणत्या नेत्याची अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) चौकशी करण्यात आली?
== विक्रमसिंग मजिठिया
८८) मुंबई- काठमांडूला जाणार्या जेट एअरवेजच्या कोणत्या विमानाला एका पक्ष्याची धडक बसल्याने लागलेल्या आगीनंतर आपत्कालीन परिस्थितीत तातडीने त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवावे लागले?
== ९ डब्ल्यू २६८ हे बोइंग ७३७
८९) फेसबुकने सरत्या वर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कोणती भेट दिली होती. मात्र, फेसबुकने दिलेल्या या भेटीमुळे अनेकांना मनस्ताप झाल्याचे लक्षात आल्यानंतर फेसबुकने आपल्या युझर्सची माफी मागितली आहे?
== इयर इन रिव्ह्यू
९०) रशियातील सेंट पिट्सबर्ग येथील 'रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एन्फ्लुएन्झा'मधील शास्त्रज्ञांच्या गटाने कोणत्या रोगाविरूध्द रोगप्रतिकारक लस तयार केली आहे?
== इबोला
९१) भूसंपादन अधिक सुलभ करण्यासाठी सरकारने २९ डिसेंबर २०१४ रोजी अध्यादेश काढला यानुसार सध्या लागू असलेल्या कायद्यातील काही तरतुदी शिथिल करण्याची व कोणते नवे कलम समाविष्ट करण्याची तरतूद या वटहुकुमात असेल?
== '१०ए’ हे पुनर्वसन आणि भरपाईसंबंधीचे नवे कलम
९२) महाराष्ट्रातील कोणती नगरपरिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे?
== अलिबाग
९३) ‘छोटे जलाराम बाप्पा’ म्हणून भक्तांचे प्रेरणास्थान असलेल्या आणि गुजराती समाजाचे श्रद्धास्थान व मानवसेवेचे आदर्श असलेल्या कोणत्या संतांचे नुकतेच निधन झाले आहे?
== संत हरिराम बाप्पा
९४) शासनाने महाराष्ट्राच्या समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्नांवरील अभ्यासासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीमध्ये नऊ सदस्य असून नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव के.बी. बक्षी समितीचे सदस्य सचिव आहेत?
== डॉ.विजय केळकर
९५) ‘चतुरंग प्रतिष्ठान ही संस्था साहित्य चळवळीत तब्बल ४०हून अधिक वर्षे सातत्याने कार्यरत आहे. त्याच्या २४व्या ‘रंगसंमेलना’त जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले साहित्यिक कोण?
== ज्येष्ठ नाटककार-दिग्दर्शक रत्नाकर मतकरी
९६) पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या कौटुंबिक निवृत्तिवेतनात पहिल्या पत्नीसह दुस-या पत्नीलाही समान वाटा दिला गेला पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोणत्या खंडपीठाने दिला आहे.तसेच सध्या हा नियम भारतीय रेल्वेतच असून, शासनाच्या इतर विभागांतही त्याचा अवलंब करावा, अशी सूचना न्यायालयाने केली आहे?
== नागपूर खंडपीठाने
९७) रेल्वे कर्मचारी निवृत्तिवेतन योजनेतील कोणत्या नियामामधील उपनियम ७ (आय)(ए) मध्ये पहिल्या व दुसऱ्या पत्नीमध्ये निवृत्तिवेतनाचे समान वाटप करण्याची तरतूद करण्यात आली आहे?
== नियम ७५
९८) हिंदू विवाह कायद्याच्या कोणत्या कलमानुसार पहिली पत्नी जिवंत असेल आणि तिच्यासोबत घटस्फोट झाला नसेल तर दुसऱ्या महिलेसोबत केलेला विवाह अवैध ठरतो?
== कलम ११
९९) जालना येथील रहिवासी प्रिया हरिभाऊ सुरडकर हिने तब्बल किती तास मेहंदी रेखाटन करीत विक्रमाला गवसणी घातली़ असून विश्वविक्रम (गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड ) प्रस्थापित केला जाणार आहे?
== ७४ तास
१००) नक्षलींचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन २००४ साली गडचिरोली जिल्ह्यासह गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील एकूण ३७ तालुके नक्षलग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले होते परंतु आता गृहविभागाकडून २६ डिसेंबर २०१४ रोजी किती तालुके नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे?
== २२ तालुके

Monday, December 29, 2014

*केंद्र व राज्य सरकारने नियुक्तकेलेल्या समित्या आणि आयोग:-

* केंद्र- राज्य संबंध आयोग- भारत सरकारने २७ एप्रिल २००७ ला केंद्र राज्य संबंध आयोग स्थापन केला, आयोगाचे अध्यक्ष होते मदनमोहन पंछी
* वर्मा समिती- राजीव गांधी हत्येची चौकशी
* न्या. भगवती समिती – भारतातील बेरोजगारीचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी
* जानकी रामन समिती (१९९२)- रोखे गैरव्यवहारप्रकरणी रिझव्‍‌र्ह बँकने नेमलेली समिती
* न्या. सरकारिया आयोग- केंद्र राज्यसंदर्भात नेमलेला आयोग
* जे. एम. लिंगडोह समिती- कॉलेजमधील निडवणुकांची आचारसंहिता ठरवण्यासाठी
* डॉ. भालचंद्र मुणगेकर समिती- सेट व नेट परीक्षांची अनिवार्यता तपासण्यासाठी
* डॉ. यू. म. पठाण समिती (२००९) राज्यातील शालेय अभ्यासक्रमामध्ये संत साहित्याचा समावेश करण्याकरिता.
* आर. के. राघवन् समिती- उच्चशिक्षण संस्थांतील रॅगिंगला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनाने नेमलेली समिती
* मुखोपाध्याय समिती – महाराष्ट्रात दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट सक्तीबाबत
* सुबोध जयस्वाल समिती – बनावट मुद्रांक घोटाळा चौकशीप्रकरणी नेमलेली समिती
* सोली सोराबजी अभ्यास गट – भारताच्या पोलीस यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी
* पी. एन. टंडन समिती- देशभरातील अभिमत विद्यापीठांची तपासणी करण्यासाठी
* डॉ. राजेंद्र पचौरी समिती – सेतुसमुद्रम प्रकल्पाचा तिढा सोडविण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेली समिती
* यशपाल समिती – अभिमत विद्यापीठांचा दर्जा रद्द करण्यासाठी शिफारस केलेली समिती
* बी. के. चतुर्वेदी समिती (२००८) – भारतातील खनिज तेल कंपन्यांची वित्तीय स्थिती तपासण्यासाठी
* न्या. बी. एन. श्रीकृष्ण – तेलंगणा वेगळे राज्य निर्माण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष.
* मंजुळा कृष्णन समिती – उत्तर प्रदेशातील निठारी बाल हत्याकांडप्रकरणी चौकशी करण्यासाठी
परीक्षाभिमुख विविध मोहिमा-ऑपरेशन्स
* ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी नरीमन हाऊस वरील दहशतवाद्यांच्या विरुद्ध लष्कराने राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन सायक्लॉन- मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी हॉटेल ताजवरील दहशत वाद्यांच्या विरुद्ध लष्कराने राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन सायलेन्स – पाकिस्तानी लष्कराने इस्लामाबाद येथील लाल मशिदीत लपलेल्या अतिरेक्यांना मारण्यासाठी राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन ऑल क्लियर – आसाममधील उल्फा दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी भारतीय लष्कराने चालविलेली मोहीम.
* ऑपरेशन ग्रीनहंट- महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छतीसगढ व झारखंड या राज्यांतील जंगलव्याप्त प्रदेशात असणाऱ्या नक्षलवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी राबविलेली मोहीम
* ऑपरेशन सुकुन- लेबनॉनमधील भारतीय नागरिकांना परत बोलविण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली आपत्कालीन मोहीम.
* ऑपरेशन ककून – विरप्पनला पकडण्यासाठी राबविलेली मोहीम
* ऑपरेशन रेड डॉन- सद्दाम हुसेनला पकडण्यासाठी अमेरिकेने राबविलेली मोहीम
* ऑपरेशन गरुड – नक्षलवाद्यांविरुद्ध छतीसगडमध्ये राबविलेली मोहीम
* ऑपरेशन बजरंग- उल्फा अतिरेक्यांविरुद्ध आसाममध्ये राबविलेली मोहीम
* ऑपरेशन कोब्रा गोल्ड- थायलंडमध्ये अतिरेक्यांविरुद्ध राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन सहायता – नर्गिस या वादळाचा तडाखा
बसलेल्या म्यानमारला भारतीय लष्करातर्फे पाठविलेल्या मदत कार्यक्रमाचे नाव
* ऑपरेशन डेनिम (२००४)- श्रीलंकेत आलेल्या पुरामध्ये तेथील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी भारतीय लष्कराने राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन पाशा- भारत व श्रीलंकादरम्यान होणाऱ्या औषधांची व इतर वस्तूंची चोरटी वाहतूक व व्यापार रोखण्यासाठी राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन पुशबॅक- भारतात बांग्लादेशातून आलेल्या चकमा शरणार्थीविरुद्ध व त्यांना हाकलून लावण्यासाठी भारत सरकारने राबविलेली मोहीम
* ऑपरेशन मुश्तरक- अमेरिकन सैनिकांच्या नेतृत्वाखाली नाटो आणि अफगाणी सेनेने तालिबान विरोधी चालविलेली लष्करी मोहीम.
* ऑपरेशन ब्लॅक गोल्ड- अफूचा बेकायदा व्यवहार करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी राजस्थान पोलिसांनी राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन फ्लॅशआऊट- बांग्लादेशी घुसखोरांना मुंबईतून शोधून काढण्यासाठी राबविलेली मोहीम.
केंद्र व राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समित्या व विविध ऑपरेशन्स :
* डॉ. आ. ह. साळुंखे समिती – महाराष्ट्र राज्याचे नवे सांस्कृतिक धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष.
* मधुकर चव्हाण समिती – महाराष्ट्र विधानसभेतील आमदार निलंबनप्रकरणी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष.
* डॉ. एम. एस. स्वामीनाथन समिती – कमी खर्चात अधिक शेती उत्पादन काढता यावे याकरिता पुढील २५ वर्षांकरिता तयार केलेल्या आराखडय़ाचे अध्यक्ष.
* किरीट पारेख समिती – पेट्रोलियम पदार्थाच्या किमती निर्धारण करण्यासाठी.
* प्रमोद आचार्य समिती – आयआयटी प्रवेश परीक्षेत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारच्या मानवी संसाधन मंत्रालयाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष.
* तमांग समिती – गुजरातमधील इशरतजहाँ व इतर तिघांची पोलीस चकमकीत झालेल्या हत्येची चौकशी करण्यासाठी.
भूषण गगराणी समिती- महाराष्ट्रातील ग्रामपंचायती व त्यांच्या समस्यांबाबत शिफारसी करण्याकरिता
डॉ. नरेंद्र जाधव समिती- विदर्भातील शेतकऱ्यांच्या सतत नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीबाबत मूल्यमापन करण्यासाठी
राम प्रधान समिती- २६/११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात शासनाने नेमलेली समिती.
माधवराव चितळे समिती- मुंबईतील पूर परिस्थितीवर अभ्यास करण्यासाठी
न्या. गुंडेवार आयोग- मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर गोळीबाराची चौकशी करण्यासाठी
बाळकृष्ण रेणके आयोग- भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या कल्याणाकरिता
न्या. बापट आयोग (२००८)- मराठा समाजास आरक्षणसंबंधी नेमलेला आयोग (आरक्षण देऊ नये अशी शिफारस)
न्या. सराफ आयोग (२००९) मराठा समाज आरक्षणासंबंधी नेमलेल्या बापट आयोगाच्या अहवालाची फेरतपासणी करण्याकरिता.
न्या. राजन कोचर समिती- सातारा जिल्ह्य़ातील मांढरदेवी येथील झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी
डॉ. अभय बंग समिती- कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूच्या चौकशीकरिता
अमरावती पॅटर्न ही मोहीम राज्य शासनाने कुपोषण निर्मूलन- संदर्भात सुरू केली.
विलासराव देशमुख निवडणूक व्यवस्थापन समिती- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव दशमुख यांच्याकडे सोपविण्यात आले.
देशमुख, दांडेकर, देऊस्कर समिती- पाणी वाटप प्रश्नी राज्यात नेमलेली समिती
प्रा. वि. म. दांडेकर समिती- प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास करून त्यावर उपाय सुचविण्यासाठी
द. म. सुकथनकर समिती (जून १९९६)- मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या- इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी व उपाय सुचविण्यासाठी
डॉ. विजय केळकर समिती- देशातील साखर उद्योगाचा सर्वागीण आढावा घेऊन ठोस उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी नेमलेली समिती
व्ही. रंगनाथन समिती- महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण क्षेत्रातील सिंचनाचा तालुका निहाय अनुशेष निश्चित करण्यासाठी व निर्मूलन करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेली समिती
* नंदलाल समिती- नागपूर महानगरपालिकेतील क्रीडा साहित्य घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी
प्रमोद नवलकर समिती- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकारने अल्पवयीन वेश्यांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती
प्रा. जनार्दन वाघमारे समिती- नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाच्या स्थापनेसाठी नेमलेली समिती
पी. एस. पाटणकर समिती- महाराष्ट्रातील नवीन नांदेड महसूल आयुक्तालयाच्या स्थापनेसंबंधी
वसंत पुरके समिती (२००८)- शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश करण्याबाबत परीक्षण करण्याकरिता राज्य सरकारने नेमलेली समिती
सुनील तटकरे समिती (२००९)- रायगडावरील किल्ल्यातील मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासंदर्भात नेमलेली समिती
अशोक बसाक समिती- दूध दरवाढ व खरेदी विक्री धोरण ठरविण्याबाबत
न्या. राजिंदर सच्चर समिती- मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दर्जाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेली समिती
जगदीश सागर समिती (१९९५)- नवी दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची चौकशी करण्यासाठी
न्या. बी. एन. श्रीकृष्ण आयोग- १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांची चौकशी करण्यासाठी
के. नलिनाक्षण समिती – ठाणे महानगर पालिकाअंतर्गत धोकादायक इमारतीमागील कारणे शोधण्यासाठी नेमलेली समिती तसेच ठेकेदारांचे भ्रष्टाचाराबद्दल
नंदलाल समिती- ठाणे महानगरपालिकेतील गैरव्यवहारप्रकरणी नेमलेली समिती
न्या. बी. एन. श्रीकृष्ण- सहाव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष
न्या. कुलदीपसिंग समिती – मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या संबंधीचा अभ्यास करण्यासाठी
लिबरहान आयोग बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी चौकशी करण्यासाठी
न्या. नानावटी आयोग/ न्या. बॅनर्जी समिती- गोध्रा हत्याकांड चौकशी करण्यासाठी
फुकन आयोग (२००४)- संरक्षण क्षेत्रातील लाचखोरी व तहलका चौकशी करण्यासाठी
मणिसाना आयोग- पत्रकारासाठी नेमलेल्या वेतन आयोगानुसार वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या पत्रकार व गैरपत्रकार कर्मचाऱ्यांना वेतनात ३० टक्के वाढ (अपूर्ण) //

#‎विज्ञान‬ तंत्रज्ञान २०१४

जानेवारी
नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार पृथ्वीचे तापमान इ.स. २१०० पर्यंत ४ अंश सेल्सियस तर इ.स. २२०० पर्यंत ८ अंश सेल्सियस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मायोटोनिक डिस्ट्रॉफी या आजारास एका रेणूतील दोष कारणीभूत असतो हे स्पष्ट झाल्यानंतर त्यावर संभाव्य औषध शोधून काढण्यात आले. २०१४ एए हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला. रक्तातील कर्करोग पेशींचे मेटास्टेसिस रोखण्याची नवी पद्धत कॉन्रेल विद्यापीठाच्या संशोधकांनी शोधली. नासाने आबेल २७४४ या दीíघकासमूहाचे छायाचित्र टिपले. अंटाíक्टकावर मोठी घळई ग्रँड कॅनन सापडली. जनुकीय उपचार पद्धतीने सहा रुग्णांना अंधत्वापासून वाचवण्यात आले. चीनची युटू रोव्हर गाडी चंद्रावर गेली व तेथील मातीचे परीक्षण केले.
फेब्रुवारी
एका रेणूचा एलईडी तयार करण्यात यश आले. १० लाख वर्षांपूर्वीच्या होमो अँटेसेसर या मानवाच्या पाऊलखुणा इंग्लंडमधील हॅपीसबर्ग येथे सापडल्या. लंडनच्या किंग्ज कॉलेजच्या वैज्ञानिकांनी बुद्धिमत्तेशी संबंधित जनुक शोधून काढले. ४०० समिलगी व्यक्तींच्या अभ्यासातून लंगिक आकर्षण स्त्री-स्त्री, पुरुष-पुरुष असावे की कसे हे जनुकावर अवलंबून असल्याचे दिसून आले. जनुकीय परिवर्तन करून रोग न होणारे बटाटे तयार करण्यात ब्रिटिश वैज्ञानिकांना यश आले. सल्फेटमुळे पृथ्वीचे तापमान वाढत असल्याचे एका संशोधनात स्पष्ट झाले. तीन हजार रुग्णांवर ११ युरोपीय देशात हृदयविकारावर मूलपेशींचा प्रयोग सुरू करण्यात आला.
मार्च
डीएक्स १० हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून गेला. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांना सागरी जलपातळी वाढण्याने धोका असल्याचे सांगण्यात आले. स्टॅनफर्डच्या जैवअभियंत्याने २००० पट मोठी प्रतिमा दाखवणारा कागदाचा सूक्ष्मदर्शक तयार केला. पातळ सौरघटाची क्षमता १७ टक्क्यांपर्यंत मिळवता आली. जैवविघटनशील बॅटरी वैज्ञानिकांनी तयार केली ती शरीरात वापरता येईल. यीस्टचे कृत्रिम गुणसूत्र तयार करण्यात यश आले. बाकदार तोंडाचा व्हेल मासा समुद्रात ३.२ किमी खोल सूर मारतो व तेथे १३७ मिनिटे राहतो. हा सस्तन प्राण्यांमधील विक्रम आहे, असे सांगण्यात आले. सीआरआयएसपीआर या जनुक संपादन तंत्राने रोग बरे करता येऊ शकतात त्याच्या मदतीने यकृताचा रोग बरा करण्यात यश आले.
एप्रिल
फळे व भाज्या जास्त प्रमाणात म्हणजे ५६० ग्रॅम सेवन केल्यास मृत्यूची शक्यता ४२ टक्क्यांनी कमी होते, असे युनिव्हर्सटिी कॉलेज लंडनच्या संशोधनात सांगण्यात आले. नासाने दिलेल्या माहितीनुसार शनीच्या एनसेलॅड्स या चंद्रावर सूक्ष्म स्वरूपात जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे. तीस सेकंदात चाìजग होणारी बॅटरी तेल अवीव येथे एका प्रदर्शनात सादर करण्यात आली. सस्तन प्राण्यात गर्भधारणेसाठी जुनो नावाचे प्रथिन आवश्यक असते, असे नेचर या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या संशोधनात म्हटले आहे. आफ्रिकेतील स्लीिपग सीकनेसचे कारण असलेल्या त्सेत्से माशीचा जनुकीय आराखडा पूर्ण करण्यात आला. स्टॅनफर्डच्या अभियंत्यांनी आताच्या नऊ हजार पट वेगाने काम करणारी चिप तयार केली ती मानवी मेंदूवर आधारित आहे. प्रतिजैविकांना जीवाणू दाद देत नसल्याने प्रतिजैविकांचा म्हणजे अँटिबायोटिक्सचा अतिवापर धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले.
मे
सध्या अमेरिकेत ई सिगारेटचे प्रमाण वाढले आहे पण त्यामुळेही कर्करोग होतो असे संशोधनात दिसून आले. १३ अब्ज वर्षांपूर्वीच्या विश्वाचे आभासी चित्र तयार करण्यात यश आले. आयसॉन धूमकेतूचे तुकडे झाले. अधिक प्रगत असलेला जैवयांत्रिक बाहू तयार करण्यात यश आले. कर्करोगग्रस्त मूलपेशींपर्यंत कर्करोगाचा माग काढण्यात आला. सर्वात मोठा डायनॉसॉर हा अर्जेटिनात सापडलेल्या जीवाश्मावरून ७७ टन वजनाचा होता व तो टिटॅनोसॉर प्रजातीचा होता. स्वादुिपडाच्या कर्करोगातील एका विशिष्ट जनुकाचे उत्परिवर्तन शोधण्यात आले.
जून
ट्रीडमीलवर ताशी ४६ किलोमीटर वेगाने पळणारा यंत्रमानव कोरियाने तयार केला. चंद्र आणि पृथ्वी आपण समजतो त्यापेक्षा ६ कोटी वष्रे जुने असल्याचे पुराव्यात दिसून आले. सामन माशाचा जनुकीय आराखडा पूर्ण झाला. सिलिकॉनची जागा घेऊ शकणाऱ्या कार्बन नॅनोटय़ूब्ज तयार करण्यात आल्या त्या इलेक्ट्रॉनिक सíकटमध्ये वापरता येतील. क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळावरील वर्ष पूर्ण केले.
जुलै
नासाने कार्बन डायॉक्साईडचा अभ्यास करण्यासाठी ऑरबायटिंग कार्बन ऑब्झर्वेटरी हे अवकाशयान सोडले. स्वमग्नता हा रोग जनुकीय उत्परिवर्तनामुळे होत असल्याचे स्पष्ट झाले. फुले जास्त काळ टवटवीत ठेवण्याचे तंत्रज्ञान जपानी वैज्ञानिकांनी शोधून काढले. व्हायेजर १ यानाला अवकाशात सूर्याकडून फेकल्या जाणाऱ्या सुनामी लाटांचा परिणाम जाणवला त्यामुळे हे यान आंतरतारकीय अवकाशात अजूनही असल्याचे स्पष्ट झाले. सेंद्रिय फळे व भाज्यांमध्ये नेहमीच्या भाज्या व फळांपेक्षा अँटिऑक्सिडंट ७० टक्के जास्त असल्याचे व विषारी धातू कमी असल्याचे दिसून आले. एड्सचा एचआयव्ही विषाणू मानवी पेशीतून नष्ट करता येतो हे पुराव्यानिशी दाखवण्यात आले. १८८० पासून मे व जून २०१४ हे सर्वात उष्ण महिने होते असे दिसून आले. केप्लर ४२१ बी या नवीन बाह्य ग्रहाचा शोध लागला. उंदरांच्या त्वचेतील न्यूरॉन्सचे रिप्रोग्रॅिमग करून ते जास्त स्थिर असल्याचे दिसले. त्यामुळे दोषयुक्त न्यूरॉन्सच्या जागी चांगले न्यूरॉन्स प्रस्थापित करून पाíकन्सनवर उपचार करता येण्याची शक्यता दिसून आली.
ऑगस्ट
हेपॅटिटिस सी हा २०३६ पर्यंत दुर्मीळ आजार ठरेल असे संगणकीय प्रारूपाच्या आधारे सांगण्यात आले. आयबीएम रीसर्चने मेंदूसारखी संगणक चिप तयार केली. त्यात १० लाख प्रोग्रॅमेबल न्यूरॉन्स व २५.६० कोटी सíकट्स म्हणजे सिनॅप्सेसचा वापर करण्यात आला. रशियन अवकाशवीरांना अंतराळस्थानकाबाहेर सागरातील प्लँक्टन वनस्पती सापडली ती तिथे कशी आली हे मात्र समजू शकले नाही. रानटी स्वरूपातील माणसाचा पूर्वज युरोपात आपण समजतो त्यापेक्षा १० पट जास्त म्हणजे पाच हजार वष्रे अस्तित्वात होता असे दिसून आले. थायमसची प्रथमच प्राण्यांच्या शरीरात ठरवून दिलेल्या पद्धतीने वाढ करण्यात आली. व्यायाम करणाऱ्या लोकात वाइनमुळे हृदयविकाराचे प्रमाण कमी होते असे दिसून आले.
सप्टेंबर
कार्यालयात छोटय़ा वनस्पती लावल्यास कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता १५ टक्के वाढते, असे क्वीन्सलँड विद्यापीठाच्या संशोधनात दिसून आले. वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याचा वेग मानवपूर्व काळापेक्षा १००० पटींनी अधिक असल्याचे दिसून आले. पाच हजार मलांवर असलेल्या लोकांमध्ये मेंदू-मेंदू संपर्क प्रस्थापित करण्यात यश आले. ब्राझीलमध्ये २०१३ मध्ये २९ टक्के वाढले म्हणजे ५८९१ वर्गकिलोमीटर जंगलतोड झाल्याचे दिसून आले. कॅनडात २००० ते २११३ दरम्यान ब्राझीलपेक्षा जास्त म्हणजे १०.४ कोटी हेक्टर क्षेत्रात जंगलतोड झाल्याचे दिसून आले. पृथ्वीवर ऑक्सिजन निर्मिती करणारे सजीव आपण समजतो त्याच्या ६० कोटी वष्रे आधीपासून अस्तित्वात होते. कॉफी या वनस्पतीची २५ हजार जनुके शोधण्यात आली. सॅनडिस्क कंपनीने ५१२ जीबीचे एसडी कार्ड तयार केले. अधिक वेगाने पाण्यापासून हायड्रोजन तयार करण्यात आला. १०० अब्ज प्राण्यांना जनुकसंस्कारित अन्न व साधे अन्न देण्यात आले. जनुकसंस्कारित अन्नामुळे त्यांच्या प्रकृतीवर काहीही परिणाम दिसला नाही. नराश्यासाठी रक्तचाचणी विकसित करण्यात आली. कर्करोगास कारण ठरणाऱ्या मेटॅस्टॅसिस या प्रक्रियेला रोखणारे प्रथिन स्टॅनफर्डच्या संशोधकांनी तयार केले. अमेरिकेचे मावेन यान मंगळावर पोहोचले. त्यानंतर भारताचे मंगळयानही तेथे पोहोचले. मायक्रोसॉफ्टने िवडोज १० ही प्रगत ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली. इबोलाचा रुग्ण अमेरिकेत सापडला.
ऑक्टोबर
गर्भाशय प्रत्यारोपित केलेल्या मातेने प्रथमच बाळाला जन्म दिला. एडवर्ड मोसेर, मे ब्रिट मोसेर व जॉन ओकिफ यांना मेंदूतील जीपीएस प्रणालीच्या संशोधनासाठी वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले. भौतिकशास्त्राचे नोबेल इसामु अकासाकी, हिरोशी अमानो व
शुज नाकामुरा यांना एलईडी लाइटच्या संशोधनासाठी जाहीर झाले, तर रसायनशास्त्रात फ्लुरोसन्स मायक्रोस्कोपीसाठी एरिक बेटझिग, विल्यम मोरनर व स्टेफन हेल यांना नोबेल मिळाले, त्यांनी नॅनो सूक्ष्मदर्शक तयार केला आहे. गर्भाच्या मूलपेशींचे रूपांतर इन्शुलिन निर्मिती करणाऱ्या पेशींमध्ये करण्यात हार्वर्डच्या वैज्ञानिकांना यश आले. कॉफीचे रोज सेवन केल्यास यकृतात घातक वितंचकांचे प्रमाण २५ टक्के कमी होते. नाकातील पेशी मेरुरज्जूत टाकल्याने पक्षाघात झालेला रुग्ण चालू लागला. २५ मिलिलिटर रक्तातील मूलपेशींपासून नवीन रक्तवाहिन्या तयार करण्यात यश आले. डीएनएवर आधारित विद्युत मंडले तयार करण्यात आली. मूलपेशींपासून मानवी पोट आतडे तयार करण्यात आले त्यामुळे अल्सर व इतर आजारांवर उपचार कालांतराने शक्य होईल.
नोव्हेंबर
वैज्ञानिकांनी प्रतिजैविकांशिवाय उपचार करू शकतील असे नॅनोकण मेदापासून तयार केले. उंदरांमध्ये नवीन न्यूरॉन्स मूलपेशीपासून तयार करून त्यांचा पाíकन्सन बरा करण्यात यश आले. रोसेटायानावरील फिली प्रोब ६७ पी चुरयुमोव- गेरासिमेन्को धूमकेतूवर उतरले. जागतिक तापमानावाढीने इ.स. २१०० पर्यंत विजा पडण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढणार आहे असे बर्कलेच्या युनिव्हर्सिटि ऑफ कॅलिफोर्नियाने म्हटले आहे. छायाचित्रे ओळखणारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सॉफ्टवेअर गुगल व स्टॅनफर्ड विद्यापीठ यांनी तयार केले.
डिसेंबर
साडेतीन ते साडेचार कोटी वर्षांपूर्वीच्या मांसभक्षी वनस्पतीचे जीवाश्म सापडले ती रोरिडय़ुला प्रजातीची होती. आपल्या विश्वाचे वय १३.८ अब्ज वष्रे असून त्यात ४.९ टक्के अणुद्रव्य व २६.६ टक्के कृष्णद्रव्य, तर ६८.५ टक्के कृष्ण ऊर्जा असल्याचे इटलीतील एका खगोल परिषदेत सांगण्यात आले. इलेक्ट्रॉनिक सíकटसाठी त्रिमिती प्रिंटिंगचा वापर करण्यात आला. जगात प्रथमच कृत्रिम वितंचके तयार करण्यात आली. सौरघटाची कार्यक्षमता ४६ टक्क्यांपर्यंत मिळवण्यात फ्रेंच-जर्मन कंपन्यांना यश. पाच हजार स्त्रियांचा दहा वष्रे अभ्यास केला असता भूमध्यसागरी भागातील आहाराने आयुर्मान वाढते यावर शिक्कामोर्तब झाले. इतर ग्रहांवर बुद्धिमान सजीव असल्याबाबतचे ड्रेक समीकरण केप्लर दुर्बिणीच्या माहितीआधारे बदलले असा ग्रह १०-१०० प्रकाशवष्रे दूर असून बुद्धिमान सजीव असलेला ग्रह काही हजार प्रकाशवष्रे दूर असल्याचे सांगण्यात आले. स्पेस शटलची जागा घेणाऱ्या ओरायन अवकाशवाहनांची चाचणी यशस्वी झाली. मंगळावर कार्बनी रेणू सापडला. भारताच्या जीएसएलव्ही मार्क २ प्रक्षेपकाचे उड्डाण यशस्वी अवकाशकुपी अंतराळात. मानवाला अंतराळात पाठवण्यासाठी भारताचे पहिले पाऊल यशस्वी. प्रयोगशाळेत कृत्रिम रसायन तयार करण्यात यश. केवळ चार रसायन वापरून नवीन रसायनांची निर्मिती. रासायनिक उत्क्रांतीची कल्पना यशस्वी झाली.
(सोर्स:- दैनिक लोकसत्ता)

Sunday, December 28, 2014

(Constitution of independent India) स्वतंत्र भारताची राज्यघटना


लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट च्या स्वरुपात १९२८ मध्ये घटनेबाबतच्या शिफारशी देण्यात आल्या होत्या. गोलमेज परिषदेतही घटना निर्मितीबाबत कॉंग्रेसने आग्रह धरला. ३० मार्च १९४२ रोजी क्रिप्स योजना जाहीर झाली. त्यानुसार महायुध्द समाप्तीनंतर भारतासाठी एक घटना परिषद नेमण्याचे आश्र्वासन देण्यात आले व १९४६ च्या कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार घटना समितीच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली.
त्रिमंत्री योजनेनुसार १० लाख लोकांमागे एक अशा प्रमाणात प्रतिनिधींची निवड करण्यात येऊन घटना परिषदेची निर्मिती झाली. या परिषदेमध्ये सर्वसामान्य २१० मुस्लीम ७८ शीख ४ इतर ४ अशा २९६ प्रतिनिधींची निवड करण्यात आली. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ. सच्चिदानंद सिन्हा निवडले गेले. त्यांच्या अध्याक्षतेखाली अध्यक्षपदी डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड झाली घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणुन डॉ. एच. सी. मुखर्जी यांची तर समितीचे सल्लागार म्हणून डॉ. बी. एन. राव यांची निवड झाली. याचबरोबर सा समितीमध्ये प्रमुख सदस्य म्हणुन पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, डॉ. राधाकृष्णन, के.एम. मुन्शी डॉ. जयकर इत्यादींचा सहभाग होता.
घटना परिषदेमार्फत २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसूदा समितीची निवड झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मसूदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर बी. एन. राव, एस, एन. मुखर्जी, इ. मसुदा समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले घटनेच्या मसुद्यामध्ये ३१५ कलमे व ७ परिशिष्टे आहेत. घटना समितीने भारताच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती केली. तर गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या भारत भाग्य विधाता, या गीताला राष्ट्रगीताचा मान देण्यात आला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी नवीन राज्यघटनेला मंजूरी देण्यात आली. राज्यघटना निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे.
म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. २६ जानेवारी १९५० पासून नवीन राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरु झाला. म्हणून हा दिवस सर्व देशभर साजरा केला जातो. भारताचे संविधान हा राज्यघटनेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. घटनेची ध्येये आणि उद्दिष्टे यात प्रतिबिंब्ंिात झाली आहेत. भारताचे संविधान खालीलप्रमाणे.
भारताचे संविधान

आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्र्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता:
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्र्वासन देणारी बंधूता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन,
आमच्या संविधान सभेस आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे :-

(१) लिखित घटना
भारताची राज्यघटना लिखित स्वरुपाची आहे. इंग्लंडच्या घटनेप्रमाणे ती अलिखित नाही. राज्यकारभाराबाबतचे नियम, कोणाचे काय अधिकार व कर्तव्य याबाबतची माहिती राज्यघटनेत देण्यात आयली आहे. घटना लिखित असली तरी काही अलिखित परंपरा पाळल्या जातात. उदा. एकच व्यक्ती तीन वेळा भारताचा राष्ट्रपती होऊ शकत नाही.
(२) जगातील सर्वात मोठी विस्तृत राज्यघटना
भारतीय राज्यघटना व्यापक व विस्तारित स्वरुपाची आहे. घटनेमध्ये ३९५ कलमे, ९ परिशिष्टे आहेत, केंद्र व प्रांत यांचे स्वरूप व अधिकार, न्यायव्यवस्थेचे अधिकार, निवडणूक आयोगाचे अधिकार, याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. यामुळे भारतीय राज्यघटना जगातील इतर देशांच्या तुलनेत विस्तृत स्वरूपाची आहे.
(३) लोकांचे सार्वभौमत्व
घटनेनुसार जनता सार्वभैाम आहे. जनतेच्या हाती खरी सज्ञ्ल्त्;ाा आहे. कारण जनता आपल्या प्रतिनिधीमार्फ़त राज्यकारभार चालविते राष्ट्रप्रमुखाची (राष्ट्रपती) निवड जनता आपल्या प्रतिनिधीकरवी करते. निवडणुकीच्या माध्यमातुन जनता आपणास आवश्यक असा बदल घडवून आणू शकते. २६ जानेवारी १९५० पासून घटनेनुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणुन साजरा केला जातो.
(४) संसदीय लोकशाही
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी लोकशाही शासनपध्दतीची मागणी केली होती. घटनाकारांनी इंग्लंडचा आदर्श समोर ठेवून संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. लोसभा व राज्यसभेची निर्मिती करण्यात आली. लोकसभेतील सदस्य पक्ष आपले मंत्रिमंडळ (कार्यकारीमंडळ) बनवतो. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार आहे. लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती, मिळून भारतीय संसद निर्माण झाल्याचे दिसून येते.
(५) संघराज्यात्मक स्वरूप
भारतीय घटनेने संघराज्यात्मक शासनपध्दतीचा स्वीकार केला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात सत्तेचे विभाजन करण्यात आले. आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांना आपआपले अधिकार देण्यात आले आहेत. मात्र आणीबाणीच्या वेळी भारतीय संघराज्याचे स्वरूप एकात्म झाल्याचे दिसून येते.
(६) घटना अंशत परिवर्तनीय व अंशत परिदृढ
लिखित व अलिखित याप्रमाणेच परिवर्तनीय व परिदृढ असे घटनेचे प्रकार आहेत. इंग्लंडची राज्यघटना अतिशय लवचीक तर अमेरिकेची राज्यघटना अतिशय ताठर स्वरूपाची आहे. भारतीय राज्यघटना इंग्लंइतकी लवचीक नाही व अमेरिकेइतकी ताठरही नाही. भारतीय घटनादुरुस्तीची पध्दत कलम ३६८ मध्ये देण्यात आलेली आहे. एखाद्या साधारण मुद्यावर संसदेच्या साध्या बहुमताने घटनेत दुरुस्ती करण्यात येते मात्र राष्ट्रपतीची निवडणूक पध्दत केंद्र व प्रांत यांचे अधिकार, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, इ. महत्वपूर्ण बाबीविषयी घटनेत दुरुस्ती करताना संसदेच्या २/३ सदस्यांची अनुमती निम्म्याहून अधिक घटक राज्याच्या विधिमंडळाची अनुमती आवश्यक असते. त्यामुळे भारतीय घटना अंशत, परिवर्तनीय व अंशत परिदृढ अशा स्वरुपाची बनविण्यात आली आहे.
(७) मूलभूतहक्क
भारतीय राज्यघटनेत व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर भर देण्यात आला आहे. कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत हक्क्ांचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य समता शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्य संपत्तीचा हक्क, पिळवणुकिविरुध्द हक्क इ. महत्वपूर्ण हक्क व्यक्तीला देण्यात आलेले आहेत. हक्काबरोबरच व्यक्तीला काही कर्तव्यही पार पाडावी लागतात. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. घटनेत व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा समावेश हे घटनेचे महत्वाचे वैशिष्टे आहे.
(८) धर्मनिरपेक्ष राज्य
भारत हे धर्मातील राष्ट्र संबोधण्यात आले आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माला राजाश्रय न देता सर्व धर्माना समान लेखण्यात आले आहे. प्रत्येकाला आपआपल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याचा, आचरण ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सर्व धर्मीयांना समान लेखण्यात आले. असून धर्म, जात पंथ, याद्वारे भेदभाव न करता सर्वाना समान संधी देण्यात आली आहे.
(९) एकेरी नागरिकत्व
अमेरिकन व स्वित्झर्लंड या देशामध्ये केंद्र व प्रांत यांचे दुहेरी नागरिकत्व देण्यात आलेले आहे. भारतात संघराज्यात्मक पध्दतीचा स्वीकार केलेला असूनही केंद्राचे व घटक राज्याचे असे वेगळे नागरिकत्व व्यक्तीस देण्यात आलेले नाही. प्रत्येक भारतीय यास संघराज्याचे नागरिकत्व देण्यात आलेल आहे. राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावे यासाठी एकेरी नागरिकत्वाची पध्दत स्वीकारण्यात आली आहे.
(१०) एकच घटना
ज्याप्रमाणे एकेरी नागरिकत्वाच पुरस्कार करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणेच देशातील सर्व नागरिकांसाठी एकाच घटनेची तरतूद करण्यात आली आहे. घटक राज्यांना स्वतंत्र अशी घटना बनविण्याचा अधिकार नाही. घटक राज्यांना संघराज्याबाहेर फुटून निघण्याचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे.
(११) राज्यघटना हीच सर्वश्रेष्ठ
देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे त्या देशाची राज्यघटना होय. राज्यघटनेच्या सर्वश्रेष्ठत्वाला आव्हान देता येत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश, मंत्री यांना राज्यघटनेची एकनिष्ठ राहण्याबाबत शपथ घ्यावी लागते.
(१२) जनकल्याणकारी राज्याची निर्मिती
भारताचा राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फ़त चालतो. भारताचा राष्ट्रपती हा इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंश परंपरेनुसार नसतो, तर अप्रत्यक्ष निवडणूक पध्दतीने निवडण्यात येतो. जनता आपणास हवे असणारे सरकार निर्माण करू शकते व हे सरकार जनकल्याणासाठी बांधील असते.
(१३) मार्गदर्शक तत्वे
व्यक्तीला मूलभूत हक्कांना कायदेशीर मान्यता असते. मूलभूत हक्कांची शासनाकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून पायमल्ली झाल्यास संबंधिताला न्यायालयात दाद मागता येते. मात्र मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत हे धोरण लागू पडत नाही. मार्गदर्शक तत्वे व्यक्तीला कल्याणासाठी असली तरी ती सरकारने पाळलीच पाहिजेत असे सरकारवर बंधन नसते. मार्गदर्शक तत्वे ही नावाप्रमाणे मार्ग दाखविण्यासाठी उपयुक्त ठरतात. भारतीय घटनेतील काही निवडक मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे (१) जीवनावश्यक गोष्टी सर्वाना मिळाव्यात (२) राज्यातील सर्वासाठी एकच मुलकी कायदा असावा (३) राज्यातील सर्व स्त्री -पुरुषांना समान वेतन असावे. (४) १४ वर्षाखालील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण असावे (५) संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये (६) देशातील साधनसंपज्ञ्ल्त्;ा्ीचे समाजहिताच्या दृष्टीने वाटप व्हावे. (७) दारुबंदी व इतर उपायांनी लोकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे.
(१४) स्वतंत्र न्यायालय व्यवस्था
लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी न्यायालयांना स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. भारतास एकेरी न्यायव्यवस्था आहे. सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, जिल्हा, कोर्ट व इतर दुय्यम न्यायालये यांची एक साखळी निर्माण करण्यात आली आहे. न्याय व्यवस्थेवर राजकीय सत्तेचा दबाब येऊ नये यासाठी विधिमंडळ व कार्यकारीमंडळ यांच्या पासून न्यायमंडळाची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे. न्यायाधीशांची नेमणूक बदली, बढती, पगार, या सर्व गोष्टींना संरक्षण देऊन न्यायाधीशांकडून कार्यक्षम व निपक्षपाती न्यायाची अपेक्षा करण्यात आली आहे.
(१५) राष्ट्रपती व त्यांचे आणीबाणीचे अधिकार
भारताचा राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे. त्यांची निवड संसद सदस्य व विधानसभा सदस्यांकडून क्रमदेय निवड पध्दतीने होत असते. सर्व महत्वपूर्ण गोष्टी राष्ट्रपतींच्या नावे होत असल्या तरी प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या हाती सज्ञ्ल्त्;ाा केंदि्रत झाली आहे. भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक अंमलबजावणीविषयक आर्थिक बाबीविषयी घटक राज्याविषयक, न्यायविषयक व संकटकाल विषयक अशा सहा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. भारतीय राष्ट्रपतीला मिळालेला संकटकाल विषयक अधिकार अत्यंत महत्वाचा आहे.
(१६) हिंदी भाषेस राष्ट्रभाषेचा दर्जा
भारतीय राज्यघटनेत भाषाविषयक धोरण स्पष्ट करण्यात आले आहे. अनुच्छेद ३४३ मध्ये स्पष्ट घोषणा करण्यात आली आहे की, भारत या संघराजयाची अधिकृत भाषा देवनागरीतील हिंदी ही राहील. प्रादेशिक राज्यकारभार ज्या त्या प्रादेशिक भाषेमधून चालविण्याबाबत घटनेत स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्रजी एक जादा भाषा म्हणून राहील. आंतराष्ट्रीय व्यवहार व हिंदी समजू न शकणार्‍या राज्यांना केद्र सरकारशी व्यवहार करण्यासाठी इंग्रजीचा वापर करता येईल.
(१७) प्रौढ मताधिकार
भारतीय लोकशाहीने प्रौढ मतदार पध्दतीचा स्वीकार केलेला आहे. १८ वर्षावरील सर्व स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार देण्यात आलेला. आहे निवडणूक मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. लोकसंख्या व विस्ताराच्या दृष्टीने भारतासारख्या विशाल देशात प्रौढ मताताधिराने लोकशाहीचा प्रयोग राबविण्यात येत आहे. सनदी नोकरांच्या निवडीसाठी पब्लिक सर्व्हिस कमिशन (लोकसेवा अयोग मंडळ) ची स्थापना करण्यात आली

एम.पी.एस.सी. पूर्वपरीक्षा भूगोल आणि STI स्पेशल

एम.पी.एस.सी. पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेत तसेच यू.पी.एस.सी. पूर्वपरीक्षेत भूगोलासंबंधित अभ्यासात खालील घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत-
दैनिक तापमान कक्षा- दिवसाच्या २४ तासांतील कमाल व किमान तापमानातील फरकास दैनिक तापमान कक्षा असे म्हणतात. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना दैनिक तापमान कक्षाही वाढत जाते. सागर किनाऱ्यांपेक्षा खंडांतर्गत प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त असते, तसेच वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त असते.
वार्षकि तापमान कक्षा - उन्हाळ्यातील कमाल तापमान व हिवाळ्यातील किमान तापमान यामधील तापमानाच्या फरकाला वार्षकि तापमान कक्षा असे म्हणतात. विषुववृत्ताजवळ वार्षकि तापमान कक्षेत फारसा फरक आढळत नाही. समुद्र किनाऱ्यापेक्षा खंडांतर्गत प्रदेशात वार्षकि तापमान कक्षा जास्त असते.
समताप रेषा- समान तापमान असणारी स्थळे नकाशात ज्या रेषेने जोडतात, तिला 'समताप रेषा' असे म्हणतात. या रेषा सर्वसाधारणपणे पूर्व-पश्चिम दिशेने जातात. या रेषा अक्षवृत्तास समांतर असतात.
भूपृष्ठावरील हवेच्या दाबाचे पट्टे
१) विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा (Equatorial Low  Pressure Belt) - विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंस ५० उत्तर ते ५० दक्षिण अंशांच्या दरम्यान हा कमी दाबाचा पट्टा पसरलेला आहे. या अक्षवृत्तांच्या दरम्यान वर्षभर सूर्यकिरणे जवळजवळ लंबरूप पडतात. त्यामुळे तापमान जास्त असते व हवेचा दाब कमी असतो, कारण तापलेली हवा हलकी होऊन वर जात असते. या पट्टय़ात बराच काळ हवा ही शांत असल्याने तेथे वारे वाहत नाहीत, म्हणून त्याला विषुववृत्तीय शांत पट्टा (DOLDRUM) असे म्हणतात.
विषुववृत्तीय पट्टय़ात व्यापारी वारे एकत्र येऊन नंतर त्यांना ऊध्र्वगामी हालचाल प्राप्त होते. ज्या प्रदेशात हे वारे एकत्र येतात. त्यास आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीभवन पट्टा (ITCZ) असे म्हणतात.
२) उपउष्णकटिबंधीय अधिक दाबाचा पट्टा (Sub-tropical High  Pressure Belt) - दोन्ही गोलार्धात २५० ते ३५० अंश या अक्षवृत्तांच्या दरम्यान जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. जास्त दाबाच्या निर्मितीचे कारण म्हणजे पृथ्वीच्या गतिशील शक्तीमुळे आणि हवेच्या अधोगामी प्रवाहामुळे जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो, विषुववृत्तापासून तापलेली हवा उंच जाते. तेथे ती थंड होते व खालून येणाऱ्या हवेच्या प्रवाहामुळे बाजूला फेकली जाते. नंतर ही हवा २५० ते ३०० अक्षवृत्तांच्या दरम्यान खाली येते व तेथे जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो.
अश्व अक्षांश (Horse Latitude) - कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या २५० ते ३५० उत्तर व दक्षिणदरम्यानच्या जास्त दाबाच्या पट्टय़ात हवा ही शांत असते, म्हणून या पट्टय़ाला अश्व अक्षांश असे म्हणतात.
३) उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे (Subpolar Low Pressure Belt) -  ५०० ते ६०० अक्षवृत्ताच्या दरम्यान दोन्ही गोलार्धात कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे तेथील हवा ऊध्र्व दिशेला लोटली जात असल्याने तेथे कमीचा पट्टा निर्माण होतो. दक्षिण गोलार्धात उत्तर गोलार्धाच्या मानाने पाणी जास्त असल्याने उत्तर गोलार्धापेक्षा दक्षिण गोलार्धात हा कमी वायुभाराचा प्रदेश अधिक स्थिर स्वरूपाचा असतो.
४) ध्रुवीय अधिक दाबाचा पट्टा (Polar High - Pressure Belt) - हे पट्टे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशात पसरलेले असतात. ध्रुवीय प्रदेशात तापमान कमी असल्याने तेथे अधिक दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे.
वारे
वारे प्रामुख्याने जास्त दाबाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे स्थितिसमांतर दिशेने वाहतात. पृथ्वीवर जे वारे निर्माण होतात, त्यांचे पुढील चार प्रकारांत विभाजन करता येते.
१) ग्रहीय वारे/ नित्य वारे - पृथ्वीवरील नित्य वाहणारे व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे व ध्रुवीय वारे यांचा यात समावेश होतो.
२) नियमित काळात वाहणारे वारे - ठरावीक वेळी किंवा ठरावीक ऋतूमध्ये हे वारे वाहतात, म्हणून त्यांना नियमित काळात वाहणारे वारे असे म्हणतात. उदा. खारे वारे, मतलई, मोसमी वारे
३) अनियमित वारे - वातावरणाच्या अनुकूल परिस्थितीत हे वारे वाहू लागतात, म्हणून अशा वाऱ्यांना अनियमित वारे असे म्हणतात.
४) स्थानिक वारे - काही विशिष्ट प्रदेशांत तेथील स्थानिक परिस्थितीनुसार हे वारे वाहू लागतात. उदा. फॉन, चिनुक, मिस्ट्रल, बोरा इ.
ग्रहीय वारे - पृथ्वी या ग्रहाच्या प्रदेशात हे वारे नियमितपणे वाहतात, म्हणून यांना ग्रहीय वारे असे म्हणतात. ग्रहीय वाऱ्यांचे वर्गीकरण पुढील प्रकारांत करतात-
अ) व्यापारी वारे  ब) प्रतिव्यापारी वारे  क) ध्रुवीय वारे
अ) व्यापारी वारे - उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील उपउष्णकटिबंधीय अधिक दाबाच्या पट्टय़ाकडून (२५० ते ३५० अक्षवृत्त) विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्टय़ाकडे ५० उत्तर ते ५० दक्षिण जे वारे वाहतात त्यांना 'व्यापारी वारे' असे म्हणतात.
पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे सरळ विषुववृत्ताकडे वाहत येत नाहीत. उत्तर गोलार्धात ते स्वत:च्या उजव्या बाजूस तर दक्षिण गोलार्धात ते स्वत:च्या डाव्या बाजूस वळल्याने त्यांची दिशा बदलते. ते सामान्यत: पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहू लागतात. त्यामुळे त्यांना पूर्वीय वारे (Easterlies) असे म्हणतात. हे वारे उत्तर गोलार्धात ईशान्येकडून नर्ऋत्येकडे वाहतात, तर दक्षिण गोलार्धात आग्नेयकडून वायव्येकडे वाहतात. हिवाळ्यात हे वारे अधिक नियमित व जोरदार असतात. उन्हाळ्यात इतरत्र निर्माण होणाऱ्या भारप्रदेशामुळे हे वारे थोडे कमकुवत होतात. व्यापारी वाऱ्यांचा वेग दर तासाला सुमारे १६ ते २४ किमी इतका असतो. व्यापारी वारे हे उष्ण प्रदेशाकडून वाहतात. त्यांच्यामध्ये बाष्पधारण शक्तीही वाढलेली असते, त्यामुळे खंडाच्या पूर्व भागात योग्य परिस्थिती निर्माण झाल्यास पाऊस पडतो. जसजसे हे वारे पश्चिमेकडे जातात तसतसा त्यांच्यापासून पाऊस पडत नाही.
प्रतिव्यापारी वारे/ पश्चिमी वारे - उपउष्ण कटिबंधीय अधिक दाबाच्या पट्टय़ाकडून (२५ ते ३५ अंशवृत्ताच्या दरम्यान) उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्टय़ाकडे (५० ते ६०) अक्षवृत्त यादरम्यान वाहणाऱ्या वाऱ्यांना प्रतिव्यापारी वारे असे म्हणतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे फेरेलच्या नियमानुसार आपल्या मूळ दिशेपासून विचलित होतात. त्यामुळे प्रतिव्यापारी वारे साधारणत: पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, म्हणून त्यांना पश्चिमी वारे असेदेखील म्हणतात. उत्तर गोलार्धात हे वारे नर्ऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात, तर दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयकडे वाहतात. हे वारे उष्ण प्रदेशाकडून थंड प्रदेशाकडे वाहत असल्याने वर्षभर खंडाच्या पश्चिम भागात पाऊस पडतो. या वाऱ्यांची गती व दिशा अगदीच अनिश्चित स्वरूपाची असते. कधी हे वारे मंद पद्धतीने वाहतात, तर कधी हे वारे भयानक वादळी स्वरूपात असतात. दक्षिण गोलार्धात जास्त जलभार असल्याने प्रतिव्यापारी वारे हे नियमित वाहतात.
दक्षिण गोलार्धात ४०० दक्षिण अक्षवृत्ताच्या पलीकडे भूप्रदेशाचा फारसा अडथळा नसलयाने हे वारे वेगाने वाहतात व ते विशिष्ट आवाजाची निर्मिती करतात म्हणून त्यांना गर्जणारे ४० असे म्हणतात, तर ५० अंश दक्षिणपलीकडे संपूर्ण सागरी प्रदेश असल्याने वाऱ्यांना कोणताही अडथळा राहत नाही. या भागात वाऱ्यांचा वेग वाढतो. ते उग्र स्वरूप धारण करतात, म्हणून त्यांना खवळलेले ५० वारे Furious fifty असे म्हणतात.
प्रतिव्यापारी वाऱ्यांमुळे पश्चिम कॅनडा, पश्चिम युरोप या देशांत वर्षभर नियमित पाऊस पडतो.
ध्रुवीय वारे - ध्रुवाजवळील जास्त दाबाच्या पट्टय़ाकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्टय़ाकडे (५० ते ६० अक्ष वृत्त) यांकडे जे वारे वाहतात, त्यांना ध्रुवीय वारे असे म्हणतात. ध्रुवीय वारे हे साधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, त्यांना Pollar Easterlies) असे म्हणतात.
आवर्त आणि प्रत्यावर्त
आवर्त - एखाद्या प्रदेशात केंद्रस्थानी अत्यंत कमी भार निर्माण झाल्यास व त्याभोवती सर्व दिशांनी वायुभार वाढल्यास सभोवताच्या भागातून वारे हे कमी दाबाच्या मध्यवर्ती केंद्राकडे चक्राकार गतीने वाहू लागतात, त्यांना 'आवर्त वारे' म्हणतात. उत्तर गोलार्धात आवर्त वारे घडय़ाळाच्या काटय़ाच्या विरुद्ध दिशेने वाहतात, तर दक्षिण गोलार्धात ते घडय़ाळाच्या काटय़ांच्या दिशेने वाहतात. आवर्तच्या केंद्रस्थानी असलेल्या कमी भाराच्या पट्टय़ाला चक्रीवादळाचा डोळा असे म्हणतात.
आवर्त ज्या ठिकाणी निर्माण होतात त्यावरून त्यांचे दोन प्रकार पडतात- अ) समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त
             ब) उष्णकटिबंधीय आवर्त
समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त (Temperate Cyclones - या पट्टय़ात या आवर्ताची निर्मिती होते, म्हणजे ३५० ते ६५० यादरम्यान दोन्ही गोलार्धात या आवर्ताची निर्मिती होते. या आवर्ताना मध्यकटिबंधीय आवर्त (Mid Latitude Cyclones) किंवा उष्णकटिबंधीय अतिरिक्त आवर्त (Extra Tropical Cyclones) असे म्हणतात.
वैशिष्टय़- समशीतोष्ण कटिबंधात निर्माण होणारी ही आवर्त जमिनीचा एखादा भाग अत्यंत तप्त झाल्यास तेथील हवेचा भार कमी होतो व या कमी भाराच्या केंद्राकडे वारे आकर्षलेि जाऊन समशीतोष्ण आवर्ताची निर्मिती होते. समशीतोष्ण कटिबंधातील आवर्त हिवाळ्यात जास्त प्रमाणात निर्माण होतात.
े विस्ताराच्या बाबतीत हे आवर्त विशाल असतात. या आवर्ताचा विस्तार २००० किमी इतका असू शकतो.
े समशीतोष्ण कटिबंधीय आवर्तात केंद्रभागाजवळील हवेचा दाब व कडेच्या भागातील हवेचा दाब यांच्यात फारसा फरक नसतो. हा फरक १० ते २० मि.बा. इतका आढळतो. यातील समभार रेषा एकमेकांपासून दूर गेलेल्या असतात.
े या आवर्तातील केंद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग तुलनेने कमी असतो. त्यामुळे यातून विध्वंस करणारी चक्रीवादळे निर्माण होत नाहीत. हवा एकसारखी वर ढकलली जात असलयाने ढगांची व आवर्तपर्जन्यांची निर्मिती मोठय़ा प्रमाणात होते.
े या आवर्ताच्या प्रवासाची दिशा ठरलेली असते. हे आवर्त पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करतात. प्रवासाचा वेग मात्र वेगवेगळ्या ऋतूंमध्ये बदललेला असतो.
े हे आवर्त साधारणत: लंबवर्तुळाकार असतात. या आवर्तात अग्रभागात (पूर्व भागात) पश्चिम भागापेक्षा अधिक पाऊस पडतो.
े या आवर्ताच्या पाठोपाठ प्रत्यावर्त येतात. तसेच हे आवर्त प्रामुख्याने प्रतिव्यापारी वाऱ्यांच्या क्षेत्रात वाहतात.
समशीतोष्ण कटिबंधीय आवर्ताचा प्रदेश
० उत्तर अटलांटिक क्षेत्र - हा समशीतोष्ण आवर्ताचा मुख्य प्रदेश आहे. येथे ग्रीनलंडकडून येणाऱ्या शीत वायू राशी व दक्षिणेकडून येणाऱ्या उबदार वायू राशी एकमेकांशी भिडतात. हे आवर्त उत्तर अटलांटिकमधून पश्चिम युरोपकडे वाहतात.

० उत्तर पॅसिफिक क्षेत्र - अटलांटिकप्रमाणेच येथेही अ‍ॅल्युशियनकडून पूर्वेकडे वाहणारे व कॅनडा व संयुक्त संस्थानात शिरणारे आवर्त आढळतात.
० भूमध्य सागरी क्षेत्र - आल्प्सवरील शीत हवा आणि भूमध्य समुद्रामधील उबदार हवा यामुळे या भागात समशीतोष्ण आवर्ताची निर्मिती होते.
० चीन समुद्र - हिवाळ्यात या भागात आवर्ताची निर्मिती होते. यामुळे चीनचा मध्य भाग तसेच उत्तर भाग या ठिकाणी या आवर्ताचा प्रभाव जाणवतो.
उष्णकटिबंधीय आवर्त Tropical Cyclones)
विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे ६० ते ३०० अक्षवृत्ताच्या प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्त आढळतात. समशीतोष्ण कटिबंधीय आवर्तापेक्षा उष्णकटिबंधीय आवर्ताचे स्वरूप भिन्न असते. त्यांचा विस्तार तुलनेने कमी असतो. मात्र त्यांचे स्वरूप प्रलयकारी असते. या आवर्ताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.
पश्चिम पॅसिफिकमध्ये टायफून (Typhoon), अटलांटिकमध्ये हरिकेन (Hurricane), पूर्व पॅसिफिकमध्ये बिग िवड (Big wind), फिलिपाइन्समध्ये बागुइओ (Baguio), ऑस्ट्रेलिया विली विलीस (Willy - Willies), भारतात या वादळांना चक्रीवादळे असे म्हणतात.
वैशिष्टय़े - उष्णकटिबंधीय आवर्त बहुधा ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये जास्त प्रमाणात निर्माण होतात.
० उष्णकटिबंधात निर्माण होणाऱ्या आवर्ताचा विस्तार तुलनेने कमी असतो. यांचा व्यास साधारणत: ८० ते ३२० किमी इतका असतो.
० केंद्रभागावरील हवेचा दाब व कडेच्या भागातील हवेचा दाब यांमध्ये खूप फरक असतो. या प्रकारच्या आवर्तातील समभार रेषा अगदी जवळजवळ असतात.
० चक्रीवादळांचा वाहण्याचा वेग अतिप्रचंड असतो. समुद्रावर या वादळांचा वेग जमिनीच्या मानाने जास्त असतो.
० हे आवर्त वर्तुळाकार असतात.
० या आवर्त प्रकारात तापमानात फारशी भिन्नता नसते. या आवर्तामध्ये पाऊस सर्वत्र पडतो.
० या आवर्ताच्या पाठोपाठ प्रत्यावर्त येत नाहीत.
० हे आवर्त प्रामुख्याने व्यापारी वाऱ्यांच्या क्षेत्रात म्हणजे हे आवर्त पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करतात.
उष्ण कटिबंधीय आवर्ताचे क्षेत्र
अटलांटिक समुद्रात (वेस्ट इंडिज) व संयुक्त संस्थानात फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर निर्माण होतात, ती हरिकेन या नावाने ओळखली जातात. जपान, चीन व फिलीपाइन्स बेटांच्या समूहांत पॅसिफिकमध्ये ही आवत्रे निर्माण होतात, त्यांना टायफून म्हणतात. िहदी महासागरात, ऑस्ट्रेलियाचा उत्तर किनारा, आफ्रिकेचा पूर्वकिनारा आणि भारताच्या पूर्व-पश्चिम किनाऱ्यावरही अशी आवर्ती वादळे निर्माण होतात.
प्रत्यावर्त
एखाद्या ठिकाणी जास्त भाराचा प्रदेश असेल तर त्याच्या केंद्रभागाकडून त्याच्या सर्व दिशेला वारे वाहू लागतात. या प्रकारच्या वायुभार वितरणास प्रत्यावर्त असे म्हणतात. प्रत्यावर्त हे प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधीय पट्टय़ात म्हणजे ३५० ते ६५० दरम्यान निर्माण होतात. समशीतोष्ण कटिबंधीय पट्टय़ात हिवाळ्यात भूभाग अत्यंत थंड होत असल्याने तेथे जास्त भाराचा प्रदेश निर्माण होतो व तेथील वारे बाहेर वाहू लागतात.
खारे वारे आणि मतलई वारे
खारे वारे - दिवसा सूर्याच्या उष्णतेमुळे जमीन लवकर तापते, त्या मानाने पाणी उशिरा तापते, त्यामुळे समुद्रालगतच्या जमिनीवर हवेचा दाब कमी असतो, तर समुद्रावर हवेचा दाब जास्त असतो. त्यामुळे दिवसा समुद्रावरून जमिनीकडे वारे वाहतात. त्यांना खारे वारे म्हणतात.
मतलई वारे - रात्री समुद्राच्या मानाने जमीन लवकर थंड होते आणि समुद्रातील पाणी मात्र उबदार असते. त्यामुळे सागरावर कमी वायुभार व जमिनीवर जास्त वायुभार असतो. परिणामी, जमिनीकडून पाण्याकडे वारे वाहतात. या वाऱ्यांना मतलई वारे असे म्हणतात. हे वारे थंड आणि कोरडे असतात व त्यांचा वेगदेखील मंद असतो. 

Saturday, December 27, 2014

मुख्य परीक्षेतील मराठी विषयाची तयारी



मराठी व इंग्रजी या अनिवार्य विषयांच्या अभ्यासाची तयारी कशाप्रकारे करावी, या संबंधी शक्य तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.

*****मराठी व इंग्रजी या विषयांचे स्वरूप
मराठी व इंग्रजी हे दोन्ही भाषा विषय एमपीएससी मुख्य परीक्षेसाठी अनिवार्य स्वरूपाचे असतात. म्हणजेच या प्रश्नपत्रिकेत मिळालेले गुण मुख्य परीक्षेच्या एकूण गुणांमध्ये ग्राह्य धरले जातात, हे आवर्जून सांगण्याचे कारण म्हणजे बहुसंख्य मुले एमपीएससी व यूपीएससीचा एकत्रितपणे अभ्यास करत असतात. यूपीएससी मुख्य परीक्षेला भाषा गुण हे चाळणी स्वरूपाचे असतात. या विषयांमध्ये आखून दिलेल्या मर्यादेएवढे मार्क्स मिळाल्यासच त्या उमेदवाराचे इतर प्रश्नपत्रिका तपासल्या जातात. यूपीएससीमध्ये भाषा विषयांचे गुण टोटल स्कोअरमध्ये काऊंट केले जात नाहीत. मात्र, एमपीएससी मुख्य परीक्षेत ते काऊंट केले जात असल्यामुळे प्रत्येक उमेदवाराला या विषयांचा अभ्यास गांभीर्याने करणे आवश्यक बनते. सर्वसाधारणपणे भाषा विषयांमध्ये चांगले गुण आवश्यक ठरतात.
1) वाचन, 2) लेखन, 3) सराव, 4) व्याकरणविषयक नियमांची माहिती. हा फक्त एक सर्वसाधारण अंदाज देण्यात आला आहे, हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे. आता याच बाबींविषयी थोडी विस्ताराने माहिती घेऊ.

1) वाचन : भाषा विषयांमध्ये जर तुमचे वाचन चांगले असेल तर त्याचा तुम्हाला नकळतपणे खूप फायदा होतो. अनेक उमेदवारांना फारसे कष्ट न घेताही चांगले गुण मिळतात. तेव्हा त्यांना असलेली वाचनाची आवड अत्यंत उपयोगी पडल्याचे दिसते. चांगल्या वाचनाचा तुम्हाला निबंधलेखनात वेगवेगळी उदाहरणे संदर्भ देण्यासाठी तसेच पत्रलेखनातील विविध विषय हाताळण्यासाठी फायदा होतो.

2) लेखन : अनेक उमेदवारांना वाचनाची आवड असली तरी वाचलेले, सुचलेले स्वत:च्या शब्दांत मांडणे अनेकांना कठीण जाते. अशा वेळी ज्ञान असूनही ते योग्य प्रकारे मांडता येत नसल्याने विद्यार्थी हतबल होतात. म्हणूनच भाषा विषयांची तयारी करताना लेखन हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा बनतो.

3) सराव : अनेक उमेदवारांचे वाचन खूप चांगले असते. ते शब्दांत व्यक्त करता येते. मात्र, त्यांच्यावर वेळेचे बंधन/मर्यादा लावल्यास त्यांना योग्य प्रकारे प्रश्नपत्रिकेतील निबंध, पत्रलेखन, सारांशलेखन करता येत नाही. कधी त्यांच्या विचारांचा वेग कमी पडतो तर कधी त्यांच्या लिहिण्याचा वेग कमी पडतो. म्हणूनच या दोन्ही बाबींचा सराव करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

4) व्याकरणविषयक नियमांची माहिती : अनेक उमेदवारांकडे चांगले वाचन, लेखन व सराव यांसारख्या बाबींची पूर्तता झाल्यावरही चुका आढळतात. उदाहरणार्थ, मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत मुले वेलांटी, उकार यासंदर्भात कायम गफलत करतात व प्रश्नपत्रिका चांगल्या पद्धतीने लिहूनही त्यांना चांगले गुण मिळत नाहीत.

******मराठी -विषय
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या एकूण 800 गुणांपैकी या पेपरला एकूण 100 गुण आहेत व प्रश्नपत्रिका सोडवण्याचा कालावधी 3 तासांचा आहे. या प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणा-या प्रश्नांचा स्तर हा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेला अनुसरून ठेवला जातो. या प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणा-या विविध प्रश्नांना अनुसरून आपण त्या बाबींविषयीची माहिती करून घेऊ.

1) निबंधलेखन : 
**निबंधलेखनासाठी एकूण पाच विषय दिले जातात. त्यापैकी कोणत्याही एका विषयावर 500 शब्दांचा निबंध लिहावयाचा असतो. त्यासाठी 30 गुण असतात. आधी 5 वर्षांत आलेल्या निबंधांचा अभ्यास करून त्याप्रमाणे वेगवेगळ्या विषयांवर निबंध लिहिण्याचा सराव करा. सुरुवातीला वेळ न लावता चांगल्या प्रकारे एका विशिष्ट फ्लोमध्ये काही उदाहरणे, संदर्भ वापरून लिहिता येते का? तसेच निबंधाची सुरुवात, शेवट चांगल्या प्रकारे लिहिता येतो का? हे तपासा. त्याचा सराव झाला की मग काही निबंध वेळ लावून लिहा. निबंधाचा प्रश्न घेऊ नका. निबंध सर्वात शेवटी लिहावा. कारण सुरुवातीला लेखनाचा व विचारांचा वेग थोडासा मंद असतो व त्यामुळे जर निबंध लिहायला जास्त लागला तर वेळेअभावी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न सोडवायचे राहतील. याउलट पेपरच्या शेवटाला लेखनाचा तसेच विचारांचा वेग वाढलेला असतो. त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त व चांगल्या प्रकारे निबंध लेखन होते. समजा निबंध फक 100, 200 शब्दच लिहून झाला व तितक्या शेवटची 10 मिनिटे राहिल्याची घंटा वाचली तर तो निबंध कधीच अर्धवट सोडू नये. त्याचा लगेचच योग्य शब्दांत समारोप करावा. यामुळे निबंधाला पूर्णत्व प्राप्त होते व निबंध चांगला लिहून झाला असेल तर मिळणा-या गुणांत फरक पडू शकतो.

**निबंधाची सुरुवात शक्यतोवर एखादा सुविचार, एखादी कविता, एखाद्या चित्रपटातील चार विषयांशी सुसंगत अशा अर्थपूर्ण ओळी- मग त्या गाण्यातील असतील, गझल असेल किंवा एखादा डायलॉग असेल तर त्याने करावी. तसेच नुकत्याच घडलेल्या एकाद्या घटनेचा किंवा भूतकाळातील एखाद्या प्रसिद्ध घटनेचा संदर्भ तुम्ही वापरू शकता. उदा. 2011 च्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नात ‘हुतात्मा स्मारके बोलू लागली तर’ याच निबंधात लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातील गांधीजींच्या तोंडचा डायलॉग तुम्ही खुशीने वापरू शकता. ‘माझे सगळे पुतळे पाडून टाका व मला पुतळ्यांच्या स्वरूपात ठेवण्याऐवजी स्वत:च्या मनात ठेवा.’ वरील बाबींचा वापरू करूनच तुम्ही निबंधाची शेवटही परिणामकारक करू शकता. तुम्हाला निबंधाच्या सुरुवातीला काही चांगले मुद्दे, उदाहरण आठवल्यास व ते लिहिण्याच्या ओघात विसरून जाण्याची शक्यता वाटत असेल तर ते कच्च्या कामासाठी दिलेल्या जागेवर अगदी तुम्हाला लगेच   क्लिक होईल. अशा एक-दोन शब्दांत लिहून काढावेत. निबंध लेखनात व्याकरणाच्या चुका जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा, खूप चांगली सुरुवात. शेवट व अर्थपूर्ण निबंध लिहूनही अशुद्ध लेखनामुळे गुण कमी होऊ शकतात. तुम्ही ज्या विषयावर निबंध लिहिणार आहेत, त्या विषयाचे जास्तीत जास्त ‘अ‍ॅसपेक्टस कव्हर’ करण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ आपण व्यवस्थित समजावून घेऊ. कारण अनेक उमेदवारांना सगळे ‘अ‍ॅसपेक्टस कव्हर’ करायचे म्हणजे नक्की काय करायचे? हेच समजत नाही. आपण एक उदाहरण घेऊ.

समजा तुम्हाला ‘डोंगर’ हा विषय निबंधासाठी दिला तर त्यावर किती प्रकारे विचार करता येऊ शकतो.

-    त्या डोंगराचे भौगोलिक स्थान, विस्तार.

-    त्या डोंगरावरील जीवसृष्टी (वने, झाडे, प्राणी)

-    त्याचा मानवाला होणारा उपयोग.

-    विविध ऋतूंमधील त्याचे स्वरूप इ. अशा विविध दृष्टिकोनातून तुमही विचार करू शकता.

मात्र, विविध ‘अ‍ॅसपेक्टस कव्हर’ करत असताना मुळ विषयाशी त्याची नाळ तुटता कामा नये. म्हणजेच मूळ विषयाशी तो दृष्टिकोन तुम्हाला लिंक करता आला पाहिजे.

**मराठी विषयाच्या निबंधात तुम्ही एखादे प्रसिद्ध इंग्रजी वाक्य, सुविचार वापरू शकता. मात्र, ते वापरल्यावर लगेचच पुढील परिच्छेदात त्याचा मराठी अर्थ थोडक्यात विशद करावा.

**निबंध सरळ साध्या सोप्या शब्दांत लिहावा. तुम्हाला लिहिताना सहजपणे एखादा वाक्प्रचार, एखादी म्हण किंवा नेहमीच्या शब्दांऐवजी वेगळा शब्द सुचला तर टाळावा. मात्र, जाणीवपूर्वक नाहीतर निबंधातील सहजता निघून जाते व तपासण्यास तो इरिटेटिंग वाटू शकतो व त्याचा परिणाम गुणांवर होऊ शकतो.