Saturday, December 27, 2014

कृषीविषयक घटक


मत्स्योत्पादन : महाराष्ट्रात ७२० कि.मी. चा समुद्रकिनारा लाभलेला आहे. जगात माशांच्या २१,०००, भारतात १६०० व महाराष्ट्रात सुमारे ६०० जाती आढळतात.
० ठाणे जिल्ह्य़ातील डहाणू तालुक्यात शंखोदर बंदर असून आकाराने मुंबई बंदराच्या चौपट मोठे आहे. येथे पवित्र तिर्थक्षेत्र असून समुद्रात जिवंत शंख सापडतात. गोडय़ा पाण्याचे कुंड आहे. भारत सरकारला परकीय चलन मिळवून देणारा शिवंड (लॉब्सटर) मासा याच ठिकाणी आढळतो.
० महाराष्ट्राच्या भौगोलिक व नैसर्गिक परिस्थितीचा विचार करता संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत योग्य कोळंबीची जात म्हणजे जम्बो कोळंबी. याच कोळंबीला रायगड व ठाणे जिल्ह्य़ात ‘पोची’ या नावाने ओळखतात तर पश्चिम महाराष्ट्रात ‘झिंगा’ या नावाने ओळखतात. जागतिक बाजारपेठेत ही कोळंबी ‘स्कॅपी’ या नावाने ओळखली जाते.
० कोळंबीचे मुख्य गुणधर्म- प्रजननाच्या वेळी होणारे स्थलांतर, नदीच्या पात्रातून, खाडीमधून जुलै ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या हंगामात ही कोळंबी समुद्राकडे पोहत येते. खाडीच्या मुखावर ही कोळंबी थव्यांनी येताना आढळते. नदीच्या तोंडाशी, खाडीमध्ये किनाऱ्यात हिरवळीच्या आडोशाने ती आपली पिल्ले सोडतात. खाडीच्या निमखाऱ्या पाण्यामध्ये ही पिल्ले जगू शकतात. काही दिवसांनी त्याचे छोटय़ा कोळंबीत रूपांतर होते, ज्याला कोळंबी बीज म्हणतात.
० महाराष्ट्र कोळंबी बीजनिर्मिती करणारे एकमेव राज्य आहे.
० महाराष्ट्रात सद्यस्थितीत ११९ कोळंबी प्रकल्प आहेत.
० खाऱ्या पाण्यातील आढळणारे मासे- बोंबील (बॉम्बे डक), पापलेट, सुरमई, बांगडा, वाम, हैद, कोळंबी, मांदेली, शेवंड, रावस, दाढा, सौंदाढा, ताठमासा इ.
० निम खाऱ्या पाण्यातील आढळणारे मासे- जिताडा, ë2;ेणवी, थाऊनस,
बोई, झिंगे इ.
० गोडय़ा पाण्यातील मासे- कटला (विदर्भात तांबरा असे म्हणतात), रोहू, कोळंबी, चंदेरी, तिलापिया, मरळ, काणोसी, गवत्या, रावस इ.
० परदेशातून आणलेल्या जाती- स्केलकार्प, मिररकार्प, लेदरकार्प, गवत्या (ग्रासकार्प- हाँगकाँग), तिलापिया (आफ्रिका), कटला, रोहू इ.
० हेरिंग, मॅकरेल, सार्डिन, टूना या जातीचे मासे सागरपृष्ठीय मासे म्हणून ओळखले जातात.
० ग्रामीण भागात मलेरिया प्रतिबंधक म्हणून डासाच्या अळ्यांचे नियंत्रण करण्यासाठी गप्पी मासे वापरले जातात.
० हैद व तारलीचे तेल रक्तवाहिनीच्या विकारावर व हृदयविकारावर वापरले जाते.
० माश्यात आढळणारे घटक- ७० ते ८० टक्के पाणी, १६ ते २५ टक्के प्रथिने (पचनास हलके) .१ ते २.२ टक्के स्निग्ध पदार्थ, .८ ते २ टक्के क्षार व खनिज पदार्थ, अ व ड जीवनसत्त्व.
० जो मनुष्य वर्षांतून कमीत कमी ३० दिवस मासेमारी करतो, त्या व्यक्तीला मच्छिमार म्हणतात.
० संपूर्ण सागरी आर्थिक क्षेत्र म्हणजे त्या देशाच्या किनाऱ्यापासून २०० सागरी मैलपर्यंतचे क्षेत्र होय.
 भारतातील कृषी क्रांती :
हरित क्रांती - अन्नधान्य उत्पादन धवल क्रांती - दूध उत्पादनात वाढ
निल क्रांती - मत्स्योत्पादनात वाढ पित क्रांती - तेलबिया
लाल क्रांती - मांस उत्पादन रजत क्रांती - अंडी उत्पादन
सुवर्ण क्रांती - फळ उत्पादन गोल क्रांती - बटाटा उत्पादन
करडी क्रांती - खत उत्पादन
० शेतमालाच्या भावाची निश्चित पातळी ठरविण्यासाठी शासकीय पातळीवर सन १९६५ साली कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली.
० विदर्भातील शेतकऱ्यांच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीबाबत मूल्यमापन करण्यासाठी शासनाने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नियुक्त केली.
आपला भारत कृषी प्रधान देश असून शेतीमध्ये रोज १५ ते १६ तास काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा देश आहे. भारतातील व आपल्या महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. आज देशातील जवळपास ६५ ते ७० टक्के लोकसंख्या कृषी व संलग्न उद्योगांवर अवलंबून आहे. देशाच्या व राज्याच्या सर्वागीण विकासामध्ये ‘कृषी’ हा आधार मानला जातो. त्यामुळे देशातील व राज्यातील प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थ्यांना व प्रशासकाला शेतीविषयी ज्ञान असणे गरजेचे आहे.
 पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय :
० शेतीला संपूरक व्यवसाय म्हणजे पशुपालन व दुग्धव्यवसाय. सध्या दोन्ही क्षेत्रांत जगात भारताचा पहिला क्रमांक लागतो. जगाच्या एकपंचमांश पशुधन भारतामध्ये आहे. जगातील एकूण म्हशींपैकी ५३.५ टक्के म्हशी भारतात आहेत.
० भारतात सर्वात जास्त पशुधन उत्तर प्रदेशात आहे.
० भारतामध्ये पशुगणना दर पाच वर्षांनी केली जाते.
० भारतात विविध भागांतील मिळून एकूण २६ प्रकारच्या गाईंच्या जाती आहेत. गाईंच्या दुधाळ जाती- सहिवाल, गीर, लालसिंधी, थरपारकर इ.
० गाईच्या शेतीच्या कामास उपयुक्त जाती- खिलार, अमृतमहाल, नागोरी, म्हैसुरी, कंगायम;
० दूध उत्पादन व शेतीकाम दुहेरी उद्देशीय जाती- देवणी, हरियाणी, कॉकरेज (सर्वात मोठी), कृष्णाकाठी, ओंगोले, थरपारकर इ.
० गाईंच्या विदेशी जाती : जर्सी, होलस्टेन, फ्रिजिअन, ब्राऊन स्वीस, रेड डॅनिश, शार्लोटा (मांस).
० म्हशीच्या जाती- जाफराबादी (सर्वात मोठी व सर्वात जास्त दूध देणारी, भावनगरी म्हणून ओळखतात), सुरती (दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण जास्त- ८.५%), मेहसाना (सुरती व मुव्‍‌र्हा जातीच्या संकरातून निर्माण), नागपुरी, पंढरपुरी (कर्नाटकात धारवाडी म्हणून ओळखतात), निली रावी, तोडा, तराई, कालाहंडी इ.
० शेळी- गरीबाची गाय म्हणून ओळखली जाते. शेळीमध्ये रोग प्रतिकारशक्ती जास्त असते. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त शेळ्या आहेत.
० दुधाकरिता उपयुक्त देशी शेळीच्या जाती- जमुनापुरी, बारबेरी, मलबारी, झकराना.
० महाराष्ट्रातील शेळीच्या जाती- सुरती, उस्मानाबादी, संगमनेरी.
० विदेशी दुधाच्या शेळीच्या जाती- जसानेन, न्युबीयन, दमास्कस, ब्रिटिश अल्पाईन.
० अंगोरा शेळीच्या लोकरीस मोहेर म्हणतात. पश्मिना हा मऊ केसांचा थर काश्मिरी शेळीमध्ये आढळतो. शेळीचा गर्भधारणा काळ १५० दिवसांचा असतो.
० मेंढीच्या जाती- नेल्लोरे, शहाबादी, बिकानेरी, मारवाडी, चोकला, गरेझ, दख्खनी, भाकरवाल, लो 61;ी, काठियावाडी, मेरीनो (लोकरीसाठी उत्तम जात), गड्डी इ.
० कोंबडय़ांच्या जाती- ब्रह्मा (झुंजीसाठी प्रसिद्ध), व्हाईट लेग हॉर्न (जगात सर्वाधिक जास्त अंडी देणारी), ब्लॅक मिनोर्का, ऱ्होड आयलंड (मांस व अंडी देणारी)
० दुधातील घटक- पाणी, लॅक्टोज, सिरम अ‍ॅल्ब्युमिन, सिरम ग्लोब्युलिन, केसीन, नॅचरल फॅटस्, फॉस्फोलिपिडस्, कोलेस्टेरॉल, कॅल्शियम, फॉस्फोरस, सोडियम, पोटँशियम, क्लोराईड, सायट्रिक आम्ल इ.
० दुधापासून तयार केले जाणारे पदार्थ- दही, ताक, लोणी, मलई, तूप, खवा, चीज, पनीर, श्रीखंड इ.

Current Affair (#‎चालू‬ घडामोडी:- डिसेंबर २०१४)


०१) यंदाच्या यश चोप्रा स्मृती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले महानायक कोण?
== अमिताभ बच्चन
०२) स्पंदन आर्ट संस्थेतर्फे दिला जाणारा महमद रफी जीवन गौरव पुरस्कार यावर्षी कोणास प्रदान करण्यात आला आहे?
== ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर
०३) विमा क्षेत्रात FDI वाढ व कोळसा खाण वितरणासाठी ई-लिलाव पद्धती आणण्याबाबतच्या अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कधी स्वाक्षरी.केली?
== २६ डिसेंबर २०१४
०४) ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युज याच्या स्मरणार्थ एव्हरेस्टवर ठेवणार बॅट.नेण्याचा उपक्रम कोणत्या देशाची क्रिकेट संघटना राबविणार आहे?
== नेपाळ क्रिकेट संघटना
०५) सोनितपूरमध्ये बोडो अतिरेक्यांविरुद्ध आसाम रायफल्स, निमलष्करी दल आणि लष्करी जवानांची संयुक्त कारवाई सुरू केली असून या कारवाईस काय नाव देण्यात आले आहे?
== मिशन ऑल आऊट
०६) झारखंडचे नवे मुख्यमंत्री.म्हणून कोणत्या बिगरआदिवासी चेहऱ्याला प्रथमच संधी मिळत आहे?
== रघुवर दास- भाजप (जमशेदपूर पूर्व मतदारसंघ)
०७) प्रवाशांसाठी ऑनलाइन रिचार्ज सुविधा सुरु करणारी मेट्रो सेवा कोणत्या शहरात पुरविली जाणार आहे?
== मुंबई
०८) देशात वाहनचोरीमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागला आहे?
== दुसरा(पहिल्या स्थानावर उत्तर प्रदेश)
०९) सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) यांनी दिल्ली येथे माहिती तंत्रज्ञान व संचारण मंत्रालयातर्फे जगातील सर्वात आटोपशीर महासंगणक प्रणालीचे अनावरण केले.त्याचे नाव काय आहे?
== परम शावक
१०) महाराष्ट्र वीज मंडळाने आपल्या तीनही कंपन्यांमधील तमाम वीज कर्मचाऱ्यांना तीन लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे?
== ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी

Friday, December 26, 2014

(GST) जीएसटी म्हणजे काय?

मुंबई: देशात जीएसटी नामक एक नवी करप्रणाली लागू करण्याबाबतचे विधेयक लोकसभेत मंजूरीसाठी मांडण्यात आले आहे. जर प्रस्तावित जीएसटी करप्रणाली देशात लागू केली गेली तर प्रत्येक वस्तू किंवा सेवेसाठी एकच कर भरावा लागणार आहे. याचा अर्थ वॅट, एक्साईज आणि सर्विस टॅक्सच्या जागी एकच टॅक्स द्यावा लागणार आहे. एप्रिल 2016 पासून हा टॅक्स लागू करण्याचा प्रयत्न करकारकडून केला जात आहे.
जीएसटीमुळे देशातील करप्रणालीचं स्वरूप बदलणार-
जीएसटी लागू झाल्यानंतर केंद्र सरकारला एक्साईज ड्यूटी, सर्विस टॅक्स या माध्यामतून मिळाणारा कर बंद होणार आहे. राज्यांना मिळणारा वॅट, मनोरंजन कर, लक्झरी टॅक्स, लॉटरी टॅक्स, एंट्री टॅक्स आदी टॅक्स बंद होणार आहेत. दरम्यान पेट्रोल, डीझेल, रॉकेल, एलपीजी गॅस यासारख्या वस्तूंवर लागणारे कर आणखी काही वर्षे लागू राहणार आहेत.

सामान्य माणसाला जीएसटीचा काय फायदा-
जीएसटी लागू झाल्यानंतर याचा सर्वात जास्त फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे. कारण जीएसटी लागू झाल्यानंतर देशभरात सर्व वस्तूंचे दर समान असणार आहेत. मग ती कोणत्याही राज्यात खरेदी केली तरी. त्यामुळे नागरिकांनी स्वस्त माल खरेदी करण्यासाठी दुसऱ्या शहरात जाण्याची गरज भासणार आहे.
जीएसटीमुळे टॅक्समधूनही दिलासा-
आपण सध्या साहित्य खरेदी करताना 30 ते 35 टक्के रक्कम कराच्या रूपाने देतो. मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर ती रक्कम 20 ते 25 टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे.
उद्योजक आणि व्यावसायिकांना जीएसटीचा फायदा काय?
जीएसटी लागू झाल्यानंतर कंपन्यांची झंझट आणि खर्च बराच आटोक्यात येणार आहे. तसंच व्यापाऱ्यांना आपले साहित्य एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यास फायदा होणार आहे. जीएसटीमुळे वेगवेगळे कर भरावे लागणार नाहीत त्यामुळे वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.
सर्व राज्यांनी जीएसटी कसा मान्य केला-
जीएसटी आल्यावर राज्याला कराद्वारे मिळणारे उत्पन्न घटण्याची भिती सर्वच राज्यांना होती. खासकरून पेट्रोल, डिझेलवर अनेक राज्यांचं अर्ध बजेट अवलंबून आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलमधून मिळणारा कर आगामी काही वर्षे राज्यांना मिळणार आहे. तसंच यामुळं होणारं राज्य सरकारचं नुकसान केंद्र सरकार भरून काढणार आहे. याशिवाय जीएसटीद्वारे मिळणारा कर राज्य आणि केंद्र सरकार ठरलेल्या टक्केवारीनुसार वाटून घेणार आहे.
अर्थव्यवस्थेसाठी जीएसटीचा काय फायदा-
जीएसटी लागू झाल्यानंतर टॅक्स चोरी सारखे प्रकार बंद होतील. त्याचा थेट परिणाम देशाच्या जीडीपीवर होणार ....

Preparation of MPSC: interview preparation(तयारी एमपीएससीची: मुलाखतीची तयारी)

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल अलीकडेच जाहीर झाला. यशस्वी उमेदवारांचे मनापासून अभिनंदन! मुलाखतीतले गुण हे अंतिम यादीत स्थान प्राप्त करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात, हे लक्षात असू द्या.
मुलाखतीच्या संदर्भात उमेदवारांमध्ये अनेक गैरसमज असतात- उदा. उमेदवाराचे दिसणे महत्त्वाचे ठरते, अमूक एका पद्धतीचा पेहराव केलेला असावा, पाठ केल्यासारखी उत्तरे देणे योग्य, उत्तरे सरकारी धोरणांनाच अनुकूल होती अशी द्यावीत.. हे सारे तद्दन गैरसमज आहेत. एक मात्र नक्की की, मुलाखतीची नीट तयारी करणे आवश्यक आहे. तसेच मुलाखतीला जाताना नेटकेपणाने, टापटीपीने जाणे आवश्यक असते.
मुलाखतीला सामोरे जाताना आपण आहोत त्याहून वेगळे आहोत असा न दाखवता, जसे आहोत तसे पॅनलला सामोरे गेलेले उत्तम! त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आतापर्यंत संपादन केलेल्या ज्ञानाच्या आधारावर, खोटेपणाचा आव न आणता, प्रामाणिकपणे उत्तर देणे म्हणजे मुलाखत. मुलाखत म्हणजे ज्ञानाची परीक्षा नव्हे, कारण तुमच्या ज्ञानाची परीक्षा ही मुख्य परीक्षेतच झालेली असते. मुलाखतीत उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी होत असते. आपल्याला एखादी गोष्ट माहीत असण्यापेक्षा आपले ज्ञान इतरांसमोर कसे मांडता याला जास्त महत्त्व असते.
मुलाखत म्हणजे खेळाचा अंतिम सामना! मागच्या काही वर्षांचा आणि विद्यार्थिसंख्येचा अंदाज पाहता साधारणत: ३० ते ४० मिनिटे मुलाखत घेतली जाते. (अर्थात असा काही नियम नाही) यापकी, पॅनलने आपल्याला प्रश्न विचारायचा वेळ वजा केल्यास उमेदवाराच्या वाटय़ाला फक्त २०-२५ मिनिटे येतात. या २०-२५ मिनिटांत उमेदवाराला स्वत:ला सिद्ध
करायचे असते.
प्रत्येकाची मुलाखत वेळेनुसार, प्रसंगानुसार वेगवेगळी असते. मात्र तयारी करताना खालील गोष्टी लक्षात ठेवल्यास उपयोग होईल.
* वैयक्तिक माहिती- आपले नाव, नावाचा अर्थ, ते नाव इतिहासाशी संबंधित असेल तर त्या संदर्भाबद्दल थोडी माहिती, उदा. एखाद्याचे नाव शिवाजी असेल किंवा एखाद्याचे नाव सचिन असेल तर त्याबाबतचे संदर्भ तयार करून ठेवावेत. वडिलांचे नाव, आडनाव, आडनावाचा इतिहास, आईचे नाव, जन्मतारीख, जन्मतारखेचा ऐतिहासिक संदर्भ, आपले गाव, गावाची माहिती, शाळा, महाविद्यालयाची माहिती, त्या शाळेतून एखादे विशेष व्यक्तिमत्त्व घडले असेल तर त्यांची माहिती, आपण शिकत असलेल्या संस्थेची माहिती, वडिलांच्या व्यवसायाची माहिती.
* शैक्षणिक पाश्र्वभूमी- आपण पदवी ज्या विद्याशाखेत घेतली असेल, त्यासंबंधी प्रश्न नक्की विचारले जातात. तयारीत असावे. पदवी परीक्षेत किंवा त्याआधी आपल्याला किती गुण मिळाले आहेत, याचा परिणाम मुलाखतीवर होत नाही, हेही लक्षात घ्या. समजा, शिक्षण घेताना एखाद्या वर्षी गॅप असेल किंवा नापास झालेले असाल तरी त्याचा परिणाम होत नाही. मात्र, उमेदवार त्या प्रश्नांची उत्तरे कशी देतो यावर बरेचसे
अवलंबून असते. कुठे नोकरीला असाल किंवा प्रशासनात काम करत असाल तर त्या विभागाची माहिती नक्की मिळवा.
* वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच शेतकी विद्याशाखेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी- जे विद्यार्थी व्यावसायिक महाविद्यालयांत शिक्षण घेतात, त्यांनी- आपण ते क्षेत्र सोडून प्रशासनात का येऊ इच्छितो, याचे व्यवस्थित उत्तर तयार करावे. उत्तर सकारात्मक असावे. अभियांत्रिकीला सध्या वाव नाही, अनेक विद्यार्थी बेरोजगार आहेत, आयुष्याला स्थिरता मिळावी, यासाठी प्रशासनात येऊ इच्छितो.. असे उत्तर देऊ नये. डॉक्टर्स, तसेच शेतकी विद्याशाखेतील विद्यार्थ्यांवर खर्च केलेला सरकारचा पसा वाया जातो, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, (कोणत्याही शाखेचे शिक्षण वाया जात नाही. घेतलेल्या शिक्षणाचा फायदा नक्कीच प्रशासनात होऊ शकतो. या आशयाचे उत्तर तयार करावे.)
* आपण प्रशासनात का येऊ इच्छिता?
या प्रश्नाचे उत्तर सर्वानीच तयार करून ठेवावे, उत्तर प्रामाणिक असावे. जरी आपल्याला भ्रष्टाचाराची चीड असेल, प्रशासनातील कामांबाबत तुमच्या मनात नाराजी असेल तरी शक्यतो टोकाचे उत्तर देणे टाळावे. देश बदलायचा आहे. प्रशासनात खूप सुधारणा घडवून आणावयाच्या आहेत, महाराष्ट्रातील भ्रष्टाचार संपवून टाकायचा आहे असे म्हणण्याऐवजी प्रशासनात नवीन आव्हाने पेलण्याची संधी मिळते, मानसन्मान मिळतो, स्थिरता मिळते या आशयाचे तुमचे स्वत:चे उत्तर तयार करा.
* आपले गाव, तालुका, प्रशासकीय विभाग यासंदर्भात प्रश्न- आपण ज्या ठिकाणहून आला आहात- उदा. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण इ. या भागांच्या समस्या उदा. पाण्याची समस्या अवकाळी पावसाची समस्या इ. या प्रदेशातील लोकप्रतिनिधी, मंत्री याची माहिती या प्रदेशातील व्यवसाय, पेहराव या प्रदेशाचे किंवा गावाचे, ऐतिहासिक महत्त्व इ. विषयांची तयारी करून ठेवावी.
* सेवा प्राधान्यक्रमाची माहिती- पसंतीक्रमावर असलेल्या कमीत कमी पहिल्या पाच सेवांची माहिती, त्या खात्याची रचना, ती सेवा नेमकी काय आहे? इ. घटकांची तयारी करावी.
* केस स्टडी संदर्भात प्रश्न- बऱ्याच वेळा मुलाखतीदरम्यान, एखादी परिस्थिती देऊन त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदा. िहदू, मुस्लीम दंगल उसळली तर..? एखाद्या प्रदेशात प्रंचड गारपीठ झाली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशा वेळी आपण काय कराल? आपण ज्या ठिकाणी नेमणुकीवर आहात तेथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या रोखण्यासाठी आपण काय प्रयत्न कराल? इ. अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा प्रश्नांची यादी तयार करून सकारात्मक उत्तरे
तयार ठेवावीत.
* छंदांविषयी प्रश्न- तुमचा छंद, तुमची आवड यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रत्येकाला छंद असेलच असे नाही. परंतु, एखादा छंद आपण नमूद केलेला असेल तर त्यासंबंधित तयारी करा. उदा. विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहणे हा छंद नमूद केलेला असतो. अलीकडेच पाहिलेल्या चित्रपटाविषयी त्याला काहीच माहीत नसते, एवढी वरवरची तयारी करून जाऊ नये. चित्रपटातील दिग्दर्शक, अभिनेते, आपण पाहिलेले काही चित्रपट, त्यातील संगीतकार इत्यादी माहिती तयार करावी. काही विद्यार्थ्यांचा छंद वाचणे हा असतो- त्यावेळी आपण अलीकडेच वाचलेली पुस्तके, त्यांचे लेखक, साहित्याचा प्रकार, साहित्य संमेलने इ. विषयी माहिती असणे आवश्यक आहे.
* महिला उमेदवारांसाठी- उमेदवार जर महिला असेल तर काही प्रश्न नक्की विचारले जाण्याची शक्यता आहे. उदा. महिलांच्या समस्या, महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिला अधिकारी म्हणून आपण कसे काम कराल? आपल्या घरापासून दूर बदली झाली तर आपण काम
कराल का? असे काही प्रश्न विचारण्याची शक्यता असते. या प्रश्नांचे तुमचे उत्तर
प्रामाणिक असावे.
* चालू घडामोडींविषयी प्रश्न- मुलाखतीला जाताना आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या राजकीय, सामाजिक घटनांची माहिती आपल्याला असणे अपेक्षित आहे. त्यांची एक यादी तयार करून उत्तरे तयार ठेवा. मुलाखतीच्या दिवशी वृत्तपत्रांतील महत्त्वाच्या बातम्या- किमान ठळक मथळे तरी नक्की वाचा.
मुलाखतीची तयारी कशी कराल?
व्यक्तिमत्त्व काही एका दिवसात घडत नाही. त्यासाठी वर्षांनुवर्षांची तपश्चर्या आवश्यक असते. कोणत्याही प्रश्नासाठी सज्ज राहा. आपली मुलाखत चांगलीच होणार आहे, आपल्याला मिळालेल्या वेळात आपण सर्वोत्तम कामगिरी करणार आहोत, असा सकारात्मक विचार करूनच मुलाखतीला सामोरे जा.
* तीन-चार मित्रांचा ग्रुप तयार करून त्यांना पॅनल समजून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी करा. सध्या मोबाइलमध्येच व्हिडिओचित्रण करण्याची सुविधा आहे. त्याचा वापर करून आपण बोलतो कसे, आपण कुठे चुकलो, याचा विचार करून तयारी करा.
* जर आपण अभिरूप मुलाखती (Mock Interview) देणार असाल तर वरिष्ठांनी किंवा प्रशिक्षकांनी सांगितलेल्या सूचनांचे नक्कीच पालन करा. मात्र त्यांनी सांगितलेली उत्तरेच तुम्ही सांगायला हवीत, असे नाही आणि तशीच उत्तरे सांगून तुम्हाला जास्त गुण मिळतील असेही मुळीच नाही. कारण त्या दिवशी वरिष्ठांनी सांगितलेली उत्तरेच जर इतर विद्यार्थी देत असतील तर आपण कोणीतरी उत्तरे तयार करून दिलेली आहेत व तशीच उत्तरे तुम्ही देत आहात, याचा चुकीचा प्रभाव पॅनलवर पडून कमी गुण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची स्वत:ची उत्तरे स्वत: तयार करा. असे केल्यास आपल्याला जास्त गुण मिळण्याची शक्यता आहे.
मुलाखतीला जाताना..
* वेळेच्या अगोदर पोहोचा.
* मुलाखतकाराने प्रश्नांनी सुरुवात केली तरी त्या प्रश्नाचे उत्तर देऊन झाल्यावर अधुनमधून मुलाखतीचे वातावरण हलकेफुलके राहील याची काळजी घ्या. त्याकरता चेहऱ्यावर स्मित असणे आवश्यक आहे.
* मुलाखत सुरू असताना स्वत:कडे लक्ष असू द्या. नकळत कोणत्याही हालचाली अथवा कृत्य करू नका. जसे पाय हलवणे, पेनाचा सारखा कट कट असा आवाज करीत राहणे, प्रश्न विचारणाऱ्याकडे न पाहता शून्यात बघणे, चेहऱ्यावर प्रसन्न भाव नसणे, खूप आरामशीर बसणे या सगळ्या छोटय़ा छोटय़ा हालचालींचा अनेकदा विपरीत परिणाम होऊ शकतो.
* खूप सहज आणि रिलॅक्स आहोत असे दाखविण्यासाठी जाणूनबुजून विनोदी बोलण्यासारखे कृत्य टाळा.
* प्रश्न काय विचारला आहे ते नीट समजून घ्या. तो समजून घेण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. त्यात गर काहीही नाही. प्रश्न न समजता हवेत उत्तरे देऊ नका.
* मुलाखतीदरम्यान स्वत:शी ठाम असणे फार महत्त्वाचे आहे. कधी तरी मुलाखत ही अचानक एकदम मोकळ्या वातावरणात होऊ लागते तर कधी काहीही कारण नसताना एकदम तणाव उत्पन्न होतो. प्रश्नांचे सूर बदलतात, पण तुम्ही मात्र कायम स्वत:बरोबर राहा. त्यातून तुम्हाला स्वत:चा ठामपणा सिद्ध करता येतो.

Thursday, December 25, 2014

Maharashtra major universities, and the establishment of property(*महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण*)



विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान
मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई
पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर - नागपूर
विद्यापीठ (१९२५)
कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती - अमरावती
विद्यापीठ (१९८३)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - औरंगाबाद
मराठवाडा विद्यापीठ (१९५८)
शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८) - नाशिक
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे (रायगड)
विद्यापीठ (१९८९)
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव
कविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक (नागपूर)
विद्यापीठ (१९९८)
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड
महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) - नागपूर

Major historical forts in Maharashtra ( *महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक किल्ले*)


ठाणे - अर्नाळा, वसईचा भुईकोट किल्ला, गोरखगड
रायगड - कर्नाळा, मुरुड-जंजिरा, लिंगाणा, द्रोणागिरी, तळे
रत्नागिरी - सुवर्णदुर्ग (सागरी), रत्नदुर्ग, विजयगड, पासगड
सिंधुदुर्ग - विजयदुर्ग (सागरी), देवगड, पारगड, रामगड
पुणे - शिवनेरी, पुरंदर, प्रचंडगड, सिंहगड, राजगड
नाशिक - ब्रह्मगिरी, साल्हेर-मुल्हेर, मांगी-तुंगी, अंकाई-
औरंगाबाद - देवगिरी (दौलताबाद)
कोल्हापूर - पन्हाळा, विशालगड, भुदरगड
अहमदनगर - हरिश्वंद्रगड, रतनगड
अकोला - नर्नाळा
सातारा - अजिंक्यतारा, मकरंदगड, प्रतापगड, सज्जनगड,

〓 Geography 〓 ••( राज्य निर्मिती) FORMATION OF INDIAN STATES ••


» अरुणाचल प्रदेश- २०फेब्रुवारी१९८७.

» आंध्र प्रदेश- ०१ऑक्टोबर १९५३.

» आसाम- २६जानेवारी१९५०.

» उत्तर प्रदेश- १५ऑगस्ट१९४७.

» उत्तरांचल- ०९नोव्हेंबर२०००.

» ओरिसा- १५ऑगस्ट१९४७.

» कर्नाटक- १५ऑगस्ट१९४७.

» केरळ- ०१नोव्हेंबर १९५६.

» गुजरात- ०१मे१९६०.

» गोवा- ३०मे१९८७.

» छत्तीसगढ- ०१नोव्हेंबर २०००.

» जम्मू काश्मिर- २६ऑक्टोबर १९४७.

» झारखंड- १५नोव्हेंबर २०००.

» तामिळनाडू- १५ऑगस्ट१९४७.

» त्रिपुरा- २१जानेवारी १९७२.

» नागालॅंड- ०१डिसेंबर१९६३.

» पंजाब- १५ऑगस्ट१९४७.

» पश्चिम बंगाल- १५ऑगस्ट१९४७.

» बिहार- १५ऑगस्ट१९४७.

» मणिपूर- २१जानेवारी १९७२.

» मध्य प्रदेश- ०१ऑगस्ट१९५६.

» महाराष्ट्र- ०१मे१९६०.

» मिजोराम- २०फेब्रुवारी १९८७.

» मेघालय- १५एप्रिल१९७०.

» राजस्थान- ०१नोव्हेंबर १९५६.

» सिक्किम- १६मे१९७५.

» हरियाणा- ०१नोव्हेंबर १९६६.

» हिमाचल प्रदेश- २५जानेवारी१९७१.

〓>> केंद्रशासित प्रदेश <<〓

» अंदमान आणि निकोबार- ०१नोव्हेंबर १९५६.

» चंढीगढ- १९६६

» दादरा नगरहवेली- ११ ऑगस्ट१९६१.

» दिव दमण- ३०मे१९८७.

» पॉंडीचेरी- ०७जानेवारी १९६३.

» लक्षद्विप- ०१नोव्हेंबर १९५६.