Wednesday, January 7, 2015

►स्थानिक स्वराज्य संस्था

स्थानिक स्वराज्य संस्था
व्याख्याः- गोल्डींग – स्थानिक लोकांनी स्वतःच्या प्रश्नांची व्यवस्था करणे म्हणजे स्वराज्य संस्था होय.
जी.डी.एच. कौल – स्थानिक शासनाचे कार्यक्षेत्र लहान असते. वरिष्ठ अधिका-यांनी त्यांना सोपविलेली कार्य ते करतात. ते सार्वभौम नसतात. ते कायदे करीत नसतात. वरिष्ठ संस्थांनी तयार केलेल्या कायद्याची ते अंमलबजावनी करतात.
►स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्वः-
१) लोकशाही तत्व
२) प्रशिक्षण केंद्र
३) समान संधी
४) केंद्रीय प्रशासनाचे काम करणे
५) लोकांचे आर्थिक सहकार्य
►वैशिष्ट्यः-
१) स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती राज्याच्या कायद्यान्वये होत असते.
२) कार्यात पुर्ण स्वायत्तता व स्वातंत्र देण्यात येते.
३) स्थानिक संस्थांचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी प्रश्नांशी निगडीत असले तरी राज्य सरकारच्या धोरणांशी निगडीत असणे आवश्यक आहे.
►स्थानिक स्वराज्य संस्था – उद्गम आणि विकासः-
अगदी वैदिक काळात गाव सभेची सुरुवात झालेली दिसते.
ऋग्वेदातही गावसभेचा उल्लेख आढळतो. यातुनच ग्रामपंचायतीचा उदय झाला. गाव प्रमुखास ग्रामीणि म्हणतात.
मुस्लमान आणि मोगल साम्राज्याच्या काळात गावचे प्रशासन सरकारने नियुक्त केलेल्या कोतवाला मार्फत होते.
क्दक्षिणेकडील चोल राज्यंनी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन दिले.
►१) प्रचिन कालखंडः- प्राचीन ग्रामपंच्यायतीच्या विकास नैसर्गिकरित्या झाला आहे. आर्यकालिन ग्रामपंचायत कारभाराविषयी बरीच माहिती उपलब्ध आहे. कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात स्थानिक शासनाची उतरंड वर्णिली आहे. गुप्त काळात ग्रामसभेच्या उप समित्या निर्माण होण्याचे कार्य सुरु झाले. यातील प्रमुख समिती पुढे पंचायत म्हणून उदयास आली. या काळात ग्रामसभा न्यायदानाचेही काम करीत असत. न्याय पंचायतीच्या उल्लेख मनुस्मृतीमध्ये आढळतो.
►२) मध्ययुगीन कालखंड – तालुक्याच्या काळातील ग्रामसभा आणि चोलांच्या काळातील सभा यांना ग्राम प्रशासनासंबंधी व्यापक अधिकार व जबाबदारी दिलेली दिसून येते. १४ व्या शतकातील मुसलमान राजे, मुघल इत्यांदिंच्या कालावधित ग्राम प्रमुखास मुकादम, मुखिया, हिशोबनिसास- पटवारी, महसूल गोळा करणारा अधिकारी मतसारक, जमिन रेकॉर्ड ठेवणारा – कानुनगो म्हणत.
►३) ब्रिटीश कालखंड – ब्रिटीश निर्मित न्याय व्यवस्था, दळणवळण सोयी, शहरीकरण यांमुळे पंचायतीच्या अंत होऊ लागला. या कालखंडात पुर्वीच्या खेड्यांऐवजी जिल्हा हा स्थानिक प्रशासनाचा घटक क्रण्यात आला. लॉर्ड मेयो यांनी सरकारी कामकाजास लागणारा पैसा स्थानिक कराच्या रुपाने उभा करण्याकरिता शासनाचे आर्थिक विकेंद्रीकरण करण्याचा उपाय सुचविला. त्या नुसार केंद्र सरकारची काही खाती प्रांतिक सरकारकडे सोपविण्यात आली. उदा. शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, साफ सफाई इ. यांमुळे संस्थांच्या वाढीला मदत मिळाली. आणि १८७१ मध्ये अनेक प्रांतात स्थानिक स्वराज्यासंबंधी कायदे करण्यात आले. उदा – पंजाब, विहार, ओरिसा, आसाम, त्रावणाकोर, कोचीन येथे १९२० व बंगाल येथे १९१९ ग्रामपंचायत अधिनियम मंजुर करण्यात आला.
►भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था – मद्रास महानगरपालिका (१९६८)
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला – १९३९
•लॉर्ड रिपनने १२ मे १८८२ रोजी आपला ठराव प्रसिध्द केला. स्थानिक शासन संस्थान म्हणजे स्थानिक जनतेला राजकीय शिक्षण देण्याचे काम एक प्रभावी साधन आहे. या दृष्टीने त्याची प्रगती होणे आवश्य्क आहे असे ठरावात मंजुर करण्यात आले होते. म्हणून लॉर्ड रिपनला भारतील स्थनिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हणतात. प्रंतु त्यांच्या या ठरावाला पाहिजे तेवढे यश लाभले नाही. कारण नोकरशाही आणि रिपन नंतर जे व्हॉईसरॉय भारतात आले ते उदारमतवादी नव्हते. म्हणून या ठरावाच्या अपेक्षा पुर्ण होऊ शकल्या नाही.
•लॉर्ड रिपननंतर ग्रामीन स्थानिक शासनाला नवीन दिशा देण्याचा जो प्रयत्न केला गेला तो १९०७ च्या विकेंद्रीकरण आयोगाशाहिच्या शिफारशिने १९०७ साली स्थानिक शासनसंबंधी शिफारशि करण्यासाठी हॉब हाउस यांच्या अध्यक्षतेखाली शाही आयोग ची स्थापना करण्यात आली. शाही आयोगाने आपला अहवाल १९०९ मध्ये सादर केला.
१९१९ च्या कायद्याने पंचायत राज हा विषय प्रांताकडे सोपविण्यात आला. १९१९ च्या कायदा अमलात आल्या नंतर त्यातील निर्देशांच्या आधारे विविध प्रांतांनी स्थानिक प्रशासना संबंधि कायदे केले.
मुंबई प्रांतात मुंबई ग्रामपंचायत कायदा १९२० मध्ये संमत झाला. जवळपास १९२६ पर्यंत सर्व प्रांतात १९१९ च्या कायद्यानुसार ग्रामपंचायतसंबंधी कायदे करण्यात आले. १९२६ ते १९३७ या ११ वर्षांचा आढावा घेतला तर ब्रिटीश भारतातील ग्रामपंचायतींची संख्या जवळजवळ दुप्पट झाल्याचे दिसते.
►सामुहिक विकासः-
सामुहिक विकास ही अशी प्रक्रीया आहे की, ज्यामध्ये ग्रामीण लोकांची पारंपारिक जीवन पध्दती बदलून त्यांना आधुनिक जिवन पध्दती स्विकारण्यास मदत करण्यात येते. त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे उपलब्ध पैशात विकास करण्यासाठी मदत करण्यात येते. स्वातंत्र्यपुर्व विकासाचे प्रकल्प व त्यांचे प्रवर्तकः-
१) श्रीनिकेतन प्रकल्प – डॉ. रविंद्रनाथ टागोर. (१९२१)
२) गुरगाव प्रकल्प - श्री. बायने (१९२७)
३) माथ-यांड प्रकल्प (मद्रास प्रांत) - डॉ. स्पेन्सर हॅच (१९२८)
४) बडोदा योजना - श्री.व्ही.टी.कृष्णाम्माचारी
(१९३३) बडोदा संस्थानाचे दिवाण
५) सेवाग्राम प्रकल्प - महात्मा गांधी (१९३६)
६) भारतीय ग्रामसेवा - श्री. विल्यम वायजर (१९४५)
स्वातंत्रोत्तर काळातः-
७) इटावा पायलट प्रकल्प - श्री. अल्बर्ट मेयर (१९४८)
८) निलोखेरी प्रकल्प - श्री. सुशिलकुमार डे (१९४८)
९) सर्वोदय योजना - मुंबई सरकार (१९४८)
१०) भूतान व ग्रामदान चळ्वळ - विनोबा भावे (१९५१)
११) घटनेतील कलम ४० हे ग्रामपंचायतीशी संबधीत आहे.

मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 ( Human Rights Protection Act 1993)

  1. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार राज्य मानवी हक्क आयोगाच्या सदस्याची नेमणूक कोण करतो ? A. राष्ट्राध्यक्ष B. राज्यपाल C. पंतप्रधान D. उच्च न्यायालय ANSWER-B. राज्यपाल

  2. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार मानवी हक्क कोणते आहेत ? A. जीवन व स्वातंत्र्याचे हक्क B. जीवन व समता याविषयीचे हक्क C. समता व प्रतिष्ठा याविषयीचे हक्क D. वरील सर्व ANSWER-D. वरील सर्व

  3. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या सभापती पदाचा कालावधी किती आहे ? A.10 वर्षे B. 7 वर्षे C. 5 वर्षे D. 8 वर्षे ANSWER-C. 5 वर्षे

  4. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार विशेष सरकारी वकील होण्यासाठी काय अट आहे ? A. 5 वर्ष वकीलीचा अनुभव B. 3 वर्ष वकीलीचा अनुभव C. 6 वर्ष वकीलीचा अनुभव D. 7 वर्ष वकीलीचा अनुभव ANSWER-D. 7 वर्ष वकीलीचा अनुभव

महाराष्ट्रातील प्रमुख जलाशय व धरणे


कोयना शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
जायकवाडी - बाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
गंगापूर - (गोदावरी) नाशिक
राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
उजनी - (भीमा) सोलापूर
तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
यशवंत धरण - (बोर) वर्धा
खडकवासला - (मुठा) पुणे
येलदरी - (पूर्णा) परभणी

Tuesday, January 6, 2015

आझाद हिंद सेना : (Azad Hind Army)

झाद हिंद सेना जरी युद्धासाठी सज्‍ज झाली, तरी जपानी अधिकारी तिला आपल्या बरोबरीची समजण्यास तयार नव्हते. त्यांचे मत असे होते की, तिच्यातील बहुतेक सैनिक ब्रिटिशांच्या नोकरीतील भाडोत्री सैनिक असल्याने ते जपान्यांप्रमाणे जिद्दीने लढणे शक्य नाही. म्हणून त्यांची स्वतंत्रच पथके ठेवावीत. परंतु हे मत नेताजींना अमान्य होते. त्यांना आपल्या सैन्याबद्दल आत्मविश्वास होता. त्यांनी आपले सैन्य जपान्यांबरोबर मुद्दाम धाडले. आझाद हिंद सेनेचा पराक्रम पाहून जपान्यांचेही पुढे मत बदलले. १९४४ च्या मार्च महिन्यात जपान्यांनी हिंदुस्थानच्या ईशान्य सीमेवर चढविलेल्या हल्ल्यात भाग घेण्यासाठी ह्या सेनेतील काही पथके धाडण्यात आली. सीमेवरील इंफाळ येथे झालेल्या लढाईत ह्या सैन्यातील काही पथकांनी चांगली कामगिरी बजाविली. १९४४ च्या मे महिन्यात शाहनवाजखान ह्यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने भारतीय हद्दीत प्रवेश करून मोडोक हे ठाणे जिंकले. ब्रिटिशांच्या मोठ्या फौजेला व विमानमाऱ्याला न जुमानता ते जवळजवळ महिनाभर लढले. ह्या वेळी कॅप्टन सूरजमल ह्यांच्या हाताखाली एक जपानी पलटणही देण्यात आली होती. मोडोकप्रमाणे इतर लढायांतही ह्या सेनेने चांगले पराक्रम केले. एक मोक्याचे ठिकाण जिंकण्याची आज्ञा होताच, लेफ्टनंट मनसुखलाल व मूठभर सैनिकांनी जिवाची पर्वा न करता ती टेकडी जिंकली व आपण जपानी सैनिकांपेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नाही हे सिद्ध केले. ह्या युद्धात मनसुखलाल ह्यांना अनेक जबर जखमा झाल्या, तरी त्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केलेच. आझाद हिंद सेनेच्या इतर पथकांनीही अशीच उत्तम कामगिरी बजावली. परंतु अखेर शत्रूचे प्रचंड संख्याबळ, विमानदल आणि शस्त्रसामग्री, तसेच जपानी सैनिकांनी घेतलेली युद्धक्षेत्रातील माघार ह्यांमुळे सुभाष पथकास नाइलाजाने माघार घ्यावी लागली. शिवाय अपुरा शस्त्र-व अन्न-पुरवठा, रसद मिळण्यातील अडचणी, जपान्यांचे लहरी सहकार्य इत्यादींमुळेही लढाई थांबविणे ह्याशिवाय त्यास दुसरा पर्याय नव्हता. ही पीछेहाट चालू असतानाच ब्रिटिशांनी विमानांतून पत्रके टाकली व ब्रिटिश सैन्यात परत या, अशी लालूच दाखविली. पण एकाही सैनिकाने त्यास भीक घातली नाही किंवा आझाद हिंद सेनेशी बेइमानी केली नाही, ही विशेष उल्लेखनीय गोष्ट होय. भारत-सीमा पार करून पुढे ब्रह्मदेशात आगेकूच करणाऱ्या ब्रिटिश व भारतीय सैन्याला आझाद हिंद सेनेची पथके शरण आली. २ मे १९४५ रोजी रंगून पडल्यावर थोड्याच दिवसांत पुढे जपानने शरणागती पतकरली. नेताजी त्या वेळी सिंगापूरहून विमानाने टोकिओला जात असता अपघात होऊन मृत्यू पावले असावेत, असे म्हणतात. आझाद हिंद सेनेच्या पुष्कळ अधिकाऱ्यांना व सैनिकांना कैद करण्यात येऊन भारत सरकारविरुद्ध बंड केल्याचा आरोप त्यांच्यावर लादण्यात आला. शाहनवाजखान, सैगल आदी अधिकाऱ्यांवर कोर्टापुढे खटले भरण्यात आले. तथापि भारतीयांच्या यासंबंधीच्या प्रक्षुब्ध लोकमताच्या जाणिवेने ब्रिटीश सरकारने या आधिकाऱ्यांच्या शिक्षा माफ केल्या (३ जानेवारी १९४६).

झाद हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून सुभाषचंद्रांना भारतीय जनता प्रेमाने, मानाने व आदराने ‘नेताजी ְ म्हणू लागली; त्यांनी दिलेली ‘जय हिंदही घोषणा आजही सर्वतोमुखी झाली आहे. प्रत्यक्ष युद्धात जरी ही सेना पराजित झाली असली, तरी तिचे उद्दिष्ट, तीमागील प्रेरणा आणि जिद्द व थोड्या अवधीत तिने केलेली कामगिरी, यांबद्दल भारतीय नागरिकांच्या मनात आदराचे स्थान आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात आझाद हिंद सेनेच्या अल्पकालीन पण स्फूर्तिदायक इतिहासास काही आगळे व महत्त्वाचे स्थान आहे.  (चित्रपत्र) 

पहा : बोस, सुभाषचंद्र; भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास. 

संदर्भ : 1.Majumdar,R.C. History of freedom Movement in India-Vol. III,Calcutta, 1963.             
            2.Majumdar, R.C. Ed. Struggle for freedom-Vol.xI, Bombay,1969. 

source: marathi vishvkosh


देवगिरीकर,त्र्यं. र.; पाटणकर, गो. वि; नरवणे, द. ना.

गांधी-आयर्विन करार ( Gandhi-Irwin Pact)

गांधी-आयर्विन करार हा महात्मा गांधी व ब्रिटीशांचे भारतातील व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यात मार्च ५, इ.स. १९३१ ला झालेला एक करार होता.[१]

करारातील प्रमुख कलमे

  • राजकीय कैद्यांची सुटका व्हावी. त्यांच्यावरील दावे काढून टाकावेत. वटहुकूम परत घ्यावेत.
  • मिठावरील कर काही प्रमाणात रद्द व्हावा. गरिबांना मीठ तयार करण्यास परवानगी मिळावी.
  • परदेशी दारू व माल विकणार्या दुकांनांवर शांततामय निदर्शने करण्याचा हक्क असावा.
  • कायदेभंग चळवळीत सरकारने ज्यांची मालमत्ता जप्त केली आहे, ती त्यांना परत करावी.
  • कायदेभंग चळवळ स्थगित व्हावी.
  • राष्ट्रसभेने गोलमेज परिषदेत सहभाग घ्यावा.
  • बहिष्कार चळवळ मागे घ्यावी.

परिणाम

पंडित जवाहरलाल नेहरूसुभाषचंद्र बोस यांना करारातील कलमे आवडली नाहीत. त्यांच्या मते गांधीजींनी सरकारला फार सवलती दिल्या.[२]

संदर्भ आणि नोंदी

  1. डॉ. जी.आर. पाटील (१८ मार्च, इ.स. २०१३). स्पर्धापरीक्षेच्या रिंगणात : एमपीएससी : पेपर- १ आधुनिक भारताचा इतिहास. लोकसत्ता. २२ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)
  2. हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. १३ डिसेंबर २०११ रोजी पाहिले. “द स्ट्रगल फॉर फ्रिडम” (इंग्रजी मजकूर)
  3. source: wikipedia

महाराष्ट्र राज्य माहिती - (Maharashtra State Information)

महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.
विषयमाहिती
स्थापनदिन१ मे १९६०
राजधानीमुंबई
उपराजधानीनागपूर
अक्षांश१५*.८’ उत्तर २२*.१’ उत्तर
रेखांश७२* .६’ पूर्व ते ८०*.९’ पूर्व
चतुःसीमापूर्व - छत्तीसगड, पश्चिम - अरबी समुद्र, दक्षिण - गोवा, कर्नाटक, आध्रं प्रदेश, उत्तर - दादरा व नगरहवेली, गुजरात, मध्य प्रदेश.
क्षेत्रफळ३,०७, ७१३ चौ. किमी.
एकूण वनक्षेत्र६४०७८ चौ. किमी.
वन्यजीव सुरक्षित क्षेत्र१५,३२,१५ चौ किमी
पूर्व-पश्चिम लांबी८०० किमी
दक्षिणोत्तर लांबी८०० किमी.
समुद्र किनारा७२० किमी
हवामानउन्हाळा ३९* ते४२*, हिवाळा ३४* ते १२*, पावसाळा जून ते सप्टेंबर
पर्वत रांगासातपुडा,सह्याद्री – (उपरांगा : सातमाळा, अजिंठा डोंगर, हरिश्चंद्र डोंगर, बालाघाट, व महादेव डोंगर.)
सर्वात उंच शिखरकळसूबाई - १,६३६ मीटर
महत्त्वाचे घाटकोकणात जाण्यासाठी सह्याद्रीवरील घाट : थळ, माळशेज, बोर, वरंधा, कुंभार्ली, आंबा, फोंडा व आंबोली घाट, पुणे - सातारा : कात्रज, खंबाटकी, पुणे – सासवड : दिवा घाट, औरंगाबाद - चाळीसगाव : औट्रम घाट
प्रमुख नद्यानर्मदा,तापी : (उपनद्या- पांझरा,गिरणा, मोर्णा, पूर्णा, काटेपूर्ण), वैणगंगा: ( पंच, कन्हान, वर्धा, पैणगंगा.), गोदावरी:( कादवा, प्रवरा, शिवना, सिंदफणा, मांजरा, पूर्णा, मन्याड, दुधना, प्राणहिता, इंद्रावती), भीमा: (कुकडी, घोड, भामा, नीरा, माण, सीना.), कृष्णा: (कोयना, वेण्णा, गायत्री, येरळा, वारणा, पंचगंगा, मलप्रभा व घटप्रभा.), कोकणातील नद्या: वैतरणा, तानसा, काळू, उल्हास, आंब, सावित्रई, वाशिष्ठी, शुक, गड, शास्त्री व तेरेखोल.
महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळानुसार ३ रा व लोकसंखेनुसार २ रा क्रमांक लागतो.

Monday, January 5, 2015

ब्राह्मणेतर चळवळ :

ब्राह्मणवर्गाच्या धार्मिक वर्चस्वाविरुद्ध ब्राह्मणेतरांनी केलेली चळवळ. ब्राह्मणेतर चळवळीची सुरुवात महाराष्ट्रापासून झाली. शिक्षणामुळे नवी दृष्टी प्राप्त झालेले जोतीरावर गोविंदराव फुले हे ब्राह्मणवर्चस्वाच्या विरोधी बंड करणारे पहिले नेते होत. त्यांच्या आधी लोकहितवादींनी ब्राह्मणांवर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली होती. जोतीराव बहुजनसमाजातून पुढे आलेले होते. मानवाच्या मूलभूत स्वातंत्र्यावर त्यांची श्रद्धा होती. या श्रद्धेतूनच त्यांनी आपली सत्यशोधक चळवळ सुरू केली. १८७३ साली स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजाला सुरुवातीला चांगले अनुयायी मिळाले. विश्राम रामजी घोले, कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, मारुतराव नवले, रामचंद्र हरी शिंदे, रामशेट उधवणे, संतूजी लाड या सत्यशोधकांनी चळवळीचे क्षेत्र व्यापक बनविण्याचा प्रयत्न केला. भालेकर यांचे दीनबंधु साप्ताहिक चळवळीचे मुखपत्र होते. जोतीराव फुले (१८२७ - ९०) यांचे गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब; नारायण मेघाजी लोखंडे यांची सत्यशोधकी निबंधमाला; मुकुंदराव पाटील यांचे कुलकर्णी लीलामृत ही पुस्तके ब्राह्मणेतर चळवळीच्या इतिहासात बरीच गाजली. ब्राह्मणेतर चळवळीच्या नेत्यांनी बहुजन समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक प्रश्नांचा विचार केलेला असला, तरी ही चळवळ प्रामुख्याने भिक्षुकीशाहीविरुद्धचे बंड होती. परमेश्वराकडे जाताना मध्यस्थाची आवश्यकता नाही, म्हणून जोतीरावांनी पुरोहितांचे महत्त्व नाकारले. धार्मिक विधीदेखील पुरोहितांच्या मार्फत करू नका, असे फुल्यांनी आवाहन केले होते. बहुजनसमाजाला समजावे या हेतूने सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकांसह सर्व पूजाविधी (१८८७) ही पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केली. शूद्रातिशूद्रांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्या. ब्राह्मणेतरांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, ही त्यांची आंतरिक इच्छा होती.

जोतीरावांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचा प्रभाव कमी झाला. देशाचे वातावरण हळूहळू बदलत होते. तुरळक प्रमाणात कोठे सत्यशोधकी जलसे होत असले, तरी एकोणिसाव्या शतकात निर्माण झालेले पुरोहितशाहीविरुद्धचे वातावरण बरेचसे निवळत गेले.

हात्मा फुले यांच्या कार्याने प्रभावित होऊन कोल्हापूरच्या छ. शाहू महाराजांनी धार्मिक आणि सामाजिक अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाचे महत्व ओळखून त्याचा प्रसार करण्याचे धोरण अवलंबले. १९०० मध्ये वेदोक्त प्रकरण निर्माण झाले. राजोपाध्ये  यांनी छत्रपतींच्या घराण्याला वेदोक्ताचा अधिकार नाकारला. महाराजांना शूद्र ठरवले. साहजिकच यातून कटू प्रसंग निर्माण झाले. ज्या शिवछत्रपतींमुळे हिंदू धर्म तरला त्यांच्याच वंशजास शूद्र ठरवल्यामुळे ब्राह्मणेत्तर समाजात असंतोष निर्माण झाला. महाराजांनीही वेदोक्ताचा हक्क नाकारणाऱ्यांची संस्थानावरील इनामे जप्त केली. लोकमान्य टिळकांसारख्या मान्यवर नेत्याने या प्रकरणातील तीव्रता कमी केली.

हाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीची सूत्रे अप्रत्यक्ष रीत्या शाहू महाराजांच्या हाती गेली. त्यांनी या चळवळीला विधायक स्वरूप दिले. केवळ ब्राह्मणविरोध हा दृष्टिकोन न ठेवता त्यांनी आपल्या संस्थानात शैक्षणिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक सुधारणा घडवून आणल्या. अस्पृश्यतेविरुद्ध मोहीम उघडली. परिषदा आणि भाषणे यांद्वारे चळवळीचे लोण संस्थानाबाहेर नेले. मद्रासच्या जस्टिस पार्टीच्या नेत्यांबरोबर संबंध प्रस्थापित केले. याच काळात भास्करराव जाधव, आण्णासाहेब लठ्ठे यांसारख्या विचारवंतांनी मोलाची भर घातली. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर (१९२२) चळवळीला दिशा उरली नाही. मात्र या काळातही माधवराव बागलांसारखे एखादे व्यक्तिमत्व फुल्यांचा जुना वारसा सांभाळीत होते. कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख महत्त्वाचा आहे.

राष्ट्रीय चळवळीत लोकमान्य टिळकांच्या नंतर महात्मा गांधींचा उदय झाला. त्यांच्या सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या धोरणाचा आदर साहजिकच महाराष्ट्रातील बहुजनसमाजाने केला. ब्राह्मणतेर चळवळीचे त्यावेळचे नेते केशवराव जेधे, शंकरराव मोरे हे १९३० नंतर राजकीय चळवळीत पडले. त्यामुळे ब्राह्मणतेर चळवळीचा प्रभाव महाराष्ट्रातून कमी झाला.

मिळनाडूतील सामाजिक स्थिती महाराष्ट्रापेक्षा खूपच निराळी होती. स्पृश्यास्पृश्यतेच्या कल्पना सर्वच जातिजमातींत दिसून येतात. श्रेणीरचनेतील स्थानानुसार इतर जातींच्या लोकांनी अंतर ठेवून व्यवहार करावे, असे नियम होते. महाराष्ट्रात मराठा समाजासारखा आर्थिक, सामाजिक दृष्टीने बराचसा तुल्यबळ असलेला समाज ब्राह्मणविरोधी संघर्ष करण्यासाठी अस्तित्वात होता. केरळमध्ये ब्राह्मणांना तुल्यबळ नायर समाज होता. तमिळनाडूत ब्राह्मणेतरांमध्ये संख्येने, आर्थिक, सामाजिक दृष्टीने तुल्यबळ असा कोणताच समाज नव्हता. ब्राह्मणेतर हे सर्व छोट्या छोट्या जातिसमूहांत विभागले गेले होते. शिवाय तेव्हाच्या त्रावणकोर आणि कोचीन संस्थानाचे अधिपतीही तमिळी नव्हते, ते मलयाळी नायर होते. तमिळनाडूत धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक क्षेत्रांतील त्यांच्या परंपरागत स्थानांमुळे त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते. ते जोपासण्याचाच त्यांचा प्रयत्न होता. त्यातूनच बहुजनसमाजाच्या मनात ब्राह्मणांविषयी तिरस्कार निर्माण झाला.

मिळनाडूतील ब्राह्मणेतर चळवळीत तीन अवस्था दिसून येतात : (१) जस्टिस पार्टीची स्थापना (१९१७), (२) स्वाभिमान संवर्धन चळवळ आणि (३) द्रविड कळघम् ची स्थापना.

वास्तविक जस्टिस पार्टी स्थापन केली, ती केरळमधील नायर समाजातील एका व्यक्तीने. जस्टिस पार्टीच्या स्थापनेत पानगल संस्थानच्या राजाचाही फार मोठा हात आहे. ब्राह्मणेतरांच्या शैक्षणिक विकासासाठी जस्टिस पार्टीने बरेच काम केले. राजकीय दृष्टीने त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. फुले-आंबेडकरांच्या चळवळीत समाजातील खालच्या थरातील लोकदेखील सामील झाले होते, तसे जस्टिस पार्टीचे नव्हते. जस्टिस पार्टीत उच्चमध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांचाच भरणा अधिक होता. जस्टिस पार्टीने ब्रिटिशांना अनुकूल अशी भूमिका १९२० सालापर्यंत उघडपणे स्वीकारली नव्हती. त्याच सुमारास ब्राह्मणेतर चळवळीबद्दल सहानुभूती बाळगणारे मुंबई इलाख्याचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांची बदली मद्रास इलाख्यला झाली. राष्ट्रीय चळवळीला आणि काँग्रेसला त्यांनी विरोध केला,कारण काँग्रेसमध्ये ब्राह्मण अधिक होते.

रामस्वामी नायकर (१८७९-१९७३) यांनी १९२५ च्या सुरुवातीला स्वाभिमान संवर्धन चळवळीला प्रारंभ केला. ही चळवळ नायकरांनी गतिशील बनवली. या चळवळीने ब्राह्मणी श्रद्धा व आचार यांच्यावर हल्ले सुरू केले. ब्राह्मणांनी द्रविड संस्कृती नष्ट केली. त्या संस्कृतीच्या उज्ज्वल कालखंडाच्या आठवणी निघू लागल्या. विवाहविधी आणि इतर धार्मिक विधींसाठी ब्राह्मणाला बोलावले जाऊ नये, असा प्रचार केला गेला. केरळमधील वायकोम सत्याग्रहात नायकरांनी भाग घेतला होता (१९२४).

मिळनाडूतील ब्राह्मणेतर चळवळीला पुढे राष्ट्रविरोधी वळण लागले. स्वातंत्र्यसोहळ्यावर बहिष्कार टाकणे, राष्ट्रध्वजाचा अवमान करणे, राज्यघटनेच्या प्रती जाळणे असे प्रकार सुरू झाले.
यातूनच पुढे द्रविड कळघम् ची स्थापना झाली. अण्णादुरै, करुणानिधी, एम्. जी. रामचंद्रन् ही नेतेमंडळी या चळवळीतूनच पुढे आली. नाटके आणि चित्रपट या माध्यामांच्या द्वारे ब्राह्मणेतर चळवळ खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचली. निरीश्वरवाद, जातिनिर्मूलन, पारंपारिक आचारांना, रूढींना विरोध या गोष्टींवर तमिळनाडूतील ब्राह्मणेतर चळवळीचा रोख होता परंतु ही चळवळदेखील परंपरेविरुद्धचे बंड अशीच होती.

हाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीपेक्षा तमिळनाडूची चळवळ अधिक उग्र होती. राजर्षी शाहूंच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीची जी अवस्था होती, ती तमिळनाडूतील चळवळीत नेहमीच राहिलेली दिसते; परंतु असे असले तरी ब्राह्मणेतर चळवळीमुळे बहुजनसमाजात शिक्षणाचा प्रसार झाला, राजकीय-सामाजिक जागृती निर्माण झाली, सामाजिक सुधारणांच्या चळवळीला गती मिळाली हे मान्य करावेच लागेल. बहुजनसमाजात स्व ची जाणीव निर्माण झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संसदीय लोकशाहीच्या प्रभावाखाली राजकीय सत्ता बहुजनसमाजाच्या, विशेषतः महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या हाती आली. त्याचप्रमाणे तमिळनाडू, केरळ तसेच आंध्रप्रदेश, कर्नाटक याही राज्यांतून राजकीय सत्ता बहुजनसमाजातील लोकांच्या हाती आली.


हा : धर्मसुधारणा आंदोलन; भारतीय प्रबोधनकाल.


संदर्भ : 1. Kavlokar, K. K. Non Brahmin Movement in Southern India 1873 - 1949, Kolhapur, 1979.
           2. Pillai, S. Devdas, Ed. Aspects of Changing India, Bombay, 1976.

           ३. कीर, धनंजय, संपा. समग्र फुले वाङ्मय, मुंबई, १९७३.
           ४. जोशी, लक्ष्मणशास्त्री, ज्योति निबंध, वाई, १९४७.
           ५. बेडेकर, दि. के.; भणगे, भा. शं. संपा. भारतीय प्रबोधन, पुणे, १९७३.
           ६. सरदार, गं. बा. महात्मा फुले, मुंबई, १९८१.
Source: Marathi Vishvkosh