Monday, January 5, 2015

राज्यसेवा परीक्षांचे स्वरूप

नव्या वर्षांला सामोरे जाण्यासाठी नव्या उमेदीने, नव्या ऊर्जेने आपण उभे राहतो. स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी जानेवारी महिना  महत्त्वाचा असतो, कारण या व यानंतरच्या काही काळात नवीन परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध होते. गेल्या काही वर्षांपासून करिअरचा एक पर्याय म्हणून स्पर्धापरीक्षेकडे विद्यार्थी वळत आहेत. खरेतर महाविद्यालयात असल्यापासूनच या परीक्षेची तयारी सुरू करणे आवश्यक आहे. आज आपण या परीक्षेचे स्वरूप समजून
घेणार आहोत.
 एमपीएससी म्हणजे काय?
एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सíव्हस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गरप्रकार होऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे खालील सेवांकरता स्पर्धा परीक्षा घेतली जाते-
- राज्यसेवा परीक्षा
- महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
- दिवाणी  न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
- साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
- पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
- विक्रीकर निरीक्षक परीक्षा
- साहाय्यक परीक्षा
- लिपिक-टंकलेखक परीक्षा
राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सेवेतील, राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील खालील विविध पदांसाठी एकच परीक्षा घेतली जाते. राज्यसेवा (पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या संपूर्ण प्रक्रियेमधून) पुढील पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते-
- उपजिल्हाधिकारी (गट अ)
- पोलीस उपअधीक्षक/साहाय्यक पोलीस आयुक्त (गट अ)
- साहाय्यक विक्रीकर आयुक्त (गट अ)
- उपनिबंधक, सहकारी संस्था (गट अ)
- उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (गट अ)
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट अ)
- मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट अ
- अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (गट अ)
- तहसीलदार (गट अ)
- साहाय्यक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, (गट ब)
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट ब)
- कक्ष अधिकारी (गट ब)
- गटविकास अधिकारी (गट ब)
- मुख्याधिकारी, नगरपालिका/नगर परिषद,  (गट ब)
- साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (गट ब)
- उपअधीक्षक, भूमी अभिलेख (गट ब)
- साहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, (गट ब)
- नायब तहसीलदार (गट ब)
 महसूल सेवा
* उपजिल्हाधिकारी
हे राज्य सेवेतील सर्वोच्च पद आहे. बढती आणि सरळ सेवा प्रवेशाने या पदावर नेमणूक होते आणि १० ते १५ वर्षांच्या सेवेनंतर भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये बढतीद्वारे प्रवेश
मिळू शकतो.
नेमणुका - उपविभागीय अधिकारी, विविध खात्यांचे उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी. कामाचे स्वरूप
पुढीलप्रमाणे आहे-
- उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना उपविभागातील शांतता व सुव्यवस्था पाहणे, महसूल वसुली, निर्वाचन अधिकारी म्हणून कार्य इत्यादी.
- विविध खात्यांचा उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्या त्या खात्याशी संबंधित कार्यवाही पूर्ण करणे व माहिती
अद्ययावत ठेवणे.
- निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना वरिष्ठ व कनिष्ठ कार्यालयात समन्वय साधणे व जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत जिल्हा प्रशासनात सुसूत्रता ठेवणे.
* तहसीलदार
या पदावर निवड राज्यसेवा परीक्षा (एमपीएससी)द्वारे केली जाते. राज्य सरकार प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार नेमते. तहसीलदारांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे -
- तालुक्यातील महसूल वसुली, प्रशासन याबाबतची सर्व कामे तहसीलदार पार पाडतात. महसूल वसुलीबाबत अर्धन्यायिक अधिकार तहसीलदाराला दिलेले आहेत.
- तालुका दंडाधिकारी या नात्याने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीचे न्यायिक अधिकार तहसीलदाराला आहेत.
- आपत्ती व्यवस्थापन, नुकसानभरपाई, शासकीय योजनांची अंमलबजावणी, भूमी अभिलेखाबाबतचे निर्णय इ. जबाबदाऱ्याही तहसीलदार पार पाडत असतात.
* नायब तहसीलदार
महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक किंवा जास्त नायब तहसीलदारांची नेमणूक करू शकते. तहसीलदारास करावी लागणारी कामेच नायब तहसीलदारांना पार पाडावी लागतात. कामांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-
- तहसीलदार पातळीवर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी नायब तहसीलदार करतात.
- महसूल अधिकारी म्हणून महसूल वसुली, बिगरशेती परवाने देणे इ.बरोबर जातीचे, रहिवासाचे दाखले देणे ही काय्रे नायब तहसीलदाराला पार पाडावी लागतात.
- शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दंडाधिकारी म्हणून काही न्यायिक अधिकार नायब तहसीलदाराला देण्यात आले आहेत.
- महसुली कामकाजांतर्गत अर्धन्यायिक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार काम पाहतात.
ल्ल महाराष्ट्र पोलीस सेवा
राज्यसेवेतील निवडीचे सर्वोच्च पद पोलीस उपअधीक्षक किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी आहे. उपअधीक्षकांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-
- गंभीर स्वरूपाच्या अपराधांचा तपास करणे.
- अधीनस्थ पोलीस कर्मचाऱ्यांवर नियंत्रण व त्यांच्या तालमी इ.ची जबाबदारी डीवायएसपीवर असते. यासाठी ते वर्षांतून एकदा सर्व पोलीस ठाणी व चौक्यांची तपासणी करतात.
- शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच काही बाबतीत परवाने देण्याचे अधिकार डीवायएसपीला असतात.
* महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा
शासनाचे विविध विभाग, महामंडळे येथील लेखाविषयक व वित्तीय जबाबदारीचे काम करण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी उपलब्ध करून देता यावेत या उद्देशाने केंद्र सरकारच्या धर्तीवर १९६५ मध्ये महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेची स्थापना करण्यात आली. १९६२ साली स्थापन करण्यात आलेल्या लेखा व कोषागार संचालनालयाचे संचालक लेखा विभागाचे प्रमुख असतात. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची या पदावर नेमणूक करण्यात येते.
राज्यसेवा परीक्षेतून वित्त व लेखा सेवा गट अ व ब या पदांसाठी निवड होते व या उमेदवारांची नेमणूक अनुक्रमे कोषागार अधिकारी/ साहाय्यक संचालक व अतिरिक्त कोषागार अधिकारी/ उपमुख्य लेखाधिकारी या पदांवर करण्यात येते. वित्त व लेखा सेवा अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-
- या सेवेतील अधिकाऱ्यांना शासनाच्या विविध विभागांमध्ये लेखाविषयक व लेखा परीक्षणविषयक बाबी सांभाळण्यासाठी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येते.
- शासकीय रकमांचे वित्तीय विनियोजन करणे व याबाबत गरप्रकार होऊ न देणे ही या सेवेतील अधिकाऱ्यांची जबाबदारी असते.
- कार्यालयातील/विभागातील वित्तीय व्यवस्थापन तसेच वेतन भत्ते, रजा व आस्थापनाविषयक कामे या अधिकाऱ्यांना हाताळावी लागतात.
* विक्रीकर (व्हॅट) विभाग
विक्रीकर (व्हॅट) हा राज्य शासनाच्या महसुलातील सर्वात जास्त वाटा असणारा कर म्हणून आहे. विक्रीकर विभाग हा अर्थमंत्रालयाच्या अधीनस्थ कार्यरत आहे. मुंबई विक्रीकर कायद्यान्वये विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य हे खात्यातील सर्वोच्च पद आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक पदासाठी वेगळी परीक्षा आयोजित करून साहाय्यक विक्रीकर आयुक्त पदासाठी निवड करण्यात येते.
साहाय्यक विक्रीकर आयुक्ताच्या जबाबदाऱ्या- व्यापाऱ्यांची नोंदणी करणे, नोंदणीकृत व्यापाऱ्यांना सल्ला, मार्गदर्शन करणे, कराची वसुली इ. बाबींची निर्धारणा शाखेसंबंधीची कामे.
विक्रीकर निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या- प्रत्यक्ष करवसुली व त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी विक्रीकर निरीक्षकाची असते. नोटीस व समन्स बजावणे व याबाबतची कार्यवाही तसेच डीफॉल्टर्सचा पाठपुरावा करणे या बाबीही विक्रीकर निरीक्षकाच्या कार्यकक्षेत येतात.
* मोटार वाहन विभाग - हा विभाग गृहमंत्रालयाच्या अधीन असतो. राज्यसेवा परीक्षेतून साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब या पदासाठी निवड करण्यात येते. साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-
शिकाऊ व पक्के ड्रायिव्हग लायसेन्स तसेच आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडून दिला जातो. वाहनांची नोंदणी, हस्तांतरण तसेच दुसऱ्या राज्यात/प्रदेशात गेल्यास त्याचे 'ना हरकत प्रमाणपत्र' देणे या बाबी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत येतात. परवाने व नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण व दुय्यम प्रती देण्याबाबतची कार्यवाही साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून होते.
* राज्य उत्पादन शुल्क विभाग
उत्पादन शुल्क हा राज्यसूचीतील विषय असून राज्य महसुलामध्ये याचा मोठा वाटा असतो.
राज्यसेवा परीक्षेद्वारे उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदावर नियुक्तीसाठी निवड करण्यात येते. प्रत्येक जिल्ह्य़ासाठी एक राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक राज्य शासनाकडून नेमण्यात येतात.
* राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक- या पदाच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-
मद्यार्क व अमली पदार्थाची तस्करी रोखणे व त्यासाठी वेगवेगळ्या उद्योग, व्यवसायांची तपासणी करणे हे या विभागातील अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे काम आहे. मद्य, मद्यार्क, अमली पदार्थ, औषधी द्रव्ये इ. बाबतच्या महसुलाची वसुली हे अधिकारी करतात. अमली पदार्थविषयक गुन्ह्य़ांचा तपास करण्याची जबाबदारीसुद्धा या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
आयोगाकडून साहाय्यक व लिपिक संवर्गासाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जातात. राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून कक्ष अधिकारी पदावर निवड होते.
* कक्ष अधिकाऱ्यांच्या कामाचे स्वरूप
कार्यासनात येणारे टपाल व धारिकांवर विहित वेळेत कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी कक्ष अधिकाऱ्यांवर असते. प्रत्यक्षात ही कार्यवाही साहाय्यकांकडून सुरू होत असली तरी याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार कक्ष अधिकाऱ्याला असतात.
* मंत्रालयीन पदस्थापना
आयोगाकडून साहाय्यक व लिपिक संवर्गासाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जातात.   
source: loksatta newspaper

Sunday, January 4, 2015

आर्य समाज:

 सं स्था प क - आर्यसमाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती हें काठेवाडांतील मोरवी संस्थानातल्या एका खेडयांत १८२४ सालीं जन्मले. त्यांनीं आपल्या हयातींत आपलें मूळ नांव किंवा जन्मस्थान कधीहि कोणास सांगितलें नाहीं; व याचें कारण, अंगीकारलेल्या धर्मकार्यांत नातेवाईक येऊन अडथळा करतील किंवा मरणोत्तर समाजाचा अधिपति म्हणून कोणी आपला नातेवाईक वारसा हक्क सांगू लागेल, असें स्वामी सांगत असत. तथापि १८८३ मध्यें स्वामी परलोकवासी झाल्यावर त्यांचें खरें नांव मूलशंकर अंबाशंकर असल्याचें माहीत झालें. स्वामींचें वडील अंबाशंकर असल्याचें माहीत झालें. स्वामींचें वडील अंबाशंकर हे ब्राह्मण जातीचे शैवपंथी सुखवस्तु गृहस्थ असून त्यांचा धंदा पेढीवाल्याचा होता. मूलशंकर उर्फ स्वामी दयानंदसरस्वती यांच्या आयुष्याचे तीन विभाग पडतात. पहिला. पूर्व वय (१८२४-१८४५), दुसरा प्रवास व अध्ययन (१८४५-१८६३), तिसरा सार्वजनिक कार्य (१८६३-१८८३). आयुष्यांतील पहिल्या दोन विभागांची माहिती स्वामींनीं स्वतः लिहून ठेवलेल्या आत्मचरित्रावरून चांगली मिळते. आर्यसमाजाच्या या संस्थापकाच्या धर्मबुध्दीसंबंधानें त्याच्या पूर्व वयांत तीन महत्त्वाच्या गोष्टी दिसून येतात. पहिली चवदाव्या वर्षीच मूर्तिपूजेविरुध्द केलेले बंड. त्याचें कारण शैव संप्रदायानुसार एका शिवरात्रीच्या दिवशीं उपोषण करून रात्री शिवालयांत भजन पूजन व जाग्रण करीत असतां त्यांनीं शिवाच्या मूर्तीवर एक उंदीर इकडे तिकडे बागडतांनां व नैवेद्य खातांनां पाहिला. दुसरी गोष्ट संसारत्याग करून मोक्ष मिळवण्याचा त्यानें केलेला निश्चय; याचें कारण बहिणीच्या मृत्यूमुळें त्यांनां झालेलें अपरंपार दुःख. तिसरी गोष्ट एकविसाव्या वर्षी त्यांनीं केलेला गृहत्याग. याचें कारण त्यांच्या आईबापांनीं जुळवून आणलेला विवाह टाळण्याची त्यांची इच्छा. याप्रमाणें मूर्तिपूजेविरुध्द बंड, मोक्ष मिळवण्याचा निश्चय, आणि संसारत्याग या तीन गोष्टींनीं स्वामींच्या भावी आयुष्याचा पाया घातला गेला या पूर्व इतिहासाबद्दल कोणास शंका येण्याचें कारण नाहीं. कारण स्वामीचें मूर्तिपूजेविरुध्द मत अखेरपर्यंत कायम होतें, आणि मूर्तिपूजेविरुध्द चळवळ स्वामींनी हरिद्वार काशी, इत्यादि प्रमुख क्षेत्रीं केली. संसाराबद्दलच्या त्यांच्या विरक्तीबद्दलहि कोणास संशय घेण्याचें कारण नाहीं. कारण स्वामींनीं एकदां जें घर सोडलें तें आप्तेष्टांचें दर्शन घेण्यास सर्व हयातींत एकदांहि ते गृहाकडे गेले नव्हते.
घर सोडल्यानंतर अठरा वर्षे स्वामीनीं संन्याशी होऊन प्रवास करण्यांत व निरनिराळया गुरूंपासून ज्ञान संपादण्यांत घालविलीं, त्यांत प्रथमपासूनच त्यांच्या मनावर वेदग्रंथांचा फार परिणाम झाला व व्यक्तिगत आत्मा आणि परत्मात्मा एकच असल्याबद्दल त्यांची खात्री पटली. ब्रह्मचर्याची दीक्षा देऊन त्यांचें नांव शुध्दचैतन्य असें ठेवण्यांत आलें. पुढें चवथ्या संन्यासाश्रमाची दीक्षा देऊन त्यांनां दयानंद सरस्वती हें नांव देण्यांत आलें. तथापि पुढें लवकरच स्वामी वेदांतमार्ग सोडून योगमार्गाकडे वळले; आणि त्यानंतर स्वामींच्या चरित्रावर अखेरचा धार्मिक परिणाम मथुरा येथें रहाणाऱ्या स्वामी विरजानंद सरस्वती नांवाच्या एका अंध वैदिक विद्वानाचा झाला. हा वैदिक अलीकडील संस्कृत वाङ्मयाचा पक्का द्वेष्टा होता. त्यानें वेद शिकविण्यास आरंभ करण्यापूर्वी सर्व अलीकडील संस्कृत ग्रंथ फेंकून देण्यास सांगितलें व दयानंदांनीं तसें केल्यावर त्यांनां वेद शिकवले. वेदाध्ययन पुरें झाल्यावर त्या अंध गुरूनें ''आतां जगांत हिंडून मनुष्य जातीला आपल्या ज्ञानाचा उपदेश कर'' अशी आशीर्वादात्मक आज्ञा केली. येथें दयानंदाच्या आयुष्याचा दुसरा भाग संपतो.
स्वामींच्या धार्मिक मतांचा इतिहास थोडक्यांत पुढील प्रमाणें आहे. प्रथम पौराणिक ग्रंथांतील मतांचा, नंतर तत्त्वज्ञानात्मक ग्रंथांतील मतांचा, आणि अखेर वैदिक ग्रंथांतील मतांचा पगडा त्यांच्या मनावर पडला.
स्वामी शैवपंथ सोडून वेदांतमार्गी बनले, व शेवटी सांख्य योगाला शेवटपर्यंत चिकटून राहिले. सर्व वेदग्रंथांचा अर्थ सांख्ययोगपर लावला पाहिजे असें त्यांचें मत होतें. आयुष्याची शेवटली वीस वर्षे स्वामींनीं सार्वजनिक कार्यांत घालविलीं. या काळांत धर्मोपदेश करीत सर्व हिंदुस्थानभर ते फिरले. पुण्यामुंबईपासून कलकत्त्यापर्यंत व उत्तरेस लाहोरपर्यंत मोठमोठे पंडित, मौलवी व मिशनरी यांच्या बरोबर त्यांनी वादविवाद केले. प्रथम चार वर्षे स्वमतप्रतिपादन केल्यावर अधिक ध्यानमनन करण्याकरितां व चारित्र्य उत्तम बनविण्याकरितां ते गंगेच्या कांठीं जाऊन राहिले. या अल्पकालीन एकांतवासांत असतांनां स्वामींस प्रत्यक्ष भेटून आलेल्या एका यूरोपीय मिशनऱ्यानें त्यांचें वर्णन पुढीलप्रमाणें लिहून ठेविलें आहेः -
'सायंकालीं नदीच्या वाळवंटांत पाण्याच्या कांठाजवळ बसलेल्या एका फकीराची भेट मीं घेतलीं. त्याच्या विद्वत्तेबद्दल व पवित्राचरणाबद्दल मी अगोदर बाजार पेठेंत पुष्कळांच्या तोंडून ऐकलें होतें. त्या ठिकाणीं तो फकीर एका गवताच्या आसनावर बसलेला होता. त्याचें शरीर भीमासारखे भक्कम व जाडजूड असून चेहरा पाणीदार होता. तो बहुतेक नग्नप्राय स्थितींत होता. मी जवळ गेल्याबरोबर त्यानें आनंदानें संभाषणास सुरुवात केली. संसाराचा पूर्ण त्याग करून परमेश्वरचिंतनांत तो काल घालवीत असे. झालेल्या संभाषणावरून सदरहू फकीराचें मन सुसंस्कृत आणि बुध्दि प्राचीन वैदिक ग्रंथांत तरबेज असल्याचें दिसून आलें. तो संस्कृतमध्यें बोलत होता त्यामुळें आमचें संभाषण एका दुभाष्या मार्फत झालें'
सुमारें अडीच वर्षांनीं स्वामी दयानंद एकांतवास सोडून पुन्हां सार्वजनिक वादविवाद करीत फिरूं लागले. हिंदूंचे प्रसिध्द क्षेत्र काशी वगैरे ठिकाणीं ते मुद्दाम वेदामध्यें मूर्तिपूजा आहे काय? या विषयावर व्याख्यानें देत असत. मूर्तिपूजेविरुध्द त्यांनीं फार जोराची मोहीम सुरू केली. व त्या कामीं आपला दृढनिश्चय तसेंच स्वतःचे मोठें वजन आणि असामान्य वक्तृत्व त्यांनी खर्च केलें.
मुंबई येथें १८७५ एप्रिल १० रोजीं स्वामी दयानंदांनीं आपला आर्यसमाज स्थापन केला. १८७७ मध्यें दिछी येथें भरलेल्या बडया दरबाराच्या वेळीं हजर राहून स्वामींनीं पंजाबांतील कांही सुप्रसिध्द गृहस्थांच्या गांठी घेतल्या. तेव्हां पंजाबांत येण्याबद्दल त्यांनां आमंत्रण झालें. तें मान्य करून स्वामी त्या प्रांतांत गेले. ती त्यांची पंजाबला पहिलीच भेट होती. त्यांच्या संस्थेनें पुढें जेथें विजय मिळविले तें क्षेत्र हेंच होय. १७८८ ते १८८१ या काळांत आर्यसमाज आणि थिऑसॉफिकल सोसायटी यांच्या दरम्यान मोठा चमत्कारिक संबंध आला; पण पुढें दोघे परस्पराबद्दल नाखूष झाले; कारण देवाच्या प्रत्यक्ष स्वरूपाबद्दल त्यांच्यामध्यें मोठा मतभेद उत्पन्न झाला. याशिवाय स्वामी दयानंदाचा ब्रह्मसमाजाचे देवेंद्रनाथ ठाकूर आणि केशवचंद्रसेन, थिऑसॉफिकल सोसायटीचे मॅडम ब्लॅव्हाटस्की आणि कर्नल आल्कॉट, प्रार्थनासमाजाचे भोलानाथ साराभाई, सुधारक मुसुलमानी पंथाचे सर सय्यद अहमद, आणि ख्रिस्ती पंथाचे डॉ. टी. जे. स्कॉट आणि रेव्ह. जे. ग्रे इत्यादि निरनिराळया संप्रदायांच्या पुढाऱ्यांशीं संबंध आला. स्वामीं दयानंदांनीं प्रार्थनासमाज, ब्रह्मसमाज व आर्यसमाज सर्व एक करावे अशी सूचना त्या त्या समाजाच्या पुढाऱ्यांनां केली होती; पण ती कोणासच मान्य झाली नाहीं.
१८८२-१८८३ मध्यें स्वामींनीं राजपुतान्याला भेट दिली आणि तेथें ते अनेक संस्थानिकांचे स्नेही व सल्लागार बनले. जोधपूरच्या महाराजांची बदफैली वर्तनाबद्दल स्वामींनीं चांगली कानउघाडणी केली असें सांगतात. या नंतर लवकरच स्वामी आजारी पडले. त्यांना अन्नामधून विषप्रयोग केला गेला असें कोणी म्हणतात. तें कांहीं असलें तरी हें मात्र खरें कीं, त्याच दुखण्यांत स्वामींचा शेवट झाला. १८८३ आक्टोबर ३० रोजीं अजमीर येथें स्वामी वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी परलोकवासी झाले.
स्वामी दयानंदांची प्रकृति फारच चांगली, चेहरा भव्य आणि मन दृढनिश्चयी होतं. मूर्तिपूजकांबरोबरच्या वादविवादांत महामूर्ख हें विशेषण त्यांच्या तोंडून फार येत असे. त्यांचें संस्कृत ग्रंथांतील पांडित्य, समयसूचकता आणि आत्मविश्वास मोठया पुढाऱ्याला योग्य अशींच होतीं.

सत्यशोधक समाज :

 सामाजिक समता व समताप्रधान समाजनिर्मितीसाठी महाराष्ट्रात स्थापन झालेला एक कांतिकारक पंथ. समाजाच्या आमूलाग मौलिक परिवर्तनाकरिता हिंदू समाजरचनेतील माणसांना उच्चनीच मानणारा जातिभेद, कर्मकांड, मूर्तिपूजा, स्त्रीदास्य, अंधश्रद्घा यांचे निर्मूलन करुन वैचारिक क्रांती घडविण्याकरिता महात्मा जोतीराव फुले यांनी समाजातील काही समविचारी मंडळींच्या सहकार्याने २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याच्या निर्मितीमागील पार्श्वभूमी, तात्त्विक बैठक, कार्य व उपक्रम यांसंबंधी माहिती म. फुले व त्यांच्या अनुयायांनी लिहिलेल्या प्रासंगिक निबंध व छोटीखानी पुस्तिकेतून (सार्वजनिक सत्यधर्म) मिळते.

पार्श्वभूमी : एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास पाश्चात्त्य सुधारणेचे स्वागत करणाऱ्या प्रवृत्तीचे तीन प्रवाह महाराष्ट्रात स्वतंत्र रीत्या प्रभावीपणे वाहताना दिसतात. पहिला प्रवाह, धार्मिक सुधारकांचा असून तो मुख्यत्वे बाह्मो समाज (स्थापना १८२८) व प्रार्थनासमाज (स्थापना १८६४) यांत व्यक्त झाला आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, रामचंद्र गोपाळ भांडारकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, न्यायमूर्ती नारायण गणेश चंदावरकर इ. मंडळी यात अगणी होती. दुसरा प्रवाह, बुद्घिवादी ब्राह्मण सुधारकांचा होता. आगरकरांसारखे जडवादी किंवा अज्ञेयवादी त्यात अगेसर होते. तिसरा मोठा प्रवाह, ब्राह्मणी संस्कृतीच्या विरुद्घ बंड करणाऱ्या बाह्मणेतरांच्या - बहुजनसमाजाच्या - चळवळीचा होता. ह्याचे आद्यजनक महात्मा जोतीराव फुले होते. या तिन्ही सुधारणा प्रवाहांची सर्वसंमत वैशिष्ट्ये अशी : (१) पाश्चात्त्य विज्ञान पूर्णतः स्वागतार्ह आहे. (२) धर्माशी प्रत्यक्ष सोयरिक नसलेले आधुनिक शिक्षण हाच खरा सुधारणेचा पाया आहे. (३) चातुर्वण्याचे तत्त्वज्ञान किंवा जातिभेद ही संस्था व्यक्तिविकासाला मारक व एकात्म समाजाच्या घडणीतील अडसर असल्यामुळे तिचे समूळ उच्चटन व्हावे; कारण व्यक्तिस्वातंत्र्याच्या पायावर लोकसत्ताक राज्यव्यवस्था भारतात निर्माण होण्याची गरज आहे; मात्र तत्पूर्वी सामाजिक परिवर्तनाची नितांत आवश्यकता आहे. या सर्व तत्त्व-सूत्रांचा प्रारंभ कुटुंबसंस्थेत आणि विवाहसंस्थेत बदल करण्यापासून होतो. त्याकरिता स्त्री-शिक्षण व स्त्री-स्वातंत्र्य यांचा पुरस्कार अपरिहार्य ठरतो. ही सर्वसंमत वैशिष्ट्ये या तिन्ही सुधारणा प्रवाहांत - चळवळीत असली, तरी महाराष्ट्रातील बहुजनसमाजातील सुधारकांचे - बाह्मणेतर सुधारकांचे-प्रश्न मागासलेल्या बहुसंख्य जनतेच्या जीवनाशी निगडित, तर ब्राह्मण सुधारकांचे प्रश्न पांढरपेशा उच्च्वर्णीयांच्या जीवनाशी संबद्घ होते. त्यामुळे हिंदू धर्माच्या पूर्वपरंपरेवर मूलोच्छेदी प्रहार करण्याची तीव्र व कठोर प्रवृत्ती निर्माण झाली आणि साधारणतः प्रार्थनासमाजाच्या धर्तीवर पण शूद्रातिशूद्रांच्या खास उद्घारार्थ सत्यशोधक समाजाची स्वतंत्र, स्वावलंबी व पुरोगामी विचारांची संघटना स्थापन करण्यात आली.

महात्मा फुले यांच्या या उच्छेदक प्रवृत्तीला अनेक कारणे आहेत. त्यांतील अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पेशवाईच्या उत्तरार्धामधील ब्राह्मणी वर्चस्वाचा काळ. या काळात, ब्राह्मणी राज्यात जातिभेदाची तीव्र अंमलबजावणी, बाह्मणेतर जातींना दडपण्याची राज्यकर्त्यांची प्रवृत्ती, शूद्राति-शूद्रांची बेफाट पिळवणूक, कायद्याच्या अंमलबजावणीतील ढळढळीत पक्षपात, बेसुमार भ्रष्टाचार व लाचलूचपत अशी बेबंदशाही व अनागोंदी होती. साहजिकच त्या काळी महाराष्ट्रातील ग्रामीण व नागरी सामाजिक जीवनात बाह्मणांचे धार्मिक व प्रशासकीय क्षेत्रांत पूर्ण वर्चस्व होते. परंपरागत हिंदू धर्माच्या चौकटीच्या पकडीत सर्व समाज गुरफटला होता. त्याचा प्रवर्तक व समर्थक वर्ग विशेषेकरुन ब्राह्मण वर्ग होता. ह्या चौकटीविरुद्घ बंड करणारी प्रवृत्ती, सत्यशोधक समाजाच्या रुपाने जागृत झाली आणि मानसिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी म. जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या रुपाने धगधगणाऱ्या बंडाचे निशाण हाती घेतले. धर्माचे मनुजवैरी गुंतवळ आणि ते जपणारे समाजघटक यांच्या अनिष्ट प्रवृत्तींविरुद्घ, जवळजवळ सर्व आघाडयंवर त्यांनी युद्घ पुकारले.

तात्त्विक बैठक : महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांची मांडणी केली आहे. धर्मभेद आणि राष्ट्रभेद यांच्याविरुद्घ महान सत्य कोणते, असा प्रश्न उपस्थित करुन म. फुल्यांनी म्हटले आहे, ‘‘ स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांच्या पायावर अवघ्या मनुष्यजातीचे एक कुटुंब निर्माण करणे, हेच मनुष्यतत्त्वाचे सर्वोच्च ध्येय होय. सर्व मानव, स्त्री किंवा पुरुष यांचे हक्क सारखे आहेत. मानव किंवा कोणताही मानवसमुदाय यांना दुसऱ्या मानवावर वा समुदायावर स्वामित्व गाजविण्याचा, जबरदस्ती करण्याचा सर्वाधिकार नाही. राजकीय व धार्मिक मतांमुळे कोणतीही व्यक्ती उच्च वा नीच मानून तिचा छळ करणे, म्हणजे सत्याचा द्रोह करणे होय. प्रत्येकाला स्वमताचा प्रसार करण्याचा हक्क व अधिकार आहे. सर्वांना ऐहिक जीवन उपभोगण्याचा सारखाच अधिकार आहे. शेती, कलाकौशल्य, मजुरी आदी कामे माणसास हीनपणा आणीत नसून त्यांच्यायोगे त्याची थोरवीच सिद्घ होते. सृष्टीच्या कार्यकारणभावाचा अर्थ ध्यानी घेऊन त्या सृष्टीचा किंवा निसर्गशक्तीचा मनुष्याच्या गरजा भागविण्यासाठी उपयोग करणे, हा मनुष्याचा मूलभूत अधिकार व कर्तव्य होय. या विश्वात जगण्याकरिता आणि उपभोगाकरिता वस्तू उत्पन्न करणे किंवा मिळविणे, हे माणसाचे पहिले कर्तव्य आहे. त्याकरिता परस्परांना साहाय्य करणे, हा मानवाचा श्रेष्ठ धर्म आहे; एवढेच नव्हे, तर ही ईश्वराची पूजा आहे. भजन, नामस्मरण, जपजाप्य, प्रार्थना, भक्ती या गोष्टींची ईश्वराला गरज नाही; कारण तो सर्व विश्वाचा स्वामी आहे. त्याला माणसाच्या स्तुतीची, भक्तीची मुळीच गरज नाही. बायबल मध्ये येशू क्रिस्तांनी माणसाने माणसाशी कसे वागावे, यासंबंधी केलेला उपदेश माणसाने अंमलात आणला, तर मनुष्यजातीचे जीवन पूर्ण सफल झाले असे समजावे ’’. म. फुले यांनी विशद केलेले हे सत्य म्हणजे हजारो वर्षांच्या परिश्रमाने संपादन केलेल्या संस्कृतीचे आणि ज्ञानाचे सार आहे. त्यांनी सत्यज्ञानाचे साधन किंवा प्रमाण कोणते, यासंबंधी समग चर्चा केली आहे. ‘‘ शुद्घ सत्य हे धर्मग्रंथात किंवा ऋषी, गुरु, अवतार व ईश्वर, प्रेषित या कुणांमध्येही नाही; ते मनुष्याच्या सदसद्विवेकबुद्घीत वास करते. निसर्गातील सत्य व नैतिक सत्य ही दोन्ही प्राप्त करुन देणारी बुद्घी (रीझन) मनुष्यात स्वाभाविकपणे वसत असते. सृष्टिकर्त्यानेच मनुष्यजातीला दिलेली ती नैसर्गिक देणगी आहे. ईश्वराने - निर्मिकाने - मानवाला एकदाच एकच एक ज्ञानाचा दिव्य ठेवा दिला आहे; तो म्हणजे बुद्घी होय ’’. म. फुले यांची सत्यशोधक समाजाविषयीची ही तात्त्विक बैठक पूर्णतः बुद्घिवादी आहे. त्यांना धर्मसंस्था मान्य नाही; मात्र ‘ निर्मिका ’ चे म्हणजे सृष्टिनिर्मात्याचे अस्तित्व ते मान्य करतात. निर्मिकाचे सर्वन्यायीपण सिद्घ करण्यासाठी म. फुले यांनी केलेला सज्जड युक्तिवाद मात्र विज्ञानाच्या कसोटीवर कितपत उतरेल ? याबद्दल शंका आहे.
कार्य व उपक्रम : सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी म. फुले यांनी घटना बनविली. तद्नुषंगाने नियमावली तयार केली.मूलतः सत्यशोधक समाज एकच निर्मिक, एक धर्म, एक मनुष्यजात मानणारा म्हणून स्थापन झाला. त्याची आचारसंहिता सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात दिली असून, त्यात ढोबळ नियम सांगितले आहेत. त्यांनुसार समाजाच्या कार्यकारिणीत सुरुवातीस म. जोतीराव फुले हे चिटणीस आणि डॉ. विश्राम रामजी घोले हे अध्यक्ष होते. वर्षातून कार्यकारिणीच्या सर्वसाधारण चार सभा, लोकशाही पद्घतीने कार्यकारी मंडळाची निवड व बहुमताने निर्णय, अशी सर्वसाधारण सूत्रे होती. सुरुवातीस दर रविवारी डॉ. गावडे यांच्याकडे अनौपचारिक रीत्या मंडळी जमत. समाजापुढील प्रश्न, सोडवणुकीचे उपाय व सद्यःस्थिती यांविषयी चर्चा होत आणि दर पंधरा दिवसांतून एक व्याख्यान असा उपक्रम असे.

सत्यशोधक समाजातील व्यक्तींनी पुढील काही सूत्रे काटेकोरपणे पाळावीत, अशी भूमिका आहे. (१) ईश्वर (निर्मिक) एक असून तो सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकार व सत्यरुप आहे आणि सर्व माणसे त्याची लेकरे आहेत. या निर्मिकाशिवाय (निर्मात्याशिवाय) मी इतर कशाचीही पूजा करणार नाही. (२) निर्मिकाची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुरोहित किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही. (३) माणूस जातीने श्रेष्ठ ठरत नसून गुणांनी श्रेष्ठ ठरतो. (४) निर्मिक सावयव रुपाने अवतरत नाही. (५) पुनर्जन्म, परलोक, मोक्ष, कर्मकांड, जपतप या गोष्टी अज्ञानमूलक आहेत; त्यांचा अवलंब माझ्याकडून होणार नाही. (६) जनावरांना मारण्यात मी सहभागी होणार नाही. (७) दारुच्या व्यसनापासून अलिप्त राहण्याचा मी प्रयत्न करीन आणि (८) तसेच समाजाचा खर्च चालावा म्हणून मी माझ्या उत्पन्नातून काही वर्गणी देईन.

सर्व सभासदांनी सत्याचा प्रसार व सद्विचार लोकांत प्रसृत करुन मानवी हक्क व कर्तव्ये यांचा प्रसार-प्रचार वृत्तपत्रे-व्याख्यानांद्वारे करावा. म. फुल्यांनी दलितांना, स्त्रियांना, कष्टकऱ्यांना त्यांच्या दैन्यावस्थेतून बाहेर पडण्यासाठी लोकशिक्षणाचा उपक्रम प्राधान्याने हाती घेतला. शिक्षण सर्वांना सहजलभ्य व्हावे आणि सर्वांनी शिक्षण घ्यावे म्हणून प्रयत्न केला. विद्येची महती त्यांनी शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथात चपखल शब्दांत वर्णन केली आहे. ते म्हणतात, “ विद्येविना मति गेली; मतिविना नीति गेली; नीतिविना गति गेली; गतिविना वित्त गेले; वित्ताविना शूद्र खचले; इतके अनर्थ एका अविद्येने केले. “ अज्ञानगस्त शूद्रातिशूद्रांच्या शाळांबरोबरच त्यांनी मुलींसाठीही शाळा काढल्या. त्यासाठी सावित्रीबाईंनी पुढाकार घेऊन अध्यापनही केले. ज्ञानवृद्घिकारक उपायांना बळकटी देण्यासाठी त्यांनी गरीब  व होतकरु विद्यार्थ्यांना विद्यावेतने व हुशार विद्यार्थ्यांना बक्षिसे ठेवली. निबंधलेखन व वक्तृत्वस्पर्धा यांना उत्तेजन दिले. वसतिगृहांची व्यवस्था करण्यात आली. त्यांचे एक सहकारी कृ. पां. भालेकर यांनी वसतिगृह स्थापून परगावच्या गरीब विद्यार्थ्यांची राहण्याची-जेवण्याची व्यवस्था केली. म. फुल्यांनी हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनात (१८८२) सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह धरला. पाझरणीच्या सिद्घांताला कडाडून विरोध केला. त्यासाठी लोकहितकारक असे उपायही सुचविले.

सत्यशोधक समाजाने लोकशिक्षणाबरोबरच शेतकऱ्यांची जमीनदार व सावकार यांच्या मगरमिठीतून सुटका करण्यासाठी अथक प्रयत्न केले. दीनबंधू , दीनमित्र वगैरे वृत्तपत्र-मासिकांतून शेतकऱ्यांची गाऱ्हाणी त्यांनी हिरिरीने मांडली. शेतकऱ्याचा आसूड मधून म. फुल्यांनी शासनाच्या नजरेस कृषिवर्गाची दुःस्थिती आणली. त्यामुळेच ‘ डेक्कन अ‍ॅगिकल्चर रिलिफ अ‍ॅक्ट ’ संमत झाला. दीनबंधू वृत्तपत्राने गिरणीकामगारांची स्थिती सुधारण्याचा पहिला प्रयत्न केला. नारायण मेघाजी लोखंडे यांनी ‘ मिलहँड असोसिएशन ’ स्थापून, फॅक्टरी आयोगापुढे कामगारांची बाजू मांडली. तसेच लहान शेतकऱ्यांना जंगल खात्याच्या अधिकाऱ्यांकडून होणारा उपद्रव दूर केला. जातिभेदखंडन करणारे तुकाराम तात्या पडवळ यांचे जातिभेद विवेकसार, परमहंस सभेचे दादोबा पांडुरंगलिखित धर्मदर्शक आणि म. फुल्यांचे सार्वजनिक सत्यधर्म ह्या ग्रंथांचा सत्यशोधक चळवळीने मार्गदर्शनपर उपयोग केला. तसेच अनिष्ट अंधश्रद्घामूलक परंपरा, चालीरीती, रुढी यांचे समूळ उच्चटन करण्याचा प्रचार केला. १८७९ मध्ये पुण्यातील एका थिएटरमध्ये त्यांनी स्त्रियांच्या निबंधवाचनाचा समारंभ घडवून आणला. शेतकऱ्यांच्या दुःस्थितीबद्दल व पिळवणुकीबद्दल त्यांनी बारामती तालुक्यात चिंचोली गावात शेतकऱ्यांची सभा भरवून (१८८०) शेतसारा, कर्ज, जंगलत्रास, सक्तीचे शिक्षण वगैरेंविषयी ठराव संमत केले. एवढेच नव्हे, तर भालेकर यांनी ते, विदर्भ व मध्य प्रदेशात कंत्राटी कामानिमित्त काही महिने गेले असता, तेथे सत्यशोधक समाजाचे प्रचारकार्य केले. महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांतून समाजाची केंद्रे निर्माण झाली आणि जनजागृतीच्या उपकमाला काही अंशी यश लाभले.

महाराष्ट्राबरोबरच बृहन्महाराष्ट्रातील काही शहरांतून म. फुल्यांच्या सत्यशोधक समाजाची केंद्रे निर्माण झाली आणि जनजागृतीच्या, लोकशिक्षणाच्या चळवळीला वेग आला. कृष्णराव पांडुरंग भालेकर, स्वामी व्यंकय्या रामय्या अय्यावरु, डॉ. विश्राम रामजी घोले, डॉ. संतुजी रामजी लाड, सावळाराम दगडूजी घोलप, महादेव गणेश डोंगरे, हरिश्चंद्र नारायण नवलकर, महादेव राजाराम तारकुंडे, आण्णा बाबाजी लठ्ठे, ज्ञानगिरी बुवा, तात्या पांडुरंग सावंत, वा. रा. कोठारी, सखाराम पाटील, मुकुंदराव गणपत पाटील, अ‍ॅड. गणपतराव कृष्णाजी कदम, भास्करराव जाधव, हनुमंतराव साळुंखे-पाटील, दांडेगावकर, अ‍ॅड. केशवराव बागडे, आनंदस्वामी, रामचंद्र आसवले, केशवराव विचारेगुरुजी, ज्योत्याजीराव फाळके-पाटील, रामचंद्र बाबाजी जाधव उर्फ ‘ दासराम ’, सदोबा गावडे, बंडोबा तरवडे, धोंडीराम नामदेव कुंभार, रामचंद्र गोविंद जामदार, भोसले - सावंत, भाई माधवराव खंडेराव बागल, पुढारी कार ग. गो. जाधव, ‘ सत्यवादी ’ कार बाळासाहेब, समाज कार सर्जेराव पाटील, बाळासाहेब देसाई, रायभान जाधव, अ‍ॅड. झुलाल पाटील, दौलतराव गोळे, व्यंकटअण्णा रणधीर, नलिनीताई लढके, अ‍ॅड. एकनाथराव साळवे, प्राचार्य गजमल माळी, ल. ब. मिसाळ, रामभाऊ फाळके, अ‍ॅड. पी. बी. कडू - पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, अ‍ॅड. डी. एस. खांडेकर, माधवराव मुकुंदराव पाटील, अ‍ॅड. द. रा. शेळके, अ‍ॅड. ना. ह. सावंत, जी. ए. उगले, ग. पां. लोके, बाबा आढाव, हरिभाऊ मुळे, उत्तम नाना पाटील व अ‍ॅड. वसंतराव ऊर्फ भाऊ फाळके-पाटील यांसारख्या मोजता येणार नाहीत अशा अनंत छोट्या-मोठ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सत्यशोधक चळवळ नेटाने पुढे नेली/आजही प्रयत्न चालू आहेत. परिणामी, संपूर्ण समाजक्रांतीचे युग अवघ्या महाराष्ट्रात सळसळून उभे राहिले. मधे काही काळ, विशेषतः म. फुले यांच्या मृत्यूनंतर (१८९०) तसेच भारताला स्वातंत्र्याची प्राप्ती झाल्यानंतर (१९४७) सत्यशोधक चळवळ खूपच मंदावली, उपेक्षित राहिली; मात्र शंकरराव मोरे, मुकुंदराव पाटील, केशवराव जेधे, भास्करराव जाधव, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, दिनकरराव जवळकर, लोकशाहीर पिराजीराव सरनाईक प्रभृती व त्यांचे खंदेबल्लळ सहकारी यांनी सत्यशोधक चळवळ पुनर्जीवित केली, गतिमान केली आणि खेड्यापाड्यांतल्या, तळागळातल्या माणसांपर्यंत नेऊन पोहोचविण्याचा आणि रुजविण्याचा प्रयत्न केला. राजर्षी शाहू महाराजांनी ती उभ्या महाराष्ट्रात वाढविण्याचा प्रयत्न केला.

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रचंड रणसंग्रामात, सर्वांगीण सामाजिक क्रांतीऐवजी देशाच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाला अग्रक्रम राहिला. त्यामुळे सत्यशोधक चळवळ विस्कळीत झाली; तशीच स्वातंत्र्योत्तर काळात, ‘ आता स्वातंत्र्य प्राप्त झालं, उद्दिष्ट साध्य झालं; म्हणजे दुसऱ्या कुठल्या उद्दिष्टाची निकड उरली नाही’, अशी बव्हंशी बहुजन समाजाने समजूत करुन घेतली. समोरची उद्दिष्टेही वेगवेगळी झाली. शिवाय मोठ्या प्रमाणात बाह्मणेतर समाज विविध राजकीय पक्षांत विभागला गेला. अशा काही महत्त्वाच्या कारणांमुळे सत्यशोधक चळवळ नुसती मंदावली असेच नव्हे, तर थंडावलीही अशी इतिहासाची नोंद आहे. मात्र इतिहासाकडे पाठ करुन ती पुन्हा उसळी मारुन फोफावू लागली, ती धारदार विचारांनी दृढ असलेल्या, कडेलोट झाला तरी मागे हटणार नाही या जिद्दीने पेटलेल्या, त्या त्या काल-परिस्थितीमधील नव्या-जुन्या, छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांच्या-नेतृत्वाच्या अभंग निष्ठांवर ! सांप्रत जाणवणारे तिचे अस्तित्वही याच ज्वलजहाल आधारावर उभे आहे. 
ग्रंथव्यवहाराची मांदियाळी : म. फुले यांच्यापासून (१८७३) आजतागायत (२००८) सत्यशोधक चळवळीचे गतिमान, वाढते यश, निरनिराळे उपक्रम, कार्यकम हाती घेऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर निर्भर आहे. कालमानानुसार त्यात बदल, काही सुधारणा संभवत असल्या तरी, छोट्या-मोठ्या सभा, शेतकऱ्यांचे मेळावे, शेतकरी-कामकरी-कष्टकऱ्यांच्या संघटना, स्पृश्य-अस्पृश्य-महिला अशा ‘शूद्रातिशूद्र’ समाजघटकासांठी शाळा उघडणे, परिवर्तन शिबिरे आयोजित करणे, नैसर्गिक किंवा मानवी आपत्ती, दुष्काळ, महापूर या संकटांच्या वेळी पुनर्वसनशिबिरे आयोजित करणे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची/पुलांची कामे घेणे, निबंध लिहून त्याचे वाचन करणे, छोट्या छोट्या पुस्तिका लिहिणे, सभा-संमेलने-अधिवेशने भरवून बहुजन समाजाला-बाह्मणेतर समाजाला व सरकारला परखडपणे काही गोष्टी सुनावून कृती करायला भाग पाडणे आणि छोटी छोटी नियतकालिके काढून त्यांद्वारा प्रभावी व प्रवाही प्रचार करणे, असे या लोकप्रबोधनकार्याचे सर्वसाधारण स्वरुप राहिले आहे. लोकशाहीमधील लोककल्याणाच्या संस्थांमध्ये प्रवेश करणे, त्यांची स्थापना करणे आणि मोठ्या प्रमाणात ग्रंथव्यवहाराचे प्रकाशन करणे, हे त्याचेकालसुसंगत असे सांप्रतचे दोन पदर आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील म.फुले समता प्रतिष्ठान, ‘एक गाव, एकपाणवठा ’ किंवा ‘ देवदासींचे पुनर्वसन ’, यांसारख्या चळवळी, भाई माधवराव बागल विद्यापीठ (कोल्हापूर) या स्वयंसेवी विद्यासंकुलातर्फे शेतकरी-कामगार-महिला-विद्यार्थी यांसारख्या दुबळ्या घटकांसाठी सातत्याने राबविले जाणारे विधायक उपक्रम, म. फुले सामाजिक समता प्रतिष्ठानच्या वतीने मागासवर्गीय व तत्सम यांच्या उद्घारार्थ छेडली जाणारी आंदोलने आणि केले जाणारे संघटन अशा संस्था आणि त्यांचे उपक्रम हे सत्यशोधक चळवळीचेच आविष्कार आहेत. वानगीदाखलची ही यादी पुरेशी ठरावी.

अधिवेशने/संमेलने : कमीअधिक प्रमाणात सत्यशोधक चळवळ झपाट्याने/काही वेळा मंदपणे फोफावत असली, तरी सत्यशोधक समाजाच्या वतीने तिच्या ध्येय-उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठीच चळवळीचे हे महायान सुरु होते. लोकजागरण, लोकप्रबोधन, लोकसंघटन आणि नवसमाजनिर्मिती या सत्यशोधक समाजाच्या ध्येयसिद्घीसाठी हा सारा खटाटोप, हा उभा प्रयास होता. १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची म. फुले यांनी स्थापना केली; मात्र समाज अधिवेशनांची सुरुवात १९११ पासून झाली. १९११ पासून २००७ पर्यंत सत्यशोधक समाजाची एकूण ३५ अधिवेशने संपन्न झाली. पहिले अधिवेशन १७ एप्रिल १९११ रोजी पुणे येथे स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरु यांच्या अध्यक्षतेने पार पडले. त्याच्या स्वागताध्यक्षपदी गणपतराव बिरमल होते. पस्तीसावे अधिवेशन २२ डिसेंबर २००७ रोजी गेवराई (जिल्हा बीड, मराठवाडा) येथे डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. ‘ मराठवाडा सार्वजनिक सभेचे ’ अध्यक्ष पद्माकरराव मुळे यांनी स्वागताध्यक्षपद भूषविले होते. पुणे ते गेवराई या प्रवासामधली सलग ३३ अधिवेशने अशी आहेत : नासिक, ठाणे, सासवड (पुणे), अहमदनगर, निपाणी, आडगाव (जळगाव), अकोला, सातारा, दांडेगाव (हिंगोली), बेळगाव, शेगाव (हिंगोली), अमरावती, मुंबई, पुन्हा मुंबई, कोल्हापूर, पाडळी (सातारा), मौजे भक्तवाडी (सातारा), औरंगाबाद, पुन्हा पाडळी (सातारा), बोराडी (धुळे), पुन्हा नासिक, नागपूर, वर्धा, यवतमाळ, सांगली, मुकुंदवाडी (अहमदनगर), वान्द्रे (पूर्व), अकोला, लातूर, सातारा, पुन्हा औरंगाबाद, चिखली, गेवराई.

या प्रबोधन चळवळीचा भाग म्हणून सत्यशोधक विद्यार्थी संघटना काम करीत असल्याचे दिसते. मात्र तिला तसे अधिकृत स्वरुप असल्याचे आढळत नाही. प्रशिक्षण वर्ग भरत असले, तरी त्याचे स्वरुप आस्था असणाऱ्यांपुरते मर्यादित असे. मात्र शेतकऱ्यांचे नेते कांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या कल्पनेने सत्यशोधक साहित्यसंस्थेसंबंधी, २००१-०२ मध्ये उचल खाल्ली, अथक प्रयत्नाने ही कल्पना साकार कशी होईल हे पाहिले. स्वतः नागनाथ अण्णा, अ‍ॅड. भाऊ फाळके-पाटील, प्रा. उगले, डॉ. एस्. एस्. भोसले, प्रा. चंद्रकुमार नलगे, प्रा. कल्याणकर, डॉ. आ. ह. साळुंखे, भूमिसत्ता चे संपादक भगतुर, प्रा. गुंदेकर, डॉ. गुरव, प्राचार्य टेकाळे, प्रा. श्याम मुंडे, प्रा. अनिल पाटील, प्रा. गजमल माळी, स्वातंत्र्यसैनिक भा. दो. पाटील, डॉ. काठोळे, प्रा. ढवळे, डॉ. सुरेश सावंत, डॉ. शशी चौधरी प्रभृतींनी कष्टपूर्वक ती लोकमानसात रुजविली. कमाने ‘ सत्यशोधकीय साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदे ’ च्या रीतसर नोंदणीमुळे सत्यशोधक चळवळीला जास्तीचे बळ लाभले आहे. सत्यशोधक कोश निर्मितीचे कार्य (सत्यशोधक चळवळीतील संस्था, व्यक्ती, ग्रंथ आणि नियतकालिके यांचा कोश : १८७३ ते २००६), उद्योगपती पद्माकरराव मुळे यांच्या नेतृत्वाने हाती घेण्यात आले आहे.

सत्यशोधकीय नियतकालिके : सत्यशोधक चळवळीने अनेक प्रचार-माध्यमे उपयोगात आणली. त्यामध्ये सत्यशोधकीय नियतकालिकांचा अगकमाने समावेश करावा लागतो. याद्वारा धार्मिक/सामाजिक क्षेत्रांत जनजागृतीचे अफाट कार्य केले. धर्मचिकित्सा, निरर्थक मूर्तिपूजेस विरोध, समाजाला पिचवून टाकणाऱ्या रुढीपरंपरांच्या चौकटींना नकार, जाति-निर्मूलन, शेतकरी-अस्पृश्य आणि स्त्रिया यांच्या उन्नतीसमृद्घीचा कृतिशील विचार, अशा अनेकस्पर्शी उपकमांसाठी या प्रचारमाध्यमांचा, आत्यंतिक कडवेपणाने व निष्ठापूर्वक जाणिवेने सत्यशोधक समाजाकडून अवलंब करण्यात आला. सर्वांगांनी प्रचार, प्रचारकांची निर्मिती, जलसे, मेळे हे तर त्यात होतेच; मात्र चळवळीची म्हणून जी नियतकालिके या काळात निघाली/निघत राहिली त्यांचे स्थान, सत्यशोधक चळवळीच्या इतिहासात अनन्यसाधारण असे आहे. बहुजन समाजाच्या प्रगमनशील, सामाजिक ध्येयनिष्ठ पत्रकारितेचा हा लखलखता आविष्कार डोळे दिपविणारा आहे. सर्वसाधारणपणे चार इयत्तापर्यंत शिक्षण झालेले, या नियतकालिकांचे बहुजनसमाजातील संपादक वृत्तपत्रक्षेत्रास अनभिज्ञ होते. अनुभव, पार्श्वभूमी, परंपरा, साधने या सगळ्याच दृष्टीने अभावगस्त होते. मात्र समाजासंबंधीची अपार बांधीलकी, अतूट ध्येयवाद आणि अभंग जिद्द अशा पुंजीवर ह्या पत्रकारितेचे गाडे रेटले जात होते. सोने-नाणे गहाण टाकले, जमीन-जुमल्याचा लिलाव झाला, लेखनकामांपासून ते स्वतःच अंक पोस्टात नेऊन टाकण्याचे नित्यकर्म करावे लागले, बायका-मुलांची हेळसांड झाली; पण सत्यशोधक चळवळीतील पत्रकारितेने मागे वळून पाहिले नाही. बहुजनसमाजाच्या अपरंपार आस्थेमुळे एकात्म समाजाच्या निर्मितीच्या समर्पित भावनेमुळे हे घडत गेले.
सत्यशोधक चळवळीच्या ऐन बहराच्या काळात - १८७३ ते १९४० - अशी जवळपास ६०/६५ नियतकालिके निघाली. त्यापुढच्या अर्धशतकाहून अधिकच्या काळात - स्थूलमानाने २००७ अखेर - त्याहून तितकीच किंबहुना त्याहून अधिकच नियतकालिके प्रसिद्घ झाली. त्याची स्थूलमानाने नोंद पुढीलप्रमाणे करणे शक्य आहे :

समाजनिष्ठ ग्रामीण पत्रकारितेचे हे अपूर्व पर्व सुरु झाले ते दीनबंधु (१८७७- कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, वासुदेवराव बिर्जे, श्रीमती तानुबाई बिर्जे) व संत्सार (१८८५- म. फुले) यांच्या पत्रकारितेने. दीनमित्र (१८८८- गणपतराव पाटील), राघवभूषण (१८८८- गुलाबसिंह कौशल्य), अंबालहरी (१८८९- कृष्णराव भालेकर), शेतकऱ्यांचा कैवारी (१८९२- कृष्णराव भालेकर), मराठा दीनबंधू (१९०१- भास्करराव जाधव), दीनमित्र (१९१०- मुकुंदराव पाटील), विश्वबंधू (१९११- बळवंतराव पिसाळ), जागृती (१९१७- भगवंतराव पाळेकर), जागरुक (१९१७- वालचंद कोठारी), डेक्कन रयत (१९१८- अण्णा-साहेब लठ्ठे), विजयी मराठा (१९१९- श्रीपतराव शिंदे), सत्यप्रकाश (१९१९- नारायण रामचंद्र विभुते), गरिबांचा कैवारी (१९२०- बाबूराव यादव), भगवा झेंडा (१९२०- दत्ताजीराव कुरणे), तरुण मराठा (१९२०- सखाराम पांडुरंग सावंत), राष्ट्रवीर (१९२१- शामराव देसाई), प्रबोधन (१९२१- के. सी. ठाकरे), संजीवन (१९२१- द. भि. रणदिवे), सिंध मराठा (१९२४- दत्तात्रय वासुदेव अणावकर), हंटर (१९२५- खंडेराव बागल), मजूर (१९२५- रामचंद्र लाड), कर्मवीर (१९२५- शि. आ. भोसले), नवयुग (१९२६- बाबासाहेब बोले), सत्यवादी (१९२६- बाळासाहेब पाटील), बाह्मणेतर (१९२६- व्यंकटराव गोडे), कैवारी (१९२८- दिनकरराव जवळकर) वगैरे प्रमुख नियतकालिकांची रांगच आहे. मराठी भाषिकांच्या सर्व प्रदेशांपर्यंत ती पोहोचत होती. त्याचबरोबर जागृती हे नियतकालिक बडोद्याहून, तर सिंध मराठा हे कराचीहून म्हणजे परप्रांतांतून प्रसिद्घ होत होते. राघव भूषण, येवला (जिल्हा नासिक); दीनमित्र, तरवडी (जिल्हा अहमदनगर) अशा ग्रामीण भागांतूनही अशी काही नियतकालिके प्रकाशित होत होती.

सत्यशोधक समाजाचे १९११ ते २००८ अखेरच्या अध्यक्षांची मालिका मोठी असून त्यात एकापेक्षा एक श्रेष्ठ तळमळीच्या समाजकार्यकर्त्यांची मांदियाळी मोठी आहे. सत्यशोधक समाजाची  अध्यक्ष म्हणून धुरा विसाव्या शतकाच्या प्रारंभी स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरु यांनी दि. १७ एप्रिल १९११ ते ३१ मार्च १९१२ पर्यंत सांभाळली आणि एकविसाव्या शतकात ही धुरा अ‍ॅड. वसंतराव फाळके (१५ एप्रिल २००१ ते आजतागायत -२००८) समर्थपणे सांभाळीत आहेत. तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ हे सत्यशोधक चळवळीचे काम पुढे नेटाने नेत आहेत.

शेती-शेतकरी, कष्टकऱ्यांची दैना, स्त्रिया-अस्पृश्य यांचे दारिद्य, प्राथमिक शिक्षणाची आवश्यकता, धर्मचिकित्सा व सामाजिक पुनर्रचना, वंचित व उपेक्षित समाजघटकांचे विदारक प्रश्न, कामगारांचे लढे, त्यांची  एकजूट, अंधश्रद्घांचे निर्मूलन, अधिकाऱ्यांची अरेरावी व खाबुगिरी असे अनंत प्रश्न या नियतकालिकांनी समर्थपणे हाताळले. जे जे जनहिताचे आणि मनुजवैरी व्यवस्थेचे समर्थक, त्या साऱ्यांचा परखड परामर्श अत्यंत निर्भयपणे इथे घेण्यात आला. अतिशय तिखट असे हे वैचारिक बंड आहे. त्याचा उद्देश स्पष्ट असल्याने त्यामध्ये विचारांचे सामर्थ्य ठासून भरले आहे; त्यामानाने वाङ्मयनिर्मितीची कलात्मकता त्यात कमी आढळते, त्यात एकांगीपण, पुनरुक्ती अधिक आहे, बोचरेपणा खूप आहे. झोंबणारा उपहास तीव्र आहे. मात्र त्यातला आवेग, जोश आणि आवेश विलक्षण आहे. सत्यशोधक समाजाच्या आणि त्याद्वारे प्रवर्तित झालेल्या सत्यशोधक चळवळीच्या कार्याचे मूल्यमापन करताना लोकमान्य प्रकांड पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी लिहितात, ‘‘ हिंदुस्थानातील तत्कालीन खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचलेली आधुनिक भारतामधील सत्य-शोधक चळवळ ही पहिली प्रबोधनपर चळवळ आहे. हजारो वर्षांपासून पिचलेल्या आणि शोषित अशा कष्टकरी जनसमूहाने तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेविरुद्घ मानवी जन्म, मानवी पत आणि मानवी प्रतिष्ठा तसेच विषमता, अज्ञान, आत्मोन्नती आणि शोषणमुक्ती यांसाठी पुकारलेली ती विराट लोकचळवळ होती. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि समतेचे जागरण, त्यामधून एकात्म समाज सत्यशोधक चळवळीला अभिप्रेत होता ’’. पुढे ते म्हणतात, ‘‘ बाह्मणेतर वादासंबंधीचा खरा झगडा, पूर्वपरंपरेविरुद्घ नवीन ज्ञानाच्या आविष्काराने निर्माण झालेल्या विचारसरणीने उठविलेले बंड हा होता. बाह्मणेतरवाद ही एक विचारसरणी आहे. उच्च्नीचत्वाच्या, जातिभेदाच्या, स्थितिस्थापकत्वाच्या ध्येयाविरुद्घ हा लढा होता. जातिभेद आणि तो कायम ठेवण्यासाठी प्रचारात असलेला सामाजिक ध्येयवाद आणि प्रवर्तक तत्त्वे यांविरुद्घ बाह्मणेतर चळवळ एक बंड आहे.’’ ‘पृथ्वीवर त्या लोकशाही राज्याची संकल्पना ’ तिने मांडली, असा यथार्थ अभिप्राय ज्योतिनिबंध या आपल्या छोट्या चणीच्या मोठ्या पुस्तकात तर्कतीर्थांनी नोंदविला आहे.

संदर्भ : 1. Keer, Dhananjaya, Mahatma Jotirao Phooley : Father of Social Revolution, Bombay, 1974.
२. उगले, जी. ए. सत्यशोधक समाज अधिवेशने : चिंतन आणि चिंता, औरंगाबाद, २००७.
३. जाधव, रा. ग. संपा. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : लेखसंगह, पुणे, १९८२.
४. जोशी, महेश, सत्यशोधक समाजाचा इतिहास, पुणे,१९८७.
५.जोशी, लक्ष्मण-शास्त्री, ज्योतिनिबंध, वाई, १९४७.
६. फडके, य. दि. संपा. महात्मा फुले समग वाङ्‌मय, मुंबई, १९९१.
७. भोसले, एस्. एस्. संपा. कांतिसूक्ते : राजर्षी छत्रपती शाहू महाराज, मुंबई, १९७५.
८. माळी, गजमल,सत्यशोधक समाजाचा इतिहास, औरंगाबाद,२००८.
९. वाघ, प्राजक्ती आणि इतर, संपा. सत्यशोधकीय साहित्य संमेलने-अध्यक्षीय भाषणे, देउळगावराजा, २००७.
१०. साळुंखे, पी. बी. आणि इतर, संपा. महात्मा फुले गौरव ग्रंथ, मुंबई, १९८२.

भोसले, एस्. एस्.; माळी, गजमल
 source: marathi vishvkosh




Saturday, January 3, 2015

प्रार्थना समाज

ब्राम्हो समाजाच्या विचारांचा महाराष्ट्र्रावरही प्रभाव पडला व त्या दृष्टीने १८४९ मध्ये परमहंस सभा स्थापन करण्यात आली. १८६७ मध्ये केशवचंद्र सेनच्या प्रेरणेने मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली. आत्माराम पांडुरंग १८२३-१८९८ नावाच्या सुधारक वृत्तीवरच्या व्यक्तीने हा समाज स्थान करण्याच्या कामी पुढाकार घेतला प्रार्थना समाजपचे स्वरुप ब्राहो समाजापेक्षा वेगळे होते. प्रार्थना समाजातील सभासद स्वत:ला प्रार्थना समाजाचे स्वरुप ब्राहो समाजापेक्षा वेगळे असे मानीत नव्हते, तर हिंदू धर्मातील एक चळवळ मानीत. थोडक्यात प्रार्थना समाजाची श्रध्दा पूर्णपणे हिंदू धर्मावर होती. एकेश्र्वरवादाच्या सिध्दान्ताव्यितिरिक्त समाज सुधारण हे उद्दिष्ट मानून प्रार्थना समाजाने विश्र्वासापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर अधिक भर दिला. मानव सेवा हीच खरी ईश्र्वराची भक्ती असे प्रार्थना समाजाचे मत होते.
समाज सुधारणेच्या बाबतीत प्रार्थना समाजाने आपल्या समोर चार उद्देश ठेवले.
(१)जातिभेद निर्मूलन (२) बालविवाह प्रतिबंध,(३) विधवा विवाह (४) स्त्री शिक्षण ,
या चळवळीचे आध्यात्मिक नेतृत्व न्या. माहदेव गोविंद रानडे यांनी केले राष्ट्रीय काॅंग्रेसच्या अधिवेशनात भरवल्या जाणार्‍या समाज सुधारणा परिषदेच्या संस्थापकांपैकी न्या. रानडे हे होते. प्रार्थना समाजाची शिकवणूक लोकांना कळावी व त्यावरील आक्षेप दूर व्हावे यासाठी न्या. रानडे यांनी एकेश्र्वरी निष्ठेची कैफियत हा निबंध लिहिला. रानडे यांचे असे मत होती की एखादी दुसरी सुधारणा करुन चालणार नाही तर संपूर्ण समाजच बदलावयास हवा ते म्हणतात सुधारणा अमलात आणत असताना भूतकाळाशी संबंध तोडून चालणार नाही कारण शेकडो वर्षाच्या सवयी व प्रवृज्ञ्ल्त्;ा्ीकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. खर्‍या सुधारकाला कोर्‍या पाटीवर लिहावयाचे नाही तर अर्धवट असलेले वाक्य पूर्ण करावयाचे आहे. रानडे यांनी पाश्चात्य संस्कृतीच्या तत्वांचा असा काही सुंदर उपयोग केला की, ही तत्वे भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरावी. डॉ भांडारकरांनी प्राचीन संस्कृत ग्रंथांची भाषांतरे केली. त्यानी आपल्या एका भाषणात परमेश्र्वर सगूण आहे हे तत्वही मान्य केलेले आढळते. परमेश्र्वराची एकाग्रतेने प्रार्थना केली असता, अंत:करण शुध्द होऊन निश्चय सामर्थ्य प्राप्त होते. अशी या समाजाची विचारसरणी होती. प्रार्थना समाजातील सभासद हे बुध्दी प्रामाण्यावादी होते. भागवत धर्मावर त्यांची पूर्ण श्रध्दा होती. म्हणूनच संत तुकाराम व नामदेव या संतांनी सांगितलेल्या शिकवणूकीचा त्यांनी प्रचार केला ना.म.जोशी यांनी १९११ मध्ये कामगारांची स्थिती सुधारावी यासाठी सोशल सर्व्हिस लीग ची स्थापना केली. राजकीय व सामाजिक कार्यकर्ते तयार करण्यासाठी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली. न्या रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी व विधवा डिप्रेस्ड क्लास मिशन स्थापन केले. पंढरपूरचे अनाथ बालिकाश्रम मुलीच्या शाळा इ. संस्था प्रार्थना समाजाच्याच कार्यकर्त्यानी स्थापन केल्या होत्या जस्टिम चंदावरकर व वामन आबाजी मोडक हे देखील प्रार्थना समाजातील मान्यवर सभासद होते.

सावित्रीबाई फुले (Savitribai Phule)

सावित्रीबाई फुले (जन्म : नायगाव-सातारा जिल्हा, जानेवारी ३, इ.स. १८३१ - मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

चरित्र

सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील. इ.स. १८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.
सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.
१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.(यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तरी भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.
सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून मार्च १०, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले . दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या.

सत्कार

पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही. सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.
सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.

सावित्रीबाईची प्रकाशित पुस्तके

  • काव्यफुले (काव्यसंग्रह, १८५४)
  • मातोश्री सावित्रीबाईंचे भाषणे व गाणी (१८९१)

सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित साहित्य

  • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका : शैलजा मोलक)
  • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : ना. ग. पवार)
  • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : नागेश सुरवसे)
  • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (विद्याविकास) (लेखक : ज्ञानेश्वर धानोरकर)
  • त्या होत्या म्हणून (लेखिका : डॉ. विजया वाड)
  • साध्वी सावित्रीबाई फुले (लेखिका : फुलवंता झोडगे)
  • सावित्रीबाई फुले (लेखक : अभय सदावर्ते)
  • सावित्रीबाई फुले (लेखिका : निशा डंके)
  • सावित्रीबाई फुले (लेखक : डी.बी. पाटील )
  • सावित्रीबाई फुले -श्रध्दा (लेखक : मोहम्मद शाकीर)
  • सावित्रीबाई फुले (लेखिका : प्रतिमा इंगोले )
  • सावित्रीबाई फुले (लेखक : जी.ए. उगले)
  • सावित्रीबाई फुले (लेखिका : मंगला गोखले)
  • सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (लेखक : ना. ग. पवार)
  • ’व्हय मी सावित्रीबाई फुले’ हे नाटक (एकपात्री प्रयोगकर्ती अभिनेत्री : सुषमा देशपांडे)
  • ज्ञान ज्योती माई सावित्री फुले (लेखिका : विजया इंगोले)
  • ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका उषा पोळ-खंदारे)
  • Savitribai - Journey of a Trailblazer (Publisher : Azim Premji University)
  • हाँ, मैं सावित्रीबाई फुले -(हिंदी), प्रकाशक : अझिम प्रेमजी विद्यापीठ

सावित्रीबाई संमेलन/पुरस्कार

  • सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक साहित्य संमेलन भरते. याशिवाय, द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन या नावाचे पहिले राज्यस्तरीय संमेलनही नागपूर येथे २-३ जानेवारी २०१२ या तारखांना भरले होते.
  • सावित्रीबाई फुले यांच्या नावाने काही संस्थांनी पुरस्कार ठेवले आहेत. ते असे :-
    • पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सामाजिक कार्यासाठीचा ’सावित्रीबाई फुले पुरस्कार’. हा पुरस्कार २०११-१२ सालापासून दरवर्षी, महिला-बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यास एका समाजसेविकेस दिला जातो. ५००१ रुपये रोख,व सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
    • महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
    • चिंचवडगाव येथील महात्मा फुले मंडळाचे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार
    • महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी(पुणे)तर्फे सावित्रीबाई तेजस कला राष्ट्रीय पुरस्कार
    • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ’आदर्श माता’ पुरस्कार
    • क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार
    • सावित्रीबाई फुले महिलामंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना दिले जाणारे स्त्रीरत्न पुरस्कार : आदर्शमाता रत्न, उद्योग रत्न, कला रत्न, क्रीडा रत्न, जिद्द रत्न, पत्रकारिता रत्न, प्रशासकीय रत्न, वीरपत्नी रत्न, शिक्षण रत्न, वगैरे.
    • मराठी पत्रकार परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
    • क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार
    • मध्य प्रदेश सरकारचा उत्तम शिक्षिकेसाठीचा एक लाख रुपयांचा वार्षिक सावित्रीबाई पुरस्कार (२०१२ सालापासून)

अधिक वाचन

  • फुलवंता झोडगे. ‘साध्वी सावित्रीबाई फुले’. चिनार पब्लिकेशन, पुणे. (मराठी मजकूर) 
  • डॉ. विजया वाड. ‘त्या होत्या म्हणून’. अनुश्री प्रकाशन. (मराठी मजकूर) 
  • "दै. सकाळमधील लेख", सकाळ, ३ जानेवारी, इ.स. २००९. (मराठी मजकूर)
 source:wikipedia

Friday, January 2, 2015

अर्थशास्त्र विविध संकल्पना:- भाग:- 01 (Economics of different concepts: - Part - 2 ) MPSC/STI पूर्वपरीक्षा स्पेशल


अर्थशास्त्रविषयक संज्ञा : अर्थशास्त्रीय लेखनास वारंवार येणाऱ्‍या काही संज्ञांचे अर्थ पुढीलप्रमाणे विशद केलेले आहेत. सर्व संज्ञांचे अर्थ स्थलाभावी देता येणे अशक्य असल्याने, ज्या संज्ञांचा अर्थ कळावयास सुगम आहे, त्या संज्ञांचा समावेश सामान्यपणे करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या संज्ञांचे संक्षिप्त अर्थ खाली दिले असले, तरी त्यांतील काहींच्या स्वतंत्र नोंदीही इतरत्र समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.
अंतर्गत काटकसरी (इंटर्नल इकॉनॉमीज) : उत्पादन-संस्थेचे आकारमान वाढल्यामुळे होणाऱ्‍या खर्चातील बचती.
अंतर्मूल्य (इंट्रिझिक व्हॅल्यू) : चलन ज्या वस्तूवर वा धातूवर मुद्रित केलेले असते त्या वस्तूचे वा धातूचे मूल्य.
अंशनियोजन (पार्शल प्लॅनिंग) : अर्थव्यवस्थेतील काही भागाचे नियोजन करून इतर भाग सामान्यपणे नियोजनाच्या कक्षेबाहेर ठेवणे.
अतिरिक्त लोकसंख्या (ओव्हरपॉप्युलेशन) : पर्याप्त लोकसंख्येपेक्षा अधिक असलेली लोकसंख्या.
अधिमूल्यन (ओव्हरव्हॅल्युएशन) : क्रयशक्ति-समानता सिद्धांताप्रमाणे योग्य असणाऱ्‍या विदेश-विनिमय-दरापेक्षा आपल्या चलनाचा दर अधिक ठेवणे. यामुळे निर्यात घटते व आयात वाढते.
अनुप्रयुक्त अर्थशास्त्र (अ‍ॅप्लाइड इकॉनॉमिक्स) : अर्थशास्त्रीय सिद्धांतांच्या व्यावहारिक उपयोगांचा अभ्यास.
अप्रत्यक्ष कर : ज्या करांच्या बाबतीत करदात्याला ते कर स्वतः न भरता करभार दुसऱ्यावर ढकलणे शक्य असते, अशा प्रकारचे कर. उदा., विक्रीकर, उत्पादन-कर.
⇨ अर्थसंकल्प (बजेट) : आगामी वर्षाच्या कालखंडातील आपल्या आय - व व्यय-विषयक अपेक्षा व धोरण व्यक्त करणारे शासनाने तयार केलेले अंदाजपत्रक.
अर्धविकसित अर्थव्यवस्था (अंडरडेव्हलप्ड इकॉनॉमी) : ज्या अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात औद्योगिक विकास झालेला आहे, अशी अर्थव्यवस्था. अर्थविकसित ही सापेक्ष संकल्पना आहे.
⇨ अवमूल्यन (डिव्हॅल्युएशन) : आपल्या चलनाचे परकीय राष्ट्राच्या चलनाच्या तुलनेत मूल्य कमी करणे. यामुळे परदेशातील वस्तू महाग होतात व आयात कमी होते आणि आपल्या वस्तू परकीयांना स्वस्त झाल्यामुळे निर्यात वाढते.
अवरुद्ध खाती (ब्लॉक्ड अकाउंट्स) : ज्या खात्यांतील रकमा काढून घेण्यास प्रतिबंध केला जातो अशी खाती.
अविकसित अर्थव्यवस्था (अनडेव्हलप्ड इकॉनॉमी) : ज्या अर्थव्यवस्थेत आर्थिक विकास झालेला नाही, अशी अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेत उद्योगधंद्यांचा विकास झालेला नसतो व शेतीही मागासलेलीच असते.
⇨ आंतरराष्ट्रीय देवघेवींचा ताळेबंद (बॅलन्स ऑफ पेमेंट्स) : निर्यात केलेल्या विविध वस्तू व सेवा यांच्यासाठी राष्ट्राला मिळावयाची रक्कम व अशाच आयातीसाठी राष्ट्राने द्यावयाची रक्कम यांचा ताळेबंद. हा प्रतिकूल असेल, तर राष्ट्राला तेवढे सुवर्ण निर्यात करावे लागते किंवा तेवढी तरतूद करण्यासाठी परकीय राष्ट्राकडून किंवा आंतरराष्ट्रीय चलननिधीसारख्या संस्थेकडून कर्ज मिळवावे लागते.
⇨ आंतरराष्ट्रीय व्यापारदर (टर्म्स ऑफ ट्रेड) : एखादे राष्ट्र आयात करीत असलेल्या वस्तूंच्या किंमतींची पातळी व निर्यात करीत असलेल्या किंमतींची पातळी यांमधील परस्परसंबंध. आयात मालाचे भाव चढले परंतु निर्यात मालाचे पूर्वीचेच राहिले, तर पूर्वीइतकीच आयात करण्यासाठी अधिक निर्यात करावी लागते, व व्यापारदर त्या राष्ट्राविरूद्ध गेला आहे असा निर्देश केला जातो.
⇨ आंतरराष्ट्रीय व्यापारसंतुलन (बॅलन्स ऑफ ट्रेड) : दोन राष्ट्रांतील वस्तूंच्या आयातनिर्यातीच्या एकूण मूल्याचे संतुलन. यात सेवांच्या आयातनिर्यातीचा समावेश नसतो.
आयातकोटा (इंपोर्ट कोटा) : कोणती वस्तू किती आयात करता येईल, ह्या दृष्टीने घातलेली मर्यादा.
आर्थिक मानव (इकॉनॉमिक मॅन) : केवळ आर्थिक प्रेरणांनुसार व्यवहार करणारा अर्थशास्त्रज्ञांनी कल्पिलेला मानव.
इतर परिस्थिती कायम राहिल्यास (सेटेरिस पॅरिबस) : तात्त्विक आर्थिक सिद्धांत व्यवहारात अनुभवास येणे हे विशिष्ट परिस्थितीच्या अस्तित्वावर अवलंबून असल्यामुळे त्यांची परिस्थिति-सापेक्षता दर्शविणारा वाक्प्रचार.
उतरत्या प्रतिलाभाचा नियम (लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स) : इतर उत्पादन-घटकांचे प्रमाण पूर्वीचेच ठेवून एखाद्या घटकाचा अधिकाधिक वापर केल्यास त्या घटकाच्या वापरल्या जाणाऱ्‍या नगांस उत्तरोत्तर कमी कमी उत्पादनफल मिळत जाते, हे तत्त्व.
उत्थान (टेक-ऑफ) : परकीयांच्या मदतीखेरीज स्वयंगतीने पुढील विकास चालू ठेवण्याची अर्थव्यवस्थेची क्षमता.
⇨ उत्पादन-संस्था (फर्म) : उत्पादन, व्यापार ह्या क्षेत्रांतील प्रवर्तक संघटना.
उत्पादनाचे घटक (फॅक्टर्स ऑफ प्रॉडक्शन) : उत्पादनप्रक्रियेस आवश्यक असलेले जमीन, श्रम, भांडवल आणि संघटन हे साधन-घटक.
उद्गामी कर (प्रोग्रेसिव्ह टॅक्सेस) : अधिक श्रीमंत वर्गावर उत्तरोत्तर वाढत्या दराने आकारले जाणारे कर.
⇨ उद्योग (इंडस्ट्री) : एकाच प्रकारच्या वस्तूचे उत्पादन करणाऱ्‍या प्रवर्तक संघटनांचा समूह.
⇨ उपभोक्त्याचे संतोषाधिक्य (कंझ्यूमर्स सरप्लस) : वस्तूस अधिक किंमत देण्याची ग्राहकाची मानसिक तयारी असूनही, ती बाजारातील किंमतीप्रमाणे कमी दरात मिळाल्यामुळे ग्राहकाला मिळणारा अधिक संतोष.
उपभोक्त्याचे सार्वभौमत्व (कंझ्यूमर्स सॉव्हरिन्टी) : उत्पादनाला मागणी प्रेरणा देत असते व मागणी उपभोक्त्यांच्या इच्छेवर व क्रयशक्तीवर अवलंबून असते, या दृष्टीने उपभोक्ता हा सार्वभौम मानला जातो.
उपयुक्तता-मूल्य (यूस व्हॅल्यू) : वस्तूच्या पुरवठ्याचा विचार न करता, तिच्या केवळ उपयोगितेवर मापले जाणारे मूल्य.
⇨ उपयोगिता (युटिलिटी) : मानवी गरज भागविण्याची वस्तूची वा सेवेची शक्ती.
ऊर्ध्वाधर-संयोग (व्हर्टिकल इंटिग्रेशन) : उत्पादनातील विविध स्तरांतील क्रियांचे एकसूत्रीकरण.
⇨ औद्योगिक संबंध (इंडस्ट्रियल रिलेशन्स) : मालक व कामगार ह्यांचे परस्परसंबंध.
⇨ औद्योगिक संयोजनीकरण (इंडस्ट्रियल रॅशनलायझेशन) : उद्योगधंद्याची वा अन्य आर्थिक क्षेत्राची नवीन तंत्रांच्या वा यंत्रांच्या साहाय्याने शास्त्रशुद्ध पुनर्रचना.
करदानक्षमता (टॅक्सेबल कपॅसिटी) : कर देण्याची कुवत. ही व्यक्तीच्या उत्पन्नावर व शासनाच्या धोरणाविषयी तिला वाटणाऱ्‍या उत्साहावर अवलंबून असते.

❄❅❆❇❈❉❊ मराठी व्याकरण ❂❃❄❅❆❇❈❉❊ (Grammar) MPSC/STI पूर्वपरीक्षा स्पेशल

१.व्याकरण :
भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व
त्याच्या परस्परांशी असलेला संबंध
ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात.
२.वर्ण विचार :
ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.
१.स्वर :ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात .
१.ऱ्हस्व स्वर : अ,इ,उ,ऋ,लृ .
२.दिर्घ स्वर : आ,ई ,ऊ,ए,ऐ,ओ,औ.
३.स्वरादी : ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने होतो त्यास स्वरादी म्हणतात
उदा-अं,आ:
४.सहजतीय स्वर :एकाच उच्चार स्थानातून निघणारे
उदा-अ,आ /इ ,ई /उ ,ऊ .
५.विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर उदा-अ ,इ /आ ,ई /अ ,उ .
६.सयुक्त स्वर :दोन स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे सयुक्त स्वर होय .
उदा-अ +इ =ऐ , अ +उ =ओ ,अ +ओ =औ .
२.व्यंजन :
ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात .
१.महाप्राण व्यंजन : ह,चे प्राबल्य असते.
२.अल्प प्राण व्यंजन :ह,चे प्राबल्य नसते.
३.स्पर्श व्यंजन :क ,च ,ट ,त ,प
४.अंतस्थ व्यंजन :य,र,ल ,व.
५.उष्ण व्यंजन :श ,ष ,स
६.नासिक्य : ड;,त्र ,ण ,न ,म .
३.वर्णाची उच्चार स्थाने :
१.कंठ्य :क,अ,आ.
२.तालव्य :च,इ,ई,
३.मूर्धन्य :ट ,र,स.
४.दंत्य : त,ल,स
५.ओष्ठ्य :प,उ,ऊ .
६.अनुनासिक : ड;,त्र ,ण ,न ,म,
७.कंठ तालव्य :ए ,ऐ.
८.कंठ ओष्ठ :ओ,औ.
९.दान्तोष्ठ : व .
४.वर्णमाला शिकवितांना वापरावयाचे दृक श्राव्य साधने :
१.वर्णमालेच तक्ता वापरणे.
२.शब्द पट्या वापराव्या.
३.चित्राचा वापर करावा –गरुड “ग”
४.खादा फलक वापरावा.
५.रेषा,गोल,अर्धवर्तुळ ,कमान काढून दाखवणे,
६.रंगीत खडू व रंगीत चित्राचा वापर करणे .
७.विद्यार्थाला वर्णमालेच्या वह्या बाजारातुन उपलब्ध करून देऊन प्रात्यक्षिक देणे.
८.हस्ताक्षर स्पर्धा घेणे.
५.शब्दाच्या जाती :
१.विकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचनं,बदल होतो त्यास विकारी शब्द म्हणतात.
१.नाम (संज्ञा )व्यक्ती ,वस्तु,स्थान,पद
ार्थ ,जागा,
१.व्यक्ती वाचक संज्ञा :सीताराम,गोपाल.
२.जातीवाचक संज्ञा :गाव,नदी.
३.भाववाचक संज्ञा :लहानपण,धैर्य.
४.समूह वाचक संज्ञा :भीड,संघ .
द्रव्य वाचक संज्ञा :पाणी,सोना
२.सर्वनाम : नामाचा वारंवार उपयोग
टाळण्यासाठी
१.पुरुषवाचक सर्वनाम : मी,तु.
२.निश्चय वाचक सर्वनाम : हे ,ते,त्या,
३.अनिश्चय वाचक सर्वनाम : कोणी,काही.
४.संबंध वाचक सर्वनाम : जो,जी ,जे .
५.प्रश्न वाचक सर्वनामे :का ?काय?कोठे ?कोण ?कोणाला ? कोणाचा ? कोणता ? केंव्हा ? किती ?
३.विशेषण : नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे .
१.गुण वाचक विशेषण :लहान ,मोठा,सुंदर ,हुशार .
२.संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.
३.परिणामवाचक विशेषण :
चांगला परिणाम ,वाईट परिणाम .
४.संकेत वाचक विशेषण :हे ,ते .
४.क्रियापद : एखादी क्रिया घडणे .
१.सकर्मक क्रियापद :पाहणे ,खेळणे .
२.अकर्मक क्रियापद : हसणे ,रडणे.धावणे,
३.संयुक्त क्रियापद :आहे, होता, असेल .
२.अविकारी शब्द : ज्या शब्दाचे
लिंग ,वचन,यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारी शब्द म्हणतात.
१.क्रियाविशेषण :क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे .
१.स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा .
२.कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल .
३.परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व.
४.रितीवाचक क्रियाविशेषण :
अचानक,हळूहळू ,जोरात .
२.शब्दयोगी अव्यव :नामाला व
सर्वनामाला अर्थ बोध होण्यासाठी जोडून येणारा शब्द .स,ला,ना,ते ,आत ,बाहेत,जवळ,पुढे .
३.उभयान्वयी अव्यय :दोन किंवा तीन वाक्य एकत्र करणारा शब्द .आणि ,पण,परंतु, किंवा .
४.केवळ प्रयोगी अव्यय : आपल्या मनातील विकाराला अभिव्यक्त केले जाणारे शब्द . वाह !, अरे !, छट !
५.लिंग विचार व वचन विचार :
लिंग विचार :
१.पुल्लिंग –मोर,विद्वान,उंट .
२.स्त्रील्लिंग :लांडोर,विदुषी,सांडणी.
३.नपुसकलिंग : झाड,घर,पुस्तक .
वाचन विचार :
१.एक वचन: पुस्तक .
२.अनेक वचन : पुस्तके .
३.बहुवचन : आपण,तुम्ही .सारे,सर्व,
६.संधी विचार:
१.जगन्नाथ : जगत +नाथ .
२.गुर्वाज्ञा : गुरु +आज्ञा .
३.सुर्याद्य : सूर्य + उदय .
४.लंकेश्वर : लंका + ईश्वर .
५.जलौघ : जल + ओघ .
६.यशोधन : यश + धन .
७.महर्षी : महा +ऋषी .
८.विद्यार्थी : विद्या +अर्थी .
९.सिंहासन : सिंह + आसन .
१०.श्रेयश : श्रेय + यश .
७.समास विचार :
१.तत्पुष समास :
गायरान,कुभकर,अज्ञान,नापसंत ,अनादर,अग्रेसर, मावसभाऊ ,साखरभात .
२.द्वंद समास :
१.इतरेतर द्वंद समास : आणि,व
कृष्णार्जुन =कृष्णा आणि अर्जुन ,खरेखोटे =खरे व खोटे.
२.वैकल्पिक द्वंद समास : अथवा,किंवा,वा.
जयापजय =जय अथवा पराजय.
यशपयश =यशा अथवा अपयश .
३.समाहार द्वंद समास : वगैरे .
मीठभाकर =चटणी ,कांदा,वगैरे.
देवधर्म =पुजा ,आज्ञा,वगैरे.
३.दिवगु समास :
१.नऊग्रह : नऊग्रहाचा समूह.
२.पंचपाळे : पाच पाल्याचा समूह.
३.नवरात्र : नऊ रात्रीचा समूह.
४.पंचवटी : पाच नद्याच समूह .
४.बहुब्रूही समाज :
१.पितांबर : पिवळे वस्त्र धारण केले आहे असा तो महादेव .
२.नीलकंठ : नीळा आहे कंठ असतो .
३.गजानन : गजाचे आनंद असतो.
४.भालचंद्र : ज्याच्या शरीरावर भाला असतो.
५.अव्यायी भाव समास :
१.दररोज : प्रत्येक दिवसी .
२.दरवर्षी : प्रत्येक वर्षी .
८.प्रयोग ओळख :
१.मुले विटी दांडू खेळतात : कर्तरी प्रयोग.
२.गवळ्याने गाईला बांधले : भावे.
३.रामाने आंबा खाल्ला : कर्मणी प्रयोग .
४.राजु घरी आहे नाही : कर्तरी प्रयोग .
५.राक्षसाने युद्ध केले : कर्मणी प्रयोग .
६.रामाने रावणास मारले : भावे प्रयोग .
९.वाक्य विचार :
१.अर्थावरून वाक्याचे प्रकार :
१.विधानात्मक वाक्य : मी मराठी वाचतो.
२.प्रश्नार्थक वाक्य : तु मराठी वाचतो ?
३.आज्ञार्थी वाक्य : हिंदी वाचा.
४.उदगार वाचक वाक्य : वाह ! खूप मोठे आहे.
५.नकारात्मक वाक्य : मी गणित वाचत नाही .
६.होकारात्मक वाक्य : मी गणित सोडवतो.
१०.रचनेवरून वाक्याचे प्रकार :
१.सरल (शुद्ध ) वाक्य : मी मराठी वाचतो एक क्रिया.
२.मिश्र वाक्य : एक वाक्य प्रधान दुसरे गौण वाक्य.
उदा-तो म्हणाला कि मी पुस्तक वाचीन.
३.सयुक्त वाक्य : अनेक उपवाक्य असतात.
उदा –राजू शाळेत गेला त्याने शिक्षकास विचारले आणि पेपर सोडायला बसला.
११.काळ विचार :
१.वर्तमान काळ : मी मराठी वाचतो.
२.भूतकाळ : मी मराठी वाचले .
३.भविष्य काळ : मी मराठी वाचीन.
१२.एकूण विरांम् चिन्ह :
१.पुर्ण विरांम् (.) : मी पुस्तक वाचतो.
२.अर्ध विरांम् (;)संयुक्त वाक्यात असतो.
३.अल्प विरांम् (,) : टिळक ,नेहरू ही चांगली माणसे होती.
४.प्रश्न चिन्ह (?) : तु काय वाचतो?
५.उदगारवाचक (!) वाह ! काय चांगले गाडी आहे.
६.अवतरण चिन्ह (“ “)(‘ ‘): दादा म्हणाला,
“तुलदास राम भक्त होते”.
७.संयोग चिन्ह (-) : काम-क्रोध त्याग करावा.
८.निर्देशक चिन्ह (--): आपले दोन शत्रू आहेत --काम आणि क्रोध .
९.कंस () स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे म्हणून मी तो मी मिळवणारच (लोकमान्य टिळक )
१०.द्वी बिंदू : मोर : आपला राष्ट्रीय
पक्षी आहे.
११.अधोरेखा (---------- ): चुकीचे ऐकणे म्हणजे .......... होय .(अपश्रवन)
‪#‎मराठी‬ शब्द अलंकार :-
व्याख्या:- कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार .
अलंकारांचे प्रकार:-
उपमा:- उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो. या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते. 'एक वस्तु दुसर्या वस्तूसारखी आहे' असे वर्णन असते. दोन वस्तूतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंकार होतो.
उदा० सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी आभाळा गत माया तुझी आम्हांवरी राहू दे
उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा हा मराठी
भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो.
(जणू,गमे,वाटे,भासे,की)
उदा० ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू.
सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानच हे जणू.
अत्रीच्या आश्रमी
नेले मज वाटे
माहेरची वाटे
खरेखुरे
अपन्हुती:- (अपन्हुती म्हणजे लपविणे/झाकणे) अपन्हुती हा मराठी
भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
*"उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा 'अपन्हुती' हा अलंकार होतो."
उदा.- न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल |
न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ ||
स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात
'कमळातल्या पाकळ्या' आणि 'शरदिचा चंद्रमा' या उपमानांनी अनुक्रमे 'नयन' आणि 'वदन' या उपमेयांना नाकारल्यामुळे इथे 'अपन्हुती' अलंकार झालेला आहे.
ːअन्य उदाहरणे-
1. हे हृदय नसे परी स्थंडिल धगधगलेले |
2. ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे |
3. आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोक भारी नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी
अन्योक्ती:- अन्योक्ती हा मराठी
भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. दुसर्यास उद्देशून केलेली उक्ती. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसर्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत तिलाच अन्योक्ती असे म्हणतात.
उदा:-येथे समस्त बहिरे बसतात लोक का भाषणे मधुर तू करिशी अनेक हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक कोकिल वर्ण बघुनि म्हणतील काक
पर्यायोक्ती:- एखादी गोष्ट आडवळणाने सांगणे.त्याचे वडील 'सरकारी पाहुणचार' घेत आहेत. ( तुरुंगात आहेत)
विरोधाभास:-एखाद्या विधानात वरवर विरोध दिसतो पण वास्तवात तसा नसतो.
उदा:-जरी आंधळी मी तुला पाहते
सर्वच बोलू लागले की कोणी ऐकत नाही
व्यतिरेक:- (विशेष स्वरूपाचा अतिरेक)
व्यतिरेक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
*"जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा 'व्यतिरेक' अलंकार होतो."
ːउदा.- 'अमृताहुनि गोड नाम तुझे देवा'
स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात परमेश्वराचे नाव हे उपमेय गोडीच्या बाबतीत अमृत या उपमानापेक्षाही वरचढ आहे (श्रेष्ठ आहे ) असे
वर्णन केलेले असल्यामुळे इथे 'व्यतिरेक' अलंकार झालेला आहे.
ːअन्य उदाहरणे-
1. कामधेनुच्या दुग्धाहुनही ओज हिचे बलवान
2. तू माउलीहून मयाळ | चंद्राहूनि शीतळ |
पाणियाहुनि पातळ | कल्लोळ प्रेमाचा ||
3. सावळा ग रामचंद्र
रत्नमंचकी झोपतो
त्याला पाहून लाजून
चंद्र आभाळी लोपतो
रूपक:- रुपक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
उपमेय आणि उपमान यांत एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो.
उदा:
बाई काय सांगो
स्वामीची ती दृष्टी
अमृताची वृष्टी
मज होय
ऊठ पुरुषोत्तमा
वाट पाहे रमा
दावि मुखचंद्रमा
सकळिकांसी
अतिशयोक्ती:- अतिशयोक्ती हा मराठी
भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
अलंकारात प्रत्यक्षात असणारी कल्पना ही फारच फुगवून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. उपमा, उत्प्रेक्षा, रुपक, व्यतिरेक ह्या अलंकारात अतिशयोक्ती असतेच पण कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करुन सांगितलेली असते तेव्हा हा अलंकार होतो.
उदा: जो अंबरी उफळता खुर लागलाहे
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे
काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर
अनन्वय:- अनन्वय हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते.
उदा: आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान
भ्रान्तिमान:- उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होणे.
भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे
पाहूनि मानूनी तिचीच विशाल नेत्रे
घालीन अंजन अशा मतिने तटाकी
कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी
भुंग्यांनी सुशोभित झालेली कमलपत्रे हे दमयंतीचे नेत्रच आहेत असे समजून तिच्या डोळ्यात अंजन घालावयास निघालेला नलराजा पुढे सरसावला आणि पाण्यामुळे भिजला.
ससंदेह:- उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संदेह निर्माण होणे भ्रान्तिमानात हा भ्रम निश्चित
असतो.
कोणता मानू चंद्रमा ? भूवरीचा की नभीचा?
चंद्र कोणता? वदन कोणते?
शशांक मुख की मुख शशांक ते?
निवडतील निवडोत जाणते
मानी परी मन सुखद संभ्रमा- मानू
चंद्रमा कोणता?
दृष्टान्त:- एखादा विषय पटवून सांगताना दाखला देणे.
उदा:
लहानपण दे गा देवा,
मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर,
त्यासी अंकुशाचा मार
अर्थान्तरन्यास:-अर्थान्तरन्यास हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. एखाद्या विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे देणे आणि सिद्धान्त मांडणे.
(अर्थान्तर- दुसरा अर्थ, न्यास- शेजारी ठेवणे )
तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन-जल-केली जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो कठिण समय येता कोण कामास येतो?
स्वभावोक्ती:-एखाद्या व्यक्त्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, स्वाभाविक स्थितीचे, हालचालीचे यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन.
उदा: गणपतवाणी विडी पिताना चावायाचा नुसतीच काडी म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी मिचकावुनी मग उजवा डोळा आणि उडवूनी डावी भिवई भिरकावुनि ती तशिच द्यायचा लकेर बेचव जैसा गवई
अनुप्रास:- एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील
नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.
उदा: गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले रजनीतल,ताम्रनील
स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटि नावांचा कृष्ण मेळ खेळे.
पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी गळ्यामधे गरिबच्या गाजे संतांची वाणी
चेतनगुणोक्ती:- (चेतनाचे गुण सांगणारी उक्ती) चेतनगुणोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
*"जेव्हा एखादी अचेतन (निर्जीव) वस्तू सचेतन (सजीव) आहे असे मानून ती सजीव प्राण्याप्रमाणे, माणसाप्रमाणे वागते असे वर्णन केलेले असते तेव्हा 'चेतनगुणोक्ती' हा अलंकार होतो."
ːउदा.- डोकी अलगद घरे उचलती |
काळोखाच्या उशीवरूनी ||
स्पष्टीकरण- काळोखाच्या उशीवरून (निर्जीव) घरे आपली डोकी उचलतात म्हणजे झोपेतून जागी होतात. येथे घर हा निर्जीव घटक माणसाप्रमाणे वर्तन करतो असे वर्णन आल्यामुळे इथे चेतनगुणोक्ती अलंकार होतो.
ːअन्य उदाहरणे-
1. चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी , काही केल्या फुलेना || [२]
2. मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे||
3. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरी सौद्याचे, देईल ज्याचे त्याला
यमक:-कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो.
उदा: जाणावा तो ज्ञा नी
पूर्ण समाधानी
निःसंदेह म नी
सर्वकाळ
पुष्ययमक
सुसंगति सदा घ डो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो
दामयमक
आला वसंत कविकोकिल हाही आ ला
आलापितो सुचवितो अरुणोदया ला
श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.
उदा: सूर्य उगवला झाडीत...
म्हारिण* रस्ता झाडीत...
शिपाइ गोळ्या झाडीत ...
अन् वाघहि तंगड्या झाडीत...
राम गणेश गडकरीकृत हे एक "झाडीत"
या शब्दावरील श्लेषाचे उदाहरण
जातीयवाचक शब्दाबद्दल क्षमस्व. आहे तसे लिहिले आहे.
शब्दश्लेष:- वाक्यात दोन अर्थ असणार्या शब्दाबद्दल दुसर्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात
अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.
उदा: मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत
नाही?
मित्र- सूर्य/सवंगडी
अर्थश्लेष:-वाक्यात दोन अर्थ असणार्या शब्दाबद्दल दुसर्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात
अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.
उदा: तू मलिन, कुटिल, नीरस जडहि पुनर्भवपणेहि कच
साच कच - केस/कच हा हा
सभंग श्लेष:-
उदा: श्रीकृष्ण नवरा मी नवरी
शिशुपाल नवरा मी न-वरी
कुस्करू नका ही सुमने
जरी वास नसे तीळ यांस, तरी तुम्हांस
अर्पिली सु-मने
ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले
औषध नलगे मजला,औषध नल-गे मजला,
परिसुनि माता 'बरे' म्हणूनी डोले
असंगती:- कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसर्याच ठिकाणी असे वर्णन असते.
कुणि कोडे माझे उकलिल का?
कुणी शास्त्री रहस्य कळविल का?
हृदयी तुझ्या सखि, दीप पाजळे,
प्रभा मुखावरी माझ्या उजळे
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला
सार:- एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधणे. काव्यात नाटके रम्य, नाटकांत शकुंतला त्यामध्ये चवथा अंक, त्यातही चार श्लोक ते
व्याजस्तुती:- बाह्यतः स्तुती आणि आतून
निंदा अथवा ह्याच्या उलट असे वर्णन.
होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आस ती
अर्धचंद्र तू द्यावा, कृपा याहून कोणती
व्याजोक्ती:- (व्याज + उक्ती=खोटे बोलणे)
एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून खोटे दुसरेच कारण देणे.
येता क्षण वियोगाचे पाणी नेत्रांमध्ये दिसे
'डोळ्यात काय गेले हे?' म्हणूनी नयना पुस
------------------------------------------
Note:- माहिती चांगली आणि उपयुक्त वाटल्यास नक्की SHARE करा.