पूर्वपरीक्षा पेपर-१ मध्ये एकूण सात उपघटक आहेत. हे विषय पारंपरिक असले
तरी त्यांचा अभ्यास मात्र पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून करणे आवश्यक
आहे. त्यासाठी त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांची सरळ दोन भागांत विभागणी
करावी- खूप महत्त्वाचे आणि महत्त्वाचे. पहिल्या भागामध्ये इतिहास, भूगोल,
राज्यव्यवस्था व अर्थव्यवस्था या चार घटकांना ठेवावे. अभ्यासण्यासाठी
बाकीचे चार घटक दुसऱ्या भागामध्ये येतील. या अतिमहत्त्वाच्या घटकांचे
महत्त्व जास्त का याचा विचार केला की लक्षात येते, इतिहास वगळता या
विषयांवरचे प्रश्न 'मूलभूत' संकल्पना पक्क्या असल्याशिवाय सोडविता येत
नाहीत. प्रश्नांचा रोख संकल्प, तथ्ये, विश्लेषण, चालू घडामोडी अशा
वेगवेगळ्या पलूंवर विचारण्यावर असतो. त्यामुळे याचा परिपूर्ण अभ्यास आवश्यक
आहे. 'इतिहास' विषय हा गटात असण्याचे कारण म्हणजे या विषयावरील प्रश्नांची
जास्त संख्या आणि प्रश्नांचे विश्लेषणात्मक स्वरूप.
'चालू घडामोडी' हा
उपघटक इतर उपघटकांच्या संबंधाने महत्त्वाचा आहेच. शिवाय या मूलभूत
विषयांच्या चालू घडामोडींच्या व्यतिरिक्त काही भागाची तयारीही या घटकात
येते. त्यामुळे वेगळा घटक म्हणूनच याची तयारी करायला हवी. या घटकावर एका
वेगळ्या लेखात आपण चर्चा करू.
इतिहासाचा अभ्यास केवळ तथ्य (फॅक्ट्स)
आणि घटनामालिका पाठ करून पूर्ण होत नाही. राजकीय आणि सामाजिकदृष्टय़ा
महत्त्वाच्या घटनांचा क्रम लक्षात ठेवावा लागतो, पण त्यासाठी केवळ पाठांतर
करून भागणार नाही. घटनांमधील परस्परसंबंध, कारणे, परिणाम असे आयाम समजून
घेतल्यास घटना व त्यांचा क्रम दोन्ही व्यवस्थित समजतात आणि लक्षात राहतात.
प्राचीन व मध्ययुगीन भारतीय इतिहासातील एकूण प्रश्न पाच ते सहापेक्षा जास्त
नसतात. त्यामुळे पूर्ण भर आधुनिक भारताच्या इतिहासावर देणे व्यवहार्य
ठरेल. महाराष्ट्राचा इतिहास भारताच्याच इतिहासाचा भाग म्हणून अभ्यासणे
आवश्यक आहे. मात्र काही समाजसुधारक व स्वातंत्र्यसनिक यांचे
महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे योगदान असल्याने त्यांचा अतिरिक्त अभ्यास
गरजेचा आहे. यासाठी बिपिनचंद्र यांचे 'भारताचा स्वातंत्र्यलढा' व
स्पेक्ट्रम प्रकाशनचे 'आधुनिक भारताच्या इतिहासावरील पुस्तक' ही पुस्तके
पुरेशी आहेत.
भूगोलाचा अभ्यास करताना उपघटकांना प्राकृतिक-आíथक-सामाजिक
अशा क्रमाने महत्त्व देणे आवश्यक आहे. मूलभूत संज्ञा आणि संकल्पना आधी
समजून घेऊन मग भौगोलिक घटना व प्रक्रियांचा अभ्यास करावा. प्राकृतिक विभाग,
नदी-पर्वत प्रणाली यांचा अभ्यास नकाशा समोर ठेवून करावा. याबाबत
भारत-महाराष्ट्र आणि जग अशा क्रमाने महत्त्व देऊन अभ्यास आवश्यक आहे.
मान्सूनची निर्मिती व्यवस्थित समजून घ्यायला हवी. आíथक भूगोलामध्ये खनिजे व
त्यांचे उत्पादन, महत्त्वाचे उपयोग व त्यांची स्थाननिश्चिती, महत्त्वाची
पिके व त्यांचे उत्पादक प्रदेश यांचा actual अभ्यास तक्त्यांद्वारे करता
येईल. मात्र उद्योग व पिके यांच्या उत्पादनाबाबत संकल्पनात्मक अभ्यास
आवश्यक आहे. पर्यटनाशी संबंधित विविध संकल्पना व महत्त्वाची स्थाने यांचा
आढावा घ्यायला हवा. सामाजिक भूगोलामध्ये जमातींचा अभ्यास महत्त्वाचा आहे.
चच्रेचा/बातमीचा विषय ठरल्या असतील तरच भारताबाहेरील जमातींचा आढावा
घ्यावा. महाराष्ट्राच्या जमातींचे स्थान, महत्त्वाचे सण, नृत्ये, कला
इत्यादींची माहिती घ्यावी. स्थलांतराची कारणे, परिणाम, समस्या, उपाय,
प्रकार, प्रभाव इत्यादी महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात समजून घ्यावे.
भारतीय राज्यव्यवस्था विषयाच्या तयारीचा पाया आहे. राज्यघटनेचा अभ्यास,
घटनेतील मूलभूत हक्क, कर्तव्ये, नीतिनिर्देशक तत्त्वे, घटनात्मक पदे,
महिला, मुले, अपंग, मागासवर्ग, अल्पसंख्याक या सामाजिक घटकांसाठीच्या
तरतुदी, घटनादुरुस्ती याबाबतची कलमे व तरतुदी तोंडपाठ असायला हव्यात.
केंद्र-राज्य संबंध, न्यायालयीन उतरंड, महत्त्वाच्या संज्ञा समजून घ्यायला
हवेत. पंचायतीराज व्यवस्था बारकाईने समजून घ्यायला हवी. चच्रेत असलेले तसेच
प्रस्तावित कायदे, नियम, धोरणे यांचाही अभ्यास आवश्यक आहे. सर्वोच्च
न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय माहीत असावेत.
आíथक व सामाजिक विकास या
घटकाच्या अभ्यासाची सुरुवात अर्थव्यवस्था विषयाच्या मूलभूत संकल्पना समजून
घेऊन करायला हवी. या संकल्पना व्यवस्थित समजून घेतल्यावर संबंधित
मुद्दय़ांची आकडेवारी (टक्केवारी) नोंदवून घ्यावी. सामाजिक
परिप्रेक्ष्यामध्ये रोजगार, दारिद्रय़, आरोग्य, शिक्षण, समावेशन इत्यादी
संकल्पना समाविष्ट होतात. या संकल्पनांचा अभ्यास महत्त्वाच्या संज्ञा,
व्याख्या, स्वरूप, समस्या, कारणे, परिणाम, उपाय, योजना अशा आठ आयामांचा
विचार करून करावा. दारिद्रय़रेषा निर्धारण, शिक्षण याबाबतच्या महत्त्वाच्या
समित्या व त्यांच्या शिफारशींचा आढावा घेता आल्यास उत्तम. आíथक व सामाजिक
असमतोल, त्याची कारणे, स्वरूप, परिणाम, उपाय इत्यादी बाबी समजून घेणे
आवश्यक आहे. मानव विकास अहवाल व तत्सम निर्देशांकांची अद्ययावत माहिती करून
घ्यावी.
सामान्य विज्ञानामध्ये जास्त भर जीवशास्त्र त्यातही मानवी
आरोग्यशास्त्रावर असतो. मानवी आरोग्याशी संबंधित बाबींचा अभ्यास
तक्त्याच्या स्वरूपामध्ये करता येईल. अवयव संस्थांचा अभ्यासही गरजेचा आहे.
औषधी व आíथक महत्त्वाच्या वनस्पतींचा आढावा घ्यावा. भौतिकशास्त्रातील
पारंपरिक मूलभूत संकल्पनांबरोबरच इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील नवीन घडामोडीही
लक्षात घेणे गरजेचे आहे. उदा. मोबाइल, संगणक यांतील अद्ययावत उपकरणे किंवा
प्रणालींची मूलभूत शास्त्रीय माहिती.
पर्यावरणीय परिस्थिती घटकामध्ये
परिसंस्था, तिचे घटक, अन्नसाखळी इत्यादी बाबी उदाहरणासहित समजून घ्यायला
हव्या. 'जैवविविधता' ही संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायला हवी. आíथक व
पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या परिसंस्था पाहायला हव्यात. भारतातील
रामसर साइट्स, जैवविविधता हॉट स्पॉट्स, प्रवाळ मित्ती, हिमालयीन, शुष्क
प्रदेशातील व किनारी भागातील वैशिष्टय़पूर्ण वनस्पती व प्राणी प्रजातींचा
आढावा टेबलमध्ये घेता येईल. IUCN (इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ
नेचर)च्या 'रेड लिस्ट'मधील भारताच्या संकटग्रस्त प्रजाती, वन्यजीवन
संवर्धनाचे कायदे, ठराव, अभयारण्ये व संबंधित संकल्पना यांचाही आढावा
आवश्यक आहे.
हरितगृह परिणाम, ओझोन क्षय, जागतिक तापमान वाढ या
संकल्पना व त्यांचा परस्परसंबंध जाणून घ्यायला हवा. हवामान बदलाबाबत क्योटो
प्रोटोकॉलमधील तरतुदी व संबंधित चालू घडामोडी लक्षात घ्याव्यात. याबाबत
भारताची भूमिका नेमकेपणाने समजून घ्यायला हवी. भारतातील यासाठीचे प्रयत्न,
त्यासाठीचे कायदे, धोरण, योजना पाहायला हव्यात. अशा नेमक्या रणनीतीने
अभ्यास केला तर यश नक्की मिळते. तुम्ही मेहनत किती घेताय यापेक्षा ती कशी
घेताय यावरच परिणाम अवलंबून असतो.