Sunday, December 28, 2014

(Constitution of independent India) स्वतंत्र भारताची राज्यघटना


लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट च्या स्वरुपात १९२८ मध्ये घटनेबाबतच्या शिफारशी देण्यात आल्या होत्या. गोलमेज परिषदेतही घटना निर्मितीबाबत कॉंग्रेसने आग्रह धरला. ३० मार्च १९४२ रोजी क्रिप्स योजना जाहीर झाली. त्यानुसार महायुध्द समाप्तीनंतर भारतासाठी एक घटना परिषद नेमण्याचे आश्र्वासन देण्यात आले व १९४६ च्या कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार घटना समितीच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली.
त्रिमंत्री योजनेनुसार १० लाख लोकांमागे एक अशा प्रमाणात प्रतिनिधींची निवड करण्यात येऊन घटना परिषदेची निर्मिती झाली. या परिषदेमध्ये सर्वसामान्य २१० मुस्लीम ७८ शीख ४ इतर ४ अशा २९६ प्रतिनिधींची निवड करण्यात आली. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ. सच्चिदानंद सिन्हा निवडले गेले. त्यांच्या अध्याक्षतेखाली अध्यक्षपदी डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड झाली घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणुन डॉ. एच. सी. मुखर्जी यांची तर समितीचे सल्लागार म्हणून डॉ. बी. एन. राव यांची निवड झाली. याचबरोबर सा समितीमध्ये प्रमुख सदस्य म्हणुन पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, डॉ. राधाकृष्णन, के.एम. मुन्शी डॉ. जयकर इत्यादींचा सहभाग होता.
घटना परिषदेमार्फत २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसूदा समितीची निवड झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मसूदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर बी. एन. राव, एस, एन. मुखर्जी, इ. मसुदा समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले घटनेच्या मसुद्यामध्ये ३१५ कलमे व ७ परिशिष्टे आहेत. घटना समितीने भारताच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती केली. तर गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या भारत भाग्य विधाता, या गीताला राष्ट्रगीताचा मान देण्यात आला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी नवीन राज्यघटनेला मंजूरी देण्यात आली. राज्यघटना निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे.
म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. २६ जानेवारी १९५० पासून नवीन राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरु झाला. म्हणून हा दिवस सर्व देशभर साजरा केला जातो. भारताचे संविधान हा राज्यघटनेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. घटनेची ध्येये आणि उद्दिष्टे यात प्रतिबिंब्ंिात झाली आहेत. भारताचे संविधान खालीलप्रमाणे.
भारताचे संविधान

आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्र्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता:
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्र्वासन देणारी बंधूता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन,
आमच्या संविधान सभेस आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे :-

(१) लिखित घटना
भारताची राज्यघटना लिखित स्वरुपाची आहे. इंग्लंडच्या घटनेप्रमाणे ती अलिखित नाही. राज्यकारभाराबाबतचे नियम, कोणाचे काय अधिकार व कर्तव्य याबाबतची माहिती राज्यघटनेत देण्यात आयली आहे. घटना लिखित असली तरी काही अलिखित परंपरा पाळल्या जातात. उदा. एकच व्यक्ती तीन वेळा भारताचा राष्ट्रपती होऊ शकत नाही.
(२) जगातील सर्वात मोठी विस्तृत राज्यघटना
भारतीय राज्यघटना व्यापक व विस्तारित स्वरुपाची आहे. घटनेमध्ये ३९५ कलमे, ९ परिशिष्टे आहेत, केंद्र व प्रांत यांचे स्वरूप व अधिकार, न्यायव्यवस्थेचे अधिकार, निवडणूक आयोगाचे अधिकार, याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. यामुळे भारतीय राज्यघटना जगातील इतर देशांच्या तुलनेत विस्तृत स्वरूपाची आहे.
(३) लोकांचे सार्वभौमत्व
घटनेनुसार जनता सार्वभैाम आहे. जनतेच्या हाती खरी सज्ञ्ल्त्;ाा आहे. कारण जनता आपल्या प्रतिनिधीमार्फ़त राज्यकारभार चालविते राष्ट्रप्रमुखाची (राष्ट्रपती) निवड जनता आपल्या प्रतिनिधीकरवी करते. निवडणुकीच्या माध्यमातुन जनता आपणास आवश्यक असा बदल घडवून आणू शकते. २६ जानेवारी १९५० पासून घटनेनुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणुन साजरा केला जातो.
(४) संसदीय लोकशाही
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी लोकशाही शासनपध्दतीची मागणी केली होती. घटनाकारांनी इंग्लंडचा आदर्श समोर ठेवून संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. लोसभा व राज्यसभेची निर्मिती करण्यात आली. लोकसभेतील सदस्य पक्ष आपले मंत्रिमंडळ (कार्यकारीमंडळ) बनवतो. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार आहे. लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती, मिळून भारतीय संसद निर्माण झाल्याचे दिसून येते.
(५) संघराज्यात्मक स्वरूप
भारतीय घटनेने संघराज्यात्मक शासनपध्दतीचा स्वीकार केला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात सत्तेचे विभाजन करण्यात आले. आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांना आपआपले अधिकार देण्यात आले आहेत. मात्र आणीबाणीच्या वेळी भारतीय संघराज्याचे स्वरूप एकात्म झाल्याचे दिसून येते.
(६) घटना अंशत परिवर्तनीय व अंशत परिदृढ
लिखित व अलिखित याप्रमाणेच परिवर्तनीय व परिदृढ असे घटनेचे प्रकार आहेत. इंग्लंडची राज्यघटना अतिशय लवचीक तर अमेरिकेची राज्यघटना अतिशय ताठर स्वरूपाची आहे. भारतीय राज्यघटना इंग्लंइतकी लवचीक नाही व अमेरिकेइतकी ताठरही नाही. भारतीय घटनादुरुस्तीची पध्दत कलम ३६८ मध्ये देण्यात आलेली आहे. एखाद्या साधारण मुद्यावर संसदेच्या साध्या बहुमताने घटनेत दुरुस्ती करण्यात येते मात्र राष्ट्रपतीची निवडणूक पध्दत केंद्र व प्रांत यांचे अधिकार, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, इ. महत्वपूर्ण बाबीविषयी घटनेत दुरुस्ती करताना संसदेच्या २/३ सदस्यांची अनुमती निम्म्याहून अधिक घटक राज्याच्या विधिमंडळाची अनुमती आवश्यक असते. त्यामुळे भारतीय घटना अंशत, परिवर्तनीय व अंशत परिदृढ अशा स्वरुपाची बनविण्यात आली आहे.
(७) मूलभूतहक्क
भारतीय राज्यघटनेत व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर भर देण्यात आला आहे. कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत हक्क्ांचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य समता शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्य संपत्तीचा हक्क, पिळवणुकिविरुध्द हक्क इ. महत्वपूर्ण हक्क व्यक्तीला देण्यात आलेले आहेत. हक्काबरोबरच व्यक्तीला काही कर्तव्यही पार पाडावी लागतात. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. घटनेत व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा समावेश हे घटनेचे महत्वाचे वैशिष्टे आहे.
(८) धर्मनिरपेक्ष राज्य
भारत हे धर्मातील राष्ट्र संबोधण्यात आले आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माला राजाश्रय न देता सर्व धर्माना समान लेखण्यात आले आहे. प्रत्येकाला आपआपल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याचा, आचरण ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सर्व धर्मीयांना समान लेखण्यात आले. असून धर्म, जात पंथ, याद्वारे भेदभाव न करता सर्वाना समान संधी देण्यात आली आहे.
(९) एकेरी नागरिकत्व
अमेरिकन व स्वित्झर्लंड या देशामध्ये केंद्र व प्रांत यांचे दुहेरी नागरिकत्व देण्यात आलेले आहे. भारतात संघराज्यात्मक पध्दतीचा स्वीकार केलेला असूनही केंद्राचे व घटक राज्याचे असे वेगळे नागरिकत्व व्यक्तीस देण्यात आलेले नाही. प्रत्येक भारतीय यास संघराज्याचे नागरिकत्व देण्यात आलेल आहे. राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावे यासाठी एकेरी नागरिकत्वाची पध्दत स्वीकारण्यात आली आहे.
(१०) एकच घटना
ज्याप्रमाणे एकेरी नागरिकत्वाच पुरस्कार करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणेच देशातील सर्व नागरिकांसाठी एकाच घटनेची तरतूद करण्यात आली आहे. घटक राज्यांना स्वतंत्र अशी घटना बनविण्याचा अधिकार नाही. घटक राज्यांना संघराज्याबाहेर फुटून निघण्याचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे.
(११) राज्यघटना हीच सर्वश्रेष्ठ
देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे त्या देशाची राज्यघटना होय. राज्यघटनेच्या सर्वश्रेष्ठत्वाला आव्हान देता येत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश, मंत्री यांना राज्यघटनेची एकनिष्ठ राहण्याबाबत शपथ घ्यावी लागते.
(१२) जनकल्याणकारी राज्याची निर्मिती
भारताचा राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फ़त चालतो. भारताचा राष्ट्रपती हा इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंश परंपरेनुसार नसतो, तर अप्रत्यक्ष निवडणूक पध्दतीने निवडण्यात येतो. जनता आपणास हवे असणारे सरकार निर्माण करू शकते व हे सरकार जनकल्याणासाठी बांधील असते.
(१३) मार्गदर्शक तत्वे
व्यक्तीला मूलभूत हक्कांना कायदेशीर मान्यता असते. मूलभूत हक्कांची शासनाकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून पायमल्ली झाल्यास संबंधिताला न्यायालयात दाद मागता येते. मात्र मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत हे धोरण लागू पडत नाही. मार्गदर्शक तत्वे व्यक्तीला कल्याणासाठी असली तरी ती सरकारने पाळलीच पाहिजेत असे सरकारवर बंधन नसते. मार्गदर्शक तत्वे ही नावाप्रमाणे मार्ग दाखविण्यासाठी उपयुक्त ठरतात. भारतीय घटनेतील काही निवडक मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे (१) जीवनावश्यक गोष्टी सर्वाना मिळाव्यात (२) राज्यातील सर्वासाठी एकच मुलकी कायदा असावा (३) राज्यातील सर्व स्त्री -पुरुषांना समान वेतन असावे. (४) १४ वर्षाखालील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण असावे (५) संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये (६) देशातील साधनसंपज्ञ्ल्त्;ा्ीचे समाजहिताच्या दृष्टीने वाटप व्हावे. (७) दारुबंदी व इतर उपायांनी लोकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे.
(१४) स्वतंत्र न्यायालय व्यवस्था
लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी न्यायालयांना स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. भारतास एकेरी न्यायव्यवस्था आहे. सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, जिल्हा, कोर्ट व इतर दुय्यम न्यायालये यांची एक साखळी निर्माण करण्यात आली आहे. न्याय व्यवस्थेवर राजकीय सत्तेचा दबाब येऊ नये यासाठी विधिमंडळ व कार्यकारीमंडळ यांच्या पासून न्यायमंडळाची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे. न्यायाधीशांची नेमणूक बदली, बढती, पगार, या सर्व गोष्टींना संरक्षण देऊन न्यायाधीशांकडून कार्यक्षम व निपक्षपाती न्यायाची अपेक्षा करण्यात आली आहे.
(१५) राष्ट्रपती व त्यांचे आणीबाणीचे अधिकार
भारताचा राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे. त्यांची निवड संसद सदस्य व विधानसभा सदस्यांकडून क्रमदेय निवड पध्दतीने होत असते. सर्व महत्वपूर्ण गोष्टी राष्ट्रपतींच्या नावे होत असल्या तरी प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या हाती सज्ञ्ल्त्;ाा केंदि्रत झाली आहे. भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक अंमलबजावणीविषयक आर्थिक बाबीविषयी घटक राज्याविषयक, न्यायविषयक व संकटकाल विषयक अशा सहा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. भारतीय राष्ट्रपतीला मिळालेला संकटकाल विषयक अधिकार अत्यंत महत्वाचा आहे.
(१६) हिंदी भाषेस राष्ट्रभाषेचा दर्जा
भारतीय राज्यघटनेत भाषाविषयक धोरण स्पष्ट करण्यात आले आहे. अनुच्छेद ३४३ मध्ये स्पष्ट घोषणा करण्यात आली आहे की, भारत या संघराजयाची अधिकृत भाषा देवनागरीतील हिंदी ही राहील. प्रादेशिक राज्यकारभार ज्या त्या प्रादेशिक भाषेमधून चालविण्याबाबत घटनेत स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्रजी एक जादा भाषा म्हणून राहील. आंतराष्ट्रीय व्यवहार व हिंदी समजू न शकणार्‍या राज्यांना केद्र सरकारशी व्यवहार करण्यासाठी इंग्रजीचा वापर करता येईल.
(१७) प्रौढ मताधिकार
भारतीय लोकशाहीने प्रौढ मतदार पध्दतीचा स्वीकार केलेला आहे. १८ वर्षावरील सर्व स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार देण्यात आलेला. आहे निवडणूक मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. लोकसंख्या व विस्ताराच्या दृष्टीने भारतासारख्या विशाल देशात प्रौढ मताताधिराने लोकशाहीचा प्रयोग राबविण्यात येत आहे. सनदी नोकरांच्या निवडीसाठी पब्लिक सर्व्हिस कमिशन (लोकसेवा अयोग मंडळ) ची स्थापना करण्यात आली

एम.पी.एस.सी. पूर्वपरीक्षा भूगोल आणि STI स्पेशल

एम.पी.एस.सी. पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेत तसेच यू.पी.एस.सी. पूर्वपरीक्षेत भूगोलासंबंधित अभ्यासात खालील घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत-
दैनिक तापमान कक्षा- दिवसाच्या २४ तासांतील कमाल व किमान तापमानातील फरकास दैनिक तापमान कक्षा असे म्हणतात. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना दैनिक तापमान कक्षाही वाढत जाते. सागर किनाऱ्यांपेक्षा खंडांतर्गत प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त असते, तसेच वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त असते.
वार्षकि तापमान कक्षा - उन्हाळ्यातील कमाल तापमान व हिवाळ्यातील किमान तापमान यामधील तापमानाच्या फरकाला वार्षकि तापमान कक्षा असे म्हणतात. विषुववृत्ताजवळ वार्षकि तापमान कक्षेत फारसा फरक आढळत नाही. समुद्र किनाऱ्यापेक्षा खंडांतर्गत प्रदेशात वार्षकि तापमान कक्षा जास्त असते.
समताप रेषा- समान तापमान असणारी स्थळे नकाशात ज्या रेषेने जोडतात, तिला 'समताप रेषा' असे म्हणतात. या रेषा सर्वसाधारणपणे पूर्व-पश्चिम दिशेने जातात. या रेषा अक्षवृत्तास समांतर असतात.
भूपृष्ठावरील हवेच्या दाबाचे पट्टे
१) विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा (Equatorial Low  Pressure Belt) - विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंस ५० उत्तर ते ५० दक्षिण अंशांच्या दरम्यान हा कमी दाबाचा पट्टा पसरलेला आहे. या अक्षवृत्तांच्या दरम्यान वर्षभर सूर्यकिरणे जवळजवळ लंबरूप पडतात. त्यामुळे तापमान जास्त असते व हवेचा दाब कमी असतो, कारण तापलेली हवा हलकी होऊन वर जात असते. या पट्टय़ात बराच काळ हवा ही शांत असल्याने तेथे वारे वाहत नाहीत, म्हणून त्याला विषुववृत्तीय शांत पट्टा (DOLDRUM) असे म्हणतात.
विषुववृत्तीय पट्टय़ात व्यापारी वारे एकत्र येऊन नंतर त्यांना ऊध्र्वगामी हालचाल प्राप्त होते. ज्या प्रदेशात हे वारे एकत्र येतात. त्यास आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीभवन पट्टा (ITCZ) असे म्हणतात.
२) उपउष्णकटिबंधीय अधिक दाबाचा पट्टा (Sub-tropical High  Pressure Belt) - दोन्ही गोलार्धात २५० ते ३५० अंश या अक्षवृत्तांच्या दरम्यान जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. जास्त दाबाच्या निर्मितीचे कारण म्हणजे पृथ्वीच्या गतिशील शक्तीमुळे आणि हवेच्या अधोगामी प्रवाहामुळे जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो, विषुववृत्तापासून तापलेली हवा उंच जाते. तेथे ती थंड होते व खालून येणाऱ्या हवेच्या प्रवाहामुळे बाजूला फेकली जाते. नंतर ही हवा २५० ते ३०० अक्षवृत्तांच्या दरम्यान खाली येते व तेथे जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो.
अश्व अक्षांश (Horse Latitude) - कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या २५० ते ३५० उत्तर व दक्षिणदरम्यानच्या जास्त दाबाच्या पट्टय़ात हवा ही शांत असते, म्हणून या पट्टय़ाला अश्व अक्षांश असे म्हणतात.
३) उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे (Subpolar Low Pressure Belt) -  ५०० ते ६०० अक्षवृत्ताच्या दरम्यान दोन्ही गोलार्धात कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे तेथील हवा ऊध्र्व दिशेला लोटली जात असल्याने तेथे कमीचा पट्टा निर्माण होतो. दक्षिण गोलार्धात उत्तर गोलार्धाच्या मानाने पाणी जास्त असल्याने उत्तर गोलार्धापेक्षा दक्षिण गोलार्धात हा कमी वायुभाराचा प्रदेश अधिक स्थिर स्वरूपाचा असतो.
४) ध्रुवीय अधिक दाबाचा पट्टा (Polar High - Pressure Belt) - हे पट्टे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशात पसरलेले असतात. ध्रुवीय प्रदेशात तापमान कमी असल्याने तेथे अधिक दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे.
वारे
वारे प्रामुख्याने जास्त दाबाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे स्थितिसमांतर दिशेने वाहतात. पृथ्वीवर जे वारे निर्माण होतात, त्यांचे पुढील चार प्रकारांत विभाजन करता येते.
१) ग्रहीय वारे/ नित्य वारे - पृथ्वीवरील नित्य वाहणारे व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे व ध्रुवीय वारे यांचा यात समावेश होतो.
२) नियमित काळात वाहणारे वारे - ठरावीक वेळी किंवा ठरावीक ऋतूमध्ये हे वारे वाहतात, म्हणून त्यांना नियमित काळात वाहणारे वारे असे म्हणतात. उदा. खारे वारे, मतलई, मोसमी वारे
३) अनियमित वारे - वातावरणाच्या अनुकूल परिस्थितीत हे वारे वाहू लागतात, म्हणून अशा वाऱ्यांना अनियमित वारे असे म्हणतात.
४) स्थानिक वारे - काही विशिष्ट प्रदेशांत तेथील स्थानिक परिस्थितीनुसार हे वारे वाहू लागतात. उदा. फॉन, चिनुक, मिस्ट्रल, बोरा इ.
ग्रहीय वारे - पृथ्वी या ग्रहाच्या प्रदेशात हे वारे नियमितपणे वाहतात, म्हणून यांना ग्रहीय वारे असे म्हणतात. ग्रहीय वाऱ्यांचे वर्गीकरण पुढील प्रकारांत करतात-
अ) व्यापारी वारे  ब) प्रतिव्यापारी वारे  क) ध्रुवीय वारे
अ) व्यापारी वारे - उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील उपउष्णकटिबंधीय अधिक दाबाच्या पट्टय़ाकडून (२५० ते ३५० अक्षवृत्त) विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्टय़ाकडे ५० उत्तर ते ५० दक्षिण जे वारे वाहतात त्यांना 'व्यापारी वारे' असे म्हणतात.
पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे सरळ विषुववृत्ताकडे वाहत येत नाहीत. उत्तर गोलार्धात ते स्वत:च्या उजव्या बाजूस तर दक्षिण गोलार्धात ते स्वत:च्या डाव्या बाजूस वळल्याने त्यांची दिशा बदलते. ते सामान्यत: पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहू लागतात. त्यामुळे त्यांना पूर्वीय वारे (Easterlies) असे म्हणतात. हे वारे उत्तर गोलार्धात ईशान्येकडून नर्ऋत्येकडे वाहतात, तर दक्षिण गोलार्धात आग्नेयकडून वायव्येकडे वाहतात. हिवाळ्यात हे वारे अधिक नियमित व जोरदार असतात. उन्हाळ्यात इतरत्र निर्माण होणाऱ्या भारप्रदेशामुळे हे वारे थोडे कमकुवत होतात. व्यापारी वाऱ्यांचा वेग दर तासाला सुमारे १६ ते २४ किमी इतका असतो. व्यापारी वारे हे उष्ण प्रदेशाकडून वाहतात. त्यांच्यामध्ये बाष्पधारण शक्तीही वाढलेली असते, त्यामुळे खंडाच्या पूर्व भागात योग्य परिस्थिती निर्माण झाल्यास पाऊस पडतो. जसजसे हे वारे पश्चिमेकडे जातात तसतसा त्यांच्यापासून पाऊस पडत नाही.
प्रतिव्यापारी वारे/ पश्चिमी वारे - उपउष्ण कटिबंधीय अधिक दाबाच्या पट्टय़ाकडून (२५ ते ३५ अंशवृत्ताच्या दरम्यान) उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्टय़ाकडे (५० ते ६०) अक्षवृत्त यादरम्यान वाहणाऱ्या वाऱ्यांना प्रतिव्यापारी वारे असे म्हणतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे फेरेलच्या नियमानुसार आपल्या मूळ दिशेपासून विचलित होतात. त्यामुळे प्रतिव्यापारी वारे साधारणत: पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, म्हणून त्यांना पश्चिमी वारे असेदेखील म्हणतात. उत्तर गोलार्धात हे वारे नर्ऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात, तर दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयकडे वाहतात. हे वारे उष्ण प्रदेशाकडून थंड प्रदेशाकडे वाहत असल्याने वर्षभर खंडाच्या पश्चिम भागात पाऊस पडतो. या वाऱ्यांची गती व दिशा अगदीच अनिश्चित स्वरूपाची असते. कधी हे वारे मंद पद्धतीने वाहतात, तर कधी हे वारे भयानक वादळी स्वरूपात असतात. दक्षिण गोलार्धात जास्त जलभार असल्याने प्रतिव्यापारी वारे हे नियमित वाहतात.
दक्षिण गोलार्धात ४०० दक्षिण अक्षवृत्ताच्या पलीकडे भूप्रदेशाचा फारसा अडथळा नसलयाने हे वारे वेगाने वाहतात व ते विशिष्ट आवाजाची निर्मिती करतात म्हणून त्यांना गर्जणारे ४० असे म्हणतात, तर ५० अंश दक्षिणपलीकडे संपूर्ण सागरी प्रदेश असल्याने वाऱ्यांना कोणताही अडथळा राहत नाही. या भागात वाऱ्यांचा वेग वाढतो. ते उग्र स्वरूप धारण करतात, म्हणून त्यांना खवळलेले ५० वारे Furious fifty असे म्हणतात.
प्रतिव्यापारी वाऱ्यांमुळे पश्चिम कॅनडा, पश्चिम युरोप या देशांत वर्षभर नियमित पाऊस पडतो.
ध्रुवीय वारे - ध्रुवाजवळील जास्त दाबाच्या पट्टय़ाकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्टय़ाकडे (५० ते ६० अक्ष वृत्त) यांकडे जे वारे वाहतात, त्यांना ध्रुवीय वारे असे म्हणतात. ध्रुवीय वारे हे साधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, त्यांना Pollar Easterlies) असे म्हणतात.
आवर्त आणि प्रत्यावर्त
आवर्त - एखाद्या प्रदेशात केंद्रस्थानी अत्यंत कमी भार निर्माण झाल्यास व त्याभोवती सर्व दिशांनी वायुभार वाढल्यास सभोवताच्या भागातून वारे हे कमी दाबाच्या मध्यवर्ती केंद्राकडे चक्राकार गतीने वाहू लागतात, त्यांना 'आवर्त वारे' म्हणतात. उत्तर गोलार्धात आवर्त वारे घडय़ाळाच्या काटय़ाच्या विरुद्ध दिशेने वाहतात, तर दक्षिण गोलार्धात ते घडय़ाळाच्या काटय़ांच्या दिशेने वाहतात. आवर्तच्या केंद्रस्थानी असलेल्या कमी भाराच्या पट्टय़ाला चक्रीवादळाचा डोळा असे म्हणतात.
आवर्त ज्या ठिकाणी निर्माण होतात त्यावरून त्यांचे दोन प्रकार पडतात- अ) समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त
             ब) उष्णकटिबंधीय आवर्त
समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त (Temperate Cyclones - या पट्टय़ात या आवर्ताची निर्मिती होते, म्हणजे ३५० ते ६५० यादरम्यान दोन्ही गोलार्धात या आवर्ताची निर्मिती होते. या आवर्ताना मध्यकटिबंधीय आवर्त (Mid Latitude Cyclones) किंवा उष्णकटिबंधीय अतिरिक्त आवर्त (Extra Tropical Cyclones) असे म्हणतात.
वैशिष्टय़- समशीतोष्ण कटिबंधात निर्माण होणारी ही आवर्त जमिनीचा एखादा भाग अत्यंत तप्त झाल्यास तेथील हवेचा भार कमी होतो व या कमी भाराच्या केंद्राकडे वारे आकर्षलेि जाऊन समशीतोष्ण आवर्ताची निर्मिती होते. समशीतोष्ण कटिबंधातील आवर्त हिवाळ्यात जास्त प्रमाणात निर्माण होतात.
े विस्ताराच्या बाबतीत हे आवर्त विशाल असतात. या आवर्ताचा विस्तार २००० किमी इतका असू शकतो.
े समशीतोष्ण कटिबंधीय आवर्तात केंद्रभागाजवळील हवेचा दाब व कडेच्या भागातील हवेचा दाब यांच्यात फारसा फरक नसतो. हा फरक १० ते २० मि.बा. इतका आढळतो. यातील समभार रेषा एकमेकांपासून दूर गेलेल्या असतात.
े या आवर्तातील केंद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग तुलनेने कमी असतो. त्यामुळे यातून विध्वंस करणारी चक्रीवादळे निर्माण होत नाहीत. हवा एकसारखी वर ढकलली जात असलयाने ढगांची व आवर्तपर्जन्यांची निर्मिती मोठय़ा प्रमाणात होते.
े या आवर्ताच्या प्रवासाची दिशा ठरलेली असते. हे आवर्त पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करतात. प्रवासाचा वेग मात्र वेगवेगळ्या ऋतूंमध्ये बदललेला असतो.
े हे आवर्त साधारणत: लंबवर्तुळाकार असतात. या आवर्तात अग्रभागात (पूर्व भागात) पश्चिम भागापेक्षा अधिक पाऊस पडतो.
े या आवर्ताच्या पाठोपाठ प्रत्यावर्त येतात. तसेच हे आवर्त प्रामुख्याने प्रतिव्यापारी वाऱ्यांच्या क्षेत्रात वाहतात.
समशीतोष्ण कटिबंधीय आवर्ताचा प्रदेश
० उत्तर अटलांटिक क्षेत्र - हा समशीतोष्ण आवर्ताचा मुख्य प्रदेश आहे. येथे ग्रीनलंडकडून येणाऱ्या शीत वायू राशी व दक्षिणेकडून येणाऱ्या उबदार वायू राशी एकमेकांशी भिडतात. हे आवर्त उत्तर अटलांटिकमधून पश्चिम युरोपकडे वाहतात.

० उत्तर पॅसिफिक क्षेत्र - अटलांटिकप्रमाणेच येथेही अ‍ॅल्युशियनकडून पूर्वेकडे वाहणारे व कॅनडा व संयुक्त संस्थानात शिरणारे आवर्त आढळतात.
० भूमध्य सागरी क्षेत्र - आल्प्सवरील शीत हवा आणि भूमध्य समुद्रामधील उबदार हवा यामुळे या भागात समशीतोष्ण आवर्ताची निर्मिती होते.
० चीन समुद्र - हिवाळ्यात या भागात आवर्ताची निर्मिती होते. यामुळे चीनचा मध्य भाग तसेच उत्तर भाग या ठिकाणी या आवर्ताचा प्रभाव जाणवतो.
उष्णकटिबंधीय आवर्त Tropical Cyclones)
विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे ६० ते ३०० अक्षवृत्ताच्या प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्त आढळतात. समशीतोष्ण कटिबंधीय आवर्तापेक्षा उष्णकटिबंधीय आवर्ताचे स्वरूप भिन्न असते. त्यांचा विस्तार तुलनेने कमी असतो. मात्र त्यांचे स्वरूप प्रलयकारी असते. या आवर्ताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.
पश्चिम पॅसिफिकमध्ये टायफून (Typhoon), अटलांटिकमध्ये हरिकेन (Hurricane), पूर्व पॅसिफिकमध्ये बिग िवड (Big wind), फिलिपाइन्समध्ये बागुइओ (Baguio), ऑस्ट्रेलिया विली विलीस (Willy - Willies), भारतात या वादळांना चक्रीवादळे असे म्हणतात.
वैशिष्टय़े - उष्णकटिबंधीय आवर्त बहुधा ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये जास्त प्रमाणात निर्माण होतात.
० उष्णकटिबंधात निर्माण होणाऱ्या आवर्ताचा विस्तार तुलनेने कमी असतो. यांचा व्यास साधारणत: ८० ते ३२० किमी इतका असतो.
० केंद्रभागावरील हवेचा दाब व कडेच्या भागातील हवेचा दाब यांमध्ये खूप फरक असतो. या प्रकारच्या आवर्तातील समभार रेषा अगदी जवळजवळ असतात.
० चक्रीवादळांचा वाहण्याचा वेग अतिप्रचंड असतो. समुद्रावर या वादळांचा वेग जमिनीच्या मानाने जास्त असतो.
० हे आवर्त वर्तुळाकार असतात.
० या आवर्त प्रकारात तापमानात फारशी भिन्नता नसते. या आवर्तामध्ये पाऊस सर्वत्र पडतो.
० या आवर्ताच्या पाठोपाठ प्रत्यावर्त येत नाहीत.
० हे आवर्त प्रामुख्याने व्यापारी वाऱ्यांच्या क्षेत्रात म्हणजे हे आवर्त पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करतात.
उष्ण कटिबंधीय आवर्ताचे क्षेत्र
अटलांटिक समुद्रात (वेस्ट इंडिज) व संयुक्त संस्थानात फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर निर्माण होतात, ती हरिकेन या नावाने ओळखली जातात. जपान, चीन व फिलीपाइन्स बेटांच्या समूहांत पॅसिफिकमध्ये ही आवत्रे निर्माण होतात, त्यांना टायफून म्हणतात. िहदी महासागरात, ऑस्ट्रेलियाचा उत्तर किनारा, आफ्रिकेचा पूर्वकिनारा आणि भारताच्या पूर्व-पश्चिम किनाऱ्यावरही अशी आवर्ती वादळे निर्माण होतात.
प्रत्यावर्त
एखाद्या ठिकाणी जास्त भाराचा प्रदेश असेल तर त्याच्या केंद्रभागाकडून त्याच्या सर्व दिशेला वारे वाहू लागतात. या प्रकारच्या वायुभार वितरणास प्रत्यावर्त असे म्हणतात. प्रत्यावर्त हे प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधीय पट्टय़ात म्हणजे ३५० ते ६५० दरम्यान निर्माण होतात. समशीतोष्ण कटिबंधीय पट्टय़ात हिवाळ्यात भूभाग अत्यंत थंड होत असल्याने तेथे जास्त भाराचा प्रदेश निर्माण होतो व तेथील वारे बाहेर वाहू लागतात.
खारे वारे आणि मतलई वारे
खारे वारे - दिवसा सूर्याच्या उष्णतेमुळे जमीन लवकर तापते, त्या मानाने पाणी उशिरा तापते, त्यामुळे समुद्रालगतच्या जमिनीवर हवेचा दाब कमी असतो, तर समुद्रावर हवेचा दाब जास्त असतो. त्यामुळे दिवसा समुद्रावरून जमिनीकडे वारे वाहतात. त्यांना खारे वारे म्हणतात.
मतलई वारे - रात्री समुद्राच्या मानाने जमीन लवकर थंड होते आणि समुद्रातील पाणी मात्र उबदार असते. त्यामुळे सागरावर कमी वायुभार व जमिनीवर जास्त वायुभार असतो. परिणामी, जमिनीकडून पाण्याकडे वारे वाहतात. या वाऱ्यांना मतलई वारे असे म्हणतात. हे वारे थंड आणि कोरडे असतात व त्यांचा वेगदेखील मंद असतो. 

Saturday, December 27, 2014

मुख्य परीक्षेतील मराठी विषयाची तयारी



मराठी व इंग्रजी या अनिवार्य विषयांच्या अभ्यासाची तयारी कशाप्रकारे करावी, या संबंधी शक्य तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.

*****मराठी व इंग्रजी या विषयांचे स्वरूप
मराठी व इंग्रजी हे दोन्ही भाषा विषय एमपीएससी मुख्य परीक्षेसाठी अनिवार्य स्वरूपाचे असतात. म्हणजेच या प्रश्नपत्रिकेत मिळालेले गुण मुख्य परीक्षेच्या एकूण गुणांमध्ये ग्राह्य धरले जातात, हे आवर्जून सांगण्याचे कारण म्हणजे बहुसंख्य मुले एमपीएससी व यूपीएससीचा एकत्रितपणे अभ्यास करत असतात. यूपीएससी मुख्य परीक्षेला भाषा गुण हे चाळणी स्वरूपाचे असतात. या विषयांमध्ये आखून दिलेल्या मर्यादेएवढे मार्क्स मिळाल्यासच त्या उमेदवाराचे इतर प्रश्नपत्रिका तपासल्या जातात. यूपीएससीमध्ये भाषा विषयांचे गुण टोटल स्कोअरमध्ये काऊंट केले जात नाहीत. मात्र, एमपीएससी मुख्य परीक्षेत ते काऊंट केले जात असल्यामुळे प्रत्येक उमेदवाराला या विषयांचा अभ्यास गांभीर्याने करणे आवश्यक बनते. सर्वसाधारणपणे भाषा विषयांमध्ये चांगले गुण आवश्यक ठरतात.
1) वाचन, 2) लेखन, 3) सराव, 4) व्याकरणविषयक नियमांची माहिती. हा फक्त एक सर्वसाधारण अंदाज देण्यात आला आहे, हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे. आता याच बाबींविषयी थोडी विस्ताराने माहिती घेऊ.

1) वाचन : भाषा विषयांमध्ये जर तुमचे वाचन चांगले असेल तर त्याचा तुम्हाला नकळतपणे खूप फायदा होतो. अनेक उमेदवारांना फारसे कष्ट न घेताही चांगले गुण मिळतात. तेव्हा त्यांना असलेली वाचनाची आवड अत्यंत उपयोगी पडल्याचे दिसते. चांगल्या वाचनाचा तुम्हाला निबंधलेखनात वेगवेगळी उदाहरणे संदर्भ देण्यासाठी तसेच पत्रलेखनातील विविध विषय हाताळण्यासाठी फायदा होतो.

2) लेखन : अनेक उमेदवारांना वाचनाची आवड असली तरी वाचलेले, सुचलेले स्वत:च्या शब्दांत मांडणे अनेकांना कठीण जाते. अशा वेळी ज्ञान असूनही ते योग्य प्रकारे मांडता येत नसल्याने विद्यार्थी हतबल होतात. म्हणूनच भाषा विषयांची तयारी करताना लेखन हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा बनतो.

3) सराव : अनेक उमेदवारांचे वाचन खूप चांगले असते. ते शब्दांत व्यक्त करता येते. मात्र, त्यांच्यावर वेळेचे बंधन/मर्यादा लावल्यास त्यांना योग्य प्रकारे प्रश्नपत्रिकेतील निबंध, पत्रलेखन, सारांशलेखन करता येत नाही. कधी त्यांच्या विचारांचा वेग कमी पडतो तर कधी त्यांच्या लिहिण्याचा वेग कमी पडतो. म्हणूनच या दोन्ही बाबींचा सराव करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

4) व्याकरणविषयक नियमांची माहिती : अनेक उमेदवारांकडे चांगले वाचन, लेखन व सराव यांसारख्या बाबींची पूर्तता झाल्यावरही चुका आढळतात. उदाहरणार्थ, मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत मुले वेलांटी, उकार यासंदर्भात कायम गफलत करतात व प्रश्नपत्रिका चांगल्या पद्धतीने लिहूनही त्यांना चांगले गुण मिळत नाहीत.

******मराठी -विषय
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या एकूण 800 गुणांपैकी या पेपरला एकूण 100 गुण आहेत व प्रश्नपत्रिका सोडवण्याचा कालावधी 3 तासांचा आहे. या प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणा-या प्रश्नांचा स्तर हा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेला अनुसरून ठेवला जातो. या प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणा-या विविध प्रश्नांना अनुसरून आपण त्या बाबींविषयीची माहिती करून घेऊ.

1) निबंधलेखन : 
**निबंधलेखनासाठी एकूण पाच विषय दिले जातात. त्यापैकी कोणत्याही एका विषयावर 500 शब्दांचा निबंध लिहावयाचा असतो. त्यासाठी 30 गुण असतात. आधी 5 वर्षांत आलेल्या निबंधांचा अभ्यास करून त्याप्रमाणे वेगवेगळ्या विषयांवर निबंध लिहिण्याचा सराव करा. सुरुवातीला वेळ न लावता चांगल्या प्रकारे एका विशिष्ट फ्लोमध्ये काही उदाहरणे, संदर्भ वापरून लिहिता येते का? तसेच निबंधाची सुरुवात, शेवट चांगल्या प्रकारे लिहिता येतो का? हे तपासा. त्याचा सराव झाला की मग काही निबंध वेळ लावून लिहा. निबंधाचा प्रश्न घेऊ नका. निबंध सर्वात शेवटी लिहावा. कारण सुरुवातीला लेखनाचा व विचारांचा वेग थोडासा मंद असतो व त्यामुळे जर निबंध लिहायला जास्त लागला तर वेळेअभावी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न सोडवायचे राहतील. याउलट पेपरच्या शेवटाला लेखनाचा तसेच विचारांचा वेग वाढलेला असतो. त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त व चांगल्या प्रकारे निबंध लेखन होते. समजा निबंध फक 100, 200 शब्दच लिहून झाला व तितक्या शेवटची 10 मिनिटे राहिल्याची घंटा वाचली तर तो निबंध कधीच अर्धवट सोडू नये. त्याचा लगेचच योग्य शब्दांत समारोप करावा. यामुळे निबंधाला पूर्णत्व प्राप्त होते व निबंध चांगला लिहून झाला असेल तर मिळणा-या गुणांत फरक पडू शकतो.

**निबंधाची सुरुवात शक्यतोवर एखादा सुविचार, एखादी कविता, एखाद्या चित्रपटातील चार विषयांशी सुसंगत अशा अर्थपूर्ण ओळी- मग त्या गाण्यातील असतील, गझल असेल किंवा एखादा डायलॉग असेल तर त्याने करावी. तसेच नुकत्याच घडलेल्या एकाद्या घटनेचा किंवा भूतकाळातील एखाद्या प्रसिद्ध घटनेचा संदर्भ तुम्ही वापरू शकता. उदा. 2011 च्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नात ‘हुतात्मा स्मारके बोलू लागली तर’ याच निबंधात लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातील गांधीजींच्या तोंडचा डायलॉग तुम्ही खुशीने वापरू शकता. ‘माझे सगळे पुतळे पाडून टाका व मला पुतळ्यांच्या स्वरूपात ठेवण्याऐवजी स्वत:च्या मनात ठेवा.’ वरील बाबींचा वापरू करूनच तुम्ही निबंधाची शेवटही परिणामकारक करू शकता. तुम्हाला निबंधाच्या सुरुवातीला काही चांगले मुद्दे, उदाहरण आठवल्यास व ते लिहिण्याच्या ओघात विसरून जाण्याची शक्यता वाटत असेल तर ते कच्च्या कामासाठी दिलेल्या जागेवर अगदी तुम्हाला लगेच   क्लिक होईल. अशा एक-दोन शब्दांत लिहून काढावेत. निबंध लेखनात व्याकरणाच्या चुका जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा, खूप चांगली सुरुवात. शेवट व अर्थपूर्ण निबंध लिहूनही अशुद्ध लेखनामुळे गुण कमी होऊ शकतात. तुम्ही ज्या विषयावर निबंध लिहिणार आहेत, त्या विषयाचे जास्तीत जास्त ‘अ‍ॅसपेक्टस कव्हर’ करण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ आपण व्यवस्थित समजावून घेऊ. कारण अनेक उमेदवारांना सगळे ‘अ‍ॅसपेक्टस कव्हर’ करायचे म्हणजे नक्की काय करायचे? हेच समजत नाही. आपण एक उदाहरण घेऊ.

समजा तुम्हाला ‘डोंगर’ हा विषय निबंधासाठी दिला तर त्यावर किती प्रकारे विचार करता येऊ शकतो.

-    त्या डोंगराचे भौगोलिक स्थान, विस्तार.

-    त्या डोंगरावरील जीवसृष्टी (वने, झाडे, प्राणी)

-    त्याचा मानवाला होणारा उपयोग.

-    विविध ऋतूंमधील त्याचे स्वरूप इ. अशा विविध दृष्टिकोनातून तुमही विचार करू शकता.

मात्र, विविध ‘अ‍ॅसपेक्टस कव्हर’ करत असताना मुळ विषयाशी त्याची नाळ तुटता कामा नये. म्हणजेच मूळ विषयाशी तो दृष्टिकोन तुम्हाला लिंक करता आला पाहिजे.

**मराठी विषयाच्या निबंधात तुम्ही एखादे प्रसिद्ध इंग्रजी वाक्य, सुविचार वापरू शकता. मात्र, ते वापरल्यावर लगेचच पुढील परिच्छेदात त्याचा मराठी अर्थ थोडक्यात विशद करावा.

**निबंध सरळ साध्या सोप्या शब्दांत लिहावा. तुम्हाला लिहिताना सहजपणे एखादा वाक्प्रचार, एखादी म्हण किंवा नेहमीच्या शब्दांऐवजी वेगळा शब्द सुचला तर टाळावा. मात्र, जाणीवपूर्वक नाहीतर निबंधातील सहजता निघून जाते व तपासण्यास तो इरिटेटिंग वाटू शकतो व त्याचा परिणाम गुणांवर होऊ शकतो.

कृषीविषयक घटक


मत्स्योत्पादन : महाराष्ट्रात ७२० कि.मी. चा समुद्रकिनारा लाभलेला आहे. जगात माशांच्या २१,०००, भारतात १६०० व महाराष्ट्रात सुमारे ६०० जाती आढळतात.
० ठाणे जिल्ह्य़ातील डहाणू तालुक्यात शंखोदर बंदर असून आकाराने मुंबई बंदराच्या चौपट मोठे आहे. येथे पवित्र तिर्थक्षेत्र असून समुद्रात जिवंत शंख सापडतात. गोडय़ा पाण्याचे कुंड आहे. भारत सरकारला परकीय चलन मिळवून देणारा शिवंड (लॉब्सटर) मासा याच ठिकाणी आढळतो.
० महाराष्ट्राच्या भौगोलिक व नैसर्गिक परिस्थितीचा विचार करता संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत योग्य कोळंबीची जात म्हणजे जम्बो कोळंबी. याच कोळंबीला रायगड व ठाणे जिल्ह्य़ात ‘पोची’ या नावाने ओळखतात तर पश्चिम महाराष्ट्रात ‘झिंगा’ या नावाने ओळखतात. जागतिक बाजारपेठेत ही कोळंबी ‘स्कॅपी’ या नावाने ओळखली जाते.
० कोळंबीचे मुख्य गुणधर्म- प्रजननाच्या वेळी होणारे स्थलांतर, नदीच्या पात्रातून, खाडीमधून जुलै ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या हंगामात ही कोळंबी समुद्राकडे पोहत येते. खाडीच्या मुखावर ही कोळंबी थव्यांनी येताना आढळते. नदीच्या तोंडाशी, खाडीमध्ये किनाऱ्यात हिरवळीच्या आडोशाने ती आपली पिल्ले सोडतात. खाडीच्या निमखाऱ्या पाण्यामध्ये ही पिल्ले जगू शकतात. काही दिवसांनी त्याचे छोटय़ा कोळंबीत रूपांतर होते, ज्याला कोळंबी बीज म्हणतात.
० महाराष्ट्र कोळंबी बीजनिर्मिती करणारे एकमेव राज्य आहे.
० महाराष्ट्रात सद्यस्थितीत ११९ कोळंबी प्रकल्प आहेत.
० खाऱ्या पाण्यातील आढळणारे मासे- बोंबील (बॉम्बे डक), पापलेट, सुरमई, बांगडा, वाम, हैद, कोळंबी, मांदेली, शेवंड, रावस, दाढा, सौंदाढा, ताठमासा इ.
० निम खाऱ्या पाण्यातील आढळणारे मासे- जिताडा, ë2;ेणवी, थाऊनस,
बोई, झिंगे इ.
० गोडय़ा पाण्यातील मासे- कटला (विदर्भात तांबरा असे म्हणतात), रोहू, कोळंबी, चंदेरी, तिलापिया, मरळ, काणोसी, गवत्या, रावस इ.
० परदेशातून आणलेल्या जाती- स्केलकार्प, मिररकार्प, लेदरकार्प, गवत्या (ग्रासकार्प- हाँगकाँग), तिलापिया (आफ्रिका), कटला, रोहू इ.
० हेरिंग, मॅकरेल, सार्डिन, टूना या जातीचे मासे सागरपृष्ठीय मासे म्हणून ओळखले जातात.
० ग्रामीण भागात मलेरिया प्रतिबंधक म्हणून डासाच्या अळ्यांचे नियंत्रण करण्यासाठी गप्पी मासे वापरले जातात.
० हैद व तारलीचे तेल रक्तवाहिनीच्या विकारावर व हृदयविकारावर वापरले जाते.
० माश्यात आढळणारे घटक- ७० ते ८० टक्के पाणी, १६ ते २५ टक्के प्रथिने (पचनास हलके) .१ ते २.२ टक्के स्निग्ध पदार्थ, .८ ते २ टक्के क्षार व खनिज पदार्थ, अ व ड जीवनसत्त्व.
० जो मनुष्य वर्षांतून कमीत कमी ३० दिवस मासेमारी करतो, त्या व्यक्तीला मच्छिमार म्हणतात.
० संपूर्ण सागरी आर्थिक क्षेत्र म्हणजे त्या देशाच्या किनाऱ्यापासून २०० सागरी मैलपर्यंतचे क्षेत्र होय.
 भारतातील कृषी क्रांती :
हरित क्रांती - अन्नधान्य उत्पादन धवल क्रांती - दूध उत्पादनात वाढ
निल क्रांती - मत्स्योत्पादनात वाढ पित क्रांती - तेलबिया
लाल क्रांती - मांस उत्पादन रजत क्रांती - अंडी उत्पादन
सुवर्ण क्रांती - फळ उत्पादन गोल क्रांती - बटाटा उत्पादन
करडी क्रांती - खत उत्पादन
० शेतमालाच्या भावाची निश्चित पातळी ठरविण्यासाठी शासकीय पातळीवर सन १९६५ साली कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली.
० विदर्भातील शेतकऱ्यांच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीबाबत मूल्यमापन करण्यासाठी शासनाने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नियुक्त केली.
आपला भारत कृषी प्रधान देश असून शेतीमध्ये रोज १५ ते १६ तास काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा देश आहे. भारतातील व आपल्या महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. आज देशातील जवळपास ६५ ते ७० टक्के लोकसंख्या कृषी व संलग्न उद्योगांवर अवलंबून आहे. देशाच्या व राज्याच्या सर्वागीण विकासामध्ये ‘कृषी’ हा आधार मानला जातो. त्यामुळे देशातील व राज्यातील प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थ्यांना व प्रशासकाला शेतीविषयी ज्ञान असणे गरजेचे आहे.
 पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय :
० शेतीला संपूरक व्यवसाय म्हणजे पशुपालन व दुग्धव्यवसाय. सध्या दोन्ही क्षेत्रांत जगात भारताचा पहिला क्रमांक लागतो. जगाच्या एकपंचमांश पशुधन भारतामध्ये आहे. जगातील एकूण म्हशींपैकी ५३.५ टक्के म्हशी भारतात आहेत.
० भारतात सर्वात जास्त पशुधन उत्तर प्रदेशात आहे.
० भारतामध्ये पशुगणना दर पाच वर्षांनी केली जाते.
० भारतात विविध भागांतील मिळून एकूण २६ प्रकारच्या गाईंच्या जाती आहेत. गाईंच्या दुधाळ जाती- सहिवाल, गीर, लालसिंधी, थरपारकर इ.
० गाईच्या शेतीच्या कामास उपयुक्त जाती- खिलार, अमृतमहाल, नागोरी, म्हैसुरी, कंगायम;
० दूध उत्पादन व शेतीकाम दुहेरी उद्देशीय जाती- देवणी, हरियाणी, कॉकरेज (सर्वात मोठी), कृष्णाकाठी, ओंगोले, थरपारकर इ.
० गाईंच्या विदेशी जाती : जर्सी, होलस्टेन, फ्रिजिअन, ब्राऊन स्वीस, रेड डॅनिश, शार्लोटा (मांस).
० म्हशीच्या जाती- जाफराबादी (सर्वात मोठी व सर्वात जास्त दूध देणारी, भावनगरी म्हणून ओळखतात), सुरती (दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण जास्त- ८.५%), मेहसाना (सुरती व मुव्‍‌र्हा जातीच्या संकरातून निर्माण), नागपुरी, पंढरपुरी (कर्नाटकात धारवाडी म्हणून ओळखतात), निली रावी, तोडा, तराई, कालाहंडी इ.
० शेळी- गरीबाची गाय म्हणून ओळखली जाते. शेळीमध्ये रोग प्रतिकारशक्ती जास्त असते. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त शेळ्या आहेत.
० दुधाकरिता उपयुक्त देशी शेळीच्या जाती- जमुनापुरी, बारबेरी, मलबारी, झकराना.
० महाराष्ट्रातील शेळीच्या जाती- सुरती, उस्मानाबादी, संगमनेरी.
० विदेशी दुधाच्या शेळीच्या जाती- जसानेन, न्युबीयन, दमास्कस, ब्रिटिश अल्पाईन.
० अंगोरा शेळीच्या लोकरीस मोहेर म्हणतात. पश्मिना हा मऊ केसांचा थर काश्मिरी शेळीमध्ये आढळतो. शेळीचा गर्भधारणा काळ १५० दिवसांचा असतो.
० मेंढीच्या जाती- नेल्लोरे, शहाबादी, बिकानेरी, मारवाडी, चोकला, गरेझ, दख्खनी, भाकरवाल, लो 61;ी, काठियावाडी, मेरीनो (लोकरीसाठी उत्तम जात), गड्डी इ.
० कोंबडय़ांच्या जाती- ब्रह्मा (झुंजीसाठी प्रसिद्ध), व्हाईट लेग हॉर्न (जगात सर्वाधिक जास्त अंडी देणारी), ब्लॅक मिनोर्का, ऱ्होड आयलंड (मांस व अंडी देणारी)
० दुधातील घटक- पाणी, लॅक्टोज, सिरम अ‍ॅल्ब्युमिन, सिरम ग्लोब्युलिन, केसीन, नॅचरल फॅटस्, फॉस्फोलिपिडस्, कोलेस्टेरॉल, कॅल्शियम, फॉस्फोरस, सोडियम, पोटँशियम, क्लोराईड, सायट्रिक आम्ल इ.
० दुधापासून तयार केले जाणारे पदार्थ- दही, ताक, लोणी, मलई, तूप, खवा, चीज, पनीर, श्रीखंड इ.

Current Affair (#‎चालू‬ घडामोडी:- डिसेंबर २०१४)


०१) यंदाच्या यश चोप्रा स्मृती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले महानायक कोण?
== अमिताभ बच्चन
०२) स्पंदन आर्ट संस्थेतर्फे दिला जाणारा महमद रफी जीवन गौरव पुरस्कार यावर्षी कोणास प्रदान करण्यात आला आहे?
== ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर
०३) विमा क्षेत्रात FDI वाढ व कोळसा खाण वितरणासाठी ई-लिलाव पद्धती आणण्याबाबतच्या अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कधी स्वाक्षरी.केली?
== २६ डिसेंबर २०१४
०४) ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युज याच्या स्मरणार्थ एव्हरेस्टवर ठेवणार बॅट.नेण्याचा उपक्रम कोणत्या देशाची क्रिकेट संघटना राबविणार आहे?
== नेपाळ क्रिकेट संघटना
०५) सोनितपूरमध्ये बोडो अतिरेक्यांविरुद्ध आसाम रायफल्स, निमलष्करी दल आणि लष्करी जवानांची संयुक्त कारवाई सुरू केली असून या कारवाईस काय नाव देण्यात आले आहे?
== मिशन ऑल आऊट
०६) झारखंडचे नवे मुख्यमंत्री.म्हणून कोणत्या बिगरआदिवासी चेहऱ्याला प्रथमच संधी मिळत आहे?
== रघुवर दास- भाजप (जमशेदपूर पूर्व मतदारसंघ)
०७) प्रवाशांसाठी ऑनलाइन रिचार्ज सुविधा सुरु करणारी मेट्रो सेवा कोणत्या शहरात पुरविली जाणार आहे?
== मुंबई
०८) देशात वाहनचोरीमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागला आहे?
== दुसरा(पहिल्या स्थानावर उत्तर प्रदेश)
०९) सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) यांनी दिल्ली येथे माहिती तंत्रज्ञान व संचारण मंत्रालयातर्फे जगातील सर्वात आटोपशीर महासंगणक प्रणालीचे अनावरण केले.त्याचे नाव काय आहे?
== परम शावक
१०) महाराष्ट्र वीज मंडळाने आपल्या तीनही कंपन्यांमधील तमाम वीज कर्मचाऱ्यांना तीन लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे?
== ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी

Friday, December 26, 2014

(GST) जीएसटी म्हणजे काय?

मुंबई: देशात जीएसटी नामक एक नवी करप्रणाली लागू करण्याबाबतचे विधेयक लोकसभेत मंजूरीसाठी मांडण्यात आले आहे. जर प्रस्तावित जीएसटी करप्रणाली देशात लागू केली गेली तर प्रत्येक वस्तू किंवा सेवेसाठी एकच कर भरावा लागणार आहे. याचा अर्थ वॅट, एक्साईज आणि सर्विस टॅक्सच्या जागी एकच टॅक्स द्यावा लागणार आहे. एप्रिल 2016 पासून हा टॅक्स लागू करण्याचा प्रयत्न करकारकडून केला जात आहे.
जीएसटीमुळे देशातील करप्रणालीचं स्वरूप बदलणार-
जीएसटी लागू झाल्यानंतर केंद्र सरकारला एक्साईज ड्यूटी, सर्विस टॅक्स या माध्यामतून मिळाणारा कर बंद होणार आहे. राज्यांना मिळणारा वॅट, मनोरंजन कर, लक्झरी टॅक्स, लॉटरी टॅक्स, एंट्री टॅक्स आदी टॅक्स बंद होणार आहेत. दरम्यान पेट्रोल, डीझेल, रॉकेल, एलपीजी गॅस यासारख्या वस्तूंवर लागणारे कर आणखी काही वर्षे लागू राहणार आहेत.

सामान्य माणसाला जीएसटीचा काय फायदा-
जीएसटी लागू झाल्यानंतर याचा सर्वात जास्त फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे. कारण जीएसटी लागू झाल्यानंतर देशभरात सर्व वस्तूंचे दर समान असणार आहेत. मग ती कोणत्याही राज्यात खरेदी केली तरी. त्यामुळे नागरिकांनी स्वस्त माल खरेदी करण्यासाठी दुसऱ्या शहरात जाण्याची गरज भासणार आहे.
जीएसटीमुळे टॅक्समधूनही दिलासा-
आपण सध्या साहित्य खरेदी करताना 30 ते 35 टक्के रक्कम कराच्या रूपाने देतो. मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर ती रक्कम 20 ते 25 टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे.
उद्योजक आणि व्यावसायिकांना जीएसटीचा फायदा काय?
जीएसटी लागू झाल्यानंतर कंपन्यांची झंझट आणि खर्च बराच आटोक्यात येणार आहे. तसंच व्यापाऱ्यांना आपले साहित्य एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यास फायदा होणार आहे. जीएसटीमुळे वेगवेगळे कर भरावे लागणार नाहीत त्यामुळे वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.
सर्व राज्यांनी जीएसटी कसा मान्य केला-
जीएसटी आल्यावर राज्याला कराद्वारे मिळणारे उत्पन्न घटण्याची भिती सर्वच राज्यांना होती. खासकरून पेट्रोल, डिझेलवर अनेक राज्यांचं अर्ध बजेट अवलंबून आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलमधून मिळणारा कर आगामी काही वर्षे राज्यांना मिळणार आहे. तसंच यामुळं होणारं राज्य सरकारचं नुकसान केंद्र सरकार भरून काढणार आहे. याशिवाय जीएसटीद्वारे मिळणारा कर राज्य आणि केंद्र सरकार ठरलेल्या टक्केवारीनुसार वाटून घेणार आहे.
अर्थव्यवस्थेसाठी जीएसटीचा काय फायदा-
जीएसटी लागू झाल्यानंतर टॅक्स चोरी सारखे प्रकार बंद होतील. त्याचा थेट परिणाम देशाच्या जीडीपीवर होणार ....

Preparation of MPSC: interview preparation(तयारी एमपीएससीची: मुलाखतीची तयारी)

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल अलीकडेच जाहीर झाला. यशस्वी उमेदवारांचे मनापासून अभिनंदन! मुलाखतीतले गुण हे अंतिम यादीत स्थान प्राप्त करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात, हे लक्षात असू द्या.
मुलाखतीच्या संदर्भात उमेदवारांमध्ये अनेक गैरसमज असतात- उदा. उमेदवाराचे दिसणे महत्त्वाचे ठरते, अमूक एका पद्धतीचा पेहराव केलेला असावा, पाठ केल्यासारखी उत्तरे देणे योग्य, उत्तरे सरकारी धोरणांनाच अनुकूल होती अशी द्यावीत.. हे सारे तद्दन गैरसमज आहेत. एक मात्र नक्की की, मुलाखतीची नीट तयारी करणे आवश्यक आहे. तसेच मुलाखतीला जाताना नेटकेपणाने, टापटीपीने जाणे आवश्यक असते.
मुलाखतीला सामोरे जाताना आपण आहोत त्याहून वेगळे आहोत असा न दाखवता, जसे आहोत तसे पॅनलला सामोरे गेलेले उत्तम! त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आतापर्यंत संपादन केलेल्या ज्ञानाच्या आधारावर, खोटेपणाचा आव न आणता, प्रामाणिकपणे उत्तर देणे म्हणजे मुलाखत. मुलाखत म्हणजे ज्ञानाची परीक्षा नव्हे, कारण तुमच्या ज्ञानाची परीक्षा ही मुख्य परीक्षेतच झालेली असते. मुलाखतीत उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी होत असते. आपल्याला एखादी गोष्ट माहीत असण्यापेक्षा आपले ज्ञान इतरांसमोर कसे मांडता याला जास्त महत्त्व असते.
मुलाखत म्हणजे खेळाचा अंतिम सामना! मागच्या काही वर्षांचा आणि विद्यार्थिसंख्येचा अंदाज पाहता साधारणत: ३० ते ४० मिनिटे मुलाखत घेतली जाते. (अर्थात असा काही नियम नाही) यापकी, पॅनलने आपल्याला प्रश्न विचारायचा वेळ वजा केल्यास उमेदवाराच्या वाटय़ाला फक्त २०-२५ मिनिटे येतात. या २०-२५ मिनिटांत उमेदवाराला स्वत:ला सिद्ध
करायचे असते.
प्रत्येकाची मुलाखत वेळेनुसार, प्रसंगानुसार वेगवेगळी असते. मात्र तयारी करताना खालील गोष्टी लक्षात ठेवल्यास उपयोग होईल.
* वैयक्तिक माहिती- आपले नाव, नावाचा अर्थ, ते नाव इतिहासाशी संबंधित असेल तर त्या संदर्भाबद्दल थोडी माहिती, उदा. एखाद्याचे नाव शिवाजी असेल किंवा एखाद्याचे नाव सचिन असेल तर त्याबाबतचे संदर्भ तयार करून ठेवावेत. वडिलांचे नाव, आडनाव, आडनावाचा इतिहास, आईचे नाव, जन्मतारीख, जन्मतारखेचा ऐतिहासिक संदर्भ, आपले गाव, गावाची माहिती, शाळा, महाविद्यालयाची माहिती, त्या शाळेतून एखादे विशेष व्यक्तिमत्त्व घडले असेल तर त्यांची माहिती, आपण शिकत असलेल्या संस्थेची माहिती, वडिलांच्या व्यवसायाची माहिती.
* शैक्षणिक पाश्र्वभूमी- आपण पदवी ज्या विद्याशाखेत घेतली असेल, त्यासंबंधी प्रश्न नक्की विचारले जातात. तयारीत असावे. पदवी परीक्षेत किंवा त्याआधी आपल्याला किती गुण मिळाले आहेत, याचा परिणाम मुलाखतीवर होत नाही, हेही लक्षात घ्या. समजा, शिक्षण घेताना एखाद्या वर्षी गॅप असेल किंवा नापास झालेले असाल तरी त्याचा परिणाम होत नाही. मात्र, उमेदवार त्या प्रश्नांची उत्तरे कशी देतो यावर बरेचसे
अवलंबून असते. कुठे नोकरीला असाल किंवा प्रशासनात काम करत असाल तर त्या विभागाची माहिती नक्की मिळवा.
* वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच शेतकी विद्याशाखेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी- जे विद्यार्थी व्यावसायिक महाविद्यालयांत शिक्षण घेतात, त्यांनी- आपण ते क्षेत्र सोडून प्रशासनात का येऊ इच्छितो, याचे व्यवस्थित उत्तर तयार करावे. उत्तर सकारात्मक असावे. अभियांत्रिकीला सध्या वाव नाही, अनेक विद्यार्थी बेरोजगार आहेत, आयुष्याला स्थिरता मिळावी, यासाठी प्रशासनात येऊ इच्छितो.. असे उत्तर देऊ नये. डॉक्टर्स, तसेच शेतकी विद्याशाखेतील विद्यार्थ्यांवर खर्च केलेला सरकारचा पसा वाया जातो, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, (कोणत्याही शाखेचे शिक्षण वाया जात नाही. घेतलेल्या शिक्षणाचा फायदा नक्कीच प्रशासनात होऊ शकतो. या आशयाचे उत्तर तयार करावे.)
* आपण प्रशासनात का येऊ इच्छिता?
या प्रश्नाचे उत्तर सर्वानीच तयार करून ठेवावे, उत्तर प्रामाणिक असावे. जरी आपल्याला भ्रष्टाचाराची चीड असेल, प्रशासनातील कामांबाबत तुमच्या मनात नाराजी असेल तरी शक्यतो टोकाचे उत्तर देणे टाळावे. देश बदलायचा आहे. प्रशासनात खूप सुधारणा घडवून आणावयाच्या आहेत, महाराष्ट्रातील भ्रष्टाचार संपवून टाकायचा आहे असे म्हणण्याऐवजी प्रशासनात नवीन आव्हाने पेलण्याची संधी मिळते, मानसन्मान मिळतो, स्थिरता मिळते या आशयाचे तुमचे स्वत:चे उत्तर तयार करा.
* आपले गाव, तालुका, प्रशासकीय विभाग यासंदर्भात प्रश्न- आपण ज्या ठिकाणहून आला आहात- उदा. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण इ. या भागांच्या समस्या उदा. पाण्याची समस्या अवकाळी पावसाची समस्या इ. या प्रदेशातील लोकप्रतिनिधी, मंत्री याची माहिती या प्रदेशातील व्यवसाय, पेहराव या प्रदेशाचे किंवा गावाचे, ऐतिहासिक महत्त्व इ. विषयांची तयारी करून ठेवावी.
* सेवा प्राधान्यक्रमाची माहिती- पसंतीक्रमावर असलेल्या कमीत कमी पहिल्या पाच सेवांची माहिती, त्या खात्याची रचना, ती सेवा नेमकी काय आहे? इ. घटकांची तयारी करावी.
* केस स्टडी संदर्भात प्रश्न- बऱ्याच वेळा मुलाखतीदरम्यान, एखादी परिस्थिती देऊन त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदा. िहदू, मुस्लीम दंगल उसळली तर..? एखाद्या प्रदेशात प्रंचड गारपीठ झाली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशा वेळी आपण काय कराल? आपण ज्या ठिकाणी नेमणुकीवर आहात तेथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या रोखण्यासाठी आपण काय प्रयत्न कराल? इ. अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा प्रश्नांची यादी तयार करून सकारात्मक उत्तरे
तयार ठेवावीत.
* छंदांविषयी प्रश्न- तुमचा छंद, तुमची आवड यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रत्येकाला छंद असेलच असे नाही. परंतु, एखादा छंद आपण नमूद केलेला असेल तर त्यासंबंधित तयारी करा. उदा. विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहणे हा छंद नमूद केलेला असतो. अलीकडेच पाहिलेल्या चित्रपटाविषयी त्याला काहीच माहीत नसते, एवढी वरवरची तयारी करून जाऊ नये. चित्रपटातील दिग्दर्शक, अभिनेते, आपण पाहिलेले काही चित्रपट, त्यातील संगीतकार इत्यादी माहिती तयार करावी. काही विद्यार्थ्यांचा छंद वाचणे हा असतो- त्यावेळी आपण अलीकडेच वाचलेली पुस्तके, त्यांचे लेखक, साहित्याचा प्रकार, साहित्य संमेलने इ. विषयी माहिती असणे आवश्यक आहे.
* महिला उमेदवारांसाठी- उमेदवार जर महिला असेल तर काही प्रश्न नक्की विचारले जाण्याची शक्यता आहे. उदा. महिलांच्या समस्या, महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिला अधिकारी म्हणून आपण कसे काम कराल? आपल्या घरापासून दूर बदली झाली तर आपण काम
कराल का? असे काही प्रश्न विचारण्याची शक्यता असते. या प्रश्नांचे तुमचे उत्तर
प्रामाणिक असावे.
* चालू घडामोडींविषयी प्रश्न- मुलाखतीला जाताना आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या राजकीय, सामाजिक घटनांची माहिती आपल्याला असणे अपेक्षित आहे. त्यांची एक यादी तयार करून उत्तरे तयार ठेवा. मुलाखतीच्या दिवशी वृत्तपत्रांतील महत्त्वाच्या बातम्या- किमान ठळक मथळे तरी नक्की वाचा.
मुलाखतीची तयारी कशी कराल?
व्यक्तिमत्त्व काही एका दिवसात घडत नाही. त्यासाठी वर्षांनुवर्षांची तपश्चर्या आवश्यक असते. कोणत्याही प्रश्नासाठी सज्ज राहा. आपली मुलाखत चांगलीच होणार आहे, आपल्याला मिळालेल्या वेळात आपण सर्वोत्तम कामगिरी करणार आहोत, असा सकारात्मक विचार करूनच मुलाखतीला सामोरे जा.
* तीन-चार मित्रांचा ग्रुप तयार करून त्यांना पॅनल समजून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी करा. सध्या मोबाइलमध्येच व्हिडिओचित्रण करण्याची सुविधा आहे. त्याचा वापर करून आपण बोलतो कसे, आपण कुठे चुकलो, याचा विचार करून तयारी करा.
* जर आपण अभिरूप मुलाखती (Mock Interview) देणार असाल तर वरिष्ठांनी किंवा प्रशिक्षकांनी सांगितलेल्या सूचनांचे नक्कीच पालन करा. मात्र त्यांनी सांगितलेली उत्तरेच तुम्ही सांगायला हवीत, असे नाही आणि तशीच उत्तरे सांगून तुम्हाला जास्त गुण मिळतील असेही मुळीच नाही. कारण त्या दिवशी वरिष्ठांनी सांगितलेली उत्तरेच जर इतर विद्यार्थी देत असतील तर आपण कोणीतरी उत्तरे तयार करून दिलेली आहेत व तशीच उत्तरे तुम्ही देत आहात, याचा चुकीचा प्रभाव पॅनलवर पडून कमी गुण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची स्वत:ची उत्तरे स्वत: तयार करा. असे केल्यास आपल्याला जास्त गुण मिळण्याची शक्यता आहे.
मुलाखतीला जाताना..
* वेळेच्या अगोदर पोहोचा.
* मुलाखतकाराने प्रश्नांनी सुरुवात केली तरी त्या प्रश्नाचे उत्तर देऊन झाल्यावर अधुनमधून मुलाखतीचे वातावरण हलकेफुलके राहील याची काळजी घ्या. त्याकरता चेहऱ्यावर स्मित असणे आवश्यक आहे.
* मुलाखत सुरू असताना स्वत:कडे लक्ष असू द्या. नकळत कोणत्याही हालचाली अथवा कृत्य करू नका. जसे पाय हलवणे, पेनाचा सारखा कट कट असा आवाज करीत राहणे, प्रश्न विचारणाऱ्याकडे न पाहता शून्यात बघणे, चेहऱ्यावर प्रसन्न भाव नसणे, खूप आरामशीर बसणे या सगळ्या छोटय़ा छोटय़ा हालचालींचा अनेकदा विपरीत परिणाम होऊ शकतो.
* खूप सहज आणि रिलॅक्स आहोत असे दाखविण्यासाठी जाणूनबुजून विनोदी बोलण्यासारखे कृत्य टाळा.
* प्रश्न काय विचारला आहे ते नीट समजून घ्या. तो समजून घेण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. त्यात गर काहीही नाही. प्रश्न न समजता हवेत उत्तरे देऊ नका.
* मुलाखतीदरम्यान स्वत:शी ठाम असणे फार महत्त्वाचे आहे. कधी तरी मुलाखत ही अचानक एकदम मोकळ्या वातावरणात होऊ लागते तर कधी काहीही कारण नसताना एकदम तणाव उत्पन्न होतो. प्रश्नांचे सूर बदलतात, पण तुम्ही मात्र कायम स्वत:बरोबर राहा. त्यातून तुम्हाला स्वत:चा ठामपणा सिद्ध करता येतो.